Maharashtra Government Pension Scheme
Maharashtra Government Pension Scheme महाराष्ट्र शासन पेन्शन योजना महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून चालविल्या जाणाऱ्या तीन योजना बद्दल जाणुन घेऊया.
नमस्कार आज आपण महाराष्ट्र सरकार ज्या काही पेन्शन योजना राबवत आहे त्यातील काही महत्वाच्या पेन्शन योजनेची माहिती यात आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकार नेहमी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात यशस्वी सरकार आहे . महिला सशक्तीकरण साठी विविध प्रकारच्या योजना राबवत आसते . मुलीसाठी त्याच्या भविष्या साठी सरकार सज्ज आहे ‘ लेक लाडकी योजना ‘ , ‘सुकन्या समृद्धी योजना ‘ यासारख्या अनेक योजना सरकर राबवत असते. कृषी संदर्भात विविध योजना, शैक्षणिक संदर्भातील योजना इत्यादी संदर्भातील अनेक योजना महाराष्ट्र शासना मार्फत राबवल्या जातात. महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी आज महाराष्ट्र सरकार मार्फत राबवल्या जाणार्या पेन्शन योजनेंतर्गत माहिती पाहणार आहोत.
अनेक योजना हे महाराष्ट्र शासन विविध जिल्ह्यामध्ये स्थानिक गरजा पाहुन वेगवेगळ्या विशिष्ट स्वरुपाच्या योजना राबवत आसतात या योजनेमधून शैक्षणिक साहाय्य, व्यावसायिक प्रशिक्षण, स्वयंरोजगार इत्यादी पद्धतीत अनेक योजना राज्य शासनाकडून राबवल्या जातात.
महाराष्ट्र राज्य शासन मार्फत ज्या काही महत्त्वपूर्ण योजना चालत आहे त्या पाहणार आहोत यात महाराष्ट्र सरकार शासनाकडून विधवा, परितक्त, असाध्य रोगग्रस्त, अपंग आणि वृद्ध नागरिकांना या सर्वांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना मार्फत लाभ मिळत आहेत तर गरजू ,गरीब महीला , दिव्यांग बांधव व जेष्ठ नागरिकांना या योजनांचा लाभ मिळणार आहे तर तसेच इतर ही काही पेन्शन योजना आहेत त्या आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा कसा अर्ज करायचा, या योजनांचा लाभ काय आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपञे आवश्यक आहे ही सर्व माहिती आज पाहुया यासाठी पुर्ण लेख व्यवस्थित वाचा आणि या योजनांचा लाभ घ्या.
• महाराष्ट्र राज्यातील पेन्शन योजना पुढील प्रमाणे आहेत.
महाराष्ट्र शासन मार्फत राबवल्या जाणार्या योजना ह्या महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी तर केंद्र शासना मार्फत राबवल्या जाणार्या योजनांचा लाभ देशातील सर्व नागरिकांसाठी आहे तर त्या कोणकोणत्या योजना आहेत ते पुढील प्रमाणे पाहुया.
1] श्रावणबाळ योजना –
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची ही पेन्शन योजना आहे. श्रावणबाळ योजने अंतर्गत, महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे यात महाराष्ट्र राज्यातील निराधार नागरीकांना प्रति महिना ₹ 1500/- पेन्शन दिली जाते. केवळ महाराष्ट्र राज्यातील कायमचे रहिवासी असणारे नागरिकच या योजने अंतर्गत लाभ मिळवु शकतात आणि लाभासाठी अर्ज करु शकतात. ही योजना शंभर टक्के महाराष्ट्र शासनाकडून महत्वाची योजना आहे.
–श्रावणबाळ योजनेची पाञता-
- या योजने अंतर्गत व्यक्तीचे वय 65 ते त्याषेक्षा आधिक आसावे.
- सदर व्यक्तीच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2100 च्या आतील आसावे.
– श्रावणबाळ योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड/ओळखीचा पुरावा.
- रेशनकार्ड झेरॉक्स.
- मतदान ओळखपत्र.
- रहिवाशी प्रमाणपत्र ( तलाठी रहीवाशी दाखला).
- उत्पन्न दाखला ( तहसीलदार/तलाठी उत्पन्न दाखला 21000 आतील पाहीजे )
- वयाची अट ही 65 वर्षापेक्षा आधिक.
- बँक पासबुक.
- अर्जदार व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो.
2] इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना –
ही योजना गरीब कुटुंबातील 40 ते 65 वर्षांच्या वयो गटातील विधवा महिलांसाठी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश विधवा महिलांना आर्थिक मदत करणे व त्यांना जीवनमान सोयीस्कर व्यवस्थित साह्य होणार आहे. या योजने अंतर्गत महिलांन दर महिना मासिक पेन्शन दिली जाते त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. आर्थिक दृष्ट सक्षम करण्यासाठी साहाय्य करते.
– इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेची पाञता.
- अर्ज करणारी फक्त महिला आसावी.
- दारिद्र् रेषेखालील कुटुंबातीला महिला आसावी.
- महिलेचे वय हे 40 ते 65 वर्षा दरम्यान आसावे.
- ती महिला विधवा आसावी.
– इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी आवश्यक कागदपञे-
- आधारकार्ड / ओळखीचा पुरावा.
- मतदान ओळखपत्र .
- तलाठी रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- ग्रामसेवक दारिद्रय़रेषा खाली असलेला यादी पुरावा.
- लाभार्थी नागरिकाचे वय हे 40 ते 79 वर्षे दरम्यान हवे.
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो.
3] इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना – Scheme
ही योजना केंद्र शासना मार्फत राबवल जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील वृद्ध व्यक्तींना आर्थिक मदत प्रदान केली जाते या योजनेचा उद्देश हा 60 वर्षापेक्षा आधिक वय आसलेल्या व्यक्तींना दर महिना निश्चित पेशन्स दिली जाते.राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेही म्हणतात. या योजनेतुन वृद्ध नागरिकांन एक आर्थिक मदत प्रदान केली जाते.
– इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेची पाञता-
- संबधीत अर्जदाराचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा आधिक आसावे.
- शासनाने दिलेल्या प्रमाणे अर्ज दार हा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
- अर्जदार निराधार आसणे आवश्यक आहे त्याच्याकडे कुटुंबातील व्यक्ती सदस्य किंवा इतर कोणताही स्रोत नसावा
- या योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील विधवा महिला किंवा पुरुष 69 व 79 वयोगटातील अपंगत्व किंवा वृद्ध व्यक्ती या योजनेसाठी पाञ आहे.
-इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-
- इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा अर्ज.
- वयाचा पुरावा ओळखपत्र.
- उत्पनाचे प्रमाणपत्र.
- अर्जदाराचे दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र.
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो.
शासना मार्फत चालविण्यात येणार्या कोणत्याही योजना आसो केंद्र शासनाची आसो वा राज्य शासनाची योजना या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या जवळच्या तालुका तहसिल कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊ शकता.योजनांची नियम आणि अटी मध्ये बदल करण्यात येतात त्यामुळे आपल्याला सविस्तर माहिती घेणे गरजेच आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा केंद्र शासनाची योजना असेल तर केंद्र शासनाच्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आधिक माहिती मिळेल.
शासनाच्य विविध योजने संदर्भात आपण आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयात जाऊन विचारपूस करुन शकता आणि महत्वपूर्ण माहिती मिळवु शकता जेणेकरून एखादी योजनेची माहिती अटि व नियम , पाञता ,कागदपञे काही बदलल्यास त्वरीत कळेल व शासनाच्य योजनेसाठी अर्ज करणे सोयीस्कर होईल जेणेकरून आपल्याला योजनेचा लाभ घेता येईल.तसेच योजनांची माहिती होईल इतरांना सांगता येईल कोणीही पाञ व्यक्ती शासकीय योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार नाही.
महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या योजना खुप आहे पण आपण प्रत्येक योजनेची स्वातंत्र्य माहिती देणार आहोत आणि स्वातंत्र्य लेख लिहून आपल्यापर्यंत थोडक्यात माहिती नसुन परिपूर सविस्तर माहिती नक्क पोहचवू तर ग्रामीण भागात वास्तव करणार्या नागरीकांना महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडून चालविण्यात येणार्या योजनेची सविस्तर माहीती नसते त्याने योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात तर आपण सदर योग्य तीच माहिती आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील लेखात व्यवस्थित प्रत्येक योजनेची स्वातंत्र्य माहिती उपलब्ध करुन देणार आहोत.
या दिसलेल्या योजना किवा इतर काह महत्वाच्या योजना याबद्दल सविस्तर माहिती आपण सोशल मीडियावर किवा युट्यूब वर व अन्य ठिकानी उपलब्ध आहे त्यानुसार योग्य माहिती मिळवु शकता पण महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडून चालविण्यात येणारी कोणतीही योजना आसो या संदर्भात योग्य अशी माहिती आपल्या वेबसाईटवर देण्याचा एक प्रयत्न करत आहोत शासना मार्फत चालविण्यात येणार्या योजनाचा लाभ घेण्यापासून कोणी वंचित राहु नये.
पुढिल लेखात शासनाच्या विविध महत्वपूर्ण योजनेची स्वातंत्र्य माहिती घेऊन सविस्तर असा लेख जेणे समजण्यात सोयीस्कर होईल तर शासनाच्या योजनेची आधिक माहिती हवी असल्यास आमच्या वेबसाईटवर अपडेट राहा आणि आमच्या युट्यूब चॅनल ला सबक्राईब करा योजनाची माहिती शासन जी आर यासंदर्भात आपल्या वेबसाईटवर योग्य आणि सविस्तर माहिती दिली जाते योजनांची माहिती घ्या आणि पाञ नागरीक, महिलांनी लाभ घ्या.