Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024| बांधकाम कामगार योजना.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाणारी बांधकाम कामगार योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे जाणुन घ्या संपुर्ण माहीती.

महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध प्रकारच्या योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. बांधकाम कामगारांसाठी एक कामाची चांगली परिस्थिती निर्माण करणे व त्यांचा व्यक्तीगत विचार करत रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शासनामार्फत शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे.

महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहे जो स्वतःच्या कामावर मजुरीवर त्याचा घर चालवतो काही कामगारांना जवळपास आपल्या शहरात काम भेटते तर काही कामगारांना स्वतःच घर दार सोडुन दुर कामाला जाव लागत घरापासून दूर आसताना ऊनात व पावसात कसल्याही स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सतत काम करत असतात बांधकाम क्षेत्रातील कामगारांना कमीत कमी मजुरीवर/पगारात काम करत असतात त्यामुळे कामगार व्यक्तीची आर्थिक परिस्थिती नाजुकीची असते व त्यामुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्या दररोजच्या आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी खूप सगळ्या समस्यांना तोंड दयाव लागते.

तसेच कामगारांना काम करताना कामगारा जवळ सेफ्टी किट उपलब्ध नसल्याने त्यांना विविध समस्या उद्भवत असतात व आचानक होणाऱ्या अपघातांचा धोका आसतो ज्यामध्ये कामगारांना अयुष्यभरच शारीरिक अपंगत्व येऊ शकते तर काही वेळा त्यांच्या जिवाला धोका आसतो मृत्यू देखील होऊ शकतो व एखाद्या घरातील कमावणारी सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी व्यक्ती एकाएकी शारीरिक अपंगत्व व मृत्यु होऊन जाण्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते व महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील बांधकाम कामगाराच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने १ मे २०११ रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली.

बांधकाम कामगार योजना Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांच्या आर्थिक व त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक मदत ,कामगारांची सुरक्षा, कामगाराचा विमा , कामगारांना मानधन ,सामाजिक सुरक्षा, आरोग्यविषयक व शैक्षणिक ज्याचा लाभ कामगाराच्या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत यांनी यासारख्या मदतीबद्दल विचार केला आहे.महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार हे राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावत आसतात .कामगार हे रस्ते, इमारती, पूल आणि इतर अनेक बांधकाम प्रकल्पांवर काम करतात व कामगार क्षेत्रात काम हे कठीण आणि धोकादायक असते.राज्यातील पायाभरणी साठी कामगारांचा खुप मोठा मोलाचा वाट कामगारामुळे खुप मोठे मोठे काम अगदी सहज पणे पुर्ण होते. Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024

कामगार हा मजुरीवर काम करणारा नसुन राज्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.महाराष्ट्रातील बांधकाम कामगारां मध्ये व्यक्ती म्हणून पुरुष आणि महिला हे दोघेही कामगार क्षेत्रात खुप महत्वपूर्ण भूमिका निभावतात त्या हे दोघंही समाविष्ट आसतात.आणि विविध पार्श्वभूमीतून येतात जास्तीत जास्त राज्यातील ग्रामीण भाग आहे आणि अनेकदा राज्याच्या ग्रामीण भागातून कामाच्या रोजगारासाठी स्थलांतर करतात. बांधकाम कामगारांना अनेकदा कमी मोबदला आणि त्यांना मिळणारी असुरक्षित कामाच्या परिस्थितीचा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना सामाजिक सुरक्षा आणि इतर कामगार क्षेत्रात मिळणार्‍या फायद्यांपासूनही त्याना दुर ठेवले जाते.महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांचे संरक्षण आणि त्यांचे कल्याण वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.

महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सारख्या संस्थांची स्थापना समाविष्ट आहे. ते मंडळ महाराष्ट्र कामगारांसाठी मंडळामार्फत विविध क्षेत्रातील बांधकाम कामगारां साठी विविध कल्याणकारी योजना राबवत आसते व महाराष्ट्र कामगारांसाठी मंडळामार्फत विविध क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंद केली जाते तसेच त्यांना सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच आर्थिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात व अनेक योजनांचा लाभही दिला जातो.

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्टे : Bandhkam Kamgar Yojana

• महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य त्याच्यासाठी आर्थिक व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.

• कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे.

• रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे.

• सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य करणे.

•ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण.बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करणे.लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत सुलभपणा आणणे.

• कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.

• बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणेव कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.

• प्रत्येक बांधकाम कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक देणे.नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकृत अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी प्रगत विश्लेषण.बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना पुढील प्रमाणे :सामाजिक सुरक्षा योजना.

• कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य कल्याणकारी योजनेअंतर्गत • बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य बांधकाम कल्याणकारी योजनेअंतर्गत

• कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना

• प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

• प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.

• अटल पेन्शन योजना लाभ

• बांधकाम कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर

• सुविधाकौशल्यवृद्धी योजना लाभबांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ

• नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा.

• प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना

• घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना

• कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहलबांधकाम कामगार स्मार्ट कार्ड.

शैक्षणिक योजना कल्याणकारी योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे :

• परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती

• क्रीडा शिष्यवृत्ती योजना

• साहित्य प्रकाशन अनुदान योजना

• इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी २५००/- रुपयांचे आर्थिक सहाय्यता.

• इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातील शिकत आसलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५०००/- रुपयांची आर्थिक मदत .

• इयत्ता दहावी व इयत्ता १२ वी मध्ये किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास १००००/- रुपयांचे आर्थिक सहाय्यता.

• इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी १००००/- रुपयाचे आर्थिक सहाय्यता.

•कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी २००००/- रुपयांचे आर्थिक सहाय्यता.

•कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी १ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्यता •वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी ६०००००/- रुपये आर्थिक सहाय्यता.

•शासनमान्यता पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी २००००/- रुपयांचे आर्थिक सहाय्यता .

• शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी २५०००/- रुपयाचे आर्थिक सहाय्यता.

•नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन मुलांस MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्तीबांधकाम.

•कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींसाठी शिष्यवृत्ती योजना कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्यता.

• बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्तीसर्वसाधारण शिष्यवृत्तीकामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरणबांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट देण्यात येत आहे.

आरोग्य विषयक योजना :

• नैसर्गिक प्रसूतीसाठी १५०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्यगंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता देण्यात येणार आहे.

•या योजनेत शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी २००००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी)•लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी २ लाखाचे आर्थिक सहाय्यता.

• एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १ लाख रुपये मुदत ठेव बंद •अपघातात कामगाराला ७५ टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास २ लाख रुपयाची आर्थिक मदत.

• महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ.

• कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरतीच्या कालावधीत त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक मदत कामगारांना.

• जननी विमा योजनेचा लाभनोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणीव्यसनमुक्ती करीता निधी.

कल्याणकारी योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे आर्थिक योजना :

•आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्यकामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास ५ लाखाचे आर्थिक सहाय्यशिवण मशीन अनुदान योजनाबांधकाम कामगार पेटी योजनाकामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास २ लाखाचे आर्थिक सहाय्यअनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ मिळणार.

•अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत २ लाखाचे अर्थसहाय्यअटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २ लाखाचे अर्थ सहाय्य ५० ते ६० वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता १० हजारांचे रुपयांचे मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा महिला कामगाराच्या विधुर पतीस ५ वर्षाकरिता २४ हजाराचे आर्थिक सहाय्यता.

•नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्यबांधकाम कामगारांना बोनस सुविधाबांधकाम कामगारांना सायकल वाटपसाहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्यबांधकाम कामगारांना सुरक्षा संच चा लाभबांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभबांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरणकामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजनाअटल बांधकाम कामगार आवास योजनावाहन चालक प्रशिक्षण योजना.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अनेक योजना आहेत.उदा. सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना,आरोग्य विषयक योजना, अर्थसाह्य योजना इ.परंतु कामगारांना कामगार म्हणून नोंदणी कशी व कुठे करायची याबाबत माहिती नाही.

बाधकाम कामगार नोंदणीची पाञता :

१] कामगार १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावा.

२]गेल्या १२ महिन्यांत कामगाराने ९० दिवसांपेक्षा जास्त काळ काम केले पाहिजे.

३]नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे बोर्डमध्ये नोंदणी करण्यासाठी, फॉर्म -V भरावा लागेल आणि खालील कागदपत्रांसह सबमिट करावा लागेल.

१. वयाचा पुरावा २.९० दिवस कामाचे प्रमाणपत्र ३. रहिवासी पुरावा ४. ओळख पुरावा ५. ३ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे नोंदणी शुल्क- रु. २५/- आणि वार्षिक वर्गणी ५ वर्षांसाठी रु. ६०/- आणि मासिक वर्गणी रु.

५.बांधकाम कामगार महामंडळात कामगार Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 म्हणून नोंदणी करण्यासाठी मागील वर्षात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्ही ठेकेदार, ग्रामसेवक, नगरपालिका, मनपा द्वारे प्राधिकृत केलेल्या अधिकारीचे पत्र यापैकी एक लागते. Online form भरण्यासाठी लिंक- mahabocw.in बांधकाम कामगार योजना 

या योजने अंतर्गत इतर काही आधिक माहिती हवी आसल्यास महाराष्ट्र राज्य शासन बांधकाम कामगार योजना या आधिकृत वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता .