Pradhan Mantri Mudra Yojana in Marathi | प्रधानमंत्री मुद्रा योजना.

Pradhan Mantri Mudra Yojana

Pradhan Mantri Mudra Yojana in Marathi

Pradhan Mantri Mudra Yojana in Marathi प्रधानमंत्री मुद्रा योजना भारतातील लघु व्यवसायांना कर्ज उपलब्ध करून देणारी सरकारी योजना आहे योजनेबद्दल सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो आज आपण पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत कर्ज उत्पादन व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या सुक्ष्म किंवा लघु उद्योगांना उपलब्ध आहे.संबंधित कृषी कार्यात गुंतलेले उद्योजक मुद्रा कर्जासाठी देखील अर्ज करू शकतात. मुद्रा योजनेअंतर्गत कमाल कर्जाची रक्कम दहा लाख रुपयापर्यंत मिळते.

आता आपण मुद्रा कर्ज म्हणजे काय, मुद्राचे फायदे, मुद्राचा प्रकार, कर्जाची परतफेड कालावधी, कर्जाची लाभार्थी पात्रता, मुद्रा लोन योजना कागदपत्रे कोणती, मुद्रा लोन कर्जासाठी अर्ज कसा करावा या सर्व गोष्टी आपण बघुया. तसेच या योजनेविषयी सर्व माहिती जाणून घ्या.

युवा तरूण युवकांना उद्योग किंवा स्वतःच व्यवसाय उभा करण्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना यासाठीची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे .

सर्वप्रथम मुद्रा कर्ज म्हणजे काय ?

मुद्रा कर्ज ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. या योजनेअंतर्गत बिगर शेती आणि बिगर काॅर्पेरेट या सुक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज दिले जाते. या संस्थांना मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अंड रिलायन्स एजन्सी लिमिटेड या योजनेअंतर्गत दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते.

PMMY प्रधानमंञी मुद्रा योजनेच्या साह्याने ,Pradhan Mantri Mudra Yojana ने लाभार्थी सूक्ष्म युनिट/उद्योजकांच्या वाढीचा/विकासाचा टप्पा आणि निधीच्या गरजा दर्शवण्यासाठी ‘शिशू’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’ ही तीन उत्पादने तयार केली आहेत.

आता आपण मुद्रा योजना म्हणजे काय ते बघितल नंतर मुद्रा योजनेचे फायदे काय आहेत ते बघुया.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.

  • १.मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सुक्ष्म आणि लघुउद्योगांना सुविधा प्रधान करते.
  • २.मुद्रा कर्जाचा एक मुख्य फायदा म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरविणे आवश्यक. या कर्जावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
  • ३. मुद्रा कर्जासाठी कमीत कमी कर्जाची रक्कम नाही.
  • ४. या योजनेअंतर्गत मोफत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर फंड आधारित आवश्यकतेसाठी असु शकतात म्हणून विविध कारणासाठी कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग करू शकतात.

आता आपण प्रधानमंञी मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार व ते कोणते आहेत ते बघुया.

  • मुद्रा योजने अंतर्गत कर्जाचा पहिला प्रकार पुढील प्रमाणे
  • 1] शिशु मुद्रा योजना – शिशु योजनेअंतर्गत 50,000 रुपयापर्यंत कर्ज मंजूर होऊ शकत.
  • दुसरा प्रकार म्हणजे 2] किशोर मुद्रा योजना – मुद्रा योजनेतुन किशोर योजनेअंतर्गत 50,000 ते 5 लाखापर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते आणि व्याज दर 8.60% पर्यंत आहे आणि या योजनेच्या अटीची पूर्तता झाल्यावर सुद्धा तूमच्या क्रेडिट वर आधारित आहे. तुम्हाला कर्ज देणाऱ्या मुदतीत व्याजासह कर्जाची परतफेड करावी लागेल.
  • तिसरा प्रकार म्हणजे 3]तरुण मुद्रा योजना – या योजनेअंतर्गत 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज आपल्याला मंजूर होऊ शकते.

● आता आपण या योजनेसाठी मुद्रा कर्जाची परतफेड कालावधी किती आहे ते पाहुया.

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले तर हे कर्ज घेतल्यापासून तिन ते पाच वर्षे या कालावधीत आपण या कर्जाची परतफेड करू शकतो.

पंतप्रधान मुद्रा कर्ज याची पात्रता काय आहे ते बघा.

  1. लघु उद्योग व्यवसाय मालक असावा
  2. तुम्ही फळभाजी विक्रेते असावे
  3. दुग्ध उत्पादक असावे
  4. कुक्कुटपालन
  5. शेती विषयक अवजारे साहित्य किंवा दुकानदार
  6. कारागीर
  7. 18 ते 65 वयोगटातील अर्जदार आसावा त्यांचा कोणताही गुन्हेगारी क्षेत्रात नोंद नसलेला भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

यासाठीची पात्रता जर तुम्ही पुर्ण केली असेल तर किंवा यामधील कोणतेही एक पात्रता पुर्ण असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.

● मुद्रा योजने अंतर्गत या योजनेसाठी आवश्यक कोणती कागदपञे आहेत.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते बघुया.

  • १. ओळख पुरावा या ओळख पुराव्यांमध्ये तुम्ही आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चा वापर करू शकता.
  • २.पत्याचा पुरावाप्रधानमंत्री मुद्रा योजना यामधील विज बील, गॅस बील आणि तुमच टेलीफोन बील तुम्ही वापरू शकता.
  • ३. व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र.
  • ४. बॅंकेचे पासबुक .

इत्यादी कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर आनलाईन अर्ज किंवा आफलाईन अर्ज करू शकता. तर प्रथम मुद्रा लोन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा ते पाहा. सर्वप्रथम या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून तुमच्या भागातील जवळच्या बॅंकेत जावे. बॅंकेत गेल्यावर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज दिला जाईल तो अर्ज आपल्या व्यवसायाचा तपशील द्यावा लागेल. तुमचा अर्ज व कागदपत्रे व व्यवसाय यांची सर्व तपासणी होऊन तुम्हाला मुद्रा लोन मंजूर होईल.

● प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा.Pradhan Mantri Mudra Yojana

  • आता आपण मुद्रा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आपण मुद्रा योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा ते बघितले तर आता आपण मुद्रा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघा.
  • १. सर्वप्रथम वेबसाईट वरील लिंकवर क्लिक करायचे क्लिक केल्यावर एक पेज समोर येईल येथे क्लोज नावाचे जे काही बटन असेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • २. त्या नंतर तुमच्या समोर मुद्रा लोनची वेबसाइट ओपन झालेली दिसेल.
  • ३. त्यामध्ये प्रथम तुमचे संपूर्ण नाव लिहावे.
  • ४.त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा .
  • ५. त्याच्या खाली तुमचा ईमेल आयडी टाकून शेवटी वर्णन येथे क्लिक केल्यावर तुमच्या समोर मेल ओपन होइल .
  • ६. यामध्ये मुद्रा योजना हा पर्याय तुम्ही क्लिक करायचा आहे.
  • ७. त्यानंतर खालील जतन या पर्यायांच्या बटनावर म्हणजेच जतन करा या बटनावर क्लिक करायच आहे.
  • ८. नंतर समोर तुम्हाला वेबसाइटचा इंटरबेस दिसेल. यामध्ये तुम्हाला वरती मेनोबार दिसेल Manu बार मध्ये अर्जाचे स्वरूप या मेनोबारवर क्लिक करावे.
  • ९. Menu बार वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होइल यामध्ये सर्वात प्रथम कर्जाचा तपशील दिसेल,
  • १०. यामध्ये मुद्रा कर्ज प्रकार यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर तुमच्या समोर शिशु, किशोर, तरुण असे कर्जाचे प्रकार तुम्हाला दिसतील. त्यातील तुम्हाला कोणता कर्जाचा प्रकार हवा आहे ते निवडायच आहे. त्यानंतर त्यापुढे कर्ज खाते प्रकार यावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुमच्या समोर पर्याय दिसेल. यामध्ये कॅश क्रेडिट, ओवर ड्राफ्ट, टर्म लोन या पर्यायांपैकी तुम्हाला जे काही कर्ज खाते हवे आहे त्यातील तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
  • ११. वरील सर्व निवडून झाल्यावर खाली तुम्हाला किती रक्कम कर्ज हवी आहे ती रक्कम तुम्हांला येथे टाकायची आहे. येथे कर्जाचा तपशील निवडून झाल्यावर पुढे बॅंकेचा तपशील यामध्ये माहिती भरावी.
  • १२.यामध्ये सर्वात प्रथम तुमच्या बॅंकेचा जिल्ह्या निवडायचा, त्यानंतर पुढे बॅंकेचा तालुका निवडायचा ते निवडून झाल्यावर पुढे
  • १३. तुमच्या भागातील बॅंकेचे नाव निवडावे, त्यानंतर शाखेचे नाव निवडावे नंतर ते निवडून झाल्यावर बॅंकेचे आय एफ सी सी कोड येथे टाकून पुढे बॅंकेचा पत्ता येथे टाकायचा आहे.
  • १४. ही सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे अर्जदाराचा तपशील यामध्ये सर्वात प्रथम अर्जदाराचे नाव लिहावे संविधान येथे ईंडीवीजुवली निवडावे यानंतर तुमचा निवासी पत्ता येथे टाकावा. बघा संविधानामध्ये निवडत असताना individual, partnership जे काही ऑप्शन असेल तुम्हाला लागु असणाऱे तो ऑप्शन तुम्ही येथे निवडायचा आहे. पुढे पत्याचा प्रकार यामध्ये तुमचा जो काही निवासी पत्ता आहे तो पत्ता टाकायचा नंतर पुढे पत्याचा जो काही प्रकार आहे त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर सेंट आणि ओवन म्हणजे तुम्ही भाड्याने राहता की तुमचं स्व:ताच घर या भाड्यावर आहे अस म्हटलेल आहे.
  • १५. त्यामधील तुमचा जो काही पर्याय असेल तो तुम्ही निवडायचा आहे. येथे तुमचा व्यवसायाचा पत्ता लिहावा व त्यापुढे पत्याचा प्रकार निवडायचा आहे त्यानंतर येथे तुमची जन्म तारीख टाकून पुढे वय टाकावे व त्याखाली तुमचे लिंग निवडावे, त्यापुढे तुमचे शैक्षणिक पात्रता निवडावी.
  • १६. येथुन तुमचा सामाजिक प्रवर्ग निवडून तुम्ही अल्पसंख्याक असल्यास या पर्यायाचा वापर करावा. यानंतर शेवटी येथे भ्रमणध्वनी क्रमांक टाकावा पुढे ईमेल आयडी लिहावा. केवायसी दस्तऐवज यामध्ये, पत्याचा पुरावा यामध्ये क्लिक करावे. नंतर ओळखपत्र क्रमांक टाकु शकता. त्याचप्रमाणे आधार क्रमांक, वाहन परवाना किंवा इतर असेल तर ते भरावे.
  • १७. याठिकाणी पत्याचा पुरावा म्हणून कोणत्याही एकाचा वापर करू शकता. यानंतर व्यवसायाचा तपशील यामध्ये सर्वात प्रथम व्यवसायाचा हेतू यावर क्लिक करावे. तुमच्या समोर Existing, proposed असे दोन पर्याय दिसतील.त्यातील तुमचा हेतू किंवा उद्देश कोणता असेल ते तुम्हाला निवडायचा आहे.
  • १८. नंतर त्यापुढे कालावधी लिहुन त्याखाली वार्षिक विक्री म्हणजे तुमची किती होते ते तुम्हांला लाखात लिहायची असते.
  • १९. नंतर त्याखाली अनुभव असल्यास अनुभव आहे म्हणून लिहावे किंवा नाही म्हणावे पुढे तुमच्या व्यवसायाचे नाव लिहावे.
  • २०. ही सर्व माहिती भरून झाल्यावर कर्जाचा तपशील यामध्ये क्लिक करावे. क्लिक केल्यावर त्याखाली काही पर्याय उपलब्ध होतील. यामध्ये सर्वात प्रथम खाते प्रकार यावर क्लिक करावे.
  • २१.क्लिक केल्यावर तुमच्या समोर deposit व loan अशी दोन पर्याय तुम्हाला दिसतील, त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय वाटणारा तुमचा जो काही पर्याय असेल तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
  • २२.त्यापुढे बॅंकेचे नाव व शाखा यामध्ये लिहायचा आहे. नंतर त्याखाली तुमचा खाते क्रमांक लिहायचा आहे. येथे तुम्हाला कर्ज किती हवे आहे ती रक्कम तुम्हाला येथे टाकायची आहे.
  • २३. नंतर बघा कर्जाच्या तपशीलाची माहिती भरून झाल्यावर शेवटी पडताळणी सांकेतांक कोड यामध्ये समोर दिसत असलेल्या कॅप्टन जो काही आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे, व खाली जतन नावाचा जो काही बटण (जतन करा) या बटणावर क्लिक करायच आहे.

अशा पद्धतीने तुम्ही योग्य रितीने अर्ज जतन होईल. या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक ती सांगलेली कागदपत्रेज् जोडुन हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या बॅंकेमध्ये जमा करायचा आहे. यावर तुमच्या अर्जाची व व्यवसायाची छाननी होइल. त्यानंतर तुम्ही या दोन साठी पात्र असाल तर तुम्हाला दोन मंजूर होईल. अशा पद्धतीने तुम्ही मुद्रा लोन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

आधिक माहिती साठी अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता – वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा पद्धतीने आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे काय, त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती, पात्रता काय आहे तसेच कर्जाचे प्रकार कोणते आहेत आणि कर्जाची परफेड कालावधी किती आहे. ही सर्व माहिती बघितली आहे.

एकदा तुमचे प्रधानमंञी मुद्रा कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक खात्यात निधी कर्जाची रक्कम प्राप्त होईल. प्रधानमंञी मुद्रा कर्ज याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही युट्यूब किंवा अन्य चौकशी करुन मिळवु शकता आणि आपल्या व्यवसायासाठी कर्ज मिळवु शकता.