Mahila Startup scheme
Mahila Startup scheme महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना जाणुन घ्या सविस्तर माहीती.
महाराष्ट्र राज्य शासन नेहमीच महिलांसाठी विविध योजना राबवत असते त्या महत्वाकांक्षी योजना पैकी एक योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” महिला स्टार्टअप योजना ” आहे या योजनेच्या माध्यमातून शासन महिलांच्या शक्तीकरणास चालना देत आहे महिलांना आत्मनिर्भर बनवत आहे यामुळेच महिलांना एक संधी मिळत समाजात स्वातंत्र्य काहीतरी करुन दाखवण्यची नेहमी सरकार महिलांना प्रथम प्राधान्य देत त्यांच्या सशक्तीकरणास चालना देत आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वतःच्या पायावर उभा राहण्याची शासनाने एक संधी उपलब्ध करुन दिली आहे या संधीचा महाराष्ट्रातील सर्व महिलांन या योजनेचा फायदा व्हावा या अनुषंगाने अजचा लेख आहे.
महिलांसाठी आनंदाची बातमी कारण आता त्यांच्यासाठी ” महिला स्टार्टअप योजना ” सुरु झाली आहे.ही योजना खास महिलांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी एक सक्षम महिला बनवण्यासाठी आहे. महिला स्टार्टअप योजना यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरवात झालेली आहे. या योजने अंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी एक लाख रूपये ते पंचवीस लाख रुपये मिळणार आहेत.या योजने संदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana
महाराष्ट्र राज्य शासन महिलांसाठी ” पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला विविध प्रकारची आव्हाने आणि अडचणींना समोर जावे लागते असे दिसुन येत आहेत अशा क्षेत्रातील महिलांना विशेष साह्राशिवाय आणि पुरेशा भांडवल निधी आभावी यशस्वी होणे कठीण आसते . महिलां नेतृत्वातील स्टार्टअप, शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमधुन येणारे स्टार्टअप यांना सुरवातीपासून प्रोत्साहित करुन महाराष्ट्र राज्यात सुरु आसणार्या इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यामातून मार्गदर्शन करणे तसेच प्रोटोटाईप बनवणे इत्यादी करीता देखील साह्रा देणे आवश्यक आहे.
महिला नेतृत्वातील स्टार्टअप मुळे यांना आवश्यकतेनुसार अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना संजीवनी मिळेल तसे या माध्यमातून अन्य महिलांना सूद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे. महिला नेतृत्वातील स्टार्टअप मुळे स्थानिक गरजेवर आधारीत व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेनुसार आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतील. स्टार्टअप विकासाद्वारे महिलांना आत्मनिर्भरता वाढवुन त्यांच्या स्टार्टअप च्या विकासाच्या माध्यमातून उद्योगाचा व्यवसायिक दृष्टिकोन विकसित होईल.तसेच शहरि व ग्रामीण पातळीवरील देखील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होईल या करीता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना व्यवसाय करण्यासाठी महिलांन आर्थिक पाठबळ देण्यासाठी आवश्यकता आहे या करीता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ” सुर करण्यात आली आहे.
राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपना प्रारंभीक टप्प्यातील व्यवसाय करण्यासाठी पाठबळ देण्यासाठी ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ” महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप :-
महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना या योजनेचे उद्दिष्ट पुढिल प्रमाणे आहे.
- महाराष्ट्रातील राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपना पाठबळ देणे.
- महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला व नविन संकल्पना आसलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृध्दी साठी तसेच व्यवसाय व उद्योग विस्तारित करण्यासाठी एक वेळ अर्थ साह्य करणे.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना या स्टार्टअप च्या माध्यमातून स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
- देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप आसलेल्या राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख निर्माण करणे.
- महिला नेतृत्वातील स्टार्टअप च्या माध्यमातून रोजगार निर्मितीस चालना देणे व बेरोजगारी कमी करणे.
- या योजने अंतर्गत एकुण तरतुदीच्या 25 टक्के इतकी रक्कम शासनाकडून विनिर्दीष्ट करण्यात आलेल्या मागास प्रवर्गातील महिला, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील महिला साठी राखीव ठेवण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपना त्यांच्या उलाढाली नुसार किमान रुपय 1 लाख ते कमाल रुपये 25 लाखापर्यंत आर्थिक साह्य प्रदान करण्यात येणार आहे.
योजनेची लाभार्थी पाञता खालील प्रमाणे आहे :-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा लाभ घेण्यासाठीची पाञता पुढील प्रमाणे आहेत.
- उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स.
- सदर स्टार्टअप्स मध्ये महिला संस्थापक/सह संस्थापक यांचा किमान 51 टक्क वाटा असणे आवश्यक आहे.
- महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स किमान एक वर्षांपासून कार्यरत आसावा.
- महिला नेतृत्वातील स्टार्टअप वार्षिक उलाढाल ही रुपये दहा लाख ते रुपये एक कोटी पर्यंत आसावी.
- महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य सरकारच्या कोणत्यही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
- अर्ज दार महिला महाराष्ट्र राज्यातील रहीवाशी आसणे आवश्यक आहे.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपञे :- Mahila Startup scheme important Document
या योजनेचा लाभ घेण्यासाठी किती आणि कोणती महत्वाची कागदपञे लागणार आहे याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
- आधार कार्ड
- बँक तपशील
- अर्जदाराचे तीन पासपोर्ट साइज फोटो
- कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- व्यवसाया स्टार्टअप सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR)
- अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव.
- उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे मान्यता प्रमाणपत्र .
- संबधीत इतरही वैयक्तिक व कंपनी संबधीत सर्व कागदपत्रे स्वतःजवळ असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करायचा लाभार्थी निवड कशी होणार –
- सदर योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीनुसार निशुल्क अर्ज करता येणार आहे.
- या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करताना कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणीचे प्रमाणपत्रे ,DPIIT मान्यता प्रमाणपत्र इ.कागदपञे आवश्यक आसतील.
- वेबसाईटवर गेल्यावर सुरवातला तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा बॅनर दिसेल त्यावर क्लिक करून सविस्तर माहिती भरुन तुम्ही अर्ज करु शकता.
योजने अंतर्गत लाभार्थी निवड कशी होणार –
- प्राप्त झालेल्या अर्जापैकी रोजगार निर्माण करणाऱ्या स्टार्टअप ला विशेष प्राधान्या देण्यात येणार आहे.
- प्राप्त अर्जा पैकी आश्वासक ,नाविन्यपूर्ण, प्रभावी स्टार्टअप ज्यामुळे इतर लोकांना महिलांन रोजगार मिळेल अशा स्टार्टअप व्यवसायाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
- आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करतील या समिती मार्फत प्राप्त अर्जातील निकषानुसार पाञ ठरणाऱ्या स्टार्टअपचे सादरीकरण सञ घेऊन निवड करण्यात येणार आहे.
- या करीता स्टार्टअप क्षेत्रातील / बँकींग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात येणार आहे.
- पाञ ठरणाऱ्या स्टार्टअप यांना देय आसणारी रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने शंभर कोटी रुपयाची तरतूद केली आहे ही योजना महाराष्ट्रातील महिलांना एक सुवर्ण संधी आहे या योजनेतुन ते स्वतःचा व्यवसाय करु शकणार स्वावलंबी आयुष्य जगणार महिलांना सन्मान म्हणुन महाराष्ट्र राज्य शासन विविध योजना राबवत आसते या योजनेच्या माध्यमातून स्टार्टअप ना एक नविन दिशा मिळेल व योग्य स्टार्टअप असेल तर महिलांन रोजगार व रोजगार निर्माण करण्यासाठीच स्टार्टअप करणे गरजेच आहे यात महाराष्ट्र सरकारचा मोलाचा वाटा आहे विविध स्टार्टअपना चालना मिळेल महिला सक्षम होतील. मार्गसवर्गीय महिलांना विशेष तरतुद देण्यात आली आहे .
या योजनेच्या एकुण तरतूदी पैकी 25 टक्के रक्कम मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राखीव आहे. शंभर कोटीच्या गुंतवणूकीतुन 500 स्टार्टअप्सना लाभ मिळणार आहे. महिलांच्या लघु उद्योगांसाठी ही योजना खुप फायदेशीर ठरणार आहे.स्टार्टअप च्या माध्यमातून आखिल भारतीय स्तरावरील संमेलन राज्यात आयोजित करण्यात येणार आहे.महिला उद्योजकता सशक्तीकरणाची योग्य दिशा देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ अंतर्गत मार्गदर्शन, आर्थिक स्वरुपात सहाय्य व उद्योग व्यवसाय स्टार्टअप ला प्रोत्साहन देणारी योजना आहे.
सक्षम महिला सक्षम राज्य अस महाराष्ट्र राज्य शासनाचे धोरण आहे.सरकार ने सुरवातीच्या काळात लोक लाडकी योजना सुरवात केली नंतर जुलै 2024 पासुन ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” या योजनेची सुरवात करण्यात आली आहे.महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून महाराष्ट्र सरकारने ” पिंक ई-रिक्षा योजना ” सुरवात करण्यात आली.आणि या योजनेत नंतर ” मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ” या नंतर ही महिला स्टार्टअप योजनेची सुरवात करण्यात आली आहे. शासन महिलांना संधी देण्यास सक्षम आहे. महिलांचा सन्मान हाच राज्याचा सन्मान आहे महाराष्ट्र राज्य शासन खुप महत्वाकांक्षी आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनाची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या प्रत्येक योजनेच्या लेखामध्ये सविस्तर माहीती देण्यात आली आहे आपल्या वेबसाईटवर सर्व शासनाच्य विविध योजनांची माहिती देत आसतो त्यासाठी वेबसाइटवर अपडेट रहा. आणि योजनेच्य विविध माहितीसाठी सर्व योजनाची स्वातंत्र्य पोर्टल आहे त्यावर जाऊन सविस्तर माहिती घेऊन आवश्यक कागदपञे घेऊन ऑनलाईन किंवा संबधीत कार्यलयात अर्ज सादर करु शकता.
आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून शासनाच्या योग्य व अचुक माहिती देण्याचा एक प्रयत्न करत आसतो आणि शासनाच्या विविध योजना पासुन कोणीही वंचित राहु नये म्हणून एक प्रयत्न करत आसतो. योजनेच्या मिळणार्या लाभापासुन कोणी वंचित राहणार नाही या किंवा कोणत्याही योजनाची सविस्तर माहिती घेण्यासाठी वेबसाईटवर अपडेट रहा.आणि माहिती शेअर करत राहा शासनाच्या योजनाच्या लाभापासुन कोणीही वंचित राहु नये सर्वांना लाभ मिळावा यासाठी माहीती इतरांना शेअर करणे गरजेच आहे .वरील सर्व माहिती आवडली आसल्यास माहिती शेअर करा आणि आमच्या वेबसाईटवर विविध योजना व घडामोडी संबधीत माहिती वाचण्यासाठी मिळण्यासाठी वेबसाईटवर अपडेट रहा.Mahila Startup scheme