Government of Maharashtra scheme for women
Government of Maharashtra scheme for women महाराष्ट्रातील महिलांसाठी निघालेल्या विविध योजना आहेत त्या सर्व योजनांची माहिती आज जाणून घेऊया.
तर बघुया महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाबाबतची माहिती. राज्य किंवा केंद्र सरकारकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा मुख्य हेतू म्हणजे तो असा की महिलांना त्यांना त्यांच्या पायावर उभे राहता याव जेणे करून त्यांना त्यांच्या कुटुंबाची व इतर मुलभूत गरजा त्यांना स्वतः भागवता येतील. या विविध बाबींचा विचार करून महिलांच्या कामाशी निगडित असणारे काम जसे शिवणकाम, विन काम, अशा अनेक योजनाचा समावेश महिलांसाठी शासनाकडून करण्यात आलेला आहे.
अजून महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करुन त्यांना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या समक्षिकरणाला चालना देणे हा शासनाचा महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा उद्देश आहे. तसा विचार केला तर मुलिंना समाजामध्ये कमी मान दिला जातो. लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकला जातो, घराबाहेर जाऊ देत नाहीत यामुळे त्यांना सुद्धा पुरुषाप्रमाणे सन्मान मिळावा यासाठीच महाराष्ट्रातील शासनाकडून महिलांसाठी १२ योजना राबवल्या जात आहेत. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा विचार करूनच महाराष्ट्र सरकारने या १२ योजनांचा विचार केला आहे.
तर या योजनेत सुरुवातीला बघुया महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणकोणत्या आहेत. यामध्ये बघा सर्वात आधी महिलांसाठी कोणत्या योजना राबविल्या जातात. मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी योजना राबविल्या जात आहेत आणि ते राज्य व केंद्र सरकारकडून राबविल्या जातात. त्यामध्ये व्यवसायासाठी महिलांना कर्ज देणार्या योजना आहेत, महिलांना व्यवसायासाठी उपकरण किंवा वस्तू देणार्या योजना आहेत, महिलांना प्रवासात सूट देणार्या योजना आहेत, महिलांना प्रसुतीपश्चात लाभ देणार्या योजना, मुलींना लाभ देणार्या योजना, गर्भवती महिलांसाठी योजना अशा विविध योजनेचा समावेश महिलांसाठी या योजनेमध्ये केला आहे. आता आपण या लेखाच्या माध्यमातून महिलांसाठीच्या ज्या १२ विवीध योजना आहेत त्या योजनेची माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया .Maharashtra Yojana for women
- आज आपण शासनामार्फत महिलांसाठी चालवल्या जाणार्या योजना पुढील प्रमाणे.
- लेक लाडकी योजना
- महिला उद्योगिनी योजना
- स्वर्णिमा योजना
- उद्योजक धोरण योजना
- महिला सन्मान योजना
- महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0
- माझी कन्या भाग्यश्री योजना
- सुकन्या समृद्धी योजना
- जननी सुरक्षा योजना
- महिला समृद्धी कर्ज योजना
- लाडकी बहीण योजना
○ महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी योजना पुढील प्रमाणे आहेत.
1 ] लेक लाडकी योजना :
ही योजना आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर बघा महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच मुलांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व मुलिंना सशक्त व प्रबळ व आत्मनिर्भर बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 सादर करताना लेक लाडकी योजना ही सुरू करण्यात आली.
या योजनेच्या माध्यमातून गरिब कुटुंबातील म्हणजेच पिवळ्या व केशरी राशन असलेल्या कुटुंबातील मुलिंना जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही महत्वपूर्ण माहिती महाराष्ट्रातील जे लहान मुली आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रकारे राज्यातील मुलिंचा जो मृत्यूदर , मुलींना शिक्षणासाठी चालना देण्यासाठी ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे. तसेच या योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये प्रत्येक लेकीला,मुलीला दाणेदार म्हणून दिला जात आहे. ही योजना फक्त मुलींसाठी काढण्यात आली आहे. यानंतर दुसरी योजना म्हणजे ती आहे महिला उद्योगिनी योजना आहे.
२ ] महिला उद्योगिनी योजना :
तर या योजनेच काम काय आहे बघुया. प्रत्येक महिलांना समाजात मानाच स्थान मिळाव, तसेच विविध व्यवसायामध्ये सुध्दा महिला या सक्षम व्हाव्यात यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे ती ही महिला उद्योगिनी योजना आहे. ही महाराष्ट्रातील एक महिला कर्ज योजना असुन ती सदर योजनेच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून लघुव्यवसायीक क्षेत्रातील व्यावसायिक, किरकोळ विक्रेते,उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू ईच्छिणार्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे. महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, उद्योगिनी वाढवण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलीली आहे तर येथे तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. नंतरची योजना आहे.
3 ] स्वर्णिमा योजना :
तर स्वर्णिमा योजना म्हणजे काय बघा. स्वर्णिमा योजना ही महिला स्वयंरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्वपूर्ण योजना आहे तसेच सदरची योजना न्याय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाकडुन मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी ते राबविण्यात येते तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतो. महिलांना व्यवसायासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NBCFDC) यांच्याद्वारे कमी व्याजदारावर कर्ज उपलब्ध करून दिला जातो.
यामध्ये महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येथे NBCFDC ही जी कार्पोरेशन फायनान्स कंपनी आहे या कंपनीकडून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिला जातो आणि खूप कमी व्याजदारावर येथे त्यांना कर्ज उपलब्ध करून दिला जातो. 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतो. जेणेकरून त्यांना स्वतः चा व्यवसाय सोप्या पद्धतीने सुरू करता येईल. नंतरची योजना आहे उद्योजक धोरण योजना.
४ ] उद्योजक धोरण योजना :
पुरुषांप्रमाणेच महिलांना सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये समान स्थान मिळावे यासाठी शासनाकडून महिलांसाठी ही कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमधून सूद्धा महिलांना त्यांच्या स्वतःच स्थान मिळाव यासाठी शासनाकडून ही कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेमधून सूद्धा महिती या योजनेमधून सूद्धा महिलांना त्यांच स्वतः च व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाखापासुन ते 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिला जातो ही मोठ्या धोरणावर सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाची महत्वपुर्ण योजना असणार आहे. या नंतरची योजना आहे महिला सन्मान योजना.
५ ] महिला सन्मान योजना :
या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामधील एक योजना म्हणजे महिला सन्मान योजना ही आहे. ST प्रवासामध्ये विषेश महिलांसाठी 50% सुट देण्याची महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली.
६ ] महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना :
या योजनेमध्ये जर एखाद्या महिलेच्या पतीचा अकस्मात किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाला असेल, अशा महिलांना समाजात वावरताना अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व स्वतःच्या बळावर आपल आयुष्य जगण्यासाठी राज्यशासनाच्या महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी ही विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेतुन विधवा महिलांना दर महिन्याला 1,000 रुपये पेन्शन राज्य शासनाकडून देण्यात येतो. या पुढची योजना आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0.
७ ] प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 :
सदर या योजनेत शासनाकडून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत ज्या गरोदर महिला आहेत आणि ज्या स्तनदा माता आहेत त्यांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत या योजनेद्वारे केली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही केंद्रशासनाची योजना असुन ही योजना महिला आणि बालविकास मंत्रालयामार्फत चालविण्यात येते.तसेच गरोदर महिलांना या योजनेची रक्कम तिन टप्प्यामध्ये देण्यात येते. यापुढील योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना.
८ ] माझी कन्या भाग्यश्री योजना :
1 मे २०१७ पासून महाराष्ट्र शासनाकडून मुलींचा जन्मदर प्रमाण सुधारण्यासाठी , स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने केली जाते.च्या माध्यमातून मुलीच्या जन्मानंतर 1वर्षाच्या मध्ये पालकांनी जर दुसरी मुलगी जन्मल्यापासून 6 महिन्याच्या मध्ये नसबंदी केल्यास त्यांना 50,000 हजार रुपयांची रक्कम शासनाकडून मुलांच्या नावावर बॅक खात्यात जमा केली जाते. ही योजना महाराष्ट्र सरकारने 2017 पासून सुरू केली आहे.
९ ] सुकन्या समृद्धी योजना :
22 जानेवारी 2015 पासून पालकांना आपल्या मुलांसाठी असलेली चिंता दूर करण्यासाठी शासनाकडून ही सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे आणि या योजनेअंतर्गत मुलीच्या पालकांना 250 रुपयांपासून 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. यामध्ये मुलीच्या भविष्यासाठी फायदा व्हावा म्हणून 7.6% व्याजदार दिला जातो. या पुढे आहे जननी सुरक्षा योजना.
१० ] जननी सुरक्षा योजना :
जननी सुरक्षा योजना देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी याच्याकडून गरिब कुटुंबातील गरोदर महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही सुरक्षा जननी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून दारिद्रय रेषेखालील गर्भवती महिलांना शासनाकडून 1400 रुपये आर्थिक मदत करण्यात येते. याशिवाय गर्भवती महिलांना मदत करणार्या अशा संयोगिता प्रसुती प्रोत्साहनासाठी 300 रुपये आणि प्रसुतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी 300 रुपये इतकी रक्कम देण्यात येते.
११ ] महिला समृद्धी कर्ज योजना :
महिला समृद्धी कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागाकडून विशेषतः महिलांसाठी राबविण्यात येणारी व्यावसायिक कर्ज योजना आहे. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी ही महिला समृद्धी कर्ज योजना काढण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतः चा उद्योग , व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. येथे 4% व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिला जातो आणि परतफेडीचा कालावधी 3 वर्षाचा असते. तर अशा प्रकारे महिलांसाठी निघालेल्या या काही योजना आहेत.
१२ ] लाडकी बहीण योजना :
महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाणारी योजना लाडकी बहीण योजना आहे २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली आहे महाविकास अघाडी सरकार च्या काळात ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना प्रति महिना १५०० रुपये मिळणार आहेत. ही योजना महिलांन सशक्त व एक आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.या योजनेची सुरवात १ जुलै पासुन झाली आहे. या योजने अंतर्गत महिलांन या योजनेचा लाभ मिळण्यास सुरवात झाली आहे. या योजनेच्या संपुर्ण माहीतीसाठी येथे क्लिक करा
वरील सर्व योजना विषयी आपण थोडक्यात माहिती बघितली आहे या सर्व योजना महाराष्ट्रातील महिलांन लाभदायक आहे अनेकांन शासनामार्फत चालवल्या जाणार्या योजनांची माहिती नसते ते कोणते योजना आहेत व्यवसाय करण्यासठी कोणती योजना लाभदायक आहे ,कर्ज कसे मिळेल कोणती योजना कशासाठी आहे हे सर्व माहिती आपण बघितली व कोणत्या योजने अंतर्गत किती लाभ मिळणार आहे या सर्व माहिती आज आपण बघितली आहे.
आधिक माहिती साठी आमच्या समुहात सामिल व्हा.
जर आपल्याला महिलासाठी चालवल्या जाणार्या योजनाबद्दल आणखी माहिती जाणुन घ्यायची असेल तर तुम्ही सोशल मीडिया किंवा युट्यूब व अन्य महाराष्ट्र शासनाच्या Government of Maharashtra किंवा केंद्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन घेऊ शकता.