Gay Gotha Anudan Yojana| गाय गोठा अनुदान योजना पहा सविस्तर माहिती.

Gay Gotha Anudan Yojana

Gay Gotha Anudan Yojana

Gay Gotha Anudan Yojana महाराष्ट्र शासनाची गाय गोठा अनुदान योजना अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत जाणुन घ्या सविस्तर माहीती.

नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकऱ्याच्या गाय गोठा अनुदान या योजनेबाबत माहिती जाणून घेऊया. या योजनेसाठी अर्ज कसा करावा या अर्जाचा नमुना मिळेल का नाही, या योजनेसाठी अटी शर्ती असतात काय तसेच यासाठी कागदपत्रे काय लागतील अशी अनेक प्रश्न शेतकर्यांना येतात. फेब्रुवारी 2021 च्या GR नुसार राज्यामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही योजना राबवण्यासाठी मजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत गाय गोठा, शेळी पालन शेड किंवा कुक्कुटपालन शेड असेल या तिन्हिही वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. यासाठी लागणार्या अर्जाचा नमुना, यासाठी लागणारी कागदपत्रे ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी लागणार्या अर्जाबाबतच्या अटी बघा. लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबतची माहिती बघूया.

गाय गोठा अनुदान योजना Gay Gotha Anudan Yojana

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्ध योजना सह गाय गोठा अनुदान योजना छतासह, छताविरहीत कुक्कुटपालन शेड आणि शेळी पालन शेड. वैयक्तिक कामासाठी अर्जाचा नमुना. प्रति सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्राम पंचायत तालुका जिल्हा, अर्जदाराच पुर्ण नाव यामध्ये सुरुवातीला अट दिलेली आहे ज्यामध्ये जनावराचा गोठा बांधने, शेळी पालन शेड बांधले, कुक्कुटपालन शेड बांधने यापैकी एक काम एका लाभार्थ्यांस मंजूर करून प्रत्येक लाभार्थी पातळीवर मग्रारोहो अंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावर वृक्ष लागवड व संगोपन 3 वर्षे 1 हेक्टर. वैयक्तिक शेततळे 15×15×15× मिटर चे लाभ घेतलेले लाभार्थी नंतर सार्वजनिक क्षेत्रावर व रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड व संगोपन काम किमान 200 झाडे चा संगोपन करणारे कुटुंब. कंपोस्ट बडिंगचे लाभ घेतलेले लाभार्थी.

तसेच योजने अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये नरेंद्र अंतर्गत 275 वैयक्तिक व सार्वजनिक कामांपैकी ज्या कामामध्ये अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त आहे. अशा सर्व कामाच्या संयोजनातुन 60.40 चा कुशल अकुशल चा प्रमाण राखण्याचा प्रयत्न करणारे सर्व कुटुंब/ लाभार्थी/ मजुर हे लाभ घेण्यास पात्र राहतील.

लाभार्थी या योजनेअंतर्गत कामाच्या संयोजनातून अकुशल कुशल प्रमाण 60.40 राखण्याचा प्रयत्न करणारे आहे अशा सर्व इच्छुक कुटुंबास/ अर्जदारास या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. यासाठीचा अर्ज जनावराचा गोठा बांधने छतासह, छताविरहीत. यामध्ये छतासह 77 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. आणि छताविरहीत 48 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.

तसेच लाभार्थ्यांकडे गाई म्हशी किती आहेत याच्या संख्या. यामध्ये छतासह अर्ज करायचा आहे की छताविरहीत अर्ज करायचा आहे. शेळी, मेंढी पालन शेड बांधने यामध्ये शेळी, मेंढीची संख्या. कुक्कुटपालन शेड बांधने यामध्ये पक्ष्यांची संख्या आणि ज्या बाबिसाठी आपण अर्ज करणार आहोत त्या समोर टिक करायची आहे. Gay Gotha Anudan Yojana

गाय गोठा अनुदान योजना लाभार्थ्यांची पात्रता व कागदपत्रे

1.यामध्ये लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती . भटक्या जमाती भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, महिला प्रधान कुटुंब, भुसार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, एसटी चे लाभार्थी अन्य परंपरागत वन निवासी, महिला प्रधान कुटुंब लाभार्थी, किंवा अल्पभूधारक असलेले लाभार्थी अशा प्रकारे आपण ज्या प्रवर्गातील आहोत त्यासमोर टिक करायची आहे.

2.त्यानंतर मनरेगाच्या अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या विविध वैयक्तिक कामाच्या संयोजनातुन अकुशल कुशल प्रमाण 60.40 लाभार्थी राखण्यासाठी या योजने अंतर्गत काम केलेले असावे.

3.सदर लाभार्थी कुटुंब यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावर किमान 20 ते 50 वृक्षलागवड करण्यात येऊन त्याचे 3 वर्षे संगोपन करून झाडे 100 टक्के जिवंत ठेऊन योजनेचा लाभ पुर्ण घेणारे लाभार्थी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामावर मजुर म्हणून किमान 100 दिवस काम करणारे मजुर पात्र आहेत.

• वैयक्तिक क्षेत्रावर 20 ते 50 फळ झाडे, वृक्ष लागवड केल्यास गाय गोठा छता विरहीत लाभ मिळतो.आणि

• वैयक्तिक क्षेत्रावर 50 पेक्षा जास्त फळ झाडे, वृक्ष लागवड केल्यास गाय गोठा छतासह गाय गोठा शेळी पालन किंवा कुक्कुटपालन शेड या योजनेचा लाभ भेटतो.

• सार्वजनिक कामावर मजुर म्हणून किमान 100 दिवस काम केल्यावर या तिन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.

• पशुपालन असल्या बाबतचा पशुधन /पर्यवेक्षक अधिकार्याचा दाखला जोडने आवश्यक आहे.

  • यामध्ये गाय गोठा करिता 2 ते 6 आवश्यक आहेत.
  • शेळी पालन शेड करिता 2 ते 10 शेळी आवश्यक आहेत. आणि
  • कुक्कुटपालनासाठी 100 पक्षी आवश्यक आहेत. यामध्ये पशुधन असल्याचा प्रमाणपत्र दाखला जोडावा लागते.
  • कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र ऑनलाईन जाॅबकार्ड किंवा याची झेरॉक्स लागते.
  • लाभार्थी च्या नावाने जमीन जागा असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी सदर गावाचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • त्याच्या राष्ट्रीयकृत बॅंक खात्याचे पासबुक झेरॉक्स.
  • सदरचे काम ग्रामपंचायत चालू वार्षिक कृती आराखडा लेबर मध्ये नाव समाविष्ट असल्याचे ग्रामपंचायत शिफारस पत्र असणे आवश्यक आहे.
  • निवडलेल्या कामाचा जागेचा अक्षांश रेखांश असलेल्या फोटो सह ग्रामपंचायत तांत्रिक सहायक पशुधन पर्यवेक्षक, लाभार्थी यांची संयुक्त सहिचा स्थळ पाहणी अहवाल जोडणे आवश्यक आहे.
  • या सर्व कागदपत्रासह मी दिलेली माहिती बरोबर आहे. याच्यामध्ये माहिती चुकीची निघाल्यावर मी शासनाने ठरविलेल्या वसुलीसाठी पात्र असेल अशा प्रकारची सहमती देऊन अर्जावर सही करावी लागते. आणि यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे या अर्जासोबत जोडायचा आहे.
  • सदर लाभार्थ्यांचे काम मंजूर झाल्यास योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो. काम सुरू करण्या आधीचा फोटो. काम चालू असताना चा फोटो आणि काम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यासोबत फोटो. अशा प्रकारचे तिने फोटो अंतिम देय मंजुरी च्या पुर्वी 7 दिवसात सादर करणे बंधनकारक राहील.
  • त्याचप्रमाणे यावर तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रति गट विकास अधिकारी जो या अर्जाच्या प्रस्तावासोबत जोडाव लागते. यामध्ये लाभार्थ्याचे नाव निवडलेल्या कामाचे नाव सदर लाभार्थी योजनेअंतर्गत 60.40 चा रेशो मेंटेन करण्यासाठी केलेल्या कामाची माहिती आणि प्राधान्यक्रम अशा प्रकारची माहिती यामध्ये दिली जाते.

ग्रामसेवकाच्या माध्यमातून एक तांत्रिक मान्यतेसाठी चे एक पत्र येथे दिले जाते.त्यानंतर तपासणी सुची लाभार्थ्याने कोणकोणते कागदपत्रे जोडलेली आहेत. लाभार्थी अंतर्गत कोणत्या बाबीसाठी पात्र आहेत. हे या प्रस्तावासोबत ग्रामविकास अधिकारी आणि ग्राम सेवकाच्या माध्यमातून जोडले जाते. त्यानंतर एक दाखला दिला जातो. शिफारस पत्र. त्याचा नमुना बघा.

लाभार्थी या ठिकाणी वृक्षलागवड, फळबाग लागवड, शेततळे अशा प्रकारची जी कामे केलेली आहेत ती कामे केली म्हणून ग्रामसेवकाच्या माध्यमातून शिफारस पत्र दिले जाते आणि हे शिफारस पत्र सुद्धा या अर्जासोबत जोडायचा आहे. सार्वजनिक कामाच्या संयोजनातुन लाभार्थ्याने 60.40 चा रेशिओ मेंटेन करण्यासाठी काम केले असेल तर त्याबाबतचाही दाखला दिला जातो. पशुपालन दाखला.

पशुपालनाचा दाखला पशुसंवर्धन अधिकार्याकडुन जे वैद्यकीय अधिकारी असतील त्याच्या माध्यमातून दिला जातो. त्यामध्ये टॅगिंग क्रमांक, जनावराची संख्या, लहान जनावरे किती आहेत , मोठी जनावरे कीती आहेत ही सर्व माहिती या ठिकाणी दिली जाते. रहिवास्याचे एक स्वयंघोषना पत्र जोडाव लागते.अर्जदाराचा फोटो यामध्ये कुठल्याही अधिकार्याची सही लागणार नाही. अर्जदाराला आपल्या फोटो सह हे स्वयंघोषना पत्र द्यावे लागते.

या मध्ये प्रति लाभार्थीस एक अनुदान द्यायचे आहे. त्या अनुदाना बाबतची माहिती ही येथे दिलेली असते. त्यामध्ये 2 ते 10 गुरूसाठी 1 पट अनुदान त्यामध्ये 77 हजार पर्यंत अनुदान ज्यामध्ये छतासहीत 2 पट अनुदान 12 गुरांसाठी दुप्पट अनुदान आणि 18 गुरांसाठी तिप्पट गोठा अनुदान दिले जाते. शेळ्यांमध्ये हि 2 ते 10 शेळ्या साठी एकपट , 20 शेळ्या साठी दुप्पट, 30 शेळ्या साठी तिप्पट गोठा अनुदान दिले जाते.Gay Gotha Anudan Yojana

अनुदानाचा दर जर एक पट असेल तर 50464 शेळी पालनासाठी आणि जर शेळ्या जास्त असतील तर त्याला तिप्पट दिले जाते. कुक्कुटपालनाला 100 च्या पुढे असेल तर दिड दोन पट अनुदान दिले जाते. गाय पालनासाठी जर 18 जनावरे असतील तर 77448 च्या तिप्पट अनुदान दिले जाते. त्याचे 60.40 चे प्रमाणही येथे दिलेले असेल.

तसेच यासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ते बघता येते या कागदपत्रासह हा अर्ज प्रस्ताव ग्रामपंचायत च्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये सादर करता येतो. तर अशा प्रकारे आपण या अर्जाच्या प्रस्तावाचा नमुना बघितला आहे जो ग्रामपंचायत च्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये सादर करायचा असतो. तसेच यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे यासाठी अर्ज कसा करावा ही सर्व माहिती बघितली आहे.

गाय गोठा अनुदान संदर्भात सविस्तर आणि आणखी जास्त माहिती हवी असल्यास संबधीत कार्यालय किंवा आपल्या गावातील ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधा योग्य माहिती मिळेल कागदपञे कोणती लागतात सर्व माहिती गावातील ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे उपलब्ध आसते योग्य माहिती घेऊन गाय गोठा अनुदान मिळविण्यासाठी अर्ज करु शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून गाय गोठा अनुदान योजना Gay Gotha Anudan Yojana या संदर्भात सविस्तर माहिती बघितली आहे तर अशाच विविध योजनाच्या व शासना मार्फत राबविण्यात येणारे निर्णय ,कृषी योजना व इतर योजनाची माहिती आपण आपल्या वेबसाईटवर देत आसतो तर आशाच माहितीसाठी आमच्या समूहात सामिल व्हा आणि आमच्या वेबसाईटवर पहात राहा.