Annabhau Sathe information in marathi | अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहीती थोडक्यात.

Annabhau Sathe information in marathi

Annabhau Sathe information in marathi

Annabhau Sathe information in marathi लोकशाहीर अण्णा भाऊ साठे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक यांच्याबद्दल माहीती थोडक्यात जाणून घेऊया.

भारतात अनेक प्रभावशाली साहित्यिक व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले आहेत. त्यांचे विचार व अनेक कार्य खुप महत्वपूर्ण आहेत. त्याच सामाजिक जडणघडणीतील एक व्यक्तीमत्व म्हणजेच अण्णा भाऊ साठे आहेत. मराठीतील सर्वसमावेशक अण्णा भाऊ साठे यांच्या माहीतीचा शोध भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक भूदृश्‍यावर अमिट छाप सोडणाऱ्या माणसाचे जीवन आणि वारसा याकडे घेऊन जातो.

अण्णा भाऊ साठे Annabhau Sathe हे साहित्य, संगीत आणि सामाजिक कार्याच्या जगात एक अग्रगण्य प्रकाश होते, त्यांनी समुदायांच्या संघर्षांना संबोधित करण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर केला होता. जातीय पदानुक्रमाने आणि आर्थिक विषमतेने ग्रासलेल्या समाजात, अण्णाभाऊ साठे हे आशेचे किरण उभे राहीले.अण्णा भाऊ साठे हे फक्त एक लेखकच नव्हते, तर ते एक समाजसुधारक, एक क्रांतिकारी आणि एक दलितांचा श्रमिकांचा कामगारांचा आवाज होते. त्यांनी त्यांच्या बर्‍यांच लेखनातून कादंबर्‍या मधून त्यांनी दलित समाजाच्या समस्या, शोषण आणि अत्याचारांवर प्रकाश टाकला.अण्णा भाऊ साठे यांचे काही साहित्य हे परिवर्तनाला दिशा देणारे व चालना देणारे ठरले आहे.महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीत आणि परिवर्तनात अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातले त्यांचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे.

महाराष्ट्र राज्यातील अण्णा भाऊ साठे एक भारतीय लोककवी, लेखक, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. आजही महाराष्ट्र आणि देशात, जगभरात मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या साहित्याचा संशोधनातून अभ्यास करताना दिसतात. त्याचे साहित्य व सामाजिक योगदान हे खुप मोठे आहे. त्यांच्या कादंबर्‍या व सामाजिक विचार या सर्वाचा आभ्यास संशोधनात्मक आभ्यास राज्य व देश पातळीवर केला जातो.अण्णा भाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लेखक, साहित्यिक, लोककवी, कादंबरीकार होते.

अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी थोडक्यात:Annabhau Sathe information in marathi

अण्णा भाऊ साठे यांच पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ आगस्ट १९२० रोजी सागली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावात झाला. त्याच्या आईचे नाव वालुबाई व वडीलांचे भाऊराव होते.अण्णा भाऊ साठे यांनी दोन लग्न केली होती . त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्य होती त्यात एक मूलगा आणि दोन मुली त्यांचे नावे मधुकर, शांता आणि शकुंतला होते .जातिव्यवस्था,गरीबी आणि भेद भावामुळे अण्णा भाऊंना शिक्षण घेता आले नाही. अवघ्या दिड दिवस शाळा शिकलेल्या अण्णा भाऊंनी आपल्या लेखनितुन साहित्य क्षेत्रात अनेक प्रचंड कामगिरी केली.तसेच ते लोकशाहीर म्हणून नावलौकिक झाले आण्णा भाऊ साठे यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते.

तरीही त्यांनी अनेक कथा व कादंबरीचे लेखन केले होते. त्यांना पोवाडे व लावणी रचणारे ‘शाहिर’ म्हणून ओळखले जाते. त्यांची “मुंबई ची लावणी व माझी मैना गावावर राहीली ” या लावण्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी लेखन केलेल्या कादंबरीवर चित्रपट देखील तयार करण्यात आला होता.त्यांनि ३५ कादंबरया, १३कथासंग्रह १० प्रसिद्ध पोवाडे, पटकथा,लावणी यांची निर्मिती केली.’फकिरा’ ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी आहे. या कादंबरीला राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरी म्हणून गौरवण्यात आले होते.

त्यांची ‘वैजयंती’ ही कादंबरी तमाशात ज्या स्त्रिया पहिल्यांदा काम करतात, त्यांचे लोक कसे शोषण करतात हे चित्रित करते. त्यांची ‘माकडांची चाळ’ ही कादंबरी भटक्या विमुक्त जातींचे चित्रण करते. अण्णाभाऊ साठे यांनी तमाशा या लोक कलेस लोकनाट्य असा दर्जा प्राप्त करून दिला. त्यांनी आपल्या साहित्यातून लोकजागृती केली होती. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी त्यांनी विशेष योगदान दिले होते.

त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून गोवा मुक्ती संग्रामामध्ये विशेष सहभाग घेतला. १८ जुलै १९६९ रोजी अण्णाभाऊ साठे या थोर समाजसुधारकाने या जगाचा कायमचा निरोप घेतला. साठे यांच्या साहित्यकृतींनी जातो आधारित भेदभाव, आर्थिक विषमता आणि सामाजिक अन्याय यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांना टाळले. हे विषय अण्णा भाऊ साठे यांच्यासाठी अत्यंत वैयक्तिक होते, त्यांनी उपेक्षित समाजात वाढलेल्या अनुभवातून रेखाटले होते.अण्णा भाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. या चळवळीने पश्चिम भारतात स्वतंत्र मराठी भाषिका साठी राज्य निर्माण करण्यासाठीचा पुरस्कार केला. ही मोहीम यशस्वी पण झाली, ज्यामुळे आज महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे.

थोर असे आण्णा भाऊ साठे यानी रशियात जाऊन छञपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे ते पहिले भारतीय होते.अण्णा भाऊ साठे यानी अनेक कथा,कादंबर्‍या, पोवाडे,लावणी यांची निर्मिती केली आहे.अण्णा भाऊ साठे एक समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. दलितांमधील होणारी तगमग त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला अण्णा भाऊ साठे Annabhau Sathe यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता, पण नंतर ते मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारसरणी कडे वळले. भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे , तरीही फण उच्चवर्णीयांचे राहिलेले वर्चस्व अण्णा भाऊ यांना हे मान्य नव्हते. त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी बाॅम्बे ( मुंबई ) येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला. “ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!” अशी या काढलेल्या मोर्चा मधील घोषणा होती.

अण्णा भाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा अनुसरण करत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभव व्यक्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कथांचा वापर केला आहे . १९५८ मध्ये, बाॅम्बे म्हणजेच आजची येथे मुंबई मध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषण करताना अण्णा भाऊ म्हणाले की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे”  दलित आणि श्रमिक कामगार यांच्या समृद्घीचे हिताचे स्वप्न अण्णा भाऊ पाहात आले होते .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी त्यांच्या मनावर खोलवर कोरलेली होती. अण्णा भाऊ यांनी गीत लिहल होत म्हणजे आहे ‘जग बदल घालुनी घाव। सांगूनि गेले मज भीमराव॥’ हे त्यांचे गीत खूप प्रसिद्ध आहे ते खुप गाजले होत . आत्ताही त्याची ती ओळ ओठात आहे. लिहिलेल्या लावण्यांत ‘माझी मैना गावावर राहिली’ आणि ‘मुंबईची लावणी’ या आणि अविस्मरणीय लावणी आहे. ह्या लावण्या खुप प्रसिद्ध आहेत.

अण्णा भाऊ साठे याच्या काही प्रमुख कादंबर्‍या.

1) परदेशी: ही त्यांची पहिली कादंबरी. यातून त्यांनी दलित समाजाच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे चित्र स्पष्ट केले आहे.

2) वैजयंता: ही कादंबरी एका दलित मुलीच्या आयुष्यावर आधारलेली आहे. यातून त्यांनी जातिय व्यवस्थेतील असमानता आणि महिलांच्या समस्या यांवर वक्तव्य केले आहे.

3) आवडी: ही कादंबरी एका दलित व्यक्तीची ची प्रेम कथा आहे. यातून त्यांनी समाजातील जातीय भेदभाव आणि प्रेमाच्या याबद्दल सांगीतल आहे.

4) माकडीचा माळ: ही कादंबरी ग्रामीण भागातील आयुष्यात येणाऱ्या समस्या आणि शोषण यांवर आधारित आहे.

5) चिखलातील कमळ: या कादंबरीत त्यांनी देव दासी जी एक प्रथा होती त्या प्रथेवर टीका केलेली आहे. 6) वारणेचा वाघ: ही कादंबरी एका बंडखोर व्यक्तीच्या आयुष्याच्या आधारावर आहे.

7) अलगूज: ही कादंबरी एका गावच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीच्या वास्तव वाचे आवलोकन करते.

8) फकिरा: अण्णा भाऊ यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी. यातून त्यांनी दलित समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे वास्तववादी चित्र स्पष्ट केले आहे.

अण्णा भाऊ साठे Annabhau Sathe च्यां लेखनावर आधारित काही चित्रपट :1)वैजयंता ही एक साठे यांची कादंबरी आहे यावर चिञपट आहे.2)टिळा लावते मी रक्ताचा हा चित्रपट “आवडी ” कादंबरीवर आधारित आहे.3)डोंगरची मैना हा चित्रपट “माकडीचा माळ” कादंबरी यावर चिञपट आहे.4)मुरली मल्हारीरायाची हा चित्रपट “चिखलातील कमळ” ह्या कादंबरीतून आहे.5)वारणेचा वाघ हा चित्रपट वारणेचा वाघ ह्या कादंबरीवर आहे.6)अशी ही साताऱ्याची तऱ्हा “अलगूज” या कादंबरीवर आहे.7)फकिरा हा चित्रपट “फकिरा” कादंबरीवर आहे.

अण्णा भाऊंच्या साहित्याचे महत्त्व हे खुप मोठे माझ्या सारख्या व्यक्तीला झेपणार नाही अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य दलित साहित्य पायाभूत दगड समजला जातो. त्यांच्या लेखनामुळे दलित समाजाला एक आवाज मिळाला आहे. म्हणून पत्येक गावात त्यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते कादंबर्‍यांनी दलित समाजातील उद्भवणाऱ समस्यांबद्दल एक जागरुकता निर्माण केली आहे. त्यांचे साहित्य आजही खुप प्रासंगिक आणि प्रसिद्ध आहे.अण्णा भाऊंच्या साहित्याचे अनुभव घेण्यासाठी आपल्याकडे मोबाईल, कम्प्युटर, त्यांची चर्चीत पुस्तके प्रेरणा देण्ण्णायासारखी आहेत अण्णा भाऊ साठे Annabhau Sathe यांच्या साहित्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या कादंबऱ्या, कथा, नाटक वाचू शकता. त्यांच्यावर आधारित पुस्तके आणि लेखन वाचू शकता. त्यांच्याबद्दल इंटरनेटवर शोध घेऊ शकता. त्यांच्यावर आधारित चित्रपट पाहू शकता. सगळ काही उपलब्ध आहे.

या लेखात अण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल थोडक्यात व्यक्त होण्याचा शब्दात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. अण्णा भाऊ साठे साहित्य व सामाजिक प्रश्नांवर प्रश्न करणारा एक बुलंद आवाज होता. नक्कीच त्यांच्या कादंबर्‍या, कथा, पोवाडा व इतर लेखनाचा अनुभव घ्यावा. म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांच पुस्तक साहित्य म्हणजे काय आहे एक लेखन नसुन एक आवाज आहे अनुभवातून वास्तव बद्द्ल काही ओळी तर खुप प्रसिद्ध आहेत.अण्णा भाऊ साठे हे खुप मोठ्या विचारसरणीतच व्यक्तीमत्व होत आहे. त्यांना शब्दात मांडता येणार नाही.