Apply Online for CM Internship | मुख्यमंत्री योजना दुत साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा संपुर्ण माहिती.

Apply Online for CM Internship

Apply Online for CM Internship

CM Internship मुख्यमंत्री योजना दुत अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रकिया काय आहे अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहीती.

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री योजनादुत हा उपक्रम राबवला आहे.महाराष्ट्र राज्यातील नागरीकांना या उपक्रमा चा खुप फायदा होणार आहे या उपक्रमांर्तगत महाराष्ट्रातील नागरीकांना शासना मार्फत राबवल्या जाणार्या विविध योजना उपक्रम शासन लोकांपर्यंत पोहचविणार आहे जेणेकरुन लोकांना याचा फायदा होईल या अनुशंगाने राज्य शासन हा उपक्रम राबवत आहे कारण ग्रामीण भागातील लोकांना शासना मार्फत चालविण्यात येणार्या योजनांची पुर्ण पणे माहिती नसते व ते नागरिक लाभापासुन वंचित राहतात यातुन विविध योजनांचा सर्वाना लाभ व्हावा ह्यासाठी हा उपक्रम आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

● मुख्यमंत्री योजना दुत –CM Internship

महाराष्ट्र राज्य शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फतमुख्यमंत्री योजना दुत हा उपक्रम राबविण्यात येत आहे यातुन महाराष्ट्र शासन राज्यात एकुन पन्नास हजार योजनादुतांच भरती करणार आहे.या मार्फत एक उपक्रम राबवून या उपक्रमा अंतर्गत शासन योजनादुताची भरती व निवड प्रकिया करुन त्या प्रत्येक महिना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे मुख्यमंत्री योजनादुत शासना मार्फत चालविण्यात येणार्य कल्याणकारी योजनाची माहिती नागरीकांना देतील मुख्यमंत्री योजनादुत कल्याणकारी योजना आणि नागरीक यांना जोडणारा एक उपक्रम आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने आपल्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत पण थेट नागरीकांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही योजनांच्या लाभापासुन वंचित राहतात कारण त्यांना विविध योजनांची माहिती नसते म्हणून लाभापासुन वंचित राहतात याच प्रयत्नांना यश याव सर्व नागरीकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठीच हा उपक्रम राबविण्यात येत आहे “शासन आपल्या दारी” हा उपक्रम सरकारच्या योजना थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहचवणे हा आहे.

या उपक्रमा अंतर्गत शासनाचा एकमेव उद्देश उद्देश आहे की शासनाच्या राबविण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ सर्वानाच व्हावा एकाच छताखाली शासनाच्य विविध योजना अनेक योजना जाणुन घेतो येतील त्या योजनांचा लाभ घेता येईल योजनादुत या उपक्रमाचा विस्तार आहे ज्याचा उद्देश सामाजिक बद्दल घडविले हा आहे.

महाराष्ट्र सरकार चा ” शासन आपल्या दारी ” हा उद्देश खुपच महत्वाकांक्षी आहे एक ध्येय पुढे हा उपक्रम राबविला जात आहे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात राहणार्या लोकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नसते त्यामुळे ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात राहणारे नागरीक विविध कल्याणकारी योजनानासुन वंचित राहतात आणि या उपक्रमा अंतर्गत शासनाने योजनादुत हा कार्यक्रम राबविला आहे या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासन मार्फत चालविण्यात येणार्या विविध योजनांचा विस्तार व्हावा अधिक लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा शासनाच्या खुप कल्याणकारी योजना आहे घरकुल योजना ते शेती विषयक योजना, वृद्ध व्यक्तींसाठी, विधवासाठी अशा अनेक योजना आहेत ज्याच्या लाभास पाञ असुन देखील लाभ मिळत नाही कारण योजनांची माहिती नसते.

योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने हा उपक्रम राबविला आहे ह्या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत ला एक योजनादुत खास करुन ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्तीला किंवा इतरांना शिक्षणा संदर्भात योजना अन्य विविध योजना नागरिकांच्या दारापर्यंत पोहचवणे व त्यांना लाभ कसा घेता येईल याची माहिती देणे पाञता,उद्देश, कागदपञे या सर्व गोष्टी काळजीपूर्वक समजावणे कोणतीही व्यक्ती शासनाच्य या उपक्रमा अंतर्गत विविध योजनापासून वंचित राहु नये हा एकमेव कार्य योजनादुताचे कार्य राहील .

ग्रामपंचायत मार्फत या योजनादुत कार्य करणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा ,त्याची पाञता काय आहे , उद्देश काय आहे ही संपुर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत योजनादुत हा योजनेची माहिती देणारा सरकारच्या सहा महिन्याच्या कंञाटी पद्धतीने भरती आसणार आहे योजनादुतांचा कालावधी हा फक्त सहा महिन्या साठी असणार आहे.संपुर्ण माहित पुढील प्रमाणे.

मुख्यमंत्री योजना दुत उद्देश

  • शासन आपल्या दारी या उपक्रमांर्तगत योजनादुत शासनाच्या विविध योजना नागरिका पर्यंत पोहचविणे.
  • लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केल आहे.
  • शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचणार.
  • शासनाच्य विविध योजना पासन कोणी वंचित राहु नये.
  • सुशिक्षित तरुणांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार.
  • सामाजिक जडणघडणीतील बद्दल घडुन आणण्यासाठी तरुणांना सहभागी करणे.

• फायदे

  • या उपक्रमांर्तगत 50,000 तरुणांन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
  • प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल.
  • विद्यावेतनातुन युवकांना आर्थिक सहाय्य मिळेल.
  • शिक्षणाबरोबरच कौशल्य विकास होईल.
  • शासनाच्या कल्याणकारी योजनाची माहिती होईल.
  • सरकारी कामकाजाचा अनुभव मिळेल.

• पाञता

  • अर्ज करण्यासाठी वय हे १८ ते ३५ गटातल उमेदवार आसावा.
  • उमदेवाराचे शिक्षण हे कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे गरजेच आहे.
  • उमेदवाराला संगणक ज्ञान आसणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे स्वताचा मोबाईल असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार जोडलेले असणे आवश्यक आहे.

कागदपत्रे –

  • ऑनलाईन अर्ज जे तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर भेटुन जाईल.
  • आधारकार्ड ओळखपत्र आवश्यक आहे.
  • पदवी प्रमाणपत्र .(पदवीधर /पदव्युत्तर )
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • रहिवशी दाखला ( सक्षम यञणेच्या शिक्यासह).
  • स्वतःचा बॅक खात्याचा तपशील/पासबुक.

मुख्यमंत्री योजना दुत ऑनलाईन अर्ज कसा करायचा -How to Apply Online for mukhyamantri Yojana doot :

  • सर्व प्रथम मोबाईल वर योजना दुत वेबसाईटवर या. https://www.mahayojanadoot.org
  • योजनादुत वेबसाईट पोर्टल वर गेल्यावर उजव्या बाजुला उमेदवार नोंदणी वर क्लिक करा.
  • योजनादूत पोर्टलवर DIO नोंदणीवर क्लिक करा.
  • पुढे आधार पर्याय येईल तेथे आधार नंबर टाका.
  • आधार कार्ड सोबत जोडलेल्या नंबर वर ओटीपी येईल तो टाका.
  • अधिकृत व्यक्तीची सांगितलेली माहिती प्रविष्ट करा.
  • आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा ( Email ID,mobile number, whatsapp number , graduation markmemo, Brith certificate ,other.)
  • नंतर ओटीपी येईल इमेल वर तो टाका.
  • तुमची सर्व माहिती सबमिट करा.
  • नंतर तुमच्या प्रोफाइल वर क्लिक करा.
  • Resume पहा माहिती योग्य आहे का.
  • नंतर menu मध्ये matching Job वर क्लिक करा.
  • कुठे अर्ज दाखल करायचा ते पहा गाव, तालुका ,जिल्हा बघा आणि अप्लाय करा .
  • नंतर Application tab वर क्लिक करुन अर्जाची स्थिती पाहु शकता.
  • अर्ज मंजुर झाला का हे पाहण्यासाठी contract view वर क्लिक करा.
  • contract मंजुर झाल्या तुम्हाला पुढे बॅक तपशील द्या.
  • आणि contract Accept करा .

हे सर्व माहिती ऑनलाईन भरणा झाल्यानंतर मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

महाराष्ट्र राज्य शासनाची कल्याणकरी योजना नागरीका पर्यंत पोहचविणे हा एकमेव उद्देश आहे.या साठी सर्व इच्छुक उमेदवार यानी अर्ज करुन यात भाग घेऊन लोक कल्याणकारी योजनेचा भाग व्हा यासाठी आधिक माहिती वर दिलेल्या शासनाच्य वेबसाईटवर मिळुन जाईल व काही माहिती हवी असल्यास फ्राॅम भरण्यास काही समस्या असल्यास whatsapp Group मध्ये सामिल व्हा आणि मेसेज करा .साह्य केल्य जाईल व फार्म भरुन दिल्या जाईल अधिक माहिती साठी जवळच्या शासकीय कार्यालयात भेट द्या व सविस्तर माहीती घेऊन रितसर अर्ज करा.

शासकीय कामाचा भाग व्हा शासनाचा अनुभव भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल यासाठी या उपक्रमांर्तगत यासाठी आप्लाय करा व शासनाच्या विविध योजना जाणुन घ्या लोकांपर्यंत पोहचवा मदत करा यासाठी सरकार तुम्हाला अर्थिक साह्य देखील देईल यासाठी कोणीही म्हणजे 18 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतील यासाठी अर्ज करताना कोणती समस्या आसल्याच समूहत सामिल व्हा वैयक्तिक मेसेज करा मदत केली जाईल व योग्य अर्ज भरुन या शासनाच्या उपक्रमाचा लाभ घ्या.