Annasaheb Patil Loan Scheme
Annasaheb Patil Loan Scheme अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना या योजने अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणुन घ्या सविस्तर.
महाराष्ट्र राज्य शासन हे नवनवीन योजना राबवत आसते त्या अंतर्गत आर्थिक सहाय्य केल जात तर आपण आज महाराष्ट्र राज्य शासन या मार्फत एक उपक्रम राबवला जातो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील तरुण पिढीला व्यवसाय करण्यासाठी आर्थिक साह्य केल जात म्हणजेच त्यान एक प्रकारच कर्ज उपलब्ध करुन दिल जात ते पण बिनव्याजी कर्ज त्यावर व्याज आकारला जात नाही व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही योजना राबवली जात आहे तर आपण आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज कशा पद्धतीने उपलब्ध करुन दिले जाते या बद्दल सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील कित्येक तरुण तरुणी शिक्षण पुर्ण करुन बाहेर पडतात काहीना नौकरी लागते तल तरुण तरुणी व्यवसायाकडे वळतात पण भांडवल उपलब्ध होत बँका कर्ज सहजासहजी देत नाहीत म्हणुन कुठेतरी अडचण निर्माण होते भांडवला अभावी व्यवसाय करणे शक्य होत नाही ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने २७ नोव्हेंबर १९९८ रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली.
या योजनेतुन विशेषकरून बेरोजगार तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन एक नवी संधी उपलब्ध करून देते. या महामंडळाकडून विविध योजना राबविल जातात आपल्याला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे हे आपल्यावर आहे महामंडळाकडून विविध प्रकार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते तरुणांन आर्थिक दृष्ट्या कमकुवत बेरोजगार तरुणांना संधी देते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज योजना काय आहे याबद्दल सविस्तर माहीती आपण पुढील प्रमाणे पाहुया.
• अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना Annasaheb Patil Loan Scheme
व्यवसाय करायचा म्हणल कि प्रथम येतो ते म्हणजे भांडवल या शिवाय व्यवसाय उभा करणे अशक्य यासाठी महाराष्ट्र राज्य शासन नेहमी प्रयत्नशील आहे खुप योजना आहे ज्या अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिल जात.महाराष्ट्रातील तरुण मंडळी ज्यांना व्यवसाय करायचा आहे पण भांडवल नाही व्यवसाय करण्यासाठी कल्पना पण चांगली आहे पण भांडवल नाही अशा साठी ही योजना जर आपण व्यवसाय करायचा म्हणल तर कोणतीही बँक सहजासहजी व्यवसाय करण्यासाठी कर्ज देत नाही भांडवल उपलब्ध होत नसल्यामुळे म्हणुन कित्येक तरुणांनच व्यवसाय करण्याच स्वप्न हे स्वप्नच राहत. पण आता स्वप्न ही पाहु शकता आणि सत्यात ही आणु शकता कारण महाराष्ट्र राज्य सरकारने व्यवसाय करण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेऊन.
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारने २७ नोव्हेंबर १९९८ रोजी या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची सुरवात केली आहे या महामंडळाकडून जे नविन तरुण व्यवसायिक स्वतःचा व्यवसाय सुरु करणार आहे अशा सर्व तरुणांना पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल जात ज्यामुळे नवीन तरुण उद्योजक आपला व्यवसाय एक उंचीवर नेऊ शकतात.राज्यातील बेरोजगार तरुणांना या योजनेच एक भक्कम अस पाठबळ मिळु शकत. आपल स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकतात अगोदरच व्यवसाय करत असतील तर योजनेतुन अजुन आर्थिक पाठबळ मिळेल.
व्यवसाय करण्यासाठी बिन व्याजी कर्ज देण्याची सोय केलेली आहे जर तुमच्याकडे व्यवसाय करण्याची कल्पना असेल ते पण चांगली व्यवसाया संबधीत सर्व बाबी पटवून देता येत असतील तर महाराष्ट्रा सरकार यासाठी या योजने अंतर्गत १५ लाख रुपयापर्यंतच बिनव्याजी कर्ज मिळू शकत. कर्ज रक्कम ही बीनव्याजी आसल्याने त्यावर कसलाही व्याज भरावा लागत नाही जे काही व्याज असेल ते अण्णासाहेब पाटील महामंडळा मार्फत भरले जाते आणि त्या योजनेच नाव आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज कस भेटणार, त्यासाठी लागणारे कागदपञे कोणती , त्यासाठी संपुर्ण प्रक्रिया काय आहे ही सर्व माहिती आज आपण जाणुन घेणार आहोत.
• अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज योजनेसाठी पाञता व अटी
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज योजनेत पात्र होण्यासाठी खालील प्रमाणे पाञता आवश्यक आहे.
- अर्ज सादर करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील कायमचा रहीवाशी असणे आवश्यक आहे.
- या कर्ज योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष पुर्ण आसावे.या कर्ज योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार पुरुषाचे वय हे जास्तीत-जास्त ५० वर्ष तर अर्जदार महिलांचे वय हे जास्तीत जास्त ५५ वर्ष आसाव.
- अर्ज करणारा उमेदवार हा या अगोदर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोणत्याही इतर योजनेसाठी अर्ज केलेला नसावा किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.जर तुम्ही आगोदर पासुन व्यवसाय करत आहात आणि आता तुम्हा यो महामंडळाकडून कर्ज पाहीजे असेल तर तुमच्याकडे उद्योग आधार व शाॅप अॅक्ट परवाना यासारखी व्यवसायाची सर्व आवश्यक कागदपञे आसणे आवश्यक आहे.
- एका कुटुांबातील एकच व्यक्ती एकाच वेळी सदर या योजनेचा लाभ घेऊ शकतो.या शिवाय व्यवसायिक नागरिक जे गटागटाच्या माध्यमातून अर्ज करणार असतील तर अशा उमेदवाराचे शिक्षण हे किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यायच असेल तर या अगोदर तुमचे कोणत्याही बँकेत कर्ज काढलेले नसाव जर बँकेच कर्ज काढलेल असेल तर ते व्यवस्थित भरलेल म्हणजेच कर्जाची रक्कम परतफेड केलेला आसावी म्हणजेच कर्ज नील आसाव.जर तुमचे कर्ज चालु असेल तर या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपयापेक्षा जास्त नसावे
• आवश्यक कागदपञे Annasaheb Patil Loan Scheme important Document
- आधारकार्ड ओळखीचा पुरावा.
- पॅनकार्ड.
- रेशनकार्ड.
- रहीवाशी दाखला.
- वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र ( वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपायापेक्षा जास्त नसावे ).
- जातीचा दाखला.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आसणार्या तुमची सर्व खात्याची माहिती.
- इमेल आयडी.
- मोबाईल क्रमाांक.
- तुम्ही व्यवसाय करणार आहात त्याबद्दलचा सविस्तर अहवाल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे . या योजनेची पाञता काय आहे आपण बघितल आहे या योजनेसाठी लागणारे कागदपञे आपण बघितल आहेत तर आता योजने अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
• अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ऑनलाईन अर्ज कसा करायचा Annasaheb Patil Loan Scheme online apply
- सर्व प्रथम तुम्हाला शासनच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जायच udyog.mahaswayam.gov.in आहे.
- नोंदणी या पर्यायावर क्लिक करायच आहे.
- त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती सविस्तर भरायची आहे.
- आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अन्य तपशील भरा आणि पासवर्ड भरा.
- सर्व माहिती सबमिट झाल्यावर तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो व्यवस्थित ठेवा.
- नंतर पुन्हा मुख्य पृष्ठावर यायच आणि User ID आणि password टाकून लाॅगीन करा.
- लॉगिन झाल्यानंतर समोर तीन कर्ज योजना तुम्हाला दीसतील त्यापैकी तुम्ही तुमचा पर्याय निवडा.
- कर्ज योजना पर्याय निवडल्या वर नविन पेज उघडेल त्यावर तुमची वैयक्तिक माहिती भरा.
- माहिती सबमिट झाल्यावर तुम्हाला पुढे आवश्यक कागदपञे स्कॅन करुन Pdf करुन आपलोड करणे.
- सर्व आवश्यक कागदपञे आपलोड झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा आणि अर्ज प्रकिया पुर्ण करा.
आशा पद्धतीने तुम्ही तुमची अर्ज प्रकिय पुर्ण करु शकता आणि तुमचा अर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाडे करण्यात येईल ही अर्ज प्रकिय तुम्हाला खुप अडचणीची व किचकट स्वरुपाची वाटत आसेल तर तुम्ही तुमच्या गावातील किंवा जवळच्या CSC केंद्रामध्ये आवश्यक कागदपञे सोबत घेऊन जाऊन अर्ज करु शकता. सर्व ऑनलाईन अर्ज प्रकिया दाखल झाल्यावर संबधीत आधिकारी आपल्या अर्जाची पडताळणी करतील आणि जर तुमचे सर्व कागदपत्रे योग्य असतील व तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाञ आसाल तर तुम्हाला योजनेचा मिळणार कि नाही याबद्दल कळवल जाईल जर तुम्ही योजनेसाठी पाञ आसाल तर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल .Annasaheb Patil Loan Scheme
विशेष म्हणजे या योजने अंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर जो व्याज आकारला जाईल ते व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून भरला जाईल त्यामुळे मिळणार्या कर्जावर कोणत्याही प्रकारच व्याज आकारल किंवा भरावे लागणार नाही या दरम्यान योजने अंतर्गत मिळणार्या कर्ज फेडण्याचा कालावधी हा पाच वर्षाचा आसतो म्हणजेच तुम्ही घेतलेल कर्ज पाच वर्षापर्यंत च्या कालावधी मध्ये फेडायच आसत त्यामुळे तुम्हाला पाच वर्ष बिनव्याची पैसे आपल्या व्यवसायासाठी वापरण्यासाठी मिळतात हा एक मोठा फायदा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेण्याचा आहे .
या योजनेतुन बिन व्याज पंधरा लाख मिळतात पण तुम्हाला पंधरा लाख मिळतीलच अस नाही तर तुमच्या व्यवसायाच्या निवडीनुसार व तुमच्या मागील बँक खात्याच्या तपशील नुसार कर्ज दिल जात हे कर्ज दोन लाख ते पंधरा लाखापर्यंत आहे.हे कर्ज तुम्ही नविन व्यवसाय करण्यासाठी किंवा आपला आगोदरचा जुना व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा वापर करु शकता.जर तुमची व्यवसाय कल्पनेत संभाव्यता असेल ती कल्पना तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पटवून देता येत असेल बँकेच्या आधिकार्याला पटवून देत येत आसेल तर व्यवसायासाठी कर्ज मिळवण्याच्या प्रकियेला लागा.आणि आपल्या व्यवसायासाठी भांडवल उभा करा.Annasaheb Patil Loan Scheme
आज आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज योजना घेण्यासाठी काय प्रकिया आहे यासाठी पाञता काय आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती बघितली आहे आम्ही नेहमी योग्य माहीती देण्याचा प्रयत्न करतो जसे की शासन निर्णयानुसार सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न करत आसतो जर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना याबद्दल आधिक माहिती हवी आसल्यास udyog.mahaswayam.gov.in या शासनाच्या महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता. इतर काही अधिक माहिती महामंडळाच्या कार्यालयात संपर्क करून अधिक घ्यावी.