How to get nrega Job Card.
How to get nrega Job Card मनरेगा अंतर्गत जाॅब कार्ड काढावे त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपञ जाॅब कार्ड पासुन मिळणारे फायदे याविषयी सविस्तर जाणुन घेऊया.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र शासनाची महत्वपूर्ण योजना आहे या योजने अंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये १०० दिवसांपर्यत रोजगाराची हमी केंद्र शासनाची आसुन व त्यानंतरची या योजनेअंतर्गत रोजगाराची हमी राज्य सरकार देते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते आणि सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाते.
या योजने अंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात. बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याबरोबरच शाश्वती निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागाला समृद्ध करणारी योजना असून खऱ्या अर्थाने ते विकासाचे इंजिन आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरा बदलण्याचे काम होईल.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उद्दीष्टे काय ते पुढील प्रमाणे आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रत्येक वित्तीय वर्षात प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्तीला किमान 100 दिवस काम मिळण्याची कायदेशीर शासनाची हमी मिळते.
त्यांच्या मार्फत या योजनेअंतर्गत अकुशल कामे करुन घेतली जातात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या २ फेब्रुवारी २००६ रोजी अंमलात आला.
•ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना रोजगार मिळवून देणे हा रोजगार हमी योजनेचा मुख्य उद्देश आहे.
• ग्रामीण भागातील नागरिकांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे.
• ग्रामीण भागातील बेरोजगारी चा दर कमी करणे व त्याच्यात आर्थिक सुधारणा आणणे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत संबंधित राज्यासाठी निर्धारित केलेल्या दराने त्या व्यक्ती ला पुरूष किंवा महिला यांना मजुरी मिळते व त्यांना मिळणारे मजुरीचे दर हे केंद्र शासन ग्राम विकास खात्याकडून जाहीर केले जातात. कोणत्याही गावातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्ती त्या परसिरात होणारे अकुशल काम करण्यासाठी अर्ज करु शकतात आणि एखादी व्यक्ती छर अधिपासून रोजगार करत असेल तर ती देखील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या आधारे रोजगारासाठी मिळवण्यासाठी अर्ज करु शकतात व त्या व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन दिला जातो व महिलांना प्राधान्य दिले जाते. How to get nrega Job Card
या योजनेच्या अंतर्गत किमान १/३ महिलांची नोंदणी करुन त्यांना काम दिले जाते. त्याना शासनामार्फत ठरवलेला मोबदला दिला जातो. महात्मा गांधी NREGA ची दृष्टी देशभरातील ग्रामीण कुटुंबांची उपजीविका सुरक्षा वाढवणे हा आहे ज्यांचे प्रौढ सदस्य अकुशल हाताने काम करण्यासाठी स्वेच्छेने काम करतात अशा प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान 100 दिवस हमी मजुरीचा रोजगार उपलब्ध करून देणे.गावगाड्यातील एखाद्या व्यक्तीला या योजनेच्या माधमातून रोजगार पाहीजे असेल तर त्या व्यक्ती ने लेखी स्वरूपात अर्ज करावा किंवा ग्रामपंचायत,ग्रामपंचायत च्या कार्यकारी आधिकारी , रोजगाराची रोजगार सेवक यांच्याकडे मागणी करावी. सदर व्यक्ती रोजगाराची मागणी हि तोंडी स्वरुपात करु शकतात आणि नोंदणी प्रक्रिया आणि त्यासाठीचा अर्ज मोफत दिला जातो.
अर्ज ग्रामपंचायत मध्ये किंवा ब्लॉक ऑफिस मध्ये अर्ज सादर कराव.नोंदणी अधिकृत करण्यासाठी ग्रामपंचायत ही अर्जदार त्याचा गावचा रहिवाशी आहे का आणि तो सज्ञान आहे का, हे पाहण्यात येते व नोंदणीसाठी घर एक भाग धरले जाते. त्यानंतर त्या गावच्या ग्रामपंचायतीकडून त्या कुटुंबाला/घराला एक जॉबकार्ड दिले जाते.जॉबकार्ड Job card म्हणजे काय आहे.जॉबकार्ड म्हणजे मूळ कायदेशीर एक दस्तऐवज आहे, त्या कार्ड च्या आधारावर नोंदणीत केलेला सदस्य रोजगाराची हमी मिळवू शकतो,अर्ज केल्यासनंतर पंधरा दिवसात जॉबकार्ड उपलब्ध व्हायला हावे ,जाॅब कार्ड ची वैधता ही पाच वर्षापर्यंत असते एक छोटी पुस्तिका ग्रामपंचायत मार्फत त्या सदस्याला देण्यात येते त्यालाच जॉब कार्ड म्हणतात.
जॉबकार्ड हा मजुराची नोंदणी महत्वपूर्ण दस्तऐवज आहे.मजुराला आवश्यक कागदपत्रां सोबत आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायतकार्यकारी आधिकारी यांच्याजवळ संपर्क साधावा.ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक मजुराला रोजगार हमी योजनेचे अर्ज देतील.
जॉबकार्ड काढण्यासाठी पात्रता काय आहे
१] ग्रामीण भागातील रहिवाशी असावा (रेशनकार्ड,आधारकार्ड, इतर कोणताही पुरावा )
२] वय वर्ष १८ पासून पुढे असावा.
३] अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी.
४] बँकचे पासबुक
५] कुटुंबाचा एकत्रित ३ फोटो
जॉबकार्ड मिळाले म्हणजे रोजगार मिळेलच असे नाही आहे कारण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार मिळण्यासाठी संबंधीत व्येक्तीला अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
जॉबकार्ड ची संपुर्ण माहीती काम मागणी केल्यानंतर १५ दिवसात काम दिले जाते. जर १५ दिवसांत काम दिले गेले नाही तर बेरोजगार भत्ता देण्यात येतो.
मनरेगा जॉब कार्ड द्वारे योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या योजनांचा लाभ पुढील प्रमाणे :
१]गृहनिर्माण सहाय्य योजना २]सौर ऊर्जा सहाय्य योजना ३]महात्मा गांधी पेन्शन योजना ४]अपंग निवृत्ती योजना ५]मुलगी विवाह सहाय्य योजना ६]शौचालय सहाय्य योजना ७]कौशल्य विकास तांत्रिक प्राणायाम योजना ८]माता बालक व बालिका सहाय्य योजना ९]कामगार गंभीर सहाय्य योजना How to get nrega Job Card
मनरेगा – महाराष्ट्र अंतर्गत घेता येणारी वैयक्तिक कामे मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१. विहित नमुन्यात अर्ज २. जॉबकार्ड विषयी माहीती ३. संबंधित कामासाठी लागणारी सर्व कागदपत्रे४. ग्रामसभेची मान्यता.५. आधार कार्ड६. राशनकार्ड ७. ग्रामीण रहिवाशी प्रमाणपत्र ८. मोबाईल क्रमाांक ९. पासपोर्ट आकाराचे फोटो
जॉब कार्ड हे एक प्रमुख दस्तऐवज आहे जे मनरेगा अंतर्गत कामगारांच्या हक्कांची नोंद करते .
जॉब कार्ड नोंदणीकृत कुटुंबांना कामासाठी अर्ज करण्यासाठी कायदेशीररित्या अधिकार देते, पारदर्शकता सुनिश्चित करते आणि कामगारांना फसवणुकीपासून संरक्षण करते.मजुराला आवश्यक कागद पत्रांसहित ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्याजवळ संपर्क साधावा.ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक मजुराला रोजगार हमी योजनेचे अर्ज देतील.अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.ग्रामसेवक अर्जदाराची सर्व माहिती रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भरेल व अर्जदाराला जॉबकार्ड देईल.