mukhyamantri annapurna yojana 2024 | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंची संपुर्ण माहिती.

mukhyamantri annapurna yojana 2024

mukhyamantri annapurna yojana 2024

mukhyamantri annapurna yojana 2024 “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ” या योजने अंतर्गत राज्यातील पाञ महिलांना दर वर्षाला मिळणार मोफत तीन गॅस सिलिंडर.

Yojana in Marathi आपल्या महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची घोषणा आहे .घरगुती गॅस सिलिंडरच्या बाबतीत प्रमाणात आहे. या निर्णयामुळे राज्यातील बर्‍याच कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तर आपण आज या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहूया.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासननाने वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ सुरू केली आहे. सामान्यांना आधार देणारा हा निर्णय महिलांच हितासाठी व सक्षमीकरणाच्या दृष्टीने देखील महत्वाचे निर्णय आहे.महाराष्ट्रात “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्यात आली आहे. या योजनेचे निकषही निश्चित करण्यात आले असून, बँक खात्यात शासनामार्फत प्रणाली द्वारे पैसे जमा केले जाणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा mukhyamantri annapurna yojana उद्देश महाराष्ट्र राज्यतील आर्थिक दृष्ट्या मागस कुटुंबा साठी ही मोफत योजना आहे या योजनेअंतर्गत आशा कुटुंबांना एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणार आहे.महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार ने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकी काही दिवसा आधीच निवडणुक पार पाडली आहे .तर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महिला, तरुण व शेतकरी यांच्या साठी बर्‍याच योजना जनकल्याण हेतूसाठी सर्व सामान्य जनतेला आधार देण्यासाठी अनेक योजना जाहीर केले आहेत. पाच जणांच्या व्यक्तीच्या कुटुंबाला महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने मार्फत प्रति वर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणे अपेक्षित आहे . योजनेबद्दल आणि लाभ कसा मिळवावा याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्य सरकारन मार्फत  “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” सुरू केली आहे या योजने अंतर्गत पाच व्यक्तीच्या कुटुंबाला प्रति वर्ष मोफत गॅस सिलिंडर प्रति वर्ष तीन गॅस सिलिंडर मिळणार आहेत. ज्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर आहे व आर्थिक दृष्ट्या मागास आहे ज्यांना गरज आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह साठी मदत होईल अशा कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी ही राज्य सरकार ने ही  योजना सुरू केली आहे.

देशातील महिलांच्या हितासाठी आरोग्य साठी धुरमुक्त वातावरणात वावरता यावे, यासाठी देशातील आर्थिक परिस्थिती मागसलेल्या कुटुंबांना स्वयंपाक करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवणे , तसेच मागास व गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यात सुधारणा करुन महिलांना सशक्त व सक्षम करणे , या उद्देशाने भारत सरकार कडून “प्रधानमंत्री उज्ज्वला योजना” वर्ष २०१६ मध्ये सुरु करण्यात आली आहे.” प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे.

महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच, योजने च्या व्यतिरिक्त अन्य गरीब व मागास प्रवर्गातील गॅसजोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅसजोडण्यांचे पुनभगरण करणे शक्य नाही कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक स्वरूपाची आसते म्हणुन आर्थिक दृष्ट्या गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नाही. तसेच, एक गॅस सिलिंडर संपल्यानंतर दुसरे गॅस सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत महिलांना स्वयंपाकासाठी इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना स्वयंपाकासाठी लाकूड आणण्यासाठी कसरत करावी लागते व त्याने वृक्षतोड होते वृक्षतोड करुन पर्यावरणास हानी पोहोचत असल्याची बाब सरकारच्या लक्षात घेऊन ह्या योजनेचा निर्णय घेतला आहे.

सदर सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाचा वर्ष २०२४-२५ या वर्षांचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या मार्फत “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची” घोषणा करण्यात आली आहे व उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचा पुनभगरर्ण (Refill) मोफत उपलब्ध करुन देण्याची बाब सरकारच्या विचारात होती.

या योजनेअंतर्गत होणारे फायदे :

  • महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत होणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत गरीब व गरजू कुटुंबाना या माध्यमातून आर्थिक स्वरूपात मदत केली जाणार आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना महिलांन मदत सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे.
  • महाराष्ट्राचे राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंञी अजित पवार यांनी शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही काही योजना सादर केली त्या पैकी “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना” आहे.
  • महिलांच्या हितासाठी आरोग्य साठी आर्थिक मदतीसाठी ही योजने आहे .
  • महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनें अतर्गत, पाच जणांच्या कुटुंबाला प्रति वर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत

महाराष्ट्र सरकार निर्णय :-

भारत सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजने च्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांनातसेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या पात्र लाभार्थ्यी कुटुंबाना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचा पुनभगरर्ण (Refill)करणे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकार ने घेतलेला आहे. ही जी योजना सुरु करण्यात आली ती योजना म्हणजे “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना” ही आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश mukhyamantri annapurna yojana :

महाराष्ट्र राज्यातील सरकार ने सुरवात केलेल्या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचे सर्वात महत्त्वाचा उद्देश हे महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत प्रदान करणे आहे. ज्या कुटुंबांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांना या योजने अंतर्गत गॅस सिलिंडर स्वरूपात एक आर्थिक मदत दिली जाणार आहे . महाराष्ट्रा राज्यातील गरीब कुटुंबांना या योजने अंतर्गत जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना”सुरू केली. पावसाळी अर्थसंकल्पीय शेवटच्या अधिवेशनात महाराष्ट्राचे अर्थमंत्री उपमुख्यमंञी अजित पवार यांनी या योजनेची ओळख करून दिली. सदर योजना ही “प्रधानमंञी उज्ज्वला योजना” व “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या दोन्ही योजनेतील पाञ महिलांन या योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंअतर्गत पाच जणांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत.

महत्वपूर्ण माहिती :

मुख्यमंत्री अन्नपूर्णा annapurna yojana या योजनें अंतर्गत प्रधानमंञी उज्ज्वला योजनेच्या पाञ लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या मार्फत ३०० रुपये अनुदाना सोडुन प्रधानमंञी उज्ज्वला योजनेंतर्गत जे अनुदान गॅस सिलिंडर साठी मिळत आहे ते तर मिळणार च पण आता महाराष्ट्र राज्य शासन मार्फत ५३० रुपये प्रति गॅस सिलेंडर रक्कम पाञ लाभार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाञ लाभार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्र राज्य शासन प्रत्येक सिलेंडर साठी ८३० रुपये म्हणजेच एक वर्षातुन फक्तं तीन सिलेंडर साठी मिळणार आहे व प्रत्येक जिल्ह्यानुसार गॅस सिलेंडरच्या किंमती नुसार रक्कम शासना मार्फत दिली जाणार आहे. 

तसेच सदर मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनें अंतर्गत योजनेत पाञ लाभार्थी अथवा ग्राहकास यास एका महिन्यात एकापेक्षा अधिक जॅस सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येर्णार नाही हे लक्षात आसावे.

जिल्हयानुसार गॅस सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. काही जिल्ह्यातील फरकाने आर ती रक्कम जिल्ह्यातील लागु रक्कमे नुसार मिळेल व तेल कंपनयां कडे वितरीत करण्यात आलेल्या गॅस सिलेंडरच्या किमतीच्या आधारे तसेच जिल्ह्यातील गॅस सिलेंडरच्या दरानुसार किमतीच्या आधारावर, प्रत्यक्ष खखर्च झालेली रक्कम तेल कंपनयां ना अदा करण्यात येईल.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना लाभार्थी पाञता काय आहे.| mukhyamantri annapurna yojana 2024 “

१} सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.

२} सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी आहेत ते सर्व लाभार्थी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी पात्र आसणार आहेत.

३} मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी पात्र असेल.

४} एका कुटुांबातील (रेशन कार्ड नुसार ) फक्त एकच लाभार्थी या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी पात्र असेल.

५} सदर लाभ केवळ १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरचा जोडणी असलेल्या गॅस सधारकांसाठीच असेल.

६} या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

७} या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थी कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे शासनाने लागू केलेल्या उत्पन्नाच्या उत्पन्ना पेक्षा जास्त नसावे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वितरण हे तेल कंपन्यां मार्फत करण्यात येणार आहे व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत गॅस सिलेंडरचा वितरण ही तेल कंपन्या मार्फत च करण्यात येणार आहे.

● मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • ओळख पञ दस्तऐवज आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्ना दाखला
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • कौटुंबिक ओळखपत्र रेशनकार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ची अर्ज प्रक्रिया:

महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अधिकृत वेबसाइट शासनामार्फत अद्याप अशी काही सुचना आली नाही. सर्व पात्र अर्जदार लाभार्थ्यांना अधिकृत सुरुवात झाल्यावर वेबसाइटला भेट द्या आणि संपुर्ण माहिती मिळवु शकता आणि एकदा शासनाने या योजनेची अधिकृत वेबसाइट जाहीर करुन सुरू केल्यानंतर तेथे सविस्तर अर्ज करू शकता.

महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वरील सर्व माहिती योग्य व सविस्तर देण्याचा एक प्रयत्न केला आहे. सर्व माहिती महाराष्ट्र शासनामार्फत निघालेल्या जी आर नुसार सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे

आधिक माहिती साठी.