e peek pahani information|ई-पिक पाहणी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती.

e peek pahani information

e peek pahani information

e peek pahani information ई- पिक पाहणी शेतकरी बांधवांना आपल्या पिकांची नोंद मोबाईल द्वारे कशा पद्धतीने करता येणार याबद्दल सविस्तर माहिती आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांची आता ई-पिक पाहणी e peek pahani करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ई- पीक पाहणी संदर्भात पुरेशी माहिती नसल्याने शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे ‘ई-पीक पाहणी’मध्ये सातबारा वर पिक पेरा नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. म्हणून आज आपण नेमकं हे ‘ई-पीक पाहणी’ काय आहे आणि ई- पिक पाहणी केल्यानं काय लाभ होतो नाही केल तर काय नुकसान होणार हे या लेखात जाणून घेणार आहोत.

आता शेतकरी बांधवांना ,ई-पीक पाहणी करणे आपल्या पिकाची नोंद करणे झाले आहे अगदी सोपे व सहज रित्या ते पण आपल्या स्वतः च्या किंवा इतर कोणाच्या मोबाईल द्वारे, महाराष्ट्र सरकार च्या ई-पीक पाहणी ॲप मध्ये खरीप व रब्बी या हंगामात आपण आपल्या शेतातील घेतलेल्या पिकाची सविस्तर अशी योग्य पद्धतीत ७/१२ सातबारा या वर नोंदणी करु शकता.

आज आपण शेतकरी हिताची आणि महत्वाची बाब या विषयी बघणार आहोत हा लेख ई-पीक पाहणी नोंदणी कशी करायची याची प्रकिया काय आहे या प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आज जाणून घेऊया. ई- पिक पाहणी केल्यानं काय होत ई- पिक पाहणी नाही केल तर काय होणार.प्रत्येक शेतकरी ई-पिक पाहणी करावीच ती का महत्वाची आहे. पिक पेरा नोंदणी केल्यान काय फायदा होणार कोणता कोणता लाभ मिळणार या विषयी सविस्तर माहिती आज जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू केलेल्या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. शासनाच्या माझी शेती माझा सातबारा मीच नोंदणी करणारा माझा पिक पेरा या महाराष्ट्र सरकार च्या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या शेतातील पिकाची नोंद आपल्या सातबारा यावर नोंदणी करणे गरजेच आहे आहे. पण खुप शेतकरी बांधवांना ई-पीक पाहणी कशी करावी याबद्दल हवासविस्तर माहिती नाही या आज आपण याबद्दल सर्व माहिती जाणुन घेणार आहोत.

शेतकरी आपल्या स्वतः च्या मोबाईल वरून ई-पीक पाहणी e peek pahani करून पिक पेरा नोंदणी करु शकता आणि आपल्या सातबारा यावर पिकाची नोंद करु शकता व आपल्या पिकाची नोंद कुठे करायची कशा पद्धतीने करायची याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. ई-पीक पाहाणी नोंदणी प्रक्रिया ही शेतकरी बांधवांना स्वतः च करता यावी शेतीच्या अडचणीच्या व नुकसान भरपाई साठी ई-पीक पाहणी याचा खुप फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांची पीक पेरा नोंदणी साठी होणारी तगमग,अडचणी लक्षात घेऊन त्यांना सुलभ पद्धतींत पिक पेरा नोंदणी करता यावी या हेतूने महाराष्ट्र राज्यात हा सोयीस्कर पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.

शेतकरी बांधवांना ई-पीक पाहणी करण्यासाठी महा-ई-सेवा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाऊन करण्याची गरज नाही . पहिल पिक पेरा नोंदणी साठी तलाठी आधिकारी किंवा इतर कोणत्या ठिकाणी ज्या ठिकानी पिक पेरा नोंदवला जातो त्या ठिकाणी जाऊन आपली पिक पाहणी करावी लागत होती. पण आता घरी बसुन स्वतः शेतकरी बांधव आपल्या मोबाईल च्या मदतीने अगदी काही इ- पीक पाहणी म्हणजेच पिक पेरा नोंदणी करू शकतात. ते पण अगदी फ्री. ई-पीक पहाणी साठी शेतकरी बांधवाची अडचण दुर व्हावी या साठी घरबसल्या पिक पेरा नोंदविता यावा या करता यासाठी राज्य शासनाकडून एक ॲप सुरू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी थेट आपल्या बांधा वरून ई-पिक पाहणी अगदी काही वेळा तच घरबसल्या आपल्या पिकाची पाहणी करता येणार आहे.

ई-पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी सुरवात झाली आहे 1 ऑगस्ट 2024 पासुन आणि शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर आहे.

• ई- पिक पाहणी म्हणजे काय. e peek pahani

ई-पीक पाहणी हे केंद्र सरकारकडून कृषी आणि ग्राहक सहकार मंत्रालयाने शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या हितासाठी तयार केलेले एक ॲप आहे. या ई-पिक पाहणी ॲप द्वारे, तुम्ही तुमच्या शेतीच्या संबंधित सर्व बाबी व्यवस्थापित सोयीस्कर पद्धतीत करु शकता अगदी घरबसल्या.

शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या शेतात पेरणी केलेल्या पिकाची खरी नोंद शासनाकडे योग्य पद्धतीने करावी आणि शेतकरी बांधवांना त्याचा लाभ व्हावा हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने ‘ ई पिक पाहणी ‘ नावाने एक अ‍ॅपलिकेशन ची सुरवात केली आहे. या उपक्रमांर्तगत अ‍ॅप च्या माध्यमातून शेतकरी कोणत्या गटामध्ये/ सर्व्ह मध्ये कोणत्या शेतात कोणते पिक घेतले आहे किती प्रमाणात पिक घेतले आहे ते क्षेत्र कसे आहे सिंचित कि असिंचत म्हणजेच क्षेञ कोरडवाहू आहे पाण्याखाली आहे याची नोंद तर होईल आणि या शिवाय ते शेतीचे ठिकाणही अक्षांश / रेखांशमध्ये नोंद केले जाणार आहे.

ई-पीक पाहणी च्या माध्यमातून ज्या पीकाची नोंदणी केलेली आहे त्याच्या आधारे शेतकरी बांधवाचे उत्पादन, शेत जमिनीच गट ,शेत जमिन क्षेत्र, नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे नुकसान झाल्यास शासन कडुन विमा भरला असेल तर कंपनीकडून मदत मिळणे शक्य होईल.एका व्यक्तीच्या मोबाईल वरुन जास्तीत जास्त २० शेतकरी बांधवांना ई- पीक पाहणी नोंदणी करता येणार आहे. सगळया शेतकऱ्याकडे मोबाईल आसतोच असे नाही काही शेतकर्या जवळ मोबाईल नसतो त्यामुळेच अशा पद्धत शीर सोय करण्यात आली आहे.

ई-पीक पाहणी माध्यमातून पिक पेरा नोंदवल्यास या पीक विमा शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास सातबारा यावरील पिक पेरा नोंदणी नुसार नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई साठी उपयोगी आहे , पिका संदर्भातील आनुदान , थोड्या च दिवसा आगोदर कापुस व सोयाबीन आनुदान मिळणार आहे २०२३ च्या सातबारावर पिक पेरा पिकांची नोदणी केली आसल्या वरच आनुदान मिळणार आशा प्रकारचे आर्थिक साह्य पिकाची नोंदणी ही लाभ दायक आहे . कापुस व सोयाबीन आनुदान प्रति हेक्टर ५००० रूपये.

• ई- पिक पाहणी केल्यास होणारे फायदे.e peek pahani

  • ई – पीक पाहणी मुळे शेतकरी आपल्या पिकांची नोंद सातबारा ७/१२ यावर करु शकणार आहे.
  • आपल्या शेतातील बांधावरील झाडाची नोंद करता येणार आहे.
  • आपल्याला शेती पिका संबधीत अनुदान मिळणार.
  • पिक नुकसान झाल्यास मिळणारा विमा साठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि ई-पीक पाहणीत नोंदवलेलं पीकच ग्रहीत धरण्यात येईल.
  • संबधीत शेतातील पिका वर कर्ज घेतल्यावर , तेच पिक आपल्या शेतात आहे का, या साठी बँक ही ई-पिक पाहणी केलेला सातबारा वरील माहिती पाहूनच पडताळणी करणार.
  • ई-पीक पाहणी’ मुळे शेतकऱ्यांच्या पिकाची व पेरणीची योग्य तीच नोंद होणार आहे.
  • शेतकऱ्या ला जर त्याच्या शेतीतला माल बर्‍या पैकी किंमतीत शासनाच्या एखाद्या योजने अंतर्गत विकायचा असेल पिक पेरा नोंदणीकृत सातबारा ७/१२ डेटा वापरला जाऊ शकतो.

• ई- पिक पाहणी नोंदणी नाही केल्यास होणारे तोटे.

  • ई – पीक पाहणी नाही केल्यास शेतकरी आपल्या पिकांची नोंद सातबारा ७/१२ यावर होणार नाही.
  • ई-पीक पाहणी’ नाही केल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची व पेरणीची नोंद होणार नाही.
  • पिक नुकसान झाल्यास मिळणारा विमा साठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक जरी आसल्यास पण ई-पीक पाहणी नोंदणी नाही केल्यास विमा अर्जातील पिकच ग्रहीत धरण्यात येणार नाही.
  • विमा भरला पण पिक पेरा नोंदणी नाही केली तर विमा नाही भेटणार.
  • आपल्याला शेती पिका संबधीत अनुदानचा लाभ मिळणार नाही.
  • संबधीत शेतातील पिका वर कर्जचा लाभ मिळणार नाही कारण साठी बँक ही ई-पिक पाहणी केलेला सातबारा वरील माहिती पाहूनच पुढील कार्य करणार.
  • ई- पिक पाहणी केली नसल्याने आपल्या शेतीत पिकणार माल हा शासना मार्फत विकता येणार नाही.

• मोबाईल वर कशा प्रकारे ई-पीक पाहणी करायची सविस्तर माहिती पुढिल प्रमाणे.

  • सर्वात आधी आपल्या मोबाईल मध्ये गुगल प्लेस्टोअर वर जाऊन ई- पिक पाहणी E peek pahani (DCS) व्हर्जन ३ हे ॲप डाऊनलोड करा.
  • ॲप ऊघडुन open करुन घेणे.
  • त्या नंतर आपला महसुल विभागाची नोंदणी करुन घेणे.
  • शेतकरी स्वतः पिक पेरा नोंदवत आहे शेतकरी म्हणून लाॅगीन नोंदणी करुन घेणे.
  • पुढे आपला मोबाईल नंबर टाकून नोंदणी करून घ्या.
  • या नंतर पुढे जा आणि आपला जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करा.
  • त्यानंतर खातेदारमध्ये पहिले नाव, मधले नाव, अडनांव आणि गट क्रमांक या पैकी पर्याय निवडा कोणती ही माहीती टाकुन खातेदार नोंद पाहु शकता माहिती टाकल्या शेतकऱ्याला आपले नाव समोर दिसेल.
  • खातेदार निवडुन आपल्या नावावर क्लिक करा.
  • नाव ,खाते क्रमांक सविस्तर तपासा आणि पुढे Click करा.
  • तुमचे खात्याची निवड त्यानंतर पुढे जा नंतर त्यामध्ये पीक पेरणीची माहिती व्यवस्थित भरा आहे व तुमच्या पिकाची निवड करायची आहे.
  • पिकाची पेरणी केलेली तारीख, पिकासाठी उपलब्ध सिंचन पध्दत आहे त्याचा प्रकार कोणता आहे तो निवडायचे आहे.
  • जमिनीच पिकाचे क्षेत्र हे किती आहे हेक्टरमध्ये भरा यानंतर हंगाम निवडा म्हणजे खरीप किंवा संपूर्ण वर्ष ते निवडा, त्यानंतर पिक पेरणी साठी किती क्षेत्र उपलब्ध आहे ही माहिती भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर नंतर कॅमेराचा फोटो पर्याय येईल या वर click करा यातून पिकाचा फोटो काढायचा आणि सर्व माहिती योग्य आहे का तपासा आणि सर्व माहिती योग्य आसल्यास सबमिट बटनावर Click करा.
  •  अशा प्रकारे तुमची ई-पीक नोंदणी पुर्ण होणार आहे व तुमच्य सातबारा यावर पिक नोंदवलेल दिसेल.

पिक पेरा नोंदणी करणे शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पिक पाहणी द्वारे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद करुन घ्यावी. यासाठीच आम्ही योग्य तीच माहिती तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.सविस्तर आसा लेख आहे त्याद्वारे ई- पीक पाहणी करुण घ्या आणि यासाठीच मिळणार लाभ याची संपुर्ण स्पष्ट माहिती यात दिली आहे.