Bsnl Is Back|ग्रामीण भागात पोहोचलेल बीएसएनएल परत 4G नेटवर्क घेऊन.

Bsnl is back.

Bsnl is back

Bsnl is back खाजगी कंपनीच्या वाढत्या रिचार्ज दर पाहता बीएसएनएल 4G नेटवर्क सह आणि अगदी स्वस्त दरात रिचार्ज प्लॅन घेऊन परत येतोय.

बीएसएनएल केंद्र सरकारच्या मालकीची येणारी दूरसंचार Telecom कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली आहे, सुरवातीपासून बीएसएनएल ग्रामीण भागात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. देशाच्या गाव खेड्यात एकमेकात संवाद झाला पाहीजे आणि एक सुविधा भेटली पाहीजे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.भारत सरकार ने गाव तिथे बीएसएनएल यासाठी कारण भारत सरकारला बीएसएनएल गाव खेड्यात पोहचायच होत, लोकांना लोकांसोबत जोडायच होत.

भारतातील खुप मोठी दूरसंचार कंपनी आहे.एक कालावधी होता जेव्हा बीएसएनएलची एक हाती सत्ता होती, त्या काळात त्यान मार्केट गाजवल होत, जेव्हापासून काही खाजगी कंपन्या बाजारात आल्या पण एक नेटवर्क घेऊन तेव्हापासून कुठेतरीच दिसत आहे, खाजगी टेलिकॉम कंपन्या पुढे बीएसएनएल टिकु शकल नाही, आणि त्याचा उतार काळसुरू झाला.

तेव्हापासून बीएसएनएल आपल्याच अस्तित्वासाठी झगडत आहे, आपल्या विश्वासु ग्राहकांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे, गाव खेड्यात जेव्हा कोणती च टेलिकॉम दूरसंचार कंपनी नव्हती तेव्हा बीएसएनएल गाव खेड्या पर्यंत पोहचल होत, आता ही खुप ठिकाणी आजही बीएसएनएल चे नेटवर्क अस्तित्वात आहे.पण काही कालावधी नंतर नेटवर्क कनेक्शन च्या सेवा मुळे ते मागे पडल , एका काळी अख्ख मार्केट गाजवलेल बीएसएनएल आता मागे पडल, पण आता इतर कंपन्याच्या रिचार्ज प्लॅन वाढल्यावर काही टेलिकॉम दूरसंचार कंपन्यांनी आपल्या रिचार्ज च्या तुलनेत 25% टक्क्याने वाढ केली आहे.

बीएसएनएल मार्केट मध्ये आल्यावर टेलिकॉम दूरसंचार कंपन्याच्या स्पर्धेत वाढ होईल आणि याचा इतर खाजगी कपन्यावर परिमाण होईल, बीएसएनएल नविन 4G नेटवर्क सोबत स्वस्त प्लॅन परत मार्केट मध्ये येतोय सोबतच टीसीएस ने त्याला हातभार लावला आहे,भारतीय ग्राहक याना परवडेल असा प्लॅन कमीत कमी मध्ये घेऊन येतोय, बीएसएनएल ची याआधी 2G, 3G नेटवर्क आहे पण आता सोबतच 4G नेटवर्क घेऊन येणार आहे,काही ग्राहक अजुनही 3G,4G सेवा वापरतात त्यामुळे बीएसएनएल ला नक्कीच फायदा आहे.

अलिकडे मोबाईल, संगणक वापरणे काळाची गरज आहे ,त्याशिवाय विविध सेवा सुविधा सुलभ होणार नाहीत फार कठीण जाणार पण मोबाईल आणि संगणक तेंव्हाच कामाचे जेव्हा टेलिकॉम दूरसंचार कंपनी चे नेटवर्क कनेक्शन चांगल असेल तरच त्याचा उपयोग होणार , इंटरनेट हा मानवी जीवनाचा एक भाग बनला आहे करमणुकी च्या गोष्टी पासुन ते कामाच्या गोष्टी पर्यंत सर्व काही इंटरनेट नेटवर्क कनेक्शन चांगल असेल तर शक्य आहे.

जेव्हा खाजगी टेलिकॉम दूरसंचार कंपन्यांची मक्तेदारी वाढल्याने ग्राहकांना त्यांचा वाढत चाललेला दर ही सोसावा लागतो त्याच कारण म्हणजे अनेक खाजगी कंपन्याचे कर्मचारी वर्क फॉर्म होम करतात, हे सर्व काम एक चांगल्या 4G,5G नेटवर्क शिवाय अशक्य आहे त्यामुळेच या खाजगी कंपन्यांनी वाढ केलेल्या दरा ला सोसव लागते आणि बीएसएनएल टेलिकॉम दूरसंचार कंपनी चांगल व स्वस्त परवडेल अस नेटवर्क कनेक्शन घेऊन येईल याच प्रतिक्षेत आहेत.

खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ Jio आणि एअरटेलने Airtel , वोडाफोन आयडिया Vi अलीकडेच मोबाईल रिचार्ज वाढ केल्यानंतर सर्वसामान्य लोकं बीएसएनएलकडे वळताना म्हणजे बीएसएनएल मध्ये इतर कंपन्यांचे सिमकार्ड पोर्ट करत आहेत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि बीएसएनएलमधील करारामुळे खासगी टेलिकॉम कंपन्यांचे परेशानीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

बीएसएनएल खेड्यापाड्यात जलद इंटरनेट देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे व गाव खेड्यात पोहोचण्यास समर्थ आहे.आता भारतातील टाटा कंपनीने बीएसएनएल ला साथ दिल्यान नक्कीच भारताच्या कानाकोपऱ्यात बीएसएनएल चे नेटवर्क 4G देण्याचा प्रयत्न करेल. आणि सुरवातीच्या काळापासून बीएसएनएल गाव खेड्यापर्यंतप्रयत्न करत आहे , पूर्वीच्या दळणवळण विभागाच्याटाटा आणि बीएसएनएल मिळुन एक हजार गावामध्ये 4G इंटरनेट सुविधा देणार , भारताला जवळ येणाऱ्या दिवसांमध्ये लवकरच फास्ट स्पीड इंटरनेट सुविधा सेवा देणार आसल्याच सांगीतल आहे.

दूरसंचार सेवा आणि नेटवर्क प्रदान करण्याचा व्यवसाय ताब्यात घेण्याच्या उद्देशाने भारत संचार निगम लिमिटेड ची सुरवात करण्यात आली आहे.भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल ही एक भारतीय केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे दूरसंचार विभागाच्या मार्फत आहे, Bharat Sanchar Nigam limited भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाचा भाग आहे,काही कालावधीत बीएसएनएल खुप प्रमाणात चालत होते, तसे त्याचे ग्राहक पण खुप होत, पण अखेर सावकाश त्याच्या नेटवर्क स्थिती मुळेच अनेक ग्राहक इतर खाजगी कंपन्याकडे वळले खाजगी कंपन्याचे नेटवर्क अगदी चांगल्या प्रकारे काम करायचे म्हणून पण अखेरीस कंपनीला खाजगी टेलिकॉम कंपन्याच्या प्रतिस्पर्ध्यांशी बीएसएनएल ला स्पर्धा करता आली नाही.

रिचार्ज मूल्याच्या बाबतीत बीएसएनएल खुप स्वस्त आहे इतर कंपन्यांच्या बाबतीत, इंटरनेट गती च्या बाबतीत बीएसएनएल मागे आहे. व्होडाफोन आयडिया, एअरटेल आणि इतर कंपन्या त्यांच्या प्राथमिक गरजा म्हणून करमणुकीत स्वारस्य असलेल्यांसाठी चांगली योजना प्रदान करतात पण आता बीएसएनएल सुद्धा चांगल्या प्रकारे नेटवर्क कनेक्शन देण्याच्या तयारीत आहे, इतर सिमकार्ड चे रिचार्ज प्लॅन खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, म्हणून देशातील ग्राहक आता बीएसएनएल ला सपोर्ट करत आहे.टाटा आणि बीएसएनएल मिळुन एक हजार गावामध्ये 4G इंटरनेट सुविधा देणार , भारताला जवळ येणाऱ्या दिवसांमध्ये लवकरच फास्ट स्पीड इंटरनेट सुविधा सेवा बीएसएनएल देणार आसल्याच सांगीतल आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आता बीएसएनएल सोबत पंधरा हजार कोटींच्या करारात सहभाग भागीदारी केली आहे,Tata consultancy देशभरात मोठी बीएसएनएल डेटा केंद्रे स्थापन करणार आहे. इतर दूरसंचार कंपन्यांच्या नेटवर्क वाढत असताना, टाटा अधिक विश्वासार्ह इंटरनेट सेवा देण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि अधिकाधिक डिजिटल सेवाना प्राधान्य देत आहे.जिओ, एअरटेल सोबतच वोडाफोन आयडिया याने आपल्या रिचार्ज किंमती वाढवल्या म्हणून ग्राहक आता बीएसएनएल कडे एका उमेदीनं बघत आहेत गाव-खेड्यात पोहोचलेल्या बीएसएनएल आता परत येणार एक चांगल नेटवर्क कनेक्शन घेऊन .

कारण यात रतन टाटा ने भागीदारी केली आहे तर बीएसएनएल एका नव्या उमेदीने येईल सर्व ग्राहकांना आशा आहे.सध्या सोशल मीडियावर बीएसएनएल ट्रेडिंग वर आहे, Port to bsnl या टॅगवर लोक बीएसएनएल ला सपोर्ट करत आहेत. या सर्वात सामन्य ग्राहकाचा विश्वाश आहे कि बीएसएनएल आणि टीसीएस मिळुन टेलिकॉम दूरसंचार क्षेत्रात चांगल काम करतील