मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना |Mukhyamantri Teerth Darshan Yojana.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana

Mukhyamantri Teerth Darshan Yojana

Mukhyamantri Teerth Darshan Yojana “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” जेष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी हि योजना राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र सरकार Maharashtra Government सामन्य जनतेसाठी नेहमी योजना राबवत असते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे’ यांनी एक नविन योजनेची घोषणा केली आहे, ती योजना म्हणजे ” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ” आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्रातील व देशातील तीर्थस्थानाचे दर्शन अगदी मोफत घेता येणार या योजनेअंतर्गत या योजनेचा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना लाभ होणार आहे.

भारतात खुप मोठ्या प्रमाणात महत्वाच्या तीर्थस्थान आहेत, तर महाराष्ट्रात पण खुप मोठ्या प्रमाणात तीर्थस्थळ आहेत, महाराष्ट्र धार्मिक स्थळांच्या बाबतीत भारतात प्रसिद्ध आहे, तर धार्मिक नागरिकांच्या बाबतीत अग्रेसर आहे. भारतात विविध धर्माचे व विविध पंथाचे लोक राहतात,भारत देशात विविध धर्माचे विविध तीर्थस्थळ आहेत. महाराष्ट्र हा धार्मिक लोकांच्या बाबतीत खुप प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्राची ओळख ही संताची भूमी म्हणून केली जाते, महाराष्ट्राला साधु संताची खुप मोठे योगदान लाभले आहे,राज्यात खुप साधु संत होऊ गेले महाराष्ट्र साधुसंताची पुण्य भूमी आहे. महाराष्ट्राची ओळख ही राज्यात होणाऱ्या मोठ्या मोठ्या याञा जशी पंढरपूर ची वारी आषाढी एकादशीनिमित्त होणारी ही वारी देशात व जगात प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रात विविध महान संत होवुन गेले व धार्मिक गुरू आहेत महाराष्ट्रात तर प्रसिद्ध आहेतच पण बाहेर खुप प्रसिद्ध आहेत,त्यांचा विचारांचा वारसा महाराष्ट्रात आणि भारतात जपला जातो ,भारताच्या सीमा ओलाांडून झाला असून साधुसंताची एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते.

महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाची, धार्मिक संस्कृतीची आणि भक्ती मार्गाची अनेक वर्षांची परांपरा लाभली आहे.अनेक धर्माचे लोक आपआपल्या मार्गाने धर्मकार्य व समाजकार्य करीत असतात. भक्ती हा एकमेव धार्मिक मार्ग आहे, असे समजतात व आपल्या दैनंदिन जीवनात भगवंताचे नाम स्मरण करणे, भक्ती करणे, भगवंताचे विचार रुजु घालणे हे कर्तव्य नेटक्या पद्धतीने पार पाडत असतात.

देशात खुप मोठ्या प्रमाणात धार्मिक आस्था आहे, त्या महाराष्ट्र अग्रेसर आहे, धर्माबद्दलची ही आस्था, भावना, भक्ती करुन त्यांना तीर्थस्थळांना जाण्यास आनंद होतो,भारतात आणि महाराष्ट्रात खुप मोठी मोठी तीर्थस्थळे आहेत.

भारत देश हा संस्कृती परंपरेने नटलेली आहे, भारताला खुप मोठा संस्कृतीक वारसा लाभला आहे,खुप लोकांची इच्छा असते तीर्थस्थळांना भेट देण्याची पण सामान्य गोरगरीब, सर्वसामान्य कुटुांबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळेच त्यांना जात शक्य होत नाही व कोणी व्यक्ती सोबत नसल्याने आणि त्या तीर्थ स्थानां बद्दल योग्य आणि पुरेशी माहीती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे व तीर्थस्थळनां भेट देण्याचे स्वप्न पूर्ण होत नाहि.

सदर जेष्ठ नागरिका बाबतची अडचण लक्षात घेऊन सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थानाना जाऊन भेट देऊन भक्ती मार्ग दर्शन घेऊन तसेच आनंदी होऊन पुण्य गाठावे यासाठी देशातील व राज्यातील सर्वधर्मातील ज्येष्ठ नागरिकांना Mukhyamantri Teerth Darshan Yojana या योजनेचा फायदा व्हावा यासाठीच राज्य सरकारकडून ही योजना राबवली जात आहे.

राज्यातील सर्वधर्मातील ज्येष्ठ नागरिक ज्यांच वय हे ६० वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना या योजनेचा नक्की फायदा होणार भारतातील तीर्थस्थानाना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” Mukhyamantri Teerth Darshan Yojana सुरु करण्यात आली आहे. ह्या योजनेचे एकच उद्दिष्ट आहे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना अगदी फ्री मध्ये तीर्थयात्रा उपलब्ध करुन देणे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजनेत राज्यातील एकूण ६६ तीर्थक्षेत्राचा समावेश आहे. Yojana in Marathi

१] सिद्धीविनायक मंदीर – मुंबई२] महालक्ष्मी मंदिर -मुंबई ३] डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर – मुंबई ४] माऊंट मेरी चर्च (वांर्द्रे) – मुंबई ५] मुंबादेवी मंदीर- मुंबई ६] वाळकेश्वर मंदिर मलबार हिल- मुंबई ७] विश्व विपश्यना पॅगोडा गोराई -मुंबई ८] चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, कॅवेल-मुंबई ९] सेंट अँड्र्यू चर्च- मुंबई १०] सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, सीझ औद्योगिक क्षेत्र अंधेरी -मुंबई

११] सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च , मरोळ- मुंबई१२] गोदीजी पाश्वर्त मंदिर – मुंबई १३] नेसेट एलियाहू, सिनेगॉग ,फोर्ट-मुंबई १४] शार हरहमीम सिनेगॉग , मस्जिद भांडार-मुंबई १५] मॅगेन डेव्हिड सिनेगॉग (भायखळा) , भायखळा-मुंबई १६] सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च- ठाणे१७] अग्यारी-अग्निमंदिर -ठाणे१८] मयुरेश्वर मंदिर , मोरगाव- पुणे १९] चिंतामणी मंदिर , थेऊर-पुणे २०] गिराजात्मज मंदिर , लेण्याद्री-पुणे

२१] महागणपती मंदीर , रांजणगाव-पुणे २२]खांडोबा मंदीर , जेजुरी -पुणे२३] संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर , आळंदी-पुणे२४] भीमाशंकर ज्योतिर्लिंग,खेड -पुणे२५]संत तुकाराम महाराज समाधी मंदिर , देहू-पुणे २६] संत चोखामेळा समाधी , पंढरपूर-सोलापूर२७] संत सावतामाळी समाधी मंदिर अरण ता. माढा -सोलापूर२८] विठ्ठल रुक्मिणी मंदिर , पंढरपूर-सोलापूर २९] शिखर शिंगणापूर-सातारा३०] महालक्ष्मी मंदिर -कोल्हापूर

३१]जोतिबा मंदिर-कोल्हापूर३२] जैन मंदिर, कुांभोज-कोल्हापूर ३३] रेणुका देवी मंदीर, माहूर- नांदेड ३४] गुरुगोविंदसिंग समाधी -नांदेड३५] खंडोबा मंदिर ,मालेगाव- नांदेड ३६] संत नामदेव देवस्थान, उंब्रज-नांदेड ३७] तुळजाभवानी मंदिर ,तुळजापूर-धाराशिव ३८] संत एकनाथ समाधी ,पैठण- छञपती संभाजीनगर ३९]घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वेरूळ-छञपती संभाजीनगर ४०] जैन स्मारके,वेरूळ लेणी- -छञपती संभाजीनगर

४१] विघ्नेश्वर, ओझर-नाशिक ४२] संत निवृत्तीनाथ समाधी – नाशिक४३] त्र्यंबकेश्वर मंदिर,ञ्यंबकेश्वर-नाशिक, ४४] सप्तशृंगी,वणी- नाशिक४५] काळाराम मंदिर-नाशिक४६] मांगी-तुंगी जैन मंदिरे-नाशिक४५] गजपंथ -नाशिक४७] सिद्धिविनायक मंदिर-अहमदनगर ४८] शनी शिंगणापूर, अहमदनगर ४९] साईबाबा मंदिर शिर्डी – अहमदनगर ५०]श्रीक्षेत्र भगवानगड, पाथर्डी – अहमदनगर नगर५१] बल्लाळेश्वर मंदीर पाली- रायगड ५२] गजानन महाराज मंदिर ,शेगाव- बुलढाणा ५३] एकवीरा देवी,कार्ले- पुणे५४] दत्त मंदिर ,औदुंबर- सांगली ५५] केदारेश्वर मंदिर-बीड५६] वैजनाथ मंदिर, परळी- बीड ५७] गणपतीपुळे- रत्नागिरी ५८]मार्लेश्वर -रत्नागिरी५९] महाकाली देवी- चंद्रपूर६०] काळूबाई मंदिर- सातारा६१] अष्टदशभुज रामटेक-नागपूर ६२] नागपूर दीक्षाभूमी- नागपूर ६३] चिंतामणी कळंब- यवतमाळ६४]पावस – रत्नागिरी६५]मुक्तिधाम – नाशिक६६] संत नामदेव महाराज देवस्थान,उंब्रज-नांदेड

सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे, तीर्थस्थानांची यादी असेल,त्या यादीमध्ये तीर्थ स्थळांची वाढ होऊ शकते कमी होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निवडलेल्या तीर्थस्थाना पैकी एका तीर्थ स्थळांच्या यात्रेकरीता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळच लाभ घेता येईल.तसेच त्या व्यक्तीचा खर्च, जेवन , प्रवास भाडे, राहण्यास व्यवस्था इत्यादींचा समावेश असेल.

योजनेचा लाभार्थी : महाराष्ट्र राज्यातील ६० वर्ष वय असलेले व ६० पेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक.लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नाही असले पाहीजे व त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार नसावे , ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.अशा कुटुंबांना या मुख्यमंत्र्याच्या योजनेअंतर्गत मध्ये लाभ मिळणार नाही.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील महत्त्वाचे मुद्दे :

१]लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

२] लाभार्थ्यांचे वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक या योजनेत पाञ असेल.

३] लाभार्थ्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

४] यादीत असलेल्या तीर्थस्थळांपैकी एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार.

५]लाभार्थ्यांसाठी प्रवास खर्चाची मर्यादा प्रती व्यक्ती तीस हजार असेल.

६] यामध्ये याञेकरूचे जेवनाची सोय व राहण्याची सोय इत्यादी बाबींचा समावेश

७] कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.

८] कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार आहेत, अशा कुटुंबांना लाभ नाही.

९] ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहन असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

१०] प्रवासासाठी लाभार्थी हा शारिरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावा जसे की टीबी, हृदयाशी संबधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोरसस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी.

११] लाभार्थी हा पुर्ण पणे शारीरिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या निरोगी आसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :

१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज

२) लाभार्थ्यांचे आधार कार्ड/रेशनकार्ड

३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐर्जी त्या लाभार्थ्यांचे १५ वर्षापूर्वीचे .

४) रेशनकार्ड व

५) मतदार ओळखपत्र

६) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टि.सी )

७) जन्म दाखला, या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल

८) कुटुंबातील कुटुंब प्रमुखाांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापयंत असणे अवश्यक ) किंवा पिवळे रेशनकार्ड / केशरी रेशनकार्ड.

९) वैद्यकिय प्रमाणपत्र.(७) पासपोर्ट आकाराचा फोटो.

१०) जवळच्या एखाद्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमाांक.

११)सदर योजनेच्या अटी र्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.