ladaka bhau yojana
ladaka bhau yojana लाडका भाऊ योजना प्रशिक्षणादरम्यान युवकांना व विद्यार्थ्यांना दर महीन्याला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
काही दिवसा आधीच २०२४ अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली पण आता बहीणीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली पण लाडक्या भावाच काय हा प्रश्न राज्य सरकार ला सर्वजन विचारत होते पण सरकारने या योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदें’ आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात केलेल्या भाषणादरम्यान या योजनेची घोषणा केली आहे. पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीही लाडक्या भावासाठी एक योजना जाहीर केली आहे, लाडका भाऊ योजना त्या योजने अंतर्गत बारावी पास विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, कोणत्या प्रकारचा डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये, तर पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये मिळणार आहेत.
पंढरपुरात बोलत आणताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या योजनेतील विद्यार्थी किंवा राज्यातील तरुण युवक वर्षभर एखाद्या कारखान्यात किंवा इतर ठिकाणी अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर त्या ठिकाणी त्याला काम केलेल्या कामाचा अनुभव मिळेल आणि त्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर त्या युवकाला एखाद्या ठिकाणी नोकरी देखील मिळेल. लाडका भाऊ योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील तरुण युवक/ विद्यार्थी ज्या कारखान्यात किंवा कुठेही एक काम करतील अप्रेन्टिसशिप Internship करतील तिथे त्यांच्यासाठी युवकासाठी आपलं सरकार पैसे भरणार, त्याचबरोबर त्यांना स्टायपंड देण्यात येईल, आतापर्यंत च्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना राबण्याचा विचारत आणली आहे, असं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
लाडका भाऊ योजना Mukhyamantri ladaka bhau yojana महाराष्ट्र अंतर्गत अप्रेन्टिसशिप प्रशिक्षणादरम्यान युवकांना व विद्यार्थ्यांना प्रत्येक महीन्याला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
महाराष्ट्रात ( Maharashtra )राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत मध्ये कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे. या अप्रेन्टिसशिप प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच राज्यातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल व राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल. कारण ही योजना महाराष्ट्रातील होतकरु युवकांना व विद्यार्थ्यांना एक संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.त्याचा नक्कीच राज्यातील युवक व विद्यार्थ्यांना खुप फायदा होईल.
महाराष्ट्र शासनामार्फत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे चालणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून रोजगार संधी शोधत असलेले उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील.
या उपक्रमा अंतर्गत योजने साठी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल
योजनेचे कामकाज म्हणजेच उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती
नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती चा अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील.
या योजनेअंतर्गत बारावी, आय.टी.आय. डिप्लोमा, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार पाहीजे असलेले उमेदवार युवक ऑनलाईन नोंदणी करतील.सदर कार्य प्रशिक्षणचा कालावधी ६ महिने असेल. सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण ना दरम्यान एखाद्या कामाचा कारखान्यात अथवा इतर ठिकाणी अनुभव येईल व त्या अनुभवाच्या जोरावर त्याला खुप फायदा होईल.
महाराष्ट्र राज्यातील युवक विद्यार्थ्यी व रोजगाराच्या संधी शोधत असलेले सुशिक्षित तरूण त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्यासाठी युवकांना सक्षम बनवण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना माझा लाडका भाऊ योजना वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास महाराष्ट्र सरकार कडुन मान्यता देण्यात येत आहे.
अप्रेन्टिसशिप म्हणजे काय? जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा शिक्षण झालेला युवक एखाद्या कंपनीत किवा कारखान्यात काही महिन्यांसाठी काम करतो, तिथं काम करताना काही कौशल्य शिकतो,काम शिकतो, तिथे त्याला कामाचा अनुभव मिळवतो व त्यासाठी त्याला स्टायपेंड मिळते त्याला अप्रेन्टिसशिप म्हणतात.
लाडका भाऊ योजने’साठी पात्रता काय आहे.
१] लाडका भाऊ या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.
२] तरुणांचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे
३] उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी.
४]बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल
५]अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे
इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी
६] उमेदवाराने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
लाडका भाऊ योजने’साठी अपात्रता काय आहे.
१] शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
२] उमेदवाराचे वय हे ३५ वर्षापेक्षा जास्त असल्यास या योजनेस सहभाग पाञ नाही,वय हे ३५ वर्षाच्या आत व १८ वर्षा पेक्षा जास्त असावे,
लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला व किती आर्थिक मदत मिळणार:
१२ वी उत्तीर्ण विद्यार्थी – प्रत्येक महीना ६,०००/ हजार रुपये
आय.टी.आय/ पदविका झालेला तरुण – प्रत्त्येक महीना ८,०००/- हजार रुपये
पदवीधर /पदव्युत्तर – दरमहा १०,०००/- हजार रुपये
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची आधिक माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता आणि आधिक सविस्तर माहिती घेऊ शकत सोशल मीडियावर किंवा अन्य शासकीय कार्यालयात माहिती मिळेल हे प्रशिक्षण केवळ सहा महिने आसणार आहे प्रशिक्षणादरम्यान विद्यावेतन वरील ठरवल्यप्रमाणे देण्यात येणार आहे आधिक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत साईटवर भेट द्या.