kolhapur district information
kolhapur district information आज आपण महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके, नद्या, पर्यटन इत्यादी अन्य संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून विशेष माहिती, शासानाच्या योजना व अन्य प्रकारची विविध माहिती पाहत आसतो तर आज आपण आशाच एक जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत. या आगोदर सातारा, बीड या जिल्ह्यातील माहिती व पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणुन घेतली आहे तरी आज आपण महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक जिल्हा खुप मोठे पर्यटन स्थळ आसलेल्या या जिल्ह्यातील माहिती जाणून घेणार आहोत.
नमस्कार मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.कोल्हापूर या जिल्ह्याचे मुख्यालय कोल्हापूर याच ठिकाणी आहे.कोल्हापूर जिल्ह्या हा आपले जे 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्या विभागांपैकी पुणे या प्रशासकीय विभागातला कोल्हापूर हा जिल्ह्या आहे.या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7692 चौ. की. मी. एवढे आहे. तसेच कोल्हापूर या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ही 38,74,15 इतकी आहे. या जिल्ह्याचे पुरुष व महिला प्रमाण हे दर हजार पुरुषांमागे 953 एवढे महिला प्रमाण आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर या जिल्ह्याची एकूण साक्षरता ही 82.90% इतकी आहे.
कोल्हापूर या जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत आणि ते कोणकोणते बघा. kolhapur district information
कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके पुढील प्रमाणे आहेत.
- आजरा
- चंदगड
- गगनबावडा
- कागल
- पन्हाळा
- शाहुवाडी
- भुदरगड
- गडहिंग्लज
- हातकणंगले
- राधानगरी
- शिरोळ
- करवीर
इत्यादी तालुके महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यात आहेत.
तसेच या कोल्हापूर या जिल्ह्यात नगरपालिका या 13 आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
- इचलकरंजी
- कागल
- कुरुंदवाड
- कोल्हापूर
- गडहिंग्लज
- जयसिंगपूर
- पन्हाळा
- मलकापूर
- मुरगुड
- वडगाव
- शिरोळ
- हुपरी
- आजरा,
अशा ह्या 13 नगरपालिका महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यात आहेत.
कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर किती जिल्ह्याला सिमा लागलेल्या आहेत ते बघा.
कोल्हापूर या जिल्ह्याला उत्तरेकडे सांगली हा जिल्हा आहे. पुर्वेला व दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे. पश्चिमेला रत्नागिरी व सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. एक राज्य व तिन जिल्ह्याच्या सीमा कोल्हापूर या जिल्ह्याला लागलेल्या आहेत.
कोल्हापूर हा जिल्हा पंचगंगा या नदीच्या काठावर वसलेला आहे.कोल्हापुर हे शहर पंचगंगा नदीच्या तीरावर आहे.
कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वाहणाऱ्या नद्या आहेत ते कोणत्या आहेत ते बघूया.
- कृष्णा नदी
- वारणा नदी
- पंचगंगा नदी
- दूधगंगा नदी
- वेदगंगा नदी
- कुंभी नदी
- कासारी नदी
- हिरण्यकेशी नदी
- घटप्रभा नदी
- ताम्रपर्णी नदी
- कडवी नदी
- भोगावती नदी
ह्या नद्या महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यातुन वाहतात.तसेच कोल्हापूर या जिल्ह्यात खनिज संपत्ती कोणकोणती आहे. ते बघा. सह्याद्रीच्या डोंगररांगांत बाॅक्साईटचे साठे पाहायला मिळतात. या जिल्ह्यात घेतली जाणारी प्रमुख शेतकी उत्पादनेभात, ज्वारी, भुईमूग, तंबाखू, ऊस, सोयाबीन आणि कापूस अल्प प्रमाणात ही कोल्हापूर या जिल्ह्यात घेतली जाणारी प्रमुख शेतकी उत्पादने आहेत. या जिल्ह्यात अत्यंत महत्त्वाचे धरण आहे ते म्हणजे राधानगरी हे जे धरण आहे भोगावती नदिवर आहे. अत्यंत महत्त्वाचे हे धरण आहे. पन्हाळा हे कोल्हापूर या जिल्ह्यातील असलेले थंड हवेचे ठिकाण आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे.
- रंकाळा तलाव
- शाहू पॅलेस
- दाजीपूर अभयारण्य
- टाउन हाॅल प्रिमियम
- पन्हाळगड किल्ला
- पारगड किल्ला
- शिवाजी विद्यापीठ
- श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर
- टेंबलाई मंदिर कोल्हापूर
- भवानी मंडप कोल्हापूर
- नवीन पॅलेस संग्रहालय कोल्हापूर
- ज्योतिबा मंदिर कोल्हापूर
- रंकाळा तलावकोल्हापूर
- कोल्हापूर कोपेश्वर मंदिर
- विशालगड किल्ला
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात इत्यादी पर्यटन स्थळे कोल्हापूर या जिल्ह्यात आहेत. kolhapur district information
कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. शाहू महाराजांची 1894 ते 1922 पर्यंतची कारकिर्दी महाराष्ट्रातील बहुजन समाजाला उत्थापनाचे, विकासाचे व जागृतीचे प्रबोधन करणारी म्हणुनच कोल्हापूर च्या एकुण जडणघडणीवर, विकासावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणेची व कार्याची छाप आहे. सहकारी दुग्धोत्पादन क्षेत्रात कोल्हापूर हा जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. चित्र नगरी हे मराठी चित्रपट निर्मिती चे केंद्र कोल्हापूर येथे आहे.आता या चित्रनगरी चे नाव भालजी पेंढारकर चित्र नगरी असे करण्यात आले आहे. कुस्तीची परंपरा ही कोल्हापूर जिल्ह्याचा एक मानबिंदू आहे. मल्लविद्या जोपासण्याचे श्रेय शाहू महाराजांकडे जाते. कोल्हापूरात अनेक ठिकाणी तालीम मंडळे आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात यंत्रमागे व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या शहरात महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी उर्फ नृसिंह वाडी हे नृसिंह सरस्वतींचे मंदिर असलेले गाव येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. त्याचप्रमाणे वाडीरत्नागिरीच्या डोंगरावरील ज्योतिबा मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर हे शिलाहार शैलीतील स्थापण्यासाठी प्रसिद्ध असलेले शिवमंदिर आहेत. नरसोबाची वाडी किंवा नृसिंह वाडी या ठिकाणपंचगंगेच नदी आणि पंचगंगा नदी या नद्यांचा संगम आहे. आणि दत्तमंदिर ही या ठिकाणी आहे. कोल्हापूर येथे रेल्वे स्थानक आहे. त्या रेल्वे स्थानकाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूर ला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा असे म्हणतात.kolhapur district information
कोल्हापूर या जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व
कोल्हापूर हे शहर सहकारी चळवळीच्या बाबतीत महाराष्ट्रातील आघाडीच्या जिल्ह्यापैकी एक आहे. या सहकारी चळवळीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात क्रांतिकारी विकास झाला. या जिल्ह्यात सुमारे 9624 सहकारी संस्था आहेत. आणि जवळजवळ 31.21 लाख लोक त्यांचे सदस्य आहेत.
कोल्हापूरच्या गादीचा इतिहास – इ.स. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला होता. त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी पन्हाळ्यावरून राज्य चालवण्याचा प्रथम प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी रायगडाकडे कूच केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.1698 मध्ये साताऱ्याला छत्रपतींच्या गादीची स्थापना केली होती. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेतली आणि स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. राणी ताराबाईंनी पन्हाळ्यावर 1710 मध्ये स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली.1782 मध्ये कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापूरला आली. तिसरा शिवाजी यांचे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1812 पर्यंत (५२ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द) कोल्हापूर गादीवर वर्चस्व होते. 1818 च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्या 1949 मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर स्वतंत्र होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील व्यवसाय उद्योग.kolhapur district information
या जिल्ह्यातील उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम ( ज्यात मुख्यत: मोटारींचे भाग तयार केले जातात अशा फाउंड्रीज) आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. इचलकरंजी या शहरात बरेच वस्त्रकामाशी व संबंधित उद्योग आणि कारखाने आहेत. हे कारखाने तयार मालाची थेट निर्यात करतात. हुपरी हे गाव चांदीकामासाठी प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर हा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संस्था गोकुळ या नावाने ओळखली जाते. या संस्थेच्या गोकुळ दुधाचा पुरवठा पूर्ण महाराष्ट्रात (प्रामुख्याने मुंबईला) केला जातो. एकूण २५०० सहकारी दूध सोसायट्या (डेअऱ्या) या संघाच्या सभासद आहेत. कोल्हापूर या जिल्ह्यात वारणानगर येथे दुधाचे पदार्थ तयार करण्याचा उद्योग आहे. वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचे वारणा दूध तसेच प्रक्रिया केलेले पदार्थ मुंबई, ठाणे, पुण्यासह कर्नाटक व गोवा या राज्यातही जातात.अशा प्रकारे आपण कोल्हापूर जिल्ह्याची काही माहिती जाणून घेतली आहे.
सातारा जिल्ह्यातील माहिती पर्यटन स्थळांबद्दल जाणुन घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवर एक लेख प्रसिद्ध केला त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती आहे तसेच सातारा जिल्ह्यातील विशेष माहिती देखील आहे तरी हा लेख आवश्य पहा. सातारा जिल्ह्यातील माहितीचा लेख पाहण्यसाठी येथे क्लिक करा.
कोल्हापूर जिल्ह्यातील माहिती पाहीली आहे यात कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणुन घेतली आहे पण पुढील लेखात कोल्हापूर जिल्ह्यातील माहिती सोबत कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कोल्हापूर शहरातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती आपण मागील लेखात जाणून घेतली आहे तरी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठीच हा लेख आवश्य वाचा.kolhapur district information
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध माहिती व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आधिकृत पोर्टलवर भेट द्या तेथे सविस्तर माहिती मिळेल. सोशल मीडियावर माहिती जाणून घेण्यासाठी युट्युब वरील विडीओ पहा सविस्तर माहिती मिळेल. आणि सोशल मीडियावरील लेख पण वाचु शकता किंवा गूगल चा वापर करुन सविस्तर माहिती मिळवु शकता. लेख आवडल्यास पुढे शेअर करा आणि आशाच माहिती साठी आमच्या वेबसाईटवर अपडेट राहा आणि अशीच माहिती ,योजना,मनोरंजन अन्य माहिती पाहत राहा kolhapur district information