Crop Insurance information|पिकाची नुकसान झाल्यास विमा कंपनीला सुचना करा.

Crop Insurance

Crop Insurance information

Crop Insurance information जास्तीच्या पावसामुळे आपल्या शेतातील पिकाची नुकसान झाल्यास संबधीत विमा कंपनीला सुचना कशी द्यायची याबद्दल सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

नमस्कार आपण नेहमीच कृषी विभाग तसेच शेती संबधीत महत्वाची माहिती काळजी पूर्वक आपल्या पर्यंत देण्याचा प्रयत्न करत आसतो या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच इतरही महत्वाचे आपडेट आपण देत आसतो आणि केंद्र सरकार व राज्य सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना किंवा शेती संबधीत महत्वपूर्ण माहिती व इतर महत्वाचे अपडेट महाराष्ट्रातील शेतकरी व लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करत आसतो.

आपल्या वेबसाईटवर काही दिवसा आगोदर इ-पीक पाहणी करुन पिक पेरा कसा नोंदवायचा याबद्दल सविस्तर माहिती बघितली आहे पिक पेरा नोंदणी का गरजेची आहे त्याचे फायदे पण जर आपल्याला शेतातील पिकाची पावसामुळे अतिवृष्टी होऊन नुकसान होत आसल्यास कंपनीला याची माहिती कळवावी लागते.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र खुप जोराचा पाऊस चालु आहे नदी,नाले, तुडुंब भरलेत याने पुर येत आहे अनेक ठिकान महाराष्ट्र शासन तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन विभाग मार्फत वेळोवेळी सुचना येत आहेत की घराबाहेर पडु नका वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस होईल अशा सुचना नागरीकांना शासन देत आहे हा होणारा जोराचा पाऊस, अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे शेतीत पिक शिल्लक राहत नाही याने शेतकरी संकटात संकटात सापडला आहे या साठी महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना वेळोवेळी सांगत आहे कि आपल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी वाटते आपल्या भागात जास्त पाऊस झाला असून आपले नुकसान झालेले आहे .

असे तर आपल आपल्या पिकांची नुकसान भरपाई साठी पिकाची नुकसानीची तक्रार करणे गरजेच आहे पुढे हि जास्त पाऊस त्यांनी ज्यावेळी जास्त पाऊस होईल तेव्हा तक्रार नुकसानीची पुर्वसुचना देऊन संबधीत विमा कंपनीला नोंद करणे गरजेच आहे ही तक्रार ऑनलाईन अ‍ॅप द्वारे किंवा कंपनीच्या नंबर वर संपर्क करुन अतिवृष्टीची नोंदणी करुन घ्यावी.

महाराष्ट्रात होणार्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे खुप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे तर महाराष्ट्रा राज्य शासनाकडून व जिल्हा शासनाकडून अतिवृष्टी झाली आहे म्हणून अहवान करण्यात आले आहे की विमा कंपनीला नुकसानीची सूचना कळवा ते कसे करायचे आहे ते पण सांगीतल आहे ज्या शेतकऱ्याने आपल्या पिकाची विमा घेतलेला आहे ” प्रधानमंञी फसल बिमा योजना ” पिकाचा विमा केलेला आहे आशा व्यक्तीने अतिवृष्टी, जास्तीच्या पावसाने शेतातील पिकाची नुकसान झाल्यास ” प्रधानमंञी फसल बिमा योजना ” अंतर्गत विमा कंपनीला कळवणे गरजेच आहे नाही केल्यास विमा मिळण्यापासून वंचित राहु शकतात. तर कोणीही वंचित राहु नये सर्वांन लाभ मिळावा यासाठी ही माहिती आहे.

गेल्या २ ते ३ दिवसांपासून ज्या ज्या भागात पाऊस सुरू आहे.. त्या भागातील शेतकऱ्यांनी पीक नुकसान तक्रार क्राॅप इन्शुरन्स ॲपद्वारे नोंदवावी.. लक्षात ठेवा जे शेतकरी ऑनलाईन तक्रार योग्यरीत्या नोंदणी केली असेल तरच त्यांना पीक विमा रक्कम मिळते पण सातत पाऊस असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दृश्य दिसुन येते आहे. कापुस,सोयाबीन, कांदा, मूग, उडीद पिकांची तक्रार नोंदवू शकता. पिक विमा तक्रार करताना inundation किंवा access of rainfall या कारणांची निवड करावी. अति जास्त पाऊस होऊन पूर येणे ज्या शेतकऱ्यांना वाटते की आपल्या भागात कमी पाऊस असून आपले नुकसान झालेले नाही त्यांनी ज्यावेळी जास्त पाऊस होईल तेव्हा तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळवावी.

सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जोराचा पाऊस पडत असून पिकाचे नुकसान होत आहे, आपल्या पिकाचे नुकसान झाले आहे असल्यास पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी पाऊस पडल्यापासून ७२ तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स नोंदवणे गरजेचे आहे प्रधानमंञी फसल बिमा योजने अंतर्गत आपल्या पिकाचा विमा काढलेला आसाणे गरजेच आहे.

शेतकरी बांधवांनी आपल्या पिक नुकसानीची नोंद नियमा प्रमाणे करुन घ्यावी तरच पिक विम्याचा लाभ मिळेल नाही केल तर लाभ मिळणार नाही.

महत्वाची बाब म्हणजे – 1)आपल्या पिकाची नुकसान तक्रार करताना कोणीही कीड व रोगासाठी पुर्वसूचना देऊ नये. अशा पूर्व सूचना विमा कंपनी मार्फत रद्द होतात.
2) या वर्षीपासून पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेत पूर्व सूचना दिल्यास नुकसान भरपाई ही पिक कोणत्या वाढीच्या अवस्थेत आहे हा विचार न करता पिकाचे नुकसान किती टके झाले यानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे वाढीच्या अंतिम अवस्थेची बाट न बघता नुकसान झाले त्यावेळेस तात्काळ पुर्वसुचना यावी.
३) पूर्व सूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या Docket Id सांभाळून ठेवावा किंवा पीक विमा पावती वर लिहून ठेवावा कधीही आवश्यकता पडु शकते.

  • आपण चालु वर्षाचा पिक विमा भरलेला असणे आवश्यक आहे.
  • पिक नुकसानीची पुर्वसुचना ही पिकाचे नुकसान झाल्यापासुन 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीला सुचना देणे आवश्यक आहे.
  • पिकाची कोणतीही आवस्था आसल्यास तात्काळ पुर्वसुचना देणे गरजेच आहे.

विमा कंपनीला पुर्वसुचना देण्यासाठी दोन पद्धती आहेत.

1) 14447 हेल्पलाईनवर क्रमांकावर पीक नुकसानीची पूर्वसूचना कंपनीला देऊन पीक विम्याचा क्लेम करता येईल. पण अनेकदा त्यात अडचणी येतात. त्यामुळं दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे .

2) मोबाइल अ‍ॅपचा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अ‍ॅप वरून क्लेम करता येतो. तो कसा करायचा, जेणेकरून तुम्हाला पीक विमा मिळेल. सोप्पं आहे.

तर आपण आपल्या मोबाईल वरुन कशा प्रकार क्लेम करु शकता ते पाहुया.

Crop Insurance अ‍ॅप वर तक्रार कशी करायची ते पुढील प्रमाणे आहेत.

पीक विमा हा एक प्रकारचा कृषी विमा आहे जो शेतकऱ्यांना पीकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविला आसल्यास त्यांना लाभ मिळू शकतो यात नैसर्गिक आपत्ती , अतिवृष्टी , जास्तीचा पाऊस याची जास्त नोंद होत असते. तर तक्रार कशी करायची ते पुढील प्रमाणे.

  1. सुरवातीला आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर जाऊन Crop insurance अ‍ॅप डाऊनलोड करा.
  2. अ‍ॅप ओपन झाल्यावर Continue as Guest ( नोंदणी खात्याशिवाय काम सुरु ठेवा ) यावर क्लिक करा.
  3. पुढे एक पेज ओपन होईल Crop Loss ( पीक नुकसान ) या पर्यायावर क्लिक करा.
  4. crop loss Intimation / पिक नुकसानीची पुर्वसुचना यावर क्लिक करा.
  5. मोबाईल क्रमाांक टाका.
  6. नंतर मोबाईलवर आलेला ओटीपी येईल तो टाका.
  7. 1) हंगाम निवडा-खरीप हंगाम आहे 2) वर्ष निवडा 3) कोणत्या योजने अंतर्गत विमा आहे ती योजना आणि राज्य निवडा.
  8. नोंदणीचा स्रोत निवडा CSC निवडा आणि आपला विमा पावती क्रमांक टाका. पुढे क्लिक करा.
  9. पुढे विमा पावती नाव, गट , दिसेल त्यावर क्लिक करा. तपशील व्यवस्थित पहा.
  10. ज्या गट क्रमांका मधील पिकाची तक्रार करायची आहे तो गट नंबर निवडा कारण (प्रत्येक गटा करिता वेगळ माहिती भरुन क्लेम करायचा आहे पावती एकच असता गट दोन किंवा जास्त असु शकतात प्रत्येक गटासाठी)
  11. पिक नुकसानीचा प्रकार – Excess Rainfall किंवा Inundation निवडावा, घटनेचा दिनांक –ज्या दिवशी नुकसान झाले आहे तो दिनांक टाकावा, पिक वाढीचा टप्पा – Standing Crop आणि नुकसानीची टक्केवारी टाकावी.
  12. नंतर पुढे बाधीत पिकाचा फोटो टाकावा.
  13. नंतर सबमिट पर्यायावर क्लिक करायच आहे.
  14. त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरीत्या दाखल होईल आलण एक Docket id पण मिळेल तो जतन करून ठेवा. तर अशा प्रकारे आपण पिक नुकसानीची नोंद पुर्वसुचना मोबाइल वरुन दाखल करू शकता.

प्रधानमञी फसल बिमा योजना ही खुप महत्वपूर्ण योजना आहे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष विमा कंपनीकडून काही न काही पिक बाधित झाल्यामुळे विमा भरपाई मिळते व शेतकरी समाधान व सुखी आहे पण त्यासाठी आपल्या पिकाचा विमा उतरविणे गरजेच आहे कारण त्याच पावती द्वारे पावती क्रमांक टाकुन तक्रार दाखल करण्यात येईल तर प्रत्येकाने आपल्या शेतातील पिकाचा विमा उतरविणे गरजेच आहे .

आशाच महत्वपूर्ण माहिती साठी युट्यूब वर पाहु शकता किवा इतर शोशल मिडीया द्वारे माहिति मिळवु शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर योग्य माहिती उपलब्ध होईल आणि तुमच्यासाठी खुप उपयुक्त ठरेल crop insurance दाखल करुन विमा कंपनीकडून भरपाई मिळेल व बाधीत क्षेत्रानुसार टक्केवारी टाकुन पिक विमा मिळेल. आधिक माहिती साठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबक्राईब करा.