Maharashtra shetkari News
Maharashtra shetkari News महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यासाठी काही महत्वपूर्ण योजनेविषयी निर्णय घेण्यात आले आहे पहा संपुर्ण माहिती.
महाराष्ट्र राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकरी हितासाठी महत्वपूर्ण योजना त्या योजना संदर्भात अनुदान याबद्दल काही शासन निर्णय घेण्यात आले आहे शासन निर्णयानुसार निधी किती आहे कोणत्या योजना अनुदानातील आहे त्यात किती वाढ केली आहे याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत लगेच महाराष्ट्र राज्य शासनाने विधानसभा निवडणुक आधीच निर्णय घेण्यात आले आहेत.Maharashtra shetkari News
विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंञी अजित पवार उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर योजना अनुदान या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत तर शेतकर्यांसाठी निघालेल्या काही योजनेचे निर्णय जे आहेत त्याचा कोणाला फायदा आहे ते बघुया. 2024 -25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला आहे. यामध्ये कोणाला फायदा होणार आहे ते बघुया. तर बघा पुढील प्रमाणे.
मागेल त्याला सौर ऊर्जा पंप शेतकर्यांना दिवसा अखंडित विजय पुरवठा करण्यासाठी सौर उर्जीकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पाअंतर्गत एकुण 8 लाख 50 हजार शेतकर्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शेतकर्यांना 8 लाख 50 हजार जे काही सौर ऊर्जा पंप आहेत ते उपलब्ध करून देण्यात येतील. खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यामध्ये दुष्काळ तर 1 हजार 21 महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नुकसानीचे जे काही पंचनामे आहेत ते जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागु करण्याचे आदेश दिले आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकुण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबाना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान शेतकर्यांना देण्यात येणार आहे. गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सामुग्री अनुदान या योजने अंतर्गत 2 हजार 694 शेतकरी कुटुंबाना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पिक कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना 14 लाख 33 हजार शेतकर्यांना प्रोत्साहन पर रक्कम म्हणून 5 हजार 190 कोटी रुपये दिले आहेत आणि उर्वरित रकमेचे वाटप सूद्धा त्वरित करण्यात येणार आहे. खुप शेतकरी कर्जाच परतफेड योग्य वेळेत करतात त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे त्यामध्ये 6 हजार कोटी रुपयांचा जो दुसरा टप्पा आहे तो 21 जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पा अंतर्गत 1 हजार 561 कोटी 64 लाख रुपये किमतीच 64 लाख रुपये किमतीच्या 767 उप प्रकल्प आहे त्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. आणि सुमारे 9 लाख शेतकर्यांना यामध्ये लाभ मिळणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक आहेत ते 11 लाख 85 हजार शेतकरी लाभार्थ्यांना मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोक रक्कम अदा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रीकिकरण या योजने अंतर्गत गेल्या 3 वर्षात 2 लाख 14 हजार शेती उपकरणाच्या खरेदीसाठी 1 हजार 239 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.
कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना ज्यामध्ये सन. 2024-25 मध्ये 341 रुपये कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. नोंदणीकृत 2 लाख 93 हजार दुध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपयाप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे आणि जे राहिलेल्या अनुदान आहे तेही त्वरित वितरित करण्यात येणार आहेत. दुध उत्पादक शेतकर्यांना आधार देण्याकरिता प्रति लीटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची जी योजना आहे ती जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे. Maharashtra shetkari News
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प करण्यात येणार आहेत. शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प येणार आहेत. मत्स्य बाजार स्थापना तसेच मासिक विक्री सुविधांसाठी 50 रुपये कोटी निधी वितरित होणार आहे. स्वच्छ व हरित उर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाइ शिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनेचे सौर ऊर्जीकरण 4 हजार 200 कोटी रुपये खर्च होणार आहे.Maharashtra shetkari News
वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यातील 3 लाख 71 हजार 277 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ आहे तो यामध्ये करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुद्धा यामध्ये करण्यात आली आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत एकुण 338 जलाशयातून 83 लाख 39 हजार 818 घनमीटर हा गाळ काढण्यात आला आहे. सहा हजार शेतकर्यांना यामध्ये लाभ मिळालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नूकसानीपोटी जुलै 2024 पासून 15 हजार 245 कोटी 76 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. नोव्हेंबर- डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेले जे शेतकरी आहेत त्यांना 24 लाख 47 हजार शेतकर्यांना 2 हजार 253 कोटी रुपयांची मदत केली आहे. Maharashtra shetkari News
नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोन एवजी तिने हेक्टर करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकशापेक्षा अधिक दराने जी मदत आहे तिने मदत जास्त देण्यात येणार आहे. अशा प्रकारे या महत्त्वाच्या काही योजना होत्या. अर्थसंकल्पीय निर्णय होते ते आपण बघितले आहेत.
वरील माहिती थोडक्यात पण योग्य व अचुक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपण महाराष्ट्र सरकार च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन इतर माहिती मिळवु शकता या लेखात फक्त थोडक्यातच माहिती दिलेली आहे सविस्तर अशी अनुदान किंवा योजनेबद्दल माहिती नाही तरी अधिक माहिती शासनाच्या अधिकृत कार्यालयात किंवा सोशल मीडिया पेजवर जाऊन घेऊ शकता.
महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकरी हितासाठी विविध योजना अंमलबजावणीत अग्रेसर आहे महाडीबीटी मार्फत विविध शेती उपयोगी यंञ सामग्री घेण्यासाठी विशेष अनुदान योजना एखादी शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे.अन्य काही योजना त्या योजनाबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील लेखात पाहणार आहोत अर्ज कसा करायचा कोणती कागपञे लागणार आहेत योजनाबद्दल सविस्तर अशी माहिती पुढील लेखात पाहणार आहोत. शेती विषयक सर्व योजना अनुदान याबद्दल सर्व माहिती आपण आपल्या वेबसाईटवर बघत आसतो इतर काही शेती विषयक योजनाबद्दल आसणारी माहिती योजना स्वातंत्र्य पाहुया पुढील लेखात.Maharashtra shetkari News
महाराष्ट्र शासनाच्या काही योजना व अनुदान याबद्दल सर्व सविस्तर माहीती आपल्या शासनामार्फत चालवल्या जाणार्या विविध योजना याबद्दल शासनाच्या अधिकृत साइटवर जीआर आसतात त्यात सविस्तर शासन निर्णयानुसार माहिती दिलेली आसते किंवा मोबाईलच्या साह्याने युट्यूब चा वापर करुन व्हिडीयो च्या माध्यमातून योग्य आणि सविस्तर माहिती मिळेल. आमच्या वेबसाईटवर आशाच्या शासनाच्या विविध योजना ,शैक्षणिक माहिती , महाराष्ट्रातील महत्वाच्या निर्णय याबद्दल जाणुन घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवर पाहत राहा. Maharashtra shetkari News