Kolhapur City Tourism
Kolhapur City Tourism महाराष्ट्र राज्यातील सुंदर व पर्यटकांचे आकर्षण आसलेल्या कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांबद्दल माहिती पाहुया.
नमस्कार मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कोल्हापूर ही महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे. पंचगंगा नदीच्या तीरावर आणि सह्याद्री पर्वतरांगासोबत वसलेले कोल्हापूर हे शहर भारतातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. Kolhapur City Tourism
कोल्हापूर या शहराला पुर्वी कलापुर या नावाने ओळखले जात असे. कलापूर या नावाच्या आधी करवीर असे होते. तसेच हे शहर सुती कपड्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणची कोल्हापूरी चप्पल अख्या जगात ओळखली जाते. भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा कोल्हापूर या ठिकाणी काढण्यात आला होता. खव्यासाठी सुद्धा कोल्हापूर हे शहर आवडीचे ठिकाण आहे. या ठिकाणी असणारी मिसळ भेळ आणि नाॅनवेज मध्ये खास करून तांबडा आणि पांढरा रस्सा यासाठी कोल्हापूर जिल्ह्या प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी कोल्हापूर या शहराला भेट देण्यासाठी योग्य समजला जातो. चला तर बघुया कोल्हापूर शहरातील 10 पर्यटन स्थळे.
• कोल्हापूर शहरातील पर्यटन स्थळे.Kolhapur City Tourism
- DYP सिटी माॅल
- भवानी मंडप
- ड्रिम वर्ल्ड वाॅटर पार्क
- कणेरी मठ
- शालीनी पॅलेस
- खासबाग मैदान
- कोल्हापूर मार्केट
- रंकाळा तलाव
- न्यू पॅलेस म्युझियम
- महालक्ष्मी मंदिर
1. DYP सिटी माॅल –
कोल्हापूर पुणे हायवेवर असलेला DYP सिटी माॅल हा कोल्हापूर शहराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य शाॅपिंग सेंटर म्हणून या माॅल ची ओळख आहे. या माॅल मध्ये आपल्याला बजेट फ्रेंडली ते प्रिमियर वस्तू पर्यंत सर्व काही खरेदी करता येते. या ठिकाणी काही अशी दुकाने आहेत ज्या ठिकाणी आपण कपडे, उपकरणे, दागिने, खेळणी आणि इतर अनेक वस्तू खरेदी करु शकतो. त्याचबरोबर खव्य्यांसाठी या ठिकाणी अनेक रेस्टॉरंट देखील आहेत. जेथे आपण वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा अनुभव घेता येतो. कोल्हापूर बस स्थानकापासून DYP सिटी माॅल हे ठिकाण 1.7 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
2.भवानी मंडप-
भवानी मंडप हे ठिकाण कोल्हापूर शहरातील सर्वात जुनी आणि प्रमुख वास्तु आहे. पुर्वी छत्रपती शाहू महाराज शाही दरबार आणि राजवाडा म्हणून ओळखले जात असे. ही ईमारत या शहरातील सर्वात महत्वाच्या हेरिटेज संरचनांपैकी एक आहे. आणि तिचे सार्वजनिक स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. या पॅलेस च्या आत मध्ये अनेक पुतळे, भरलेले प्राणी, लाकडी मुकुट आणि शाहू महाराजांची शिल्पे पाहायला मिळतात. भवानी स्मारक हे पुर्णपणे काळ्या दगडात बांधलेले आहे. ते पाहण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत खुले असते. कोल्हापूर बस स्थानकापासून भवानी मंडप हे ठिकाण 3.2 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
3.ड्रिम वर्ल्ड वाॅटर पार्क –
कोल्हापूर शहरातील ड्रिम वर्ल्ड वाॅटर पार्क हे ठिकाण रंगीबेरंगी पाण्याच्या फुग्यासोबत खेळण्यासाठी हे उत्तम जागा आहे. या ठिकाणी आपण मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत जाऊ शकतो. या पार्क मध्ये 8 रंगामध्ये स्लाइड्स उपलब्ध आहेत. तसेच या ठिकाणी एक कॅफे आहे. त्या ठिकाणी आपण स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेऊ शकतो. मात्र या ठिकाणाला भेट देण्यासाठी मे ते ऑक्टोबर हा कालावधी योग्य समजला जातो. हे ठिकाण सकाळी 10 ते सायंकाळी 9 पर्यंत चालू असते. कोल्हापूर बस स्थानकापासून हे ठिकाण 2.7 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.Kolhapur City Tourism
4.कणेरी मठ-
हे ठिकाण कोल्हापूर शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक स्थळांपैकी एक आहे. याला सिद्धगिरी ग्राम जीवन संग्रहालय म्हणून ओळखले जाते. 7 एकर इतक्या क्षेत्रामध्ये हे संग्रहालय विस्तारलेले आहे. या ठिकाणी आपल्याला ग्रामीण जीवनाची वर्णन करणारी 80 दृश्य आणि 300 पेक्षा जास्त पुतळे पाहायला मिळतात. त्याचबरोबर कणेरी मठ हे भगवान शिवाचे मंदिर असलेले पवित्र प्रसिद्ध स्थान म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी बरेच भाविक येत असतात. चारही बाजूंनी निसर्गानी वेढलेल्या या ठिकाणाला आपण सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत भेट देऊ शकता. कोल्हापूर बस स्थानकापासून कणेरी मठ हे ठिकाण 13 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
5.शालीनी पॅलेस-
कोल्हापूर शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कोल्हापूर संस्थानाच्या राजकन्या शालीनी राजे यांच्यासाठी हा आलीशान पॅलेस बांधण्यात आला होता. दोन मजली व आयताकृती असलेला हा राजवाडा वास्तुमद्ययुगीन पद्धतीचा आहे. याच्या चारही बाजूंच्या कोपऱ्याला चार चौकोनी मनोरे असुन त्याच्यावर घुमुट लावलेले आहे. मनोर्याच्या वरच्या बाजूला काचेचे नक्षीकाम व मनोर्याचे घड्याळ लावलेले आहे. त्यामुळे या वास्तुचे सौंदर्य खूप सुंदर दिसते. त्याचबरोबर राजवाड्याच्या अंतरंगात अनेक दालने असुन ती अत्यंत कलात्मरित्या व उत्तम सजावटीने रंगवले आहे. कोल्हापूर बस स्थानकापासून हे ठिकाण 4.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
6.खासबाग मैदान–
खासबाग मैदान हे कोल्हापूर शहरातील कुस्तीचा आखाडा म्हणून वसलेले ठिकाण आहे. हे छत्रपती शाहू महाराजांच्या अनेक योगदानने कोल्हापूर शहराला लाभलेले आहे. कोल्हापूर मध्ये 1907 साली या आखाड्याचे काम सुरू करण्यात आले होते. आणि 1912 मध्ये ते पूर्ण करण्यात आले होते. या मैदानाच्या सभोवताली प्रेक्षकांना व व्यवस्थीत कुस्ती पाहता यावी यासाठी उतरन केलेली आहे. एका वेळी 25 ते 30 हजार लोक भारतीय बैठकीत बसु शकतील इतकी मोठी क्षमता या मैदानाची आहे. कोल्हापूर शहरापासून हे मैदान अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे.
7.कोल्हापूर मार्केट-
कोल्हापूरला जाणारा प्रत्येक पर्यटक या ठिकाणी आल्यावर खरेदी करायला विसरत नाही. ती खरेदी आपल्याला कोल्हापूर मार्केट मध्ये करता येते. कोल्हापूर मध्ये आल्यावर आपल्याला खास करून कोल्हापूरी चप्पल आणि मसाले हवेसे वाटतात. कोल्हापूर चप्पल मार्केट मध्ये आपल्याला अगदी मापक दरात मिळते.कोल्हापूर चप्पल मार्केट मध्ये आपल्याला अगदी मापक दरात मिळते.कोल्हापूर शहरातील पर्यटक स्थळांना भेट देणारा प्रत्येक पर्यटक या मार्केटला भेट देण्यासाठी येत असतो. कोल्हापूर शहरापासून हे मार्केट 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.Kolhapur City Tourism
8.रंकाळा तलाव–
रंकाळा तलाव हे कोल्हापूर शहरातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. याला भेट देण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी पर्यटकांची खुप गर्दी असते. कोल्हापूर शहराची रंकाळा चौपाटी म्हणून याची ओळख आहे. राजघाट आणि मराघाट यांना जोडणारा हा तलाव कोल्हापूर चे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी बांधला होता. जो तप्पल 107 हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रात विस्तारलेला आहे. रंकाळा तलाव हा मन शांत करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी कोल्हापूर शहरातील एक उत्कृष्ट ठिकाण आहे. जुन ते सप्टेंबर हा कालावधी या तलावाला भेट देण्यासाठी अगदी उत्तम समजला जातो. कोल्हापूर बस स्थानकापासून हे ठिकाण 4.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.Kolhapur City Tourism
9.न्यू पॅलेस म्युझियम-
ही कोल्हापूर शहरातील एक प्राचीन ईमारत आहे. या राजवाड्याच्या मध्यभागी घड्याळाचा मनोरा म्हणून ओळखला जाणारा अष्टकोनी मनोरा आहे. तो खुपच सुंदर आणि आकर्षक दिसतो. या राजवाड्याच्या तळमजल्यावर छत्रपती शाहू महाराजांची छायाचित्रे, नाणी, दागदागिने, वेशभूषा, शस्त्त्रे इत्यादी वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. न्यू पॅलेस या राजवाड्यामध्ये राज परीवाराचे वास्तव्य आहे. भवानी मंडप कसबा बावडा रोडवर हा पॅलेस स्थीत आहे. मित्रांबरोबर आणि कुटुंबासोबत भेट देण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. कोल्हापूर शहरापासून न्यू पॅलेस हे ठिकाण 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
10.महालक्ष्मी मंदिर –
कोल्हापूर शहरात असलेले श्री महालक्ष्मी हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदीरापैकी एक आहे. हे प्रसिद्ध हिंदू तिर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध हिंदू तिर्थ क्षेत्र म्हणून ओळखले जाते. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीचे मंदीर हे महाराष्ट्रत असलेल्या साडेतीन शक्ति पीठांपैकी एक आहे. आज देखील कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच या मंदिराचा उल्लेख करतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी विविध भागातील भाविक भक्त मोठ्या उत्सुकतेने येतात. भारतातील सर्वात शक्तिशाली आणि पवित्र पुजन स्थानांपैकी एक म्हणून या मंदिराकडे बघितले जाते. कोल्हापूर शहरामध्ये येऊन जर तुम्ही या मंदिराला भेट दिली नाही तर तुमची सहल पुर्ण होणार नाही.कोल्हापूर बस स्थानकापासून हे अवघ्या 3.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
तर आज आपण कोल्हापूर शहर पर्यटन शहरातील 10 पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेतली आहे.Kolhapur City Tourism
बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणुन घ्या.
आज आपण कोल्हापूर शहरातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणुन घेतली आहे तरी आपण पूढील लेखात कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष माहीती व पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणुन घेणार आहोत कोल्हापूर हे शहर खुप मोठ आहे त्या शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांबद्दल आज आपण माहिती बघितली आहे तरी पुढील लेखात कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणुन घेऊया कारण तसा कोल्हापूर जिल्हा खुप मोठा आहे अनेक किल्ले, राजवाडे ऐतिहासिक स्थळ आहेत त्या संबधित सविस्तर आणि सोपी माहिती पूढील लेखात पाहणार आहोत. Kolhapur City Tourism
पुढील लेखात संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील माहीती, पर्यटन, भेट देण्यासाठी कसे जाता येईल ही सर्व माहिती पाहणार आहोत तरी आपल्याला आधिक माहिती हवी आसल्यास कोल्हापूर जिल्हा अधिकृत वेबसाइटवर भेट द्या तिथे माहिती मिळेल सोशल मीडियावर, युट्युबवर व्हिडिओ सूद्धा मिळतील तर कोल्हापूर शहर पर्यटन माहिती कशी वाटली माहिती आवडल्यस शेअर करा.Kolhapur City Tourism