Apply for Mahadbt Yojana|महाडिबीटी योजना मोबाईलवरून करा अर्ज.

Apply for Mahadbt Yojana

Apply for Mahadbt Yojana

Apply for Mahadbt Yojana शेतकऱ्यासाठी महाडिबीटी योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरून कशा प्रकारे अर्ज करायचा सविस्तर माहिती जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो आज आपण महाडिबीटी MahaDBT या माध्यमाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. महाडिबीटी या माध्यमातून शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ घेता येतो. त्यामध्ये ट्रॅक्टर अवजारे असतील, विहीरीसाठी अनुदान असेल, छोटी मोठी यंत्र असतील किंवा शेततळे, पाईप, ठिबक, फवारणी पंप, बियाणे या घटकांसाठी डिबीटीच्या माध्यमातून शेतकर्यांना अनुदान दिले जाते. शेतकर्यांना अर्ज करावा लागतो पण तो अर्ज कुठे करावा आणि कसा करावा याची शेतकर्यांना माहिती मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पात्र असुनही या योजनेसाठी अर्ज करत नाहीत. महाडिबीटी या वर शेतकर्यांच प्रोफाईल तयार करता येते. आपल्या मोबाईल मध्येच ऑनलाईन पद्धतीने तुमच्या प्रोफाईल महाडिबीटी या पोर्टलवर तयार करता येते. प्रोफाईल करणे खूप सोपे आहे. प्रोफाईल केल्याशिवाय ऑनलाईन अर्ज महाडिबीटीच्या MahaDBT कुठल्याही योजनेसाठी करता येत नाही. त्यामुळे या योजनेसाठी प्रोफाईल कसा तयार करायच ते आपण बघुया.

• महाडिबीटीच्या योजनेसाठी प्रोफाईल कसा तयार करायचे . Apply for Mahadbt Yojana

  1. सुरुवातीला आपल्या मोबाईल फोन मध्ये गूगल ओपन करायचे आहे. नंतर त्यामध्ये महाडिबीटी MahaDBT लाॅग इन टाकून सर्च करायचे आहे. त्यानंतरच्या तुमच्या समोर एक वेबसाइट ओपन होईल त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यावर महाडिबीटीच पोर्टल ओपन होईल.
  2. त्यानंतर लाॅग इन करा या बटनावर क्लिक करायचे आहे. तुमची नोंदणी आधी केलेली नसेल तर उजव्या बाजूला नवीन अर्जदार नोंदणी या बटनावर क्लिक करायचे आहे.
  3. त्यानंतर पूढे नवीन पेज ओपन होईल त्यावर अर्जदाराच नाव टाकावे वापर करणाऱ्या नाव टाकायचे आहे समोर पासवर्ड च्या जागी तुम्हाला टाकायचा आहे तो पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड हा 8 अंक किंवा अक्षरांमध्ये असावा. समोर पासवर्ड पुन्हा टाका असे असेल त्यामध्ये पासवर्ड चुकुन न देता पासवर्ड टाकावे.
  4. त्याच्या खाली ईमेल आयडी टाकायचे असेल त्यामध्ये ईमेल आयडी टाकुन वेरीफाय करुन घ्या. त्यासाठी ईमेल वर सत्यता तपासणारे एक ओटीपी पाठवला जातो तो ओटीपी पाठवल्या नंतर एक नोटिफिकेशन स्क्रीनवर दिसेल त्यावर ओके करायचे आहे. मग खाली ईमेल आयडी तपासण्यासाठी ओटीपीच्या जागी ओटीपी टाकून समोर दिसणार्या हिरव्या रंगातील ईमेल आयडी तपासा यावरती क्लिक करा. स्क्रीनवर ओटीपी सत्यापन यशस्वी झालेल्या नोटिफिकेशन येईल. त्याला ओके म्हणून पुढे जायचे आहे. पुढे गेल्यावर मोबाईल नंबर टाकायचा त्यावर एक ओटीपी पाठवण्यात येईल. त्यानंतर मोबाईल चि सत्यता तपासण्यासाठी ओटीपी मिळवा. यावर क्लिक करा. मोबाईल नंबर वर पण एक ओटीपी पाठवलेल नोटिफिकेशन येईल त्या ओके वर क्लिक करा. समोर हिरव्या रंगाच्या ओटीपी तपासा यावर क्लिक करून ओटीपी तपासुन घ्यायचा. म्हणजे वेरीफाय करुन घ्यायचा आहे. ओटीपी वेरीफाय झाल्यावर त्याच एक नोटिफिकेशन स्क्रीनवर दिसेल त्यावर क्लिक करा मग खाली दिलेला कॅप्च्या बाजुच्या रकान्यात टाकायचा आहे. नंतर नोंदणी यावर क्लिक करा मग तुमची बेसीक नोंदणी पुर्ण झालेली असेल.
  5. मग तुम्हाला वापरकर्ता आयडी मिळालेला असतो. तुम्ही हा आयडी वापरून लाॅग इन करु शकता. पन लाॅग इन आयडी तयार केल म्हणजे माहिती पुर्ण होत नाही. म्हणजे प्रोफाईल अजून तयार झालेली नसेल.
  6. पुन्हा लाॅग इन करून वेबसाइटवर यायचे आहे. तिथे प्रोफाईल स्थिती दाखवली जाते त्याखाली कृपया येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग समोर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहिती मध्ये तुमचा आधार, नाव, ईमेल, मोबाईल क्रमांक, जन्म तारीख वय हे आलेल असेल कारण आपण नवीन नोंदणी करताना याबद्दलची माहिती तीथे दिलेली असते.
  7. आता समोर तुम्हाला नाव वडिल किंवा पतीचे नाव रकान्यात टाकायचे आहे. नंतर खाली आपण आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारस आहात का असा प्रश्न विचारला जातो. असाल तर होय आणि नसाल तक्षशिला नाही या बटनावर क्लिक करायचे आहे. कुटुंबाचे वारस आहात का असा प्रश्न विचारला जातो. असाल तर होय आणि नसाल तक्षशिला नाही या बटनावर क्लिक करायचे आहे. खाली आपण भारतीय दलाच्या सेवेत कार्यरत आहात का असाही प्रश्न असेल त्यावरही असेल तर होय आणि नसेल तर नाही या बटनावर क्लिक करायचे आहे. समोर तुम्हाला जात निवडायची असेल त्यामध्ये एससी, एसटी आणि इतर असे पर्याय असतील नंतर वैयक्तिक अपंगत्व असेल तर होय नसेल तर नाही असे निवडायचे आहे.
  8. पुन्हा खाली तुमचा आधार लिंक बॅंक खाते आहे का आणि त्यातून पैसे काढण्याची किंवा ठेवण्याची मर्यादा आहे का असा असेल त्यामध्ये तुम्हाला जे टाकायच आहे ते टाकावे. नंतर खाली बॅंक खाते क्रमांक टाकायचे आहे आय एफसी कोड टाकुन खाली दिलेल्या बाॅक्समध्ये निळ्या रंगाची टिक करायचे आहे. आणि जतन करा यावर क्लिक करायचे आहे. ईथे तुमची वैयक्तिक माहिती पुर्ण होते.
  9. आता तुमचा पत्ता हा पत्त्यांचा रकान्यात टाकायचा आहे म्हणजे आता तुम्हाला तुमच्या पत्त्याबद्दलची माहिती भरायची असते. जिल्ह्याच्या रकान्यात जिल्हा तालुक्याच्या रकान्यात तालुका आणि गावाच्या रकान्यात गाव निवडायचे आहे. तुमच्या गावाचा जो पिनकोड असेल ते पिनकोड च्या रकान्यात टाकायचे आहे. खाली पत्रव्यवहाराचा पत्ता एकच आहे का असा प्रश्न विचारला असतो होय असेल तर होय किंवा नाही असेल तर नाही वर क्लिक करायचे आहे. नाही वर क्लिक केले तर तुम्हाला कायमस्वरूपी व पत्रव्यवहाराचा पत्ता टाकावा लागतो. खाली आता जतन करा वर क्लिक करायचे आहे मग स्क्रीन वर सक्सेस अस नोटिफिकेशन येईल त्यावर ओके क्लिक करायचे आहे. आता तुमचा पत्ता सूद्धा भरणे झाला असेल. नंतर शेवटी आपल्याला शेतजमीनीचा तपशील द्यावा लागतो त्यासाठी आपल्याला गावात एकापेक्षा अधिक जमीन आहे का असा विचारले जाईल त्यामध्ये होय असेल तर होय नाही असेल तर नाही असे टाकुन क्लिक करायचे आहे.
  10. मग खाली परत जिल्हा तालुका निवडायचा आहे. त्यासोबतच खाली 8A खाते क्रमांक टाकायचा आहे. तुमची शेती किती आहे कृषी क्षेत्र जमीन रकान्यात टाकायचे आहे. जमीन हेक्टर आणि R मध्ये टाकायची आहे. त्यानंतर सातबारा तपशील द्यायचा असतो गट क्रमांक आणि जो काही सर्वेक्षण क्रमांक असेल तो टाकायचा आहे. तुमच्या जमिनीची मालकी वैयक्तिक आहे आणि किती आहे त्यासोबतच संयुक्त किती आहे ते लिहायच आहे. संयुक्त नसेल तर तेथे काही लिहायची गरज नाही. खाली संचलनाखालील क्षेत्र किती आहे ते सुद्धा नमूद कराव लागते. हे सर्व तुम्हाला हेक्टर R मध्ये लिहायच आहे.
  11. नंतर त्याखाली दोन प्रश्न असतील त्यामध्ये तुम्ही शेतकरी उत्पादकाचे सदस्य आहात काय असेल विचारले जाते असाल तर होय नसाल तर नाही वर क्लिक करायचे आहे. तुमच्या शेतात सोलार पंप आहे का असाही प्रश्न विचारला जातो असेल तर होय नसेल तर नाही नाही वर क्लिक करायचे आहे . आता तुमची सर्व माहिती तपासून जमिनीचा तपशील जतन करा या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर एक नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर येईल ओके म्हणून क्लिक करा. जमिनीची माहिती यशस्वीपणे भरली आहे आता पुढे जा वर क्लिक करा तुमची प्रोफाईल पुर्णपणे भरून झालेली असेल.

आता तुम्ही महाडिबीटी MahaDBT च्या कुठल्याही योजनेसाठी अर्ज करू शकता. यामध्ये कृषी यांत्रिकी करण, सिंचन साधन व सुविधा , बियाणे औषधे खत, फलोत्पादन, सौरकुंपन इत्यादी घटकासाठी अर्ज करू शकता. अशा प्रकारे आपण महाडिबीटी च्या माध्यमातून शेतकर्यांना विविध योजनेसाठी लाभ कसा घेता येतो आणि अर्ज कसा करता येतो याबाबतची सर्व माहिती जाणून घेतली आहे.Apply for Mahadbt Yojana

MahaDBT महाडिबीटी योजनेच्य आधिक माहितीसाठी महाडिबीटी योजना अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://mahadbt.maharashtra.gov.in