Lakhpati Didi Yojana 2024|महिलांसाठी ‘लखपती दिदी योजना’.

Lakhpati Didi Yojana 2024

Lakhpati Didi Yojana 2024

Lakhpati Didi Yojana 2024 केंद्र शासनाची ” लखपती दीदी योजना ” महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज जाणुन घ्या सविस्तर माहिती.

भारत सरकार हे खुप महत्वाकांक्षी आहे महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहेत गेल्या काही दिवसात म्हणजेच जुलै 2024 पासुन संपुर्ण महाराष्ट्रात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही योजना फक्त महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे पण सध्या खुपच चर्चेत आहे या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये महाराष्ट्र सरकार देणार आहे.तर आता “लखपती दिदी योजना ” चर्चेचा विषय आहे नुकताच या योजनेचा कार्यक्रम जळगाव येथे पंतप्रधान ‘ नरेंद्र मोदी ‘उपस्थितीत पार पाडण्यात आला आहे तर या योजने संदर्भात केंद्र शासनाची उद्देश काय आहे ह्या योजने पासून कोणाला फायदा होणार आहे या योजनेची पाञता काय इतर सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत. Yojana In Marathi

स्ञीयांना मान सन्मान भारत देशात मिळतो महाराष्ट्र राज्यातील महत्वाकांक्षी सरकार नेहमीच महिलांसाठी विविध योजना राबवत आसते महाराष्ट्रातील मुलीसाठी आसो वा इतर स्ञीयांसाठी मोठ्या प्रमाणात आहेत तर आता लखपती दीदी योजना महाराष्ट्रातील महिलांनाषम एक संधी आहे त्याच सोन नक्कीच केल पाहीजे प्रत्येक क्षेत्रात स्ञीया अग्रेसर आहे पण ग्रामीण भागात गावा खेड्यात राहणार्या स्ञीयांना व्यवस्थीत माहिती किंवा पूढाकाराने संधी उपलब्ध होत नाही त्याही त्याच्या आयुष्यात बद्दल घडु इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही योजना खुप महत्वाची आहे.

मोदी सरकारने सुरु केलेली ही योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबुत बनविणे व त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठीची आर्थिक अडचण दुर करणे व स्वावलंबी बनवणे व त्यांना पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक साह्य दिल जाणार आहे. स्ञीयांना सक्षम बनविण्यासाठी चालना देणारी ही केंद्र सरकारची महत्वाकाक्षी योजना आहे.केंद्र सरकारने प्रथम ही योजना 23 डिसेंबर 2023 रोजी राजस्थान मध्ये सुरु करण्यात आली. राजस्थान मध्ये सुरवातीला योजना राबवण्यात आली 11.24 लाख स्ञीयांना लाभ मिळवून देण्याच राज्यस्थान सरकारच उद्दिष्ट आहे.

या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट हे आर्थिक दृष्ट्या मागास स्ञीया ज्यांच वय आठरा ते पन्नास वर्षां पर्यंत आहे त्यांना सक्षम बनविण्यासाठी व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र शासन पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भारतातील ग्रामीण भागातील स्ञीयांना जास्त जास्त लाभ देऊन प्रोत्साहित करणे .योजनेत लाभार्थ्यी स्ञीयांना कर्ज उपलब्ध करुन देणे आणि कर्जाचे वाटप करणे या दरम्यान कार्यक्रम आयोजित करणे जेणेकरुन इतर पाञ कमी उत्पन्न आसणार्‍या स्ञीयांना या योजनेच महत्व कळावे.

ही योजना ग्रामीण भागातील बचत गटाला जोडलेल्य स्ञीयांना जास्त प्रमाणात प्राधान्य आहे या योजने अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी योग्य माहिती आर्थिक स्वरूपात किंवा व्यवसायाशी निगडीत माहिती प्रधान करुन कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यानुसार कर्ज देऊन एक सक्षम आणि आर्थिक दृष्ट्या मजबुत बनवण्याचा सरकारचा उद्दिष्ट आहे.आणि तीन कोटी महिला लखपती बनवण्याच नरेंद्र मोदी यांच उद्दिष्ट आहे.महाराष्ट्र राज्यातील पन्नास लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला आहे.स्ञीयांना कोणतीही जबाबदारी दिली तर ते यशस्वी रित्या पार पाडू शकतात त्याच कर्तव्य हे खुप मोठ आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खुप चर्चेत आहे या योजने अंतर्गत महिलांन मिळणारे पंधराशे रुपये त्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात पण झाली आहे त्यामध्ये दोन महिन्यचे तीन हजार रुपये रक्षाबंधन पर्यंत जमा झाले आहे तर आता लखपती दिदी योजने ची चर्चा नुकताच जळगाव मध्ये पार पाडलेल्या प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या योजनेचा कार्यक्रम पार पाडल्यापासुन महाराष्ट्र राज्यात या योजनेची चर्चा होत आहे तर आपण बघुया ” लखपती दिदी योजना ” म्हणजे नेमकी काय आहे

योजनेची सुरुवात कधी झाली.

लखपती दिदी योजनेची सुरुवात प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना या योजनेची सुरवात केली आहे. या योजने अंतर्गत स्ञीयाना स्वतःच्या पायावर उभा टाकता आल पाहीजे त्यांना सक्षम बनविले पाहीजे व त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून कर्ज मिळणार आहे या योजनेअंतर्गत त्यांना स्वयंरोजगारा साठी बिनव्याजी एक ते पाच (1 ते 5 लाख) कर्ज दिले जाणार. आर्थिक दृष्ट्या कमकुवत आसणार्‍या स्ञीयांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार ने ही योजना राबवली आहे.

योजना काय आहे .

लखपती दीदी योजना म्हणजे महिलांना स्वयंरोजगाराशी जोडणे व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणे या योजनेअंतर्गत त्यांना व्यवसाय एक ते पाच लाख रुपयापर्यंत आर्थिक साह्य बिनव्याजी दिल जात.

स्ञीयामध्ये स्वयं रोजगाराची निर्मिती व्हावी उद्योग क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढावा आर्थिक दृष्ट्या मजबुत व सक्षम व्हाव्या त्यांना व्यवसाय करण्याची एक संधी मिळावी त्याची आर्थिक अडचण दुर व्हावी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी चालना मिळावी हा उद्देश ठेवुन केंद्र सरकारने ह्या योजनेची सुरवात केली आहे.

या योजनेचा उद्देश काय आहे.

  • स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे
  • लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना आत्मनिर्भर बनविणे,आर्थिक दृष्ट्या मजबुत करणे.
  • स्ञीयांचा सामाजिक व आर्थिक दर्जा उंचावणे.
  • ग्रामीण भागातील गावातील स्ञीयांना प्रोत्साहन देणे.
  • उद्योग क्षेत्रात एक संधी उपलब्ध करून देणे.
  • स्ञीयांचे आर्थिक उत्पन्न वाढावे व स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी.

या साठी त्यांना बिनव्याजी पाच लाखापर्यंत कर्ज सुद्ध उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

या योजनेअंतर्गत होणारे फायदे.

  • स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.त्यामुळे व्याज भरण्याची समस्या उद्भवणार नाही.
  • स्ञीयांना त्याच्या व्यवसाय करण्यासाठी योग्य रित्या संबधीत व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे.
  • स्ञीयांना संबधीत स्वयं सहाय्य गटात जोडुन एकमेकांना पाठींबा देऊन व्यवसायात एकमेकांना साह्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
  • महिलांना कुठे तरी एक संधी उपलब्ध होणार आहे याने स्वतःचा व्यवसाय उद्योग करुण स्वतःचा पायावर उभा राहता येईल.

या योजने अंतर्गत साह्य केले जाणार मार्गदर्शन, माहिती देऊन व्यवसाय करून स्वता स्ञीया सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारकडून ही महत्वाकाक्षी योजना राबवली जात आहे. जास्तीत जास्त ग्रामीण भागातील स्ञीयांना जफायदा व्हावा यासाठी भर दिला जातो.

या योजनेची पाञता काय आहे.

लखपौई दिदी योजनेची पाञता ही पुढिल प्रमाणे आहे.पण काही प्रमाणात वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या प्रकारे पाञतेचे निकष वेगळ असतील.तरी आपण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केले आहे.

  1. भारत देशातील कोणतीही महिला या योजनेसाठी अर्ज करु शकते.
  2. या योजनेसाठी फक्त महिलांच अर्ज करु शकतात.
  3. लाभार्थी स्ञी ही संबंधित राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  4. लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 तीन लाखां रुपायापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  5. स्ञीयांचे वय हे 18 वर्ष ते 50 वर्षापर्यंत आसावे.
  6. या योजनेसाठी अर्ज करणारी लाभार्थी महिला बचत गटाशी संबधीत असणे आवश्यक आहे
  7. अर्जदाराच्या घरातील व्यक्ती कोणतीही शासकीय नोकरदार नसावा.

या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांकडे खालील प्रमाणे कागदपञे आणणे आवश्यक आहे.

  • ओळख पुरावा आधार कार्ड.
  • उत्पन्न दाखला प्रमाणपत्र.
  • पॅन कार्ड.
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • स्वतःचा मोबाईल क्रमाांक.

अर्ज करण्यासाठी इत्यादी महत्वपूर्ण दस्तऐवज असणे आवश्यकता आहे.

लखपती दीदी योजने साठी अर्ज करण्यासाठी केंद्र शासनाच्या आधिकृत वेबसाईटवर जाऊन सविस्तर अशी माहिती मिळवु शकता. lakhpatididi.gov.in

लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

  • तुम्ही दिलेली सर्व माहिती योग्य व बरोबर आसल्याची खाञी करा.
  • रहिवशी प्रमाणपत्र, आधार कार्ड ,बँक पासबुक, राशन कार्ड ,उत्पन्न दाखला, मोबाईल इत्यादी माहिती व्यवस्थित व जमा ठेवा झेरॉक्स तयार ठेवा.
  • बचत गटाचा सदस्य आसणे आवश्यक आहे नसाल तर सदस्य व्हा गटात सामील व्हा.
  • या गटामार्फत आपल्याला योजनाची माहिती मिळते.
  • ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीत भेट द्या आणि सविस्तर माहिती मिळेल.
  • आवश्यक माहिती व अर्ज करण्याची पध्दत व कुठे करायचा याची सविस्तर माहिती घ्या.

या योजने संदर्भात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपण इतर काही माहिती हवी आसल्यास गावातील ग्रामपंचायत किंवा इतर शासकीय ठिकाणी माहिती मिळवू शकता आणि योग्य माहिती ही आपल्याला ऑनलाईन सोशल मीडियावर किंवा युट्यूब वर मिळेल सविस्तर माहिती घेऊन या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता.सविस्तर अशी माहिती घेऊन या शासनाच्या योजनेचा लाभ घ्या इतर काही महिलांसाठी योजना आहे त्या योजना पण आहे ही जी योजना आहे आपल्याला व्यवसाय प्रारंभ करण्यास योग्य ती सविस्तर माहिती व मार्गदर्शन शासनाचे कौशल्य प्रशिक्षण देणार आणि महिलांना कर्ज सूद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील महिलांसठी विविध महत्वपूर्ण योजना आहेत यावर क्लिक करुन पाहु शकता.

आपण आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायास सुरवात करु शकता आणि एक नविन सुरवात करुन महिला आपल्या आयुष्याला नविन दिशा मिळणार आपल्या पायावर उभा राहण्यासाठी सक्षम करणे यासाठी आहे योग्य मार्गदर्शन घेऊन या योजनेचा नक्की लाभ ध्या शासनाची आधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे.