Apply for Abha card
Apply for Abha card आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अंतर्गत आभा कार्ड म्हणजे काय आहे मोबाईल द्वारे ऑनलाईन कसे काढायचे सविस्तर माहीती.
केंद्र शासन व राज्य शासनाकडून सामान्य माणसासाठी नेहमी योजना राबवत असते विविध प्रकारच्या योजने त्यापासून मिळणारा उपयोग हे सर्व गोष्टींची सामान्य माणसांन माहिती नसते यामुळे त्यापासून भेटणाऱ्या लाभ ते लोक वंचित राहतात. शासनामार्फत चालविल जाणाऱ्या काही योजना हे त्यांचे कार्ड असते व ते कार्ड त्या योजने साठी खुप महत्वपूर्ण असते महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडून प्रत्येक क्षेत्रात अनेक प्रकारच्या विविध योजना राबवल्या जातात.
केंद्र सरकार ने आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अंतर्गत आभा हेल्थ कार्ड सुरवात केली आहे या अंतर्गत आपल्याला आरोग्यासाठी लाभ मिळणार आहे व आपल्या आरोग्याची संपुर्ण रिपोर्ट या कार्ड मध्ये आसेल व आयुष्यमान भारत योजनेचा चा लाभ घेण्यासाठी आभा कार्ड महत्त्वाचे आहे आभा कार्ड द्वारे आजारांवर उपचार करण्यासाठी पाच लाख मोफत उपचार आहे.
आज आपण आभा कार्ड या बद्दल जाणुन घेणार आहोत अर्थातच आभा कार्ड मध्ये रुग्णची डिजीटल स्वरुपात म्हणजे आपल्या आरोग्य संबधीत सर्व माहिती आपल्याला कोणता आजार आहे त्या आजारावर कुठे उपचार केल्या ही सर्वच माहिती एकाच जागी डिजिटल स्वरूपात साठवली जाते.
पतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिजीटल इंडिया ची सुरवात झाली आहे आभा हेल्थ कार्ड हे आयुष्यमान भारत डिजीटल मिशन चा एक भाग आहे या कार्ड च्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयात उपचार घेता येतील योजने अंतर्गत कार्ड ची सुरवात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 27 सप्टेंबर 2021 मध्ये केली
• आभा कार्ड ABHA CARD म्हणजे काय.
आभा कार्ड ABHA CARD चे पुर्ण नाव म्हणजेच Ayushman Bharat Health Account व्यक्तीला आसणारे आजार त्या व्यक्तीची दवाखाना माहिती कोणत्या आजारांवर उपचार चालु आहेत ही सर्व माहीती यात आसते. आभा कार्ड जेव्हा दवाखाना उपयोगी आहे हे प्रत्येकासाठी महत्वपूर्ण आहे.आणि आता हे कार्ड तुम्ही स्वतः आपल्या मोबाईल द्वारे काढु शकता.
ABHA कार्ड मध्ये आपल्याला दवाखान्यात पाच लाखांपर्यंतचा वैद्यकीय खर्चासाठी साह्य मिळणार आहे, ज्यामध्ये राज्य शासनाकडून सरकारी दवाखान्यात Govt Hospital आणि खाजगी दवाखान्यात Private Hospital मध्ये दवाखान्यात या कार्ड चा उपयोग होते दिलेल्या रक्कमेपर्यंत मदत दिली जाते.
आभा कार्ड हे आपले आरोग्य विषयक सेवा मिळवण्यासाठी एक लायसेन्स आहे जस की आपल्याला या कार्ड मुळेच दवाखान्याच्या खर्चात फायदा होतो आणि आपल्या आजार विषयक सर्व माहिती यात समाविष्ट असते जसे की आपले सर्व माहिती दवाखान्याचे उपचार केलेली माहिती ,आपला आजार कोणता आहे या आजाराची लक्षणे, मेडीकल औषधे,आपली कोणती टेस्ट झाल्यास त्याची माहिती इत्यादी सर्व माहिती एकाच ठिकाणी सुरक्षितपणे साठवली जाते.
या कार्ड मुळे सर्व माहिती ऑनलाईन डिजीटल स्वरूपात गोळा केली जाते कार्ड मध्ये साठवली जाते कारण यामुळे रुग्णाची आरोग्यविषयक समस्या लवकरात लवकर समजेल त्यावर निदान करता येईल या आधी या आजारावर मेडिसिन घेतल आहे का व कोणती मेडिसिन घेतली आहे कोणती टेस्ट केली आसल्यास त्या संदर्भात माहिती यामुळे योग्य उपचार मिळेल आणि राज्य शासनाकडून आर्थिक साह्य पण मिळेल.
• ABHA हेल्थ कार्डचे फायदे.
आभा कार्ड आपल्या खुप महत्वपूर्ण आहे. त्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत.
- आभा कार्ड हे डिजीटल स्वरुपाचे कार्ड आहे आभा कार्ड आसल्यास दवाखान्यात जाताना कोणती कागदपञे किंवा इतर माहिती नेण्याची गरज या कार्ड मध्ये सर्व माहिती आसणार आहे.
- आरोग्य विषयक योजनांचा लाभ या कार्ड द्वारे होतो.
- आपली दवाखान्या संबधीत सर्व माहिती एकाच ठिकानी या कार्ड मध्ये साठवलेली आसते आणि ती माहिती सुरक्षित आसते.
- आपण हे कार्ड कोठेही महत्त्वाच्या वेळी दवाखान्यातील कागदपत्र उपलब्ध नसतील तर लगेच मोबाईल द्वारे माहिती पाहु शकतो.
- रुग्णालयातील वैद्यकीय आधिकारी यांना आपल्या आरोग्याची आजाराची संपूर्ण माहिती या कार्ड द्वारे मिळाल्याने आपल्याला अधिक चांगले उपचार देऊ शकतात त्याचे निदान लवकर होऊ शकत.
- भारत सरकारने चालवलेल्य आयुष्मान भारत योजना पासुन मिळणारा लाभ घेण्यासाठी व त्याचा फायदा घेण्यासाठी आभा कार्ड महत्वाचे आहे.
• ABHA हेल्थ कार्ड नसेल तर होणारे तोटे.
- आणि जर तुमच्याकडे आभा हेल्थ कार्ड नसेल तर शासनामार्फत या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मिळणार लाभ सुद्धा मिळणार नाही.
- तुमच्या आरोग्य संबधीत फाईल्स केलेले टेस्ट याचे जतन करावे लागेल.
- आरोग्यविषयक आभा कार्ड मार्फत जो लाभ मिळतो तो मिळणार नाही.
- तुमचा आरोग्य संबधीत डेटा साठवला जाणार नाही रुग्णालयात जातानाच सर्व कागदपत्र सोबत घेऊन जाणारी लागतील.
- तुमचा आजार कोणता आहे त्यावर काय निदान करावे यासाठीच डाॅक्टराना सविस्तर माहिती द्यावी लागेल याने उपचार घ्यायला वेळ होउ शकतो.
• ऑनलाईन ABHA कार्ड कसे काढायचे ते पुढील प्रमाणे आहेत.Apply online for Abha card
आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात , जवळच्या मल्टीसर्विसेस केंद्राला जाऊन कार्ड काढु शकता. किंवा एक पर्याय आहे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही अगदी स्वताच घरी बसुन मोबाईल द्वारे ऑनलाई पध्दतीने काढु शकता.आभा कार्ड हे सर्व सामान्य आर्थिक दुर्बल घटक ( EWS ) यातील लोकांसाठी खुप महत्वाचे आहे व कार्ड सर्व व्यक्तीनी काढले पाहिजे पण अनिवार्य नाही आपल्या इच्छेनुसार अगदी घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारे आभा कार्ड काढु शकता ते कसे पुढील प्रमाणे.
- सर्व प्रथम Google गुगल वर जा आणि Abha.abdm.gov.in असे टाईप करा.
- मग नविन पेज दिसेल आयुष्यमान भारत ABHA असे नाव दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर.
- Log To your Abha असे दिसेल त्याखाली मोबाईल नंबर च ऑप्शन एक रकाना दिसेल तिथे मोबाईल क्रमाांक टाका.
- त्यानंतर खाली दिलेला Captcha भरा Captcha भरल्यानंतर NEXT वर क्लिक करा.
- नंतर मोबाईल वर चार अंकी ओटीपी येईल ते भरा.
- त्यानंतर तुमच आभा हेल्थ कार्ड तुमच्या समोर दिसेल बघा आणि मोबाईल मध्ये Print Abha किवा Download Abha यापैकी कुठेही क्लिक करुन आभा कार्ड मोबाईल मध्ये सेव्ह करून घ्या.
- सेव्ह झाल्यानंतर कुठेही झेरॉक्स काढून कार्ड बनवुन मिळेल.
आभा कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्यात साठी येथे Click करा.Apply online for Abha card
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजना आहे त्या योजने अंतर्गत मिळणारे कार्ड हे उपयोगी आहे आरोग्य संदर्भात योजना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना इतर काही योजना आहे त्या अंतर्गत विमा,उपचारा दरम्यानचा खर्च आशा पद्धतींत आरोग्य योजना खुप महत्वपूर्ण आहेत आणि त्या साठी योजनेची माहिती असणे गरजेच आहे माहिती आसल्यास लाभ घेणे सोपे होईल. आरोग्य विषयक आणि इतर काही योजने विषयक माहिती पुढील लेखात पाहूया .
आभा कार्ड या कार्ड वीषयाची काही माहिती व कार्ड कसे काढायच कुठे काढायच याबद्दल आपण सविस्तर माहीती बघितली आहे तरी आरोग्य विषयक समस्या काही जनाना आसतात पण कधी कोणाला समस्या येईल सांगता येत नाही म्हणून आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आभा कार्ड सर्वानी काढुन घ्यावे खुप महत्वाचे या कार्ड चे फायदे पण खुप आहे आपण वरील सर्व माहिती पाहिली आहे.
आभा कार्ड किंवा या योजने बद्दल काही माहिती हवी आसल्यास शासनाच्या आधिकृत वेबसाईट जाऊन घेऊ शकत किंवा सोशल मिडीया, युट्यूब, व आपल्या जवळच्या आरोग्यकेंद्रात जाऊन या कार्ड बद्दल सविस्तर माहिती मिळवु शकता.