Important Card of Government|शासनाचे महत्वाचे कार्ड.

Important Card of Government

Important Card of Government

Important Card of Government आज आपण शासनाचे काही महत्त्वपूर्ण कार्ड कोणते आहे ते कशासाठी उपयुक्त आहे बद्दल माहिती जाणुन घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र विविध योजना राबविण्यात अग्रेसर आहे त्या योजने अंतर्गत आधिक आधिक लाभ व्हावा यासाठी काही कार्ड वापरण्यात आणले आहे. त्या कार्ड च्या माध्यमातून आपल्या एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड ची आवश्यक भासणार आहे. शासन महत्वाकांक्षी आहे आरोग्य विषयक योजना संदर्भात कार्ड, शेती किंवा इतर ओळखपञ म्हणून सूद्धा आपल्याला कार्ड आवश्यकता पडणार आहे दैनंदिन जीवनात शासनाच्य दिलेल्या कार्डचे खूप महत्त्व आहे आणि आवश्यकता आहे एखाद्या शासकीय लाभ घेण्यापासून ते वैयक्तिक लाभासाठी आहे.

राज्य शासनाकडून व केंद्र सरकारकडून बनविलेले जे 10 कार्ड आहेत त्या कार्ड विषयी माहिती जाणून घेणार आहोत. या 10 कार्ड नी तुम्ही कोणत्याही योजनाचा लाभ घेऊ शकता. सर्व प्रकारच्या स्किम, योजनेचा फायदा तुम्हाला मिळते जर तुम्ही हे 10 कार्ड बनवून घेतले असतील तर. आणि हे कार्ड बनवून घेण्यासाठी जास्त वेळ ही लागणार नाही. खुप कमी वेळात हे कार्ड बनवता येते. आणि सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर बघुया कोणकोणते कार्ड आहेत ते.

Important Card of Government शासनाचे काही महत्त्वपूर्ण कार्ड.

शासनाने महत्त्वपूर्ण कार्ड पुढील प्रमाणे आहेत.

  • आभा कार्ड .
  • ई श्रम कार्ड.
  • आयुष्यमान कार्ड.
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कार्ड.
  • राष्ट्रीय करियर सेवा कार्ड.
  • मतदान कार्ड.
  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका.
  • किसान क्रेडिट कार्ड.

1] ABHA म्हणजेच Ayushman Bharat Health Account

. किंवा याला आपण हेल्थ आयडी असेही म्हनु शकता. हे कार्ड सरकार तर्फे बनवून दिले जाते. आभा कार्ड म्हणजे व्यक्तीची सर्व मेडिकल हिस्ट्री. व्यक्तीला कोणकोणते आजार आहेत. त्या व्यक्तीची कोणकोणते तपासणी झाली आहे किंवा चालू आहे या प्रकारची सर्व माहिती या कार्ड मध्ये असते. या कार्डचा फायदा हा असतो जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाऊन हे कार्ड डाॅक्टरला दाखवता तेव्हा तुमच्या विषयीची सर्व माहिती त्यांना कळते. तुम्हाला काय आजार आहे , तुमचे कोणकोणते उपचार झालेत आणि तुमची मेडिसिन कोणते चालू आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर तुमची सर्व मेडिकल हिस्ट्री त्या डाॅक्टर जवळ असते. आणि त्यानुसार तुमची समोरची ट्रिटमेंट चालू ठेवता येते. तसेच हे कार्ड तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बनवता येते.

2] ई श्रम कार्ड

हे कार्ड सरकारने 2021 मध्ये लाँच केले आहे. या कार्ड मुळे लाभार्थ्याना आर्थिक मदत आणि फायदे सरकारकडून दिले जातात. ज्याच्याकडे हे कार्ड आहे त्यांना पेन्शन बेनिफिट भेटते. म्हणजे महिन्याला 3 हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. म्हणून हे कार्ड खूप महत्त्वाचे आहे. आणि हे कार्ड फक्त आधार कार्ड च्या बेसवर तुम्हाला बनवता येते.

3 ] आयुष्यमान कार्ड

एकदा तुमचे हे कार्ड तयार झाले की तुम्हाला कोणत्याही सरकारी किंवा खाजगी हाॅस्पिटल मध्ये 5 लाख रुपयांपर्यंत लाखापर्यंत चा लागणारा खर्च या आयुष्यमान कार्ड मधुन केला जातो. रजिस्टर केलेले असलेल्या सरकारी किंवा खाजगी हाॅस्पिटल मध्ये. हे कार्ड ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने बनवता येते.

4] प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कार्ड

या कार्ड च्या अंतर्गत तुम्हाला 3 हजार रुपयांपर्यंतची पेन्शन दिली जाते.योजना असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना ओल्ड ईज प्रोटेक्शन आणि स्युकेअर स्युकरीटी देते. दर महिन्याला पेन्शन मिळावी यासाठी लाभार्थ्याना कमीत कमी 55 रुपये आणि जास्तीत जास्त 200 रुपयाचे योगदान स्वतः कडून करावे लागते. ज्यामध्ये तितक्याच रकमेचे योगदान केंद्र सरकार कडे आणि लाभार्थ्याला वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. मानधन योजनेचे कार्ड सुद्धा ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही प्रकारे बनवता येते.


5] राष्ट्रीय करियर सेवा कार्ड

या कार्ड मध्ये तुमची शैक्षणिक, स्किल संबंधित तसेच कामाचा अनुभव म्हणजे तुमचा सर्व बायोडाटा स्टोअर केलेला असतो. ज्यामुळे कोणत्याही ठिकाणी नोकरी साठी तुम्हाला अर्ज करता येतो. आणि तसेच हे कार्ड ऑनलाईन पद्धतीने बनवु शकता.

6] मतदान कार्ड

हे कार्ड सुद्धा प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे. या कार्डला ओळख पत्र कार्ड म्हणून ओळखले जाते. सरकारी ठिकाणी मागणी केल्यावर मतदान कार्ड सादर करता येते. निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे आहे. बर्‍याच ठिकानी शासकीय कामाकरता , शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मतदान कार्ड महत्वाचे आहे.

7] आधार कार्ड

आधार कार्ड हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही प्रकारे बनवता येते. हे कार्ड जर 10 वर्षे जुने असेल आणि मागिल 10 वर्षामध्ये तुम्ही हे कार्ड कधीही अपडेट केल नसेल, त्यात काही बदल केल नसेल तर सावधान राहायला हवे. अपडेट न केलेले आधार कधीही ईन अक्टिव / बंद केले जातात. आधार कार्ड वरची डोमोग्राफिक माहिती जसे तुमचा पत्ता, जन्म तारीख, जेन्डर काहीही बदलायचे असेल तर ते तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वर करु शकता. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड केंद्रावर जाण्याची गरज लागणार नाही.

8] पॅन कार्ड

व्यक्तिची आर्थिक माहिती, परिस्थिती जाणून घेण्यासाठी पॅन कार्ड खूप महत्त्वाचे असते. व्यक्ती व्यवसाय करत असेल, बॅंकेत खाते उघडायचे असेल तर पॅन कार्ड महत्त्वाचे ठरते. आणि जर तुमची कमाई ऑनलाईन असेल आणि पेमेंट डाॅलर मध्ये मिळत असेल तर ते रुपयामध्ये कन्फर्म करण्यासाठी पॅन कार्ड खूप महत्त्वाचे असते. तसेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले असेल तरीही ही माहिती मिळते. म्हणून सरकार आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास सांगते. मागच्या वर्षापर्यंत ज्यांनी कोणी हे लिंक केले नसेल तर त्यांना 1 हजार रुपयांचा दंड भरून लिंक कराव लागेल.

9] रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका

या कार्ड द्वारे वार्षिक कौटुंबिक उत्पन्नानुसार लाभार्थी परिवाराला ठराविक दराने धान्य दिले जाते. हे फायदेशीर रेशन कार्ड आता डिजिटल स्वरूपात सुद्धा मिळत आहे. त्यासाठी 12 अंकि नंबर द्यावा लागतो. आणि मेरा रेशन या अप मध्ये तुम्ही तुमचे डिजिटल रेशन कार्ड बघु शकता. किंवा ऑनलाईन पोर्टलवर सूद्धा जाऊन राशन कार्ड पाहु शकता . त्याचबरोबर नव्या रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येतो.

10] किसान क्रेडिट कार्ड

हे कार्ड शेतीच्या कामासाठी खुप महत्त्वाचे असते.जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड बनवले असेल तर या कार्ड नुसार तुम्हाला सिंगल विन्डोच्या माध्यमातून बॅंकेकडून कर्ज मिळवता येते. शेतिची कामे जसे पिकाच्या लागवडीसाठी अल्पकालीन कर्जाची आवश्यकता, कापणी नंतरचा खर्च, विपणन कर्ज उत्पादन, शेतकरी कुटुंबाच्या उपभोग आवश्यकता, शेतीच्या मालमत्तेच्या देखरेखीसाठी खेळते भांडवल तसेच कृषी साठी गुंतवणूक क्रेडिटची आवश्यकता ईत्यादी. किसान क्रेडिट कार्ड सुद्धा तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने बनवुन शकता. अशा प्रकारे भारत सरकारने बनविलेल्या 10 कार्ड या विषयी माहिती आपण घेतली आहे.Important Card of Government

महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र शासनाचे काही कार्ड आहेत आशा कार्डचा उपयोग विविध ठिकानी होतो हे आपल्याला पण माहिती आहे शासनाच्या विविध योजना आसो किंवा कोणता लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड आवश्यक आहे आधार कार्ड हे आजच्या डिजीटल युगात एक महत्त्वपूर्ण कार्ड आहे या कार्डची आवश्यकता प्रत्येक वेळी पडणार आहे बँकेत खाते उघडायचे आसेल किंवा शैक्षणिक काम असेल , शासकीय काम असेल तर आधार कार्ड म्हणजे आपल्या जन्मापासून मृत्यू पर्यंत या कार्डची आवश्यकता आहे आधार कार्ड शिवाय एकही काम शक्य नाही असे म्हणता येईल. Important Card of Government

पॅन कार्ड हे बँकेत व्यवहार करण्यासाठी अकाउंट उघडण्यापासुन ते इतरही व्यवहार करताना याची आवश्यकता आसते खूपच महत्वाचे आहे कार्ड आहे आधार कार्ड पॅन कार्ड जोडणी करण्यास सुध्दा शासनाने सांगीतले आहे .राशन कार्ड ही आपल्या कुटुंबाची ओळख आहे स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कडून धान्य घेण्यासाठी शासनाचे हे कार्ड महत्वपूर्ण आहे तसेच बँकेत, शासकीय इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी हे राशन कार्ड एक कौटुंबिक ओळख म्हणून गरजच आहे.

आता आपण आजच्या लेखात शासनाचे काही महत्त्वपूर्ण कार्ड बद्दल थोडक्यात माहिती बघितली आहे तरी प्रत्येक कार्डची सविस्तर माहिती नविन लेखात घेऊन येणार आहोत. प्रत्येक कार्डचे फायदे काय आहेत.कार्ड साठी कसे अर्ज करायचा कुठे अर्ज करायचा त्या कार्ड पासुन लाभ काय आहेत ,कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपञे लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढील लेखात जाणून घेणार आहोत.Important Card of Government

आपल्या कोणत्याही शासनाचे काही महत्त्वपूर्ण कार्ड या बद्दल आधिक माहिती हवी आसल्यास शासकीय कार्यालयात जाऊन माहिती करुन घेऊ शकता जवळच्या शासकीय कार्यालयात सर्व माहिती मिळेल किंवा मोबाईलच्या साह्याने आधिकृत पोर्टलवर जाऊन सूद्धा माहिती मिळवु शकता आणि कार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकता आजचा लेख माहिती पुर्ण व योग्य वाटल्यास पुढे पाठवा आणि हे शासकीय महत्वपूर्ण कार्ड बद्दल माहीती पुढे पाठवा.Important Card of Government