Aurangabad district information
Aurangabad district information मराठवाड्यातील विभाग छञपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) जिल्ह्यातील माहिती थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
नमस्कार मंडळी आज आपण छञपती संभाजीनगर (औरंगाबाद ) जिल्ह्याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. औरंगाबाद हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला मराठवाड्याचे द्वार म्हणून संबोधले जाते. छ. संभाजीनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. हा जिल्हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आहे.
छञपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील तालुके
औरंगाबाद या जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत. ते कोणकोणते आहेत पुढील प्रमाणे आहेत.
- छ. संभाजीनगर ( औरंगाबाद )
- खुलताबाद
- सोयगांव
- सिल्लोड
- गंगापूर
- कन्नड
- फुलंब्री
- पैठण आणि
- वैजापूर
हि छ. संभाजीनगर ( औरंगाबाद ) जिल्ह्यातील 9 तालुके आहेत. या 9 तालुक्यात एकूण 1344 गावे आहेत
औरंगाबाद या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 10,130.89 चौ. कि. मी. एवढे असून 2011 च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 37,01,282 इतकी आहे.
छञपती संभाजीनगर ( (Aurangabad) ) जिल्ह्यातील काही प्रमुख नद्या सुद्धा आहेत. कोणकोणत्या आहेत ते बघा. गोदावरी नदी, तापी नदी आणि पूर्णा नदी ह्या औरंगाबाद जिल्ह्यातील नद्या आहेत. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील काही प्रमुख पिके आहेत ते बघा. कापूस, बाजरी, मका, तूर, मुग ज्वारी आणि गहू ही औरंगाबाद जिल्ह्यातील घेतली जाणारी पिके आहेत.
छञपती संभाजीनगर (औरंगाबाद) हा जिल्हा भारतातील एकमेव जिल्हा आहे. आणि त्यात 2 जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तु आहेत ते म्हणजे अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी ही आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर पैठण हे आहे. आणि पैठण हे ऐतिहासिक शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या जिल्ह्यातील हिमरू शाल हे प्रसिद्ध आहे. औरंगाबाद या जिल्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. या जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात वाळुज, चिकलठाणा, शेंद्रा या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. तसेच पैठण या तालुक्यातही औद्योगिक वसाहती आहेत. त्यामधील शेंद्रा औद्योगिक वसाहत ही पंचतारांकित वसाहत म्हणून ओळखली जाते. याशिवाय चिकलठाणा येथे आय. टी. पार्क सुद्धा आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक कंपन्यांचे काॅल सेंटर्स आणि छोट्या आय. टी. कंपन्याही आहेत.
छञपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे.
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणुन घेणार आहोत ते पर्यटन स्थळ पुढील प्रमाणे आहेत.
- भद्रा मारुती
- वेरूळ लेणी
- बिबी का मकबरा
- दौलताबाद किल्ला
- अजिंठा लेणी
- जायकवाडी धरण आणि तिर्थक्षेत्र धरण
- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
- भद्रा मारुती -या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील मुर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मुर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाणी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे आहे दुसरे खुलताबाद आहे व तिसरे मध्यप्रदेशातील जामसावडी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात.
- वेरूळ लेणी – कैलास मंदिर, घृष्णेश्वर मंदिर, वेरूळला इंग्रजांनी एलोरा हे नाव दिले आहे. व त्याच नावाने हे जगप्रसिद्ध आहे. आणि येथे जगप्रसिद्ध 34 लेणी आहेत. क्र. 1 ते 10 बौद्ध धर्माची लेणी क्रमांक 13 ते 20 हिंदू धर्माचे आणि क्रमांक 30 ते 34 जैन धर्मांची लेणी आहेत. या तिन्हीनी क्र. 10,14,15,21,29,31,33 व 34 या लेणी उत्कृष्ट आहेत. याची लांबी सुमारे 164 फुट आहे, रुंदी 109 फुट व उंची 96 फुट इतकी आहे. हे खोदताना 30 लाख घनफूट दगड वेगळा करावा लागला होता. हे मंदीर बांधण्याचे काम तिन पिढ्यात म्हणजे इ. स. 578 मध्ये पुर्ण झाले. शिल्पकलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. वेरूळ पासून जवळच घृष्णेश्वराचे पवित्र स्थान व कुंड आहे. हे कुंड महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी बारावे ज्योतिर्लिंग आहे. हे शिवमंदिर असुनही येथे पुर्ण प्रदक्षिणा घालतात. घृष्णेश्वराचे मंदीर हे अहिल्यादेवींनी उभारले. हे मंदीर पुर्वाभिमुख आहे.
- बिबी का मकबरा – बिबी का मकबरा हा आग्रा येथील ताजमहलाची प्रतिकृती आहे. या महालात औरंगजेबाची पत्नी दिलरासबागू बेगम यांची कबर असुन ती मुघल बादशाह औरंगजेबाच्या काळात बनविण्यात आली होती. परंतु मकबरा मलिबाचा मुलगा शहजादा आजम शाह कडून सन 1651 ते 1661 या काळात आईच्या स्मरणार्थ बांधला गेला होता. कबरीवर दिवसा सूर्यकिरणे व रात्री चंद्राचा प्रकाश पडतो. येथे औरंगजेब व त्यांची बेगम यांच्या वापरात येणार्या वस्तू तसेच चढाई, भांडे , लाकडी फर्निचर आणि वस्त्र असुन त्याच्या राहण्याचे साधेपणा येथे दिसून येते. बिबी का मकबरा स्थापत्य शास्त्रातील अप्रतिम वास्तु असुन मकबर्याची भव्यता आणि सौंदर्य ताजमहलासारखेच आहे. मकबर्याच्या उत्तरेस बारा लेण्या आहेत. आणि त्या 6 व्या किंवा आठव्या शतकातील असाव्यात असा अंदाज आहे.
- दौलताबादचा किल्ला – दौलताबाद याचे जूने नाव देवगिरी आहे. येथील प्रसिद्ध किल्ला या दराने बांधला होता. रामदेवबाबा यांच्या काळात अल्लाउद्दीन खिलजीने सन 1296 मध्ये जिंकला. या किल्ल्याभोवती खंदक आहे. याशिवाय गुवारी मार्गाने येथे जावे लागते. किल्ला चढताना या किल्याचा काही मध्यभाग अंधाराने व्यापलेला आहे. येथे शत्रुला मारण्यासाठी गरम तवा ठेवलेला असतो. किल्ल्याच्या भोवतीचा महाकोट शिल्पसंग्रह, बुरूज, हत्ती हौद, भारतमाता मंदीर चांदमिनार, हेमाडपंती मंदिर, कालकोट चिनी महाल ,मेंढा तोफ, खंदक, भुयारी रस्ता, गणेश मंदीर, बारादरी, जनार्दन स्वामींच्या पादुका, दुर्गातोफ अशा अनेक गोष्टी येथे बघण्यासारखे आहेत. तसेच येथे यादवांनी बांधलेला 100 फुट उंचीचा मनोरा चांद मिनार हा या किल्ल्याजवळ च आहे.
- अजिंठा लेणी – छञपती संभाजीनगर (औरंगाबाद) पासून सुमारे 102 किलोमीटर अंतरावर घळीच्या आकारातील पर्वतात ही लेणी आहे. घळीच्या आकारातील पर्वतात अप्रतिम अजिंठा लेण्या कोरण्यात आल्या आहेत. बौद्धव वास्तुशास्त्र, भिंती चित्र आणि शिल्पकलेचा आदर्श नमुना असलेल्या या लेण्यात भगवान बुद्धांना अर्पण केलेली चैतदालन्ये आणि प्रार्थनागृहे याशिवाय ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिक्खू वापरात असलेले बिहार आणि आश्रम आहे. लेण्यांमधील भिती आणि छतावर काढलेल्या देखण्या चित्रामधुन भगवान बुद्धांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण आवडते. सुमारे 700 वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे अशाच सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे 1 हजार वर्षांहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या. जाॅन स्मिथ हा ब्रिटिश लष्करी अधिकारी 1839 साली लष्करीसाठी निघाला होता तेव्हा त्याला या लेण्या दिसुन आल्या. • पानचक्की. औरंगाबाद येथील पानचक्की हे पर्यटन स्थळ निजामकालीन आहे. येथे पाण्यावर चालणारी पिठाची चक्की असल्याने याला पानचक्की म्हणतात. येथे येणारे पाणी शहराच्या बाहेरुन सहा किलोमीटर वरुन एका नहरीद्वारे जमिनीखालुन आणले जाते. व हेच पाणी 20 फुट उंचीवरून एका धबधब्याच्या स्वरूपात हौदामध्ये सोडले जाते. पानचक्की म्हणजेच मध्ययुगीन अभियांत्रिकी चे एक उत्तम उदाहरण आहे.
- जायकवाडी धरण आणि तिर्थक्षेत्र धरण – जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातल्या मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी एक आहे. हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे कारण या धरणातील पाणी या भागातील लोकांना पिण्यासाठी तर या जिल्ह्यातील एम आय डी सी मधील उद्योगांना पुरवण्यात येते. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात गोदावरीच्या तिरावर आहे. या धरणाच्या सभोवती पक्षी अभयारण्य आणि उदयान आहे. तसेच पैठण हे संत एकनाथ महाराजांचे जन्मस्थान आहे. त्यांनी येथेच समाधी घेतली होती. एकनाथषष्टी हा पैठण येथील मुख्य उत्सव आहे. तसेच या दिवशी उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पैठण येथे येतात.
अशा प्रकारे आपण औरंगाबाद जिल्ह्याची काही माहिती जाणून घेतली आहे. या स्थळाव्यतीरीक्त अनेक गोष्टी या औरंगाबाद जिल्ह्यात पाहण्यासारख्या आहेत. जसे ऐतिहासिक 52 दरवाजे, औरंगाबाद गुफा, पितळखोर लेण्या, किले अंतुर, सिता नहानी, सोनेरी महाल, ऐतिहासिक संग्रहालये, गौताळा अभयारण्य, सलीम अली सरोवर, सिद्धार्थ उद्यान याशिवाय अनेकउद्यान याशिवाय अनेक ऐतिहासिक गोष्टी देखील छञपती संभाजीनगर (औरंगाबाद) या जिल्ह्यात आहेत.
छ. संभाजीनगर ( औरंगाबाद ) जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्य वेबसाईटवर उपलब्ध रहा नविन लेख घेऊन छञपत संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांबद्दल आधिक माहिती जाणुन घेणार आहोत ही माहिती थोडक्यात आहे तसे या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे या जिल्ह्यातील आधिक माहिती जाणुन घेण्यासाठी जिल्ह्याच्या आधिकृत वेबसाईटवर भेट द्या.