artificial intelligence AI | आर्टिफिशियल इंटेलिजन्सी.

artificial intelligence AI

artificial intelligence AI

artificial intelligence AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजे काय त्याचा उपयोग काय AI चे फायदे काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

artificial intelligence म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत याबद्दल आपण सर्वांनी कुठे न कुठे ऐकल आहे आजकाल तर आपण आपल्या मोबाईल फोन मध्ये Google map, Google Assistant यावर आपण सांगलेली माहिती पाहायला मिळते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी याबद्दल आपल्याला नक्कीच माहिती असेल हे एक साॅफ्टवेअर आहे ज्यात आपण कोणती माहिती संपुर्ण जगभरातील माहिती मिळवु शकतो आणि आपण याचा वापर ही करत आहोत.जस मानवाला बुद्धी आहे त्या बुद्धी च्या जोरावर आजच्या डिजीटल जगात वेगळेपणा दिसत आहे मानव हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धी मान मानला जातो आणि तसा तो आहे डिजीटल क्रांती आसो वा इतर काही आजच्या युगात मानवी जीवनात खुप काही बद्दल घडुन येतात.आणि हे फक्त मानवी कुशल बुद्धी ने संभाव्य आहे प्रत्येक गोष्ट सोपी व सोयीस्कर कशी होईल या शोधात नेहमी आसतो.

AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ही एक खुपच शक्तिशाली तंत्रज्ञान आहे, ज्याचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होतो.त्याचा योग्य वापर फायद्याचा आहे चुकीचा वापर हा खुप समस्या निर्माण करु शकतो जेवढ फायदेशीर तेवढच नुकसान सुद्धा आहे आज आपण Chatgpt किवा अन्य साधन वापरतो पण काही माहिती ही योग्य असेलच अशी नाही राहत पण आपण योग्य रित्या याचा वापर केला तर फायदेशीर आहे ही खुप मोठी प्रणाली आहे.

मानव आपल्या बुद्धीच्या जोरावर खुप प्रगती केली आहे.या बुद्धीच्या जोरावर कॉम्प्युटर, मोबाईल, वाहन आशा अनेक बाबी मध्ये या क्षेत्रात आधिराज्य करत आहे . मानवाने केलेल्या नविन आविष्कार मुळे त्यांच्या जिवानाला एक वेगळ वळन मिळाले आहे.टेक्नॉलॉजी च्या क्षेत्रात मानव एवढा विकास केलेला आहे मानवा प्रमाणेच किंवा त्यापेक्षा हुशार अभ्यास करुन मशिन तयार करण्याच्या विचारात आहे. जो की मानवा प्रमाणेच काम व कार्य कुशल प्रमाणेच करण्याची क्षमता आसणारे अशा पद्धती च बनवणाऱ्या Advanced technology चा artificial intelligence म्हणतात.

याबाबत लोकांना जास्त माहिती नाही तरी आज आपण या विषयावर जाणुन घेणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सी या संबधीत महत्वपूर्ण माहिती देणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी नेमक काय आहे याच कार्य काय आहे याचा वापर कुठे केला जातो याचे काय फायदे आणि काय नुकसान आहे हे याबद्दल जाणून घेऊया.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजे काय.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता एखादा व्यक्तीच्या बुद्धी च्या जोरावर बनवलेली विचार करण्याची शक्ती आहे . म्हणजे Artificial Intelligence ही एक संगणकाची शाखा आहे ज्यात एक मशीन विकसित करण्यात आले हे जी मानवा द्वारे विचार करु शकेल आणि त्याच्या सारखे कार्य करु शकेल. यात संगणकांना मानवी बुद्धिमत्ते प्रमाणेच कार्य करण्यास सक्षम बनवते.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम पद्धतीने विकसित केलेली बौद्धिक क्षमता.याद्वारे संगणक प्रोग्राम किंवा रोबोटिक प्रोग्राम तयार केली जाते, जी मानवी बुद्धी च्या ज्याच्या आधारे कार्य करते त्याच तर्काच्या आधारे चालवण्याचा प्रयत्न केला जातो.

जेव्हा कधी आपण एखादा संगणक कम्प्युटर तयार करतो तेव्हा मनुष्याच्या बुद्धीचा वापर करुनच केला जातो आणि याद्वारे एखादा सॉफ्टवेअर बनवणे त्यावर सर्व माहिती त्यावर साठवणे हे सर्व कृञिम बुद्धिमत्तचा वापर केला जातो हे एका मानवा प्रमाणेच सर्व माहितीचा साठा म्हणा किंवा तो अगदी मानवा प्रमाणेच कार्य कराव अस बनवल जाते.जेव्हा एखाद्या मशीन मध्ये एक प्रोग्रॅम सेट करतो यासाठीच की तो एका मानवा प्रमाणे कार्य करेल याच प्रकारे संगणका मध्ये एक प्रोग्रॅम डेवलप केला जातो.

कम्प्युटर सायन्स मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सी वर पुर्ण पणे कार्य केल जात आहे . ला मशीन लर्निग नावाने पण ओळखले जाते.मशीन लर्निग त्याचा एक भाग आहे. मशीन लर्निग संगणकाच्या प्रोग्राम वर डेव्हलप करते.ज्या प्रकारे मानव आपले अनुभव क्षमतेवर कार्य करते त्याच प्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी मशीन लर्निग च्या साह्याने कार्य करते.

एखाद्या समस्याच निरसण करणे किंवा माहिती घेणे शिकणे आणि भाषा अवगत घेणे समजुन घेणे व यासारख्या कार्याचा समावेश यात होतो व एखादी माहिती सोप्या शब्दांत व भाषेत सांगायचे तर, ही एक तंत्रज्ञान आहे ज्या द्वारे संगणक मानवा सारखे विचार करण्यास आणि शिकण्यास सक्षम करते मदत करते

आर्टिफिशियल इंटेलिजन्सी काम कसे करते.

सर्वसाधारणपणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी प्रणाली मोठ्या प्रमाणात लेबल केलेला प्रशिक्षण डेटा अंतर्भूत करून, सहसंबंध आणि नमुन्यांसाठी त्या डेटाचे विश्लेषण करून आणि भविष्यातील स्थितींबद्दल अंदाज बांधण्यासाठी या नमुन्यांचा वापर करून कार्य करतात. मोठ्या प्रमाणात महितीच्या साठ्याचा वापर करुन शिकते व ही माहिती विश्लेषण करुन त्या आधारावर संगणक स्वतःच निर्णय घेण्यास शिकतो.

उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्सी लोकप्रिय बनली आहे कारण एखादी फोटो ओळखणे, एखाद्या विषयाचा आभ्यास व अन्य काही बाबी संदर्भात सर्व माहिती आपल्यासाठी देते जस पहिल्यांदा गूगल मॅप किवा गुगल असिस्टंट च्या साह्याने मदत घेतो होतो पण आता याच्याकडे साठा हा मोठ्या प्रमाणात आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा फायदे पुढील प्रमाणे

आर्टिफिशियल इंटेलिजन्सी मानवी जीवनातल्या अनेक क्षेत्रात बदल घडवून आणत आहे. AI च्या काही महत्त्वाच्या फायद्यांचा समावेश आहे

1)आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ने आपल्याला एखाद कार्य पुन्हा पुन्हा करण्याची गरज असलेली कामे स्वयंचलित करण्यास मदत करते. जसे डेटा एंट्री, ग्राहक सेवा आणि उत्पादन प्रक्रिया यांचा समावेश होतो.2)माहिती वेगवान आणि अचूक मिळते व त्याचे विश्लेषण करू शकतो, ज्यामुळे निर्णय घेणे अधिक प्रभावी सोयीस्कर बनते. 3) आपल्या पसंती आणि गरजा समजून घेऊन आपल्यासाठी वैयक्तिकीकृत मदत करते 4) सुरक्षा व्यवस्थेच्या बाबत अधिक प्रभावी बनवण्यात मदत करू शकते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सी चे काही तोटे

1)या मुळे अनेक नोकऱ्या जाण्याची व नोकऱ्या च प्रमाण कमी होण्याची दाटशक्यता आहे याने बेरोजगारी वाढेल.2) याला मोठ्या प्रमाणात माहितीची आवश्यकता असते. यामुळे गोपनीयतेची समस्या उद्भवेल. 3)या प्रोग्राम चा दुरुपयोग होऊ शकतो . 4) याने सायबर हल्ले किंवा खोटी माहिती पसरवण्यासाठी होऊ शकतो.5)एखाद्याचा व्हीडिओ किंवा फोटो याद्वारे इडिट करुन समस्या निर्माण होऊ शकते.

यामध्ये काही विकसित करण्याची गरज आहे हे जेवढ फायद्याच आहे तेवढच धोक्याच आहे याचा योग्य वापर केला तर योग्य नाहीतर एक समस्या आहे आणि हे विकसित झाले तर नौकरी च प्रमाण टिकुन राहणार नाही.हे सत्य आहेही माहिती तात्पुरत्या स्वरूपात थोडक्यात आहे तरी आपण युट्यूब सोशल मीडियावर इतर माध्यमातून माहिती शोधु शकता.