Chief Minister Relief Fund Information (CRMF)
Chief Minister Relief Fund Information मुख्यमंत्री सहायता निधी (CMRF) ही एक योजना आहे जी महाराष्ट्र सरकार ने सुरू केली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेत गोरगरीब रुग्णांना गंभीर किंवा दूर्धर आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत करण्याचे प्रावधान आहे. या योजनेचा लाभ घेण्याची संपूर्ण प्रक्रिया ही संपूर्णतः नि:शुल्क आहे.मुख्यमंत्री मदत निधीचा महत्वपूर्ण उद्देश गरीबांना मदतीचा आर्थिक मदतीचा हात पुढे करणे आहे जे अशा कारणांमुळे संकटात आहेत आरोग्य समस्या ज्यांना महागड्या औषधोपचाराची आवश्यकता असते त्यांच्या साठी आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी हा दुर्बल घटकांसाठी एखाद्या देवदुता पेक्षा कमी नाही, योजनेत निधी प्रक्रिया अधिक सोप्पी व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे असून त्या अंतर्गत ८६५०५६७५६७ ह्या क्रमांकावर मोबाइल मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाइलवर उपब्लध करून दिला जाणार आहे. या सुविधेमुळे महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी पोहोचेल असा विश्वास महाराष्ट्र सरकारचा आहे.मुख्यमंत्री सहायता निधी वैद्यकीय मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज आणि पूर्णपणे सोपी सुविधा उपलब्ध Chief Minister Relief Fund Information (CRMF) करून दिल्यास नागरीकांना मंत्रालयात खेटा न मारता या सुविधेचा लाभ मिळेल.मुख्यमंत्री सहायता निधी ही एक योजना आहे जी महाराष्ट्र सरकार ने सुरवात केली आहे.
महाराष्ट्र सरकार नेहमी जन कल्याणासाठी योजना राबवत असते या योजनेद्वारे रुग्णांना आर्थिक लाभ मिळविण्यासाठी मदत केली जाईल ज्यामुळे त्यांना उपचार घेणे सोपे जाईल आरोग्यसेवेच्या वाढत्या खर्चाचा हवाला देऊन, ज्या परिस्थिती अनेकदा अचानक घडू शकतात आणि त्यासाठी पैसे देणे आव्हानात्मक असू शकते. सीएम रिलीफ फंड CMRF ची सुरवात करण्यात ज्यात रुग्णांना आर्थिक मानद सहाय्य मिळेल.
महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता अथवा मदत देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थिक मदत पुरविले जाते.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थिक मदत केली जाते.
मुख्यमंत्री सहायता निधी ची उद्दिष्ट Chief Minister Relief Fund Information (CRMF) :
राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना आर्थिक मदत करणे.जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
संपुर्ण माहिती पुढिल प्रमाणे :
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा? मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र.: ८६५०५६७५६७ Email:- aao.cmrf-mh@gov.in मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऑनलाईन अर्ज कसा करायचा Chief Minister Relief Fund Online Application पुढील प्रमाणे :
१] CMRF मुख्यमंत्री सहायता निधी चा आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्यासाठीची कालमर्यादा ही उपचारानंतर एक वर्षाच्या आत आरामासाठी अर्ज सादर केला पाहिजे शेवटच्या अंतिम बिलातील तारखेनुसार अर्ज स्वीकारला जातो.
२] मुख्यमंत्री सहायता निधी ८६५०५६७५६७ या क्रमांकावर मिसकॉल करून अर्जासहित संपूर्ण माहिती मिळणार आहे याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधी साठी कसा भरायचा,कुठे पाठवायचा अशा कोणत्याही अडचणीसाठी संपर्क करु शकता.cmrf.maharashtra.gov.in हे योजनेची अधिकृत वेबसाईट आहे यावर अधिक माहिती मिळेल.
३] CMRF च्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा अर्ज ची प्रत मिळेल तो डाउनलोड करा.
४]आवश्यक आहे ती माहिती लिहुन अर्ज भरा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज व कागदपत्रे PDF फाईल पध्दती मध्ये स्कॅन करा.
५] PDF फाईल aao.cmrf-mh@gov.in या mail id वर पाठवणे.६] सर्व मूळ कागदपत्रे “मुख्यमंत्री कार्यालय , मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी ,सातवा मजला ,मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक , मंत्रालय ,मुंबई -400032″ या पत्त्यावर कुरिअर किंवा पोस्टाने पाठवा.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
१.अर्ज विहीत नमुन्यात
२.निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला. रु.१.६०.लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
४. रुग्णाचे आधारकार्ड महाराष्ट्र राज्याचे लहान बाळासाठी बाल रुग्णांसाठी आईचे आधारकार्ड आवश्यक ५.रुग्णाचे रेशनकार्ड महाराष्ट्र राज्याचे
६.संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे
७.अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.
८.प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ-शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९.रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी. अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात वाचनीय पाठवावी. Email:- aao.cmrf-mh@gov.in व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.
■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे
१.कॉकलियर इम्प्लांट वय वर्ष-०२-ते-०६,
२.हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०.अपघात शस्त्रक्रिया
११.लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२.मेंदूचे आजार१३.हृदयरोग
१४.डायलिसिस
१५.अपघात
१६.कर्करोग-केमोथेरपी/ रेडिएशन
१७.नवजात शिशुंचे आजार
१८.गुडघ्याचे प्रत्यारोपण१९.बर्न रुग्ण
२०.विद्युत अपघात रुग्ण
या अशा एकूण-२०-गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र.: ८६५०५६७५६७संपर्क क्र.०२२-२२०२६९४८ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत.असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी,मुख्यमंत्री सचिवालय. फोन:-९६१९९५१५१५ संपर्क:-०२२-२२०२५५४०