Lek Ladaki Yojana Maharashtra Government
Lek Ladaki Yojana Maharashtra Government मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केली लेक लाडकी योजना या योजने बद्दल सविस्तर माहिती जाणुन घेऊया.
नमस्कार, महाराष्ट्र शासन हे मुलींच्या भवितव्याबाबत विचार करण्यात नेहमी अग्रेसर आहे. योजनेच्य स्वरूपात लेकीने मुलींना आर्थिक साहाय्य दिले जात.मुलींचा सन्मान, महिलांचा सन्मान करण्यात महाराष्ट्र राज्यातील सरकार खुप महत्वाचे आहे कराण नेहमी मुलींच्या हितासाठी सरकार विविध योजना राबवत असते, महाराष्ट्र शासना मार्फत चालवल्या जाणार्या काही योजना आपण आपल्या वेबसाईटवर बघितल्या आहे त्या बद्दल सविस्तर स्वरुपाची माहीती दिली आहे अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे करायचा, पाञता काय आहे ,कागदपत्रे कोणते कोणते लागतात ही सर्व माहिती आपण बघितली आहे आज आपण महाराष्ट्र सरकारची ‘ लेक लाडकी ‘ योजनेची संपुर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
• लेक लाडकी योजना –
महाराष्ट्र राज्य शासन हे मुलींच्या भवितव्या बाबत विचार करुन ही योजना अंमलात आणली आहे. या योजने अंतर्गत मुलींना आर्थिक साह्य व एक मदत मिळणार आहे त्याच्या भविष्यात या योजनेचा फायदा होणार आहे. मुलींचा जन्मदर वाढविण , मुलीच्या शिक्षणाच्या बाबतीत ही योजना योग्य आहे ही योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासुन माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून शासन निर्णयानुसार लागु करण्यात आली आहे. सदर योजनेचा अपुरा मिळणार प्रतिसाद लक्षात घेता मिळणार कमी प्रतिसाद लक्षात घेऊन.
महाराष्ट्र राज्य शासन मुलींच्या सक्षमीकरणासाठी नविन योजना लागू करण्याच्या विचारात होते म्हणून 2023-24 च्या अर्थसंकल्पात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘ लेक लाडकी ‘ ही योजनेची सुरवात करण्यात आली.या योजने अंतर्गत पिवळ व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना जन्मानंतर टप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय हे आठरा वर्ष पुर्ण झाल्यानंतर तीला 75 हजार रूपये रोख रक्कम देण्यात येणार आहे.अशी घोषणा महाराष्ट्र सरकार च्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘ लेक लाडकी ‘ ही योजना सुरु करण्यात आली.
• योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासन निर्णय –
महाराष्ट्र राज्य शासनाने आधी जे योजना होती ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ आधिक्रमित करुन महाराष्ट्र सरकार ने दिनांक 1 एप्रिल 2023 पासुन मुलीचा जन्मदर व तिच्या सक्षमीकरणासाठी, भविष्याचा विचार करुन शिक्षणाच्या बाबतीत ही ‘ लेक लाडकी योजना ‘ सुरू करण्यात आली आहे.
• लेक लाडकी योजनेचा उद्देश–
महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या योजनेचा उद्देश हा मुलींच्या भवितव्या बाबत विचार करुन सक्षमीकरणासाठी व शैक्षणिक बाबतीत विचार करुन ही योजना अंमलात आणली आहे सदर योजनेचा उद्देश खालीलप्रमाणे आहे.
- मुलींच्या जन्मदर वाढविणे व मुलींच्या जन्माबाबत प्रोत्साहन देणे व मुलींच्या जन्माबाबत जागृती निर्माण करणे.
- मुलीच्या सक्षमीकरणास चालणा देणे व मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
- मुलीचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे.
- कुपोषण कमी करणे.
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शुन्य वर आणण्यासाठी प्रोत्साहीत करणे.
• महत्वाचे–
महाराष्ट्र राज्य शासनाने मुलींच्या भविष्याचा विचार करुन ही योजना अंमलात आणली आहे.सदर योजना फक्त महाराष्ट्रातील मुलींसाठी आहे इतर राज्या साठी नाही या योजने अंतर्गत मुलीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी, शैक्षणिक वाटचालीस चालना देण्यासाठी ही योजना आहे. या योजने अंतर्गत काही नियम व अटी आहेत आवश्यक कागदपञाच्या आधारे पिवळ व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींना जन्मानंतर झाल्या नंतर पाच हजार रुपये मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये तर इयत्ता साहवीत गेल्यावर सात हजार रुपये, इयत्ता आकारावीत आसताना आठ हजार रुपये, लाभार्थी मुलीचे वय आठरा वर्ष पुर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये याच प्रमाणे एक लाख एक हजार रूपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
या योजने अंतर्गत पुढील टप्प्याने रक्कम देण्यात येणार आहेम
- मुलींच्या जन्म झाल्यावर – ₹ 5000/- रुपये
- मुलगी इयत्ता पहिलीत आसताना – ₹ 6000/-
- मुलगी इयत्ता साहवीत आसताना -₹ 7000/-
- मुलगी इयत्ता आकारावीत आसताना -₹ 8000/-
- मुलीचे वय 18 वर्ष पुर्ण झाल्यावर -₹ 75000/-
याच पध्दतीने टप्यानुसार एकुन रक्कम ₹1,01,000/- लाभ मिळणार आहे.
• योजनेसाठी पाञता –
या योजनेसाठी पाञता काय आहे ते पुढील प्रमाणे.
- लाभार्थ्यी मुलींच्या कुटुंबाकडे पिवळ किवा केशरी रेशनकार्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी मुलींचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी म्हणजे महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी मुलींचे बँक खाते हे महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रक्कम रु. १ लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
- 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणार्या मुलींना योजना लागु राहील.
- कुटुंबातील दोन मुलींना या योजने अंतर्गत लाभ घेता येईल.
• योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –
योजेसाठी कागदपत्रे हे खालीलप्रमाणे आहेत.
- लाभार्थी मुलीचा जन्मदाखला ( brith certificat ).
- लाभार्थ कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला ( एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावा) याबाबत तहसिलदार किंवा अन्य सक्षम आधिकारी यांचा दाखला आवश्यक आहे.
- लाभार्थी मुलीचे आधार कार्ड ( पहील्या ₹5000/- च्या लाभासाठी ही अट शिथिल राहील).
- लाभार्थी मुलींच्या पालकाचे आधार कार्ड आवश्यक आहे.
- बँक पासबुक झेरॉक्स.( पहील्या पानाची अकाऊंट नंबर, आय एफ सी कोड , इतर सर्व व्यवस्थित झेरॉक्स).
- लाभार्थी मुलींच्या कुटुंबातील रेशनकार्ड झेरॉक्स ( पिवळ किंवा केशरी रेशनकार्ड आवश्यक आहे).
- मतदान ओळखपत्र ( लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर तीला उर्वरित लाभ घेण्यासाठी मुलीचे मतदार यादीत नाव आसल्याचा दाखला).
- टप्यानुसार जी रक्कम लाभ स्वरूपात प्राप्त होते त्यासाठी शिक्षण घेत आसल्याबाबत शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड ( Bonafied) आवश्यक राहील.
- लाभार्थी पाल्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- शेवटच्या लाभाकरीता मुलीचे लग्न ( विवाह) झालेला नसावा . अ विवाहीत आसल्या बाबत मुलीचे स्वयं घोषणापञ आवश्यक राहील.
सदर योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी सर्व अटी शर्तीनुसार कागदपञे आसणे आवश्यक आहे काही कागदपञे वयाच्या टप्यानुसार आहेत त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील. महाराष्ट्र सरकार सामन्य केशरी व पिवळ रेशनकार्ड धारक कुटुंबातील व्यक्तीच्या मुलींना योजनेचा लाभ व्हावा आणि कुटुंबातील पाल्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे सदर शेवटचा ₹ 75000/- रुपयाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष असणे आवश्यक आणि या शेवटच्या लाभासाठी जी आर मध्ये दिलेल्या अटी व शर्ती नुसार मुलीचे लग्न झालेले नसावे लाभार्थी मुलगी अविवाहित आसावी ती अविवाहित आहे अस स्वयं घोषणा पञ देण आवश्यक आहे. ती जर विवाहित असेल तर शेवटची रक्कम लाभ स्वरूपात तीला मिळणार नाही यासाठी सर्व माहिती तपशीलवार वाचा.
लाभार्थी मुलीचे वय वाढेल तशी रक्कमात शासनाने वाढ केलेली आहे जन्मानंतर आणि पुन्हा पहिल ते आकरावी आणि नंतर शेवटी बारावी म्हणजेच लाभार्थी मुलीचे वय आठरा वर्ष पुर्ण झाल्यानंतर लाभार्थी मुलगी अविवाहित असेल तर तीला शेवटची एकुन रक्कम मिळणार आहे या योजने अंतर्गत ‘ बेटी बचाओ- बेटी पढाओ ‘ या उपक्रमाला प्राधन्य दिल आहे महाराष्ट्रात राबविण्यात येणार्या या योजनेचा महाराष्ट्रातील सर्व पाञ लाभार्थी कुटुंबाने आपल्या मुलीच्या सक्षमीकरण व शिक्षण सुधारित करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्रातील सर्वासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.
आपल्या वेबसाईटवर या आगोदर महाराष्ट्र राज्यातील राबवल्या जाणार्या विविध योजना सविस्तर अशा स्वरुपात मांडल्या आहेत ही पण योजना ‘ माझी कन्या भाग्यश्री ‘ ही योजना थोडक्यात मांडली होती या योजने अंतर्गत सविस्तर आभ्यास करून महाराष्ट्र सरकारने विचारात घेतलेली ही ” लेक लाडकी ” योजना राबवली आहे या योजनेचा मुख्य उद्देश मुलींचा जन्मदर वाढविणे व त्यांना सक्षम करणे हा आहे.
महाराष्ट्र राज्यातील केंद्र शासनाच्या विविध योजना जाणुन घेण्यासाठी आपल्या ह्या वेबसाईटवर पाहत राहा आणि इतर काही माहिती हवी असल्यास सोशल मीडियावर किंवा युट्यूब वरुन पाहु शकता आणि शासनाकडून चालवल्या जाणार्या शासकीय कार्यालयात भेट देऊन या योजनेची माहिती घेऊ शकता ,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत इतर ठिकानी या योजनेची माहिती मिळेल अर्ज कसा करायचा ,कुठे करायचा सविस्तर माहिती शासकीय कार्यालयात मिळेल इतर माहिती साठी शासनाच्या शासकीय GR महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे किवा Google वर लेक लाडकी योजना GR अस सर्च केल्यावर या योजनेचा शासनाचा अधिकृत GR भेटेल .
आधिक माहिती साठी संबधीत शासकीय कार्यालयात भेट द्या,आणि या योजनेची जागृती करा आणि याचे महत्त्व पटवून द्या प्रोत्साहन द्या आणि महत्व सांगा फायदे भविष्यात महत्वाची आहे योजना या साठी आजच संबधीत कार्यालयात भेट देऊन अर्ज करा.