Dragon Fruit Farming in Maharashtra
Dragon Fruit Farming in Maharashtra जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी या गावातील उच्चशिक्षित तरुणाने पिकवली ड्रॅगन फ्रुट ची शेती पहा सविस्तर माहिती.
महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने पारंपारिक पिकांची शेती मोठ्या प्रमाणावर होते आणि महाराष्ट्रात शेती हा अग्रेसर आहे, महाराष्ट्र राज्य हे ज्वारी पिकांसाठी उत्पादनात देशात अग्रेसर आहे. व खरीप हंगामात घेणारी बाजरी ही प्रमुख पिका पैकी आहे . खरीप व रब्बी हंगामातील पिके आहे जे पारंपारिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पिक घेतली जातात. सोयाबीन पेरणी ही खरीप हंगामात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते महाराष्ट्राला कांदा प्रसिद्धी साठी ओळखले जाते. महाराष्ट्र राज्यात शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने विविध प्रकार च्या योजना राबविण्यात येत आहेत.
ड्रॅगन फ्रूट ही एक अशी फळे आहे जी आपल्या देशात नवीन असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी क्षमता वाढवते आणि ड्रॅगन फ्रूट ही फळे दिसायला खूप सुंदर आहेत मार्केट मध्ये याला खुप चांगली मागणी आहे.
जालना जिल्ह्य़ातील एक उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणाने शेती करण्याचा विचार केला आणि त्या शेतीत त्याने पिकवली ड्रॅगन फ्रुट टी शेती . कारण शेती हा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय आहे . सध्या संपुर्ण महाराष्ट्र राज्यात पारंपारिक शेती आघाडीवर आहे व सर्वच शेतकरी हे आपल्या शेत जमिनीवर पारंपारिक शेती करतात. सोयाबीन, कापूस ,गहू , मुग ,हरभरा आणि इतर काही पिके जी हंगामा नुसार शेती करतात .काहीजण वार्षिक पिक घेतात फळ लागवड क्वाचितच कुठे तरी दिसुन येते. पण बर्याच पैकी फळ लागवड होत आसुन नविन पिक घेण्याची कोणाची तयारी नसते . पारंपारिक शेतीलाच जास्त प्राधान्य देतात.
सध्या महाराष्ट्र राज्यात ड्रॅगन फ्रूटची शेती म्हणजे काही नवीनच आहे असे वाटते पण त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही. मात्र, या शेतीकडे दुर्लक्ष ही करुन जमणार नाही कारण आजच्या जगात ड्रॅगन फ्रुट ची एक वेगळीच प्रसिद्धी आहे सध्या अनेक राज्यांत या पिका कडे शेतकरी आणि उद्योजक यांचे लक्ष वेधले आहे.शेती ही नुसती उदरनिर्वाह साठी नाही योग्य मेहनत घेतली तर काळजी पुर्वक शेती केली शेतकरी चांगल आयुष्य जगणार र्ड्रॅगन फ्रुटची शेती ही संपुर्ण जगामध्ये उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय अशा भागातील प्रदेशात केली जाते. सध्या भारतात, प्रामुख्यानं गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे.
ड्रॅगन फ्रूट हे दुष्काळ सहन करू शकणारे एक पीक आहे त्यामुळे पाण्याची सोय ही कमी प्रमाणात असलेल्या भागातही त्याची लागवड केली जाऊ शकते व योग्य नियोजन करुन योग्य नफा मिळवता येतो ड्रॅगन फ्रूट हे कमी शेती तुन जास्त उत्पादन करुन देणारे पीक आहे.सध्याच्या बाजारात ड्रॅगन फ्रुटला चांगली व मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्याची किंमतही अशी चांगली आहे. सध्था शासनही ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला प्रोत्साहन मिळाव म्हणून योजना आणत आहे. छञपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) जिल्ह्यात ड्रॅगन फ्रूटची शेती काही प्रमाणावर सुरूवात झालेली दिसुन येत आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्यातील इतर काही भागातही या पिकाची लागवड सुरू आहे.
या पिकांच बद्द्ल माहिती मिळत आहे याने ड्रॅगन फ्रूटच्या शेतीबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे .याने शेतकरी ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे थोडक्यात च का होईन वळला जात आहे आसाच एक उच्चशिक्षित तरुण पांडुरंग तारख यानी ड्रॅगन फ्रुट ची शेती केली सुरवातीला त्याचा चंदन लावण्या कडे लक्ष होते पण नंतर ते ड्रॅगन फ्रूटच्या शेतीबद्दल उत्सुकता निर्माण होऊन त्या शेतीकडे वळले. त्याच्या पारंपारीक शेती तर आहे च पण पांडुरंग तारख यांनी एक एकर शेतीत ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे. ते २०१४ पासुन या पिका बद्दल सोशल मीडिया यावरुन माहिती घेत होते. शेतीची सर्व मशागत झाल्यान तेलंगणा राज्यात जाऊन ड्रॅगन फ्रूटची रोप आणली .
योग्य काळजी आणि योग्य मेहनत घेऊन ड्रॅगन फ्रूटची शेती पिकवली योग्य औषध फवारणी करुन सर्व नीटनेटकेपणाणे सर्व व्यवस्थित केल .ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्या साठी सी वाना ची निवड केली. कारण मार्केट मध्ये सध्या खुप डिमांड आहे आणि हि सी ( व्हरायटी ) वान चांगल आहे हे त्यांनी ओळखल. या वानाला फळ जास्त येतात आणि त्याचा कलर पण चांगला आहे उत्पादन ही चांगल होणार त्यांना कल्पना होती म्हणुन त्याने हे वान निवडल.
एक एकर ड्रॅगन फ्रूटची लागवड करुन संगोपनासाठी चार लाख पन्नास हजार इतका खर्च आला आहे असे ते सांगतात सुरवातीलाच पाच लाख इतका नफा झाला आणि नंतर त्यानी ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यासाठी आणखी जमीन वाढवली म्हणजेच पाच एकर पर्यंत ड्रॅगन फ्रूटची लागवड केली.आणि त्याना ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून वर्षाला पंचवीस लाख इतक उत्पन्न होत आहे. इतकी मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली शेती पाहण्यासाठी आजुन बाजुच्या शेतकरी मिञ येत आहेत त्यांची शेती पाहत आहेत त्याकडुन काही गोष्टी जाणुन घेत आहे . सध्या महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात ड्रॅगन फ्रुट ची शेती हळुहळु पसरत आहे लोकाना समजु लागली आहे शेती.
पांडुरंग तारख याची ड्रॅगन फ्रुट ची शेती पाहुन आजु बाजूच्या गावातील शेतकर्यांना आपणही ड्रॅगन फ्रूटची लागवड करावी अशी उत्कुता लागली आहे. शेतकरी वर्ग जो पारंपारिक पिकात अडकलेला आहे तो आता नविन प्रयोग म्हणून ड्रॅगन फ्रूटची शेती केली पाहीजे जे की खुप चांगली आहे चांगल उत्पन्न ही मिळेल. शेतकरी सुखी होईल यासाठी पारंपारिक शेती तर कराच पण सोबत ड्रॅगन फ्रूटची लागवड करावी खुप फायदा आहे.
ड्रॅगन फ्रूट आपल्या आरोग्या साठी खूपच फायदेशीर आहे या फळात अनेक पोषक तत्वे आसतात आणि ज्यामुळे पोषक तत्वा मुळे आपले शरीर निरोगी राहते व ड्रॅगन फ्रुटमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने आपल्याला अनेक आरोग्य साठी लाभदायक आहे .
ड्रॅगन फ्रूटची शेती ही महाराष्ट्रात दिसुन येत आहे आणि भविष्यात यात शेतीचा खुप फायदा होईल जर एखादा उच्चशिक्षित तरुण या शेती कडे वळु शकतो तर सर्व शेतकऱ्यांनी या शेतीपासून एक प्रेरणा घेऊन हि शेती केली पाहीजे.
या आर्टिकल मध्य ड्रॅगन फ्रुट बद्दल सविस्तर माहीत देण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपण इंटरनेट च्या माध्यमातून सविस्तर माहिती घेऊ शकता आणि युट्यूब वर ड्रॅगन फ्रूट बद्दल खुप यशस्वी शेतकऱ्यांच्या व्हीडिओ आहेत आपण पाहु शकता . सध्या मार्केट मध्ये उपलब्ध आहे त्याची मागणी किंमत ड्रॅगन फ्रुट चव इत्यादी आपण पाहु शकता.आणि नक्कीच शेतकरी मिञांनी या शेतीचा विचार केला पाहीजे.