Gay mhais anudan yojana
Gay mhais anudan yojana महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाणारी गाय म्हशी अनुदान योजना काय आहे याबद्दल सविस्तर माहीती आपण जाणुन घेणार आहोत.
नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकर्यांना देण्यात येणाऱ्या 50% अनुदानावर 13 हजार 400 दुधाळ गाई म्हशीचे वाटप करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मराठवाडा विदर्भातील दुग्ध प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 19 जिल्ह्यातील शेतकर्यांना दुधाळ गाई व म्हशीचे वाटप करण्यात येत आहे. 16 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने या बाबतचा शासन निर्णय घेतला आहे . दुग्ध प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यासाठी मंत्री मंडळात मान्यता घेण्यात आली होती. त्यामध्ये 149 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली होती.
• गाय म्हशी अनुदान योजना. Gay mhais anudan yojana
चला तर मग बघुया 50% गाई व म्हशीच्या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कोणत्या जिल्ह्याचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे अशा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. NDDB DAIRY आणि MOTHER DAIRY यांच्या मदतीने हा प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भात राबवला जाणार आहे . या प्रकल्पाची किंमत 328 कोटी 82 लाख रुपये आहे. याआधी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील 11जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता.
पण आता विदर्भ आणि मराठवाडा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा बुलढाणा, यवतमाळ , वाशिम, गडचिरोली, अमरावती, अकोला, नांदेड, जालना, हिंगोली बिड, उस्मानाबाद, संभाजीनगर, धाराशिवधाराशिव अशा एकूण 19 जिल्ह्यामध्ये 2026-27 पर्यंत दुग्ध विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत दुधाळ गाई व म्हशीचेच वाटप करण्यात येणार आहे असे काही नाही तर 13,400 गाई म्हशीचे 50% अनुदान वाटप करण्यात येईल त्यातील 50% हिस्सा हा शेतकर्यांना भरायचा आहे तर 50% हिस्सा राज्य सरकार भरतो. तसेच उच्चदुध क्षमता असलेल्या भ्रणाच प्रत्यारोपण केलेल्या 1 हजार कालवडींचे 75% अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पशु प्रजनन खाद्य पुरवठा करण्यासाठी 25% अनुदान देण्यात येते.Gay mhais anudan yojana
तसेच दुधातील फॅट SNF वाढवण्यासाठी 25% अनुदान बहु वार्षिक चारा पिके घेण्यासाठी 22 हजार शेतकऱ्यांना 13 कोटी अनुदान विद्युतचलित कडबाकट्टी खरेदीसाठी 10 हजार शेतकर्यांना 50% अनुदान 33% शेतकर्यांना 30% मुरघास अनुदान तर गाई म्हशीमधील व्यंधत्व निवारण कार्यक्रम आणि आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय विकासासाठी 3 कोटी 28 लाख रुपये आणि 1 कोटी 30 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. अशा प्रकारे एकुण 9 घटकांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी कार्यपद्धती काय आहे ते ही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आल आहे. आपण आधी गाई म्हशीच्या अनुदानासाठी अटी आणि लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत ते आधी बघूया. नंतर इतर घटकांची माहिती घेऊया.
• गाय म्हशी अनुदान लाभार्थी निकष.Gay mhais anudan yojana
- 8 ते 10 लिटर दूध देणाऱ्या दुधाळ गाई म्हशीच्या खरेदीसाठी एका लाभार्थ्यांला 50 % अनुदान देण्यात येत आहे. दुधाळ जनावरांना डिजिटल ट्रॅकर लावणे आणि जिओ टॅगिंग करणे सुद्धा बंधनकारक आहे.
- वाटप केलेली गाय किंवा म्हैस असेल तर ते 3 वर्षापर्यंत विकता येणार नाही.
- वाटप केलेल्या गाई म्हशी प्रकल्पाच्या नावे ठेवावे लागतील.
- गाई म्हशीचा 3 वर्षाचा विमा बंधनकारक आहे.
- विमा उतरविले जनावर जर मृत झाल तर नवीन दुधाळ जनावर खरेदी करणे सुद्धा बंधनकारक आहे. तसेच अटि सोबतच काही लाभार्थी निवडीचे निकष यामध्ये टाकले आहेत ते बघा.
- पशुपालकाकडे किमान 2 दुधाळ जनावर असावीत हा पहिला निकष आहे .
- मागील वर्षभरात किमान 3 महिने खाजगी व सहकारी दूध संकलन केंद्रावर संबंधित पशुपालकाने दुध विक्री केली असणे आवश्यक आहे.
- मागील 3 वर्षांत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसणे बंधनकारक आहे.
- एका गावातील जास्तीत जास्त 5 लाभार्थी निवडीसाठी पात्र ठरणार आहेत.
- आणि एका कुटुंबात एकाच व्यक्तीला लाभ देण्यात येते.
• गाई म्हशीची खरेदी तसेच वाटप कसे केल जाणार आहे ते जाणून घेणार आहोत.
- दुधाळ जनावर खरेदी करताना शेतकरी NDDB ची सेवा घेतील किंवा खुल्या बाजारातून उच्च दुध क्षमता असलेल्या गाई म्हशीची खरेदी केली जाते.
- प्रत्येक गाई म्हशीसाठी 1 लाख रुपये किंमत गृहीत धरण्यात आली आहे. त्यामध्ये ट्रेकिंग सिस्टम वाहतूक खर्च आणि 3 महीन्याचा विम्याचा समावेश करण्यात आला आहे.
- लाभार्थींना 50% किंवा 50 हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून राज्य सरकारकडून देण्यात येते. गाई म्हशीच्या खरेदीचा पुरावा आणि विमा पावती सादर केल्यावरच भारत पशुधन प्रणाली
- वर खातर जमा करून जिल्हा पशु संवर्धन उपायुक्ताकडुन लाभार्थीच्या बॅक खात्यात डिविटिद्वारे पैसे जमा करण्यात येतात.कालवडीच वाटप अनुदान यामध्ये 1 हजार शेतकर्यांना आयविएफ तंत्राद्वारे 7 महिन्याच्या गाभन कालवडीसाठी व पारडीसाठी 75% अनुदान किंवा 1 लाख 8 हजार 750 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तर तेवढ अनुदान देण्यात येते.
- यासाठी निकष बघा दुध उत्पादक शेतकर्याकडे किमान 5 जनावर असावीत पशु आहाराच शाश्वत पद्धतीच ज्ञान शेतकर्यांना असावे.
- पशुधनाच्या भावी पिढ्याची पैदास केवळ कृत्रिम रेतनाद्वारे करण्यासाठी पशुपालक इच्छुक असावा.
- पशु प्रजनन पुरक खात्यावर अनुदान कसे देण्यात येणार आहे तर एका गाई म्हशीसाठी प्रत्येक दिवशी 5 किलो ग्रॅम पशु पुरक खाद्य आवश्यक आहे.
- त्याचप्रमाणे 60 दिवसासाठी खाद्य देण्यात येते. त्याचा दर 32 रुपये किलो ग्रॅम गृहीत धरण्यात येते.
- एका गाईसाठी 9 हजार 600 किमतीच खाद्य देण्यात येते.
- 25% अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत. त्याचा लाभ 1 लाख म्हशीसाठी देण्यात येणार आहे.
- दुधातील फॅट आणि एस एन एफ वर्धक खाद्य पुरवठ्यासाठी एक गाय व म्हशीसाठी प्रती दिवस 250 ग्रॅम खाद्य पुरक आवश्यक असुन ते 90 दिवसांसाठी देण्यात येणार आहे. त्याचा दर 200 रुपये प्रति ग्रॅम गृहीत धरण्यात आला आहे. एका गाईसाठी व म्हशीसाठी 4,500 किमतीच खाद्य पुरक देय राहिल.
- तर 25% अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर खरेदीचे पुरावे सादर केल्यानंतर जमा केले जातील. त्यासाठी 33% गाई म्हशी पशुपालक पात्र ठरतील असेही शासन निर्णयात सांगितले आहे.
- बहु वार्षिक चारा पिके घेण्यासाठी 6 हजार बियाणे आणि ठोंबी 100 अनुदान तत्वावर 22 हजार लाभार्थी शेतकर्यांना देण्यात येतील. त्यासाठी निकष म्हणजे शेतकर्यांकडे 3 ते 4 दुधाळ जनावर असावीत. तसेच शेतकर्यांकडे 1 एकर जमीन असायला पाहिजे. त्या जमीनीवर चारा उत्पादनासाठी सिंचनाची सोय असायला हवी.
- वैरण उत्पादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेकडुन मोफत बियाणे व ठोंबे याचा लाभ घेतलेले शेतकरी अपात्र ठरणार आहेत.
- कडबाकुटीच्या वाटपासाठी 10 हजार लाभार्थी राज्यात पात्र ठरणार आहेत. एका कडबाकुटीची किंमत 30 हजार रुपये राज्य सरकारने गृहीत धरले आहे. या किमतीच्या 50% किंवा 30 हजार रुपये राज्य सरकारने गृहीत धरले आहे. या किमतीच्या 50% किंवा 15 हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून संबंधित शेतकर्यांना देण्यात येते. कडबाकुटी खरेदी केल्याची पावती सादर केल्यावर अनुदान लाभार्थी च्या बॅक खात्यात जमा केले जाते. याचा निकष हा 3 ते 4 दुधाळ जनावर असावीत. विद्युत जोडणीचा खर्च लाभधारकाने करायला हवा.
- मागील 5 वर्षांत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा जिल्हा केंद्र योजनेतून लाभ घेतलेली.
- लाभ घेतलेली शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरतील.
- लाभार्थ्यांनी 2 एच पि मार्क असलेली कडबाकुटी खरेदी करायला हवी. मुरगास साठी प्रति दिवस 5 किलो मुरगास 3 रुपये किलो प्रती अनुदान 33 हजार लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
- जिल्हा योजनेतून लाभ घेतलेली लाभार्थी यासाठी अपात्र आहेत. तर मुरगास खरेदीचा पुरावा सादर केल्यावर अनुदान खात्याच्या बॅंक खात्यावर डिवीटिच्या माध्यमातून जमा करण्यात येतील.
गाई म्हशी मधील व्यंधत्व निवारणासाठी 2 लाख गाई म्हशी वर संप्रेरकांच्या द्वारे पारंपरिक उपचार करण्यात येईल. तसेच आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय विकस करण्यासाठी 36 हजार शेतकर्यांना पशुवैद्यकीय विद्यापीठ प्रशिक्षण केंद्रातून कृषी विधान केंद्रातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशा एकूण 9 घटकांसाठी मराठवाडा विदर्भातील दुग्ध विकास प्रकल्पातून अनुदान देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच मुख्य न्यायालय नागपूर येथे आहे. या प्रकल्पाच 2 वर्षानंतर मुल्यमापन करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. 3 वर्षासाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे पण 2 वर्षानंतर या प्रकल्पाच मुल्यमापन करण्यात येईल असेही शासन निर्णयात सांगितले आहे. Gay mhais anudan yojana
महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रकल्पाची 2018 मध्ये घोषणा केली होती. त्यावेळी शेतकर्यांचा या योजनेना योग्य प्रतिसाद नव्हता. पण नंतर या योजनेला प्रतिसाद मिळाला. कोरोना नंतर च्या 2 वर्षात या प्रकल्पातुन 3 लाख दुध लिटर संकलन मराठवाडा आणि विदर्भात करु लागण्याचा दावा प्रकल्प संचालकाकडुन करण्यात आला होता. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 2 हजार दुधाळ जनावर वाटप करण्यात आली होती. आता मात्र राज्य सरकारने त्या दुधाळ जनावरांची संख्या 13,400 पर्यंत वाढवली आहे. तर दुसरीकडे मदर डेअरी च्या चीलिन सेंटर आणि आउटलेट मधुन विदर्भ आणि मराठवाड्यातील गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध योजना जाणून घ्या.
• गाय म्हशी अनुदान अर्ज कसा करावा. Gay mhais anudan yojana How to Apply
गाय म्हैस अनुदान वाटप योजनेबद्दल आधिक माहिती हवी महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत कार्यालयत जाऊन माहिती मिळवु शकता किंवा आपल्या मोबाईल च्या साह्याने अधिकृत पोर्टलवर https://www.mahabms.com अर्ज करु शकता AH-MAHABMS हे मोबाईल एप्लीकेशन उपलब्ध आहे याच्या साह्याने अचूक माहिती भरून आपला अर्ज प्रकिया पुर्ण करु शकता व आधिक माहिती जाणुन सूद्धा माहिती मिळवु शकता.
आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा व अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करतो आधिक माहितीसाठी जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयात भेट द्या किंवा शासनाच्या या अनुदाना संदर्भात पोर्टलवर भेट द्या.