Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती.

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi

Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांच्याबद्दल थोडक्यात माहीती जाणुन घेणार आहोत.

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना समजुन शब्दात उतरविणे म्हणजे फार मोठी बाब आहे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक, विचारवंत, कायदेतज्ज्ञ, राजकारणी अशा व्यक्तीमत्वाबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून एखाद्या विद्यार्थी किंवा व्यक्तीला व्यासपीठावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना फायदा होईल बाबासाहेब आंबेडकर माहिती बद्दल थोडक्यात माहिती पाहुया.

प्रचंड बुद्धीमत्ता असणाऱे समाजासाठी अनेक त्याग करणारे, प्रचंड समाजाला स्थान मिळवून देणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे महाडचा सत्याग्रह , मनस्पतीचे दहन काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह शेतकर्यांचे कैवारी गोलमेज परिषद गाजवणारे , पुणे करार , महिलांसाठी कार्य अशी अनेक महान कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात केले होते. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. शिक्षणासाठी संघर्ष करुन अठरा अठरा तास अभ्यास करून त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या.व आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धीचा उपयोग देशाच्या व समाजाच्या उद्धारासाठी केला. त्याचे जिवन आणि शिक्षण एक सामाजिक , धार्मिक व राजकीय कार्य अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे. आज आपण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवनक्रम त्याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत संपूर्ण माहिती आणि कार्य जाणून घेणार आहोत. महु येथे 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar यांचा जन्म झाला होता. सुभेदार रामजी मालोजी सपकाळ हे त्यांचे वडील होते आणि भीमाबाई या त्यांच्या आई होत्या. महु येथील लष्करी छावणीत सुभेदार रामजी मालोजी सत्काळ आणि भीमाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ते 14 वे आपत्य होते.

1894 मध्ये सातारा येथील प्राथमिक शाळेत त्यांचे नाव नोंदवले गेले होते. डिसेंबर1896 मध्ये त्यांच्या आई भीमाबाई यांचे मस्तककुशाने निधन झाले. पुढे 7 नोव्हेंबर 1900 मध्ये आंबेडकर यांचे नाव सातारा येथील सरकारी माध्यमिक शाळा सातारा हायस्कूल येथे या शाळेत सुभेदाराने नाव नोंदवले. या शाळेत त्यांचे नाव आंबाबाईकर बदलून आंबेडकर असे नोंदवले. नोव्हेंबर 1904 मध्ये बाबासाहेब सातारा हायस्कूल मधुन इंग्रजी चौथीच्या परिक्षेत पास झाले .पुढे बाबासाहेबांना सुभेदारांनी डिसेंबर 1904 मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये दाखल केले. पुढे जानेवारी 1907 मध्ये आंबेडकर यांनी मॅट्रिक ची परीक्षा देऊन परिक्षेत पास झाले.

अस्पृश्य समाजातील मॅट्रिक पास झालेले आंबेडकर हे पहिले विद्यार्थी होते. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी एक सभा भरवली गेली होती. त्या सभेत गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर यांनी त्यांचे ‘ भगवान बुद्धाचे चरीत्र’ हे पुस्तक आंबेडकरांना दिले होते. एप्रिल 1908 मध्ये बाबासाहेबांचा यांचा विवाह झाला. भिकु धोत्रे यांची कन्या रमाबाई यांच्याशी सुभेदारांनी विवाह आंबेडकर यांच्या शी करून दिला. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी 1910 मध्ये आंबेडकर यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन दिले. तसेच दरमहा 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती बडोद्याच्या संस्थानाने मंजूर केली आणि पदवी प्राप्त केल्यानंतर बडोदा संस्थानाची नोकरी करण्याची अट आंबेडकरांना घातली. जानेवारी 1913 मध्ये बाबासाहेब B.A च्या पदवी परीक्षेत पास झाले.

15 जानेवारी 1913 रोजी बडोदा सरकारच्या शिष्यवृतिच्या करारानुसार आंबेडकर हे मिलीटरी डिपार्टमेंट च्या अकाउंट जनरलच्या कार्यालयात जाऊ लागले. तिथे त्यांना महिन्याला 75 रुपये एवढी पगार होती. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी यांचे 2 फेब्रुवारी 1913 रोजी निधन झाले होते. बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी सर्वात मोठा संघर्ष आणि योगदान हे त्यांनीच दिले होते. 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानाने बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी दरमहा साडेअकरा पौंड एवढी स्कॉलरशजून 1913 रोजी दोन वर्षासाठी मंजूर केली होती. 4 जून 1913 रोजी आंबेडकर आणि बडोदे संस्थान यांच्यात करार झाला आणि या करारानुसार शिक्षण पूर्ण होताच दहा वर्षे बडोदा संस्थानची नोकरी करण्याची अट घालण्यात आली होती.

नंतर Dr Babasaheb Ambedkar यांनी 20 जुलै 1913 रोजी न्युयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्र या शाखेत प्रवेश घेतला. आंबेडकर हे रोज अठरा तास अभ्यास करून ऍडमिनीस्ट्रेशन अन्ड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठात M.A च्या पदवीसाठी सादर केले. भिमरावांनी सादर केलेला हा सबंध कोलंबिया विद्यापीठाने स्विकारुन आंबेडकर यांना M.A ची पदवी दिली.जुन 1916 मध्ये आंबेडकरांनी Ph. D च्या पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया आणि अ हिस्टाॅरीकल अन्ड अनॅलीटिकल स्टडी या नावाचा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला आणि तो विद्यापीठाने स्विकारला. आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये 11 ऑक्टोबर 1916 ला मास्टर ऑफ सायन्स आणि डाॅक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी प्रवेश घेतले.Dr Babasaheb Ambedkar

पुढे 11 नोव्हेंबर 1916 ला लंडनमधील Gray’s Inn मध्ये बॅरिस्टर चा अभ्यास करण्यासाठी आंबेडकर आपले नाव नोंदवले. समोर 12 डिसेंबर 1916 ला आंबेडकर आणि रमाबाई यांना पुत्र झाला. आणि त्यांचे नाव यशवंत ठेवण्यात आले. 21 ऑगस्ट 1917 ला बडोदा सरकारच्या शिष्यवृत्ती ची मुदत संपल्यामुळे आंबेडकर यांना त्यांचा अभ्यास क्रम अर्धवट सोडून भारतात परत याव लागले. 31 ऑगस्ट 1917 रोजी बडोदा सरकारच्या नोकरीत ते काम करु लागले. त्यामुळे त्यांना दरमहा 150 रुपये पगार होती पण त्यांना राहायला जागा मिळत नव्हती.

महार असल्याने त्यांना कोणीही राहायला जागा देत नव्हते त्यामुळे ते परत मुंबईला आले. 5 डिसेंबर 1917 रोजी आंबेडकरांनी सिडनहॅम काॅलेजात प्राध्यापकाच्या जागेसाठी अर्ज केला.पुढे 10 नोव्हेंबर 1918 रोजी दरमहा साडेचारशे पगार म्हणून सिडनहॅम काॅलेजात आंबेडकर यांची हंगामी प्राध्यापक म्हणून 1 वर्षासाठी नेमणूक झाली. पुढे त्यांना मुदतवाढ देण्यात आली.

31 जानेवारी 1920 अस्पृश्यता जागृती आंबेडकरांनी व तसेच अस्पृश्यांची बाजु देशासमोर मांडण्यासाठी आंबेडकरांनी मूकनायक हे पत्र सुरू केले. 15 मार्च 1920 रोजी आंबेडकरांनी आपल्या प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. 21 आणि 22 मार्च 1920 रोजी बहिष्कृत वर्गाची परीषद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शाहू महाराज यांनी म्हणाले डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. ईतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्तानचे पुढारी होतील. आंबेडकरांची सार्वजनिक जीवनातील ही पहिली परिषद होय. 30 सप्टेंबर 1920 रोजी आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये M.sc साठी प्रवेश मिळविला. आंबेडकर यांनी डाॅक्टर ऑफ सायन्स या पदविकरिता द प्राॅब्लेम रुपी हा प्रबंध लंडन विद्यापीठाला सादर केला.

28 जून 1922 रोजी लंडनच्या Gray’s Inn या संस्थेच्या न्याय सभेने बाबासाहेबांना बार – ऑट – लाॅ म्हणजेच बॅरिस्टर ही पदवी प्रधान केली. 5 जुलै 1923 पासून आंबेडकरांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. त्यांनी द प्राॅब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध स्विकारुन लंडन युनिव्हर्सिटीने त्यांना D. sc ही पदवी दिली. 19 जून 1924 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांना पुत्र झाला आणि त्यांचे नाव राजरत्न असे ठेवण्यात आले. अस्पृश्य वर्गाच्या अडचणी समाजासमोर मांडण्यासाठी 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना करण्यात आली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. बहिष्कृत हितकारिणी सभे मार्फत बाबासाहेबांनी 4 जानेवारी 1925 रोजी सोलापूर येथे अस्पृश्य विद्यार्थांसाठी पहिले मोफत वसतिगृह काढले.

मुंबई सरकारने सरकार नियुक्त सदस्य म्हणून डिसेंबर 1926 रोजी मुंबई विधीमंडळात त्यांची नेमणूक केली. 18 फेब्रुवारी 1927 रोजी बाबासाहेबांचा मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणून शपथविधी झाला. 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला होता. नंतर तळ्याचे शुध्दीकरण केले. 3 एप्रिल 1927 रोजी आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले त्यांनी समाज समता संघ ही संस्था स्थापन केली. विषमतेचे शिकवण देणार्या मनुस्पृती या ग्रंथाचे बाबासाहेब सहस्रबुद्धे यांच्या हस्ते दहन करण्यात आले.

25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिवस म्हणून पाळला जातोबहिष्कृत हितकारिणी सभा विसर्जित करून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 जून 1928 रोजी भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन केली. मुंबई येथे शासकीय विधी महाविद्यालयात 21 जून 1928 रोजी बाबासाहेबांची सरकारने प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. अस्पृश्य समाजात जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी समता नावाचे पत्रक सुरू केले. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूर व बेळगाव येथे जून 1928 मध्ये वसतिगृह सुरू केले. Dr Babasaheb Ambedkar Information In Marathi