T20 captain Suryakumar Yadav
T20 captain Suryakumar Yadav भारत श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव टि-२० मध्ये संघाचा कर्णधार असेल,सूर्यकुमार यादव हा एकदिवसीय संघाचा तो भाग नसेल.
गौतम गंभीर हा भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर खुप काही बदल करण्यात आले आहे तुम्ही भारतीय संघाच्या कर्णधार पदात मोठा बदल पाहिला असेल, पण आता तुम्हाला आणखी एक बदल पाहायला मिळणार आहे की, संजू सॅमसनची संघात निवड झाली होती पण तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता पण यावेळी तुम्हाला ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्याने खऱ्या प्रतिभेला योग्य स्थान मिळेल.
कोणत्याही व्यक्तिमध्ये कितीही आत्मविश्वास कौशल्य असु द्या पण तो व्यक्ती तेव्हाचा यशस्वी होऊ शकतो जेंव्हा त्या व्यक्तीला त्याच कौशल्य टॅलेंट दाखवायचा एक संधी भेटली पाहीजे गौतम गंभीर एक असे नाव आहे ज्याने सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav ला नेहमीच संधी दिली आहे . कोलकाता नाईट रायडर्स मध्ये आसताना गौतम गंभीर स्वता कप्तान असताना सूर्यकुमार ला उप कप्तान बनवले. रोहित शर्मासाठी संपूर्ण टीममध्ये सर्वात जवळ आहे तो सूर्यकुमार आहे, त्या सूर्यकुमार ला आज त्याच्या कौशल्या च्या जोरावर .
सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाच नेतृत्त्व करु शकतो .तो टिम इंडीया चा मोठा खेळाडु आहे आता सूर्यकुमार यादव च्या टॅलेंटला खरच आज ओळखल आहे.सूर्यकुमार हा जगातील सर्वोत्तम T20 फलंदाज मानला जाऊ शकतो, पुर्ण जगामध्ये त्याचे चाहते आहेत, आणि २०२४ टि-२० विश्वविजेता टीममध्ये सूर्यकुमार यादव ची कामगिरी संपुर्ण क्रिकेट प्रेमींनी पाहीली आहे. परंतु त्याच्या एक दिवशीय ODI षटकांच्या खेळाबद्दल असेच म्हणता येणार नाही कारण त्याने खेळलेल्या ३७ एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्यकुमार ची फलंदाजाची सरासरी फक्त २५.७६ आहे. यात त्याचा सर्वोच्च स्कोर ७६ आहे त्यात चार वेळा फिफ्टी केली आहे आणि खेळण्याच्या आणि धावा काढण्याचा वेग हळूहळू वाढवण्याच्या क्षमतेवर आहे.
सूर्यकुमार यादव हा टी-२० मध्ये खुप चांगल्या पध्दतीने खेळतो तसे त्याच्याकडे कौशल्य आहे. आयपीएल मध्ये पण मुंबई इंडियन्स संघाकडून त्याची कामगिरी महत्वपूर्ण आहे.भारतीय टी-२० मध्ये सूर्यकुमार यादव ची खेळी खुप महत्वपूर्ण ठरते. टी-२० मध्ये आतापर्यंत ६८ सामने खेळला आहे व सर्वोच्च खेळी ११७ धावांची आहे,तर चार शतक व एकोणीस अर्धशतके त्याच्या नावावर आहेत.सर्व सामन्यात फलंदाजाची सरासरी ही ४३.३३ आहे.सूर्यकुमार यादव हा टी-२० मधील सर्वोत्तम खेळाडू आहे.
हार्दिक पांड्या कडे क्रिकेटमध्ये भारताचा प्रमुख सीम-बॉलिंग अष्टपैलू खेळाडू आहे पण तो श्रीलंकेविरुद्धच्या खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय संघाचा व मालिकेचा भाग नाही. पण, तो श्रीलंकेविरुद्धच्या खेळल्या जाणाऱ्या टि-२० संघाचा भाग आहे.टि-२० वर्ल्डकप मध्ये हार्दिक पांड्याची भूमिका खुप मोलाची होती, रोहीत शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तीन महत्वपूर्ण खेळाडूंनी टि-२० वर्ल्डकप नंतर टि-२० क्रिकेट मधुन निवृत्त घेतली आहे, तर भारतीय संघाचा नविन कप्तान कोण होणार सोशल मीडियावर चर्चा होत होती. टि-२० कर्णधार रोहित शर्मा निवृत्त घेतल्या नंतर सोशल मीडियावर कर्णधार पदासाठी हार्दिक पांड्या होईल ही चर्चा रंगत होती. त्याने काही सामन्यात कर्णधाराची भूमिका घेतली होती त्यामुळे चर्चा होत होती.
रविंद्र जडेजा हा श्रीलंकेविरुद्धच्या खेळल्या जाणाऱ्या टि-२० आणि एकदिवसीय संघाचा भाग नाही. एकदिवसीय लंकेविरुद्धच्या संघाचा रोहित शर्मा कर्णधार आहे तर भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिल उपकर्णधार आहे.रियान परागला श्रीलंकेविरुद्धच्या खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय ODI आणि टी-२० या दोन्ही संघात स्थान मिळाले आहे तर संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल हे फक्त T20I संघाचा भाग असतील. रियान परागला श्रीलंकेच्या २०२४ च्या श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी संघात समाविष्ट केल्यानंतर एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात प्रथमच संधी मिळाली.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रियान पराग Riyan Parag २७ जुलै रोजी पहिल्या टि-२० T20 सामन्यात भारतीय संघात प्रथमच पदार्पण कर आहे.भारत श्रीलंका मालिकेसाठी टि-२० आणि एकदिवसीय सामन्यात रियान पराग हा एक असा खेळाडू आहे ज्याला धावा मिळू शकतात. पराग हा केवळ क्रमवारीत एक महत्त्वपूर्ण फलंदाज नाही तर त्याच्याकडे काही षटके टाकण्याची कौशल्य देखील आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये, अष्टपैलू खेळाडू म्हणून रियान परागची सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल त्याच्या कौशल्यांना स्पष्ट करत आहे. गेल्या काही सामन्यात त्याने सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. भारतीय संघाला त्याचा नक्कीच फायदा होणार श्रीलंका मालिकेच्या दोन्ही संघाचा भाग आहे.
हर्षित राणा हा अष्टपैलू खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची निवड झाली आहे उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि वेगवान गोलंदाजी करतो. त्याने २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले २०२४ मध्ये कोलकता नाईट रायडर्स खेळला आहे .आता २०२४ मध्ये भारतीय संघात एकदिवसीय ODI पदार्पण करणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा हर्षित राणा भाग आहे. सूर्यकुमार यादव हा त्या टि-२० च्या उत्तम कामगिरी मुळे श्रीलंकेविरुद्धच्या टि-२० संघाचा कर्णधार केले आहे भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिल उप कर्णधार आहे .
सूर्यकुमार यादव हा टि-२० स्फोटक फलंदाज आहे.सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav टी-२० संघाचा नवीन कर्णधार असेल. तर शुभमन गिल उपकर्णधार म्हणून नियुक्त.
टी-२० मधून निवृत्त झालेले रोहित आणि विराट एकदिवसीय संघात खेळत राहतील.
रियान पराग, हर्षित राणा एकदिवसीय संघातील नवे चेहरे असतील.
टी-२० संघात कुलदीप आणि चहल यांचा समावेश नाही.
ऋतुराज गायकवाडला मागच्या टि-२० मालिका मध्ये चांगली करुन पुन्हा एकदा दोन्ही संघातून डावलले आहे.
टी-२० मधून निवृत्त झालेल्या रविंद्र जडेजाला एकदिवसीय ODI मध्ये स्थान नाही.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ निवड झाली.
टि-२० संघ :
सूर्यकुमार यादव ( कर्णधार ), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक ), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघ :
रोहित शर्मा ( कर्णधार ), शुभमन गिल ( उपकर्णधार ), विराट कोहली, केएल राहुल ( यष्टिरक्षक ), ऋषभ पंत ( यष्टिरक्षक ), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.