Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजने अंतर्गत मिळणार पाच लाखापर्यंत मोफत उपचार जाणुन घ्या सविस्तर.
महाराष्ट्र राज्य शासन हे जनहीतासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाणारी योजना आहे महाराष्ट्र गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी शासना मार्फत आरोग्य संबधीत काही योजना राबवण्यात येत आहे त्याच पैकी ही एक योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य ही योजना या आगोदर ही योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणुन ओळखली जात होती 2 जुलै 2012 रोजी राज्यातील फक्त आठ जिल्ह्यातुन ही योजना सुरु करण्यात आली होती आणि या नंतर 21 नोव्हेंबर 2013 पासून ती महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांमध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला होता.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच रुपांतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आल आहे महाराष्ट्र शासन हे महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील नागरीकांना एखादा आरोग्याशी संबधीत आजार झाला तर त्यांना त्या आजाराचा पैशा आभावी सोयीस्कर इलाज करणे शक्य होत नाही खाजगी दवाखाना परवडत नाही या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबातील नागरीकांना आरोग्यशी संबधीत आजाराचे निदान करता याव यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे या योजने अंतर्गत खाजगी दवाखान्यात सुद्धा आजारच निदान केल जात ते पण अगदी मोफत ते आजार कोणता आहे यावर आहे तर आपण आज या योजने संबधीत माहिती जाणुन घेऊया.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे काय आहे ( MJPJAY ) :
महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच रुपांतर या योजनेत करण्यात आल आहे . या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांसठी उपलब्ध आहे या योजने अंतर्गत अनेक प्रकारच्या गंभीर आजाराच मोफत उपचार केले जातात. या योजनेतुन लाभ आजारांवरील उपचार करण्यासाठी १.५ लकख रुपये पर्यंत मर्यादा होती आता ही मर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली आहे या योजनेचा महाराष्ट्र राज्यातील नागरीकांना फायदा होईल.
योजनेला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना RGJAY म्हणून 2017 पर्यंत ओळखलं जात होतं. पण यानंतर भाजपा शासनाने या योजनेचे नामकरण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे केलं. नवीन निर्णयानुसार आता या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नागरिकांना मिळणार आहेत. खरं बघितल तर आत्तापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य या योजने अंतर्गत दिड ते दोन लाख रुपयां पर्यंतचे मोफत उपचार दिले जात होते.पण यात वाढ केलेली आहे .
या योजने अंतर्गत अनेक प्रकारच्या गंभीर आजारांवर उपचार घेता येतात तसेच पाच लाखापर्यंत खर्च या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार आहे या आधीची रक्कम ही गंभीर प्रकारच्या आजारांवरील उपचार घेण्यासाठी पुरेशी नव्हती अस शासनाच्या निदर्शनास आल आणि या योजने अंतर्गत उपचार घेण्यासाठीची मर्यदा वाढवली जेणेकरून गंभीर आजावर उपचार करण्यास सोयीस्कर होईल व आजाराच निदान होईल कारण खुप नागरीकांना खर्चा आभावी उपचार घेत शक्य होत नाही म्हणुन शासनाने हा उपक्रम राबवला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना उद्दिष्टे :
- राज्यातील नागरीकांना चांगले व सोयीस्कर आरोग्य सुविधा मिळतील याची खात्री करणे हे MJPJAY चे उद्दिष्ट आहे.
- गरीब कुटुंबातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांतील नागरीकांना आजार रोगांवर उपचार करणे आणि वैद्यकीय सेवा प्रदान करणे त्यांचे उद्दिष्ट आहे.
- स्वस्त आरोग्य सेवा कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करुन महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी शस्त्रक्रिया आणि महत्त्वपूर्ण प्रक्रियां सारख्या वैद्यकीय उपचारांपर्यंत सेवा पोहोचविणे.
- या योजनेच उद्दिष्ट आर्थिक दृष्ट्या दुर्बल कमकुवत कुटुंबांना नागरीकांना विविध आजार त्या आजारांवर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सोयीस्कर उपचार उपलब्ध करून देणे व त्यांना जास्त दवाखान्यात होणाऱ्या खर्चापासुन बचाव करणे व या योजने अंतर्गत उपचार खर्चापासून वाचवणे आहे.
- गरीब व कमकुवत कुटुंबातील नागरीकांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे पाच लाखापर्यंत खर्च शासनाकडून देण्यात येणार आहे.
- गरीब कुटुंबातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबातील लोकांना प्रत्येकासाठी शस्त्रक्रिया आणि महत्त्वाच्या प्रक्रियेसारख्या विविध वैद्यकीय उपचारांमध्ये प्रवेश करणे सोपे होते.
- महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील नागरीकांना विविध प्रकारच्या आजारांवरील उपचार घेणे शक्य होईल खर्चा आभावी उपचार घेण्याची चिंता आसणार नाही शासन मर्यादे प्रमाणे खर्च भरून घेईल.
- महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील नागरीकांना आरोग्य विमा प्रदान करुन देणे.
- योजना आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठी सुरू झाली आहे. राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक नागरिकांना या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत घेता येणार आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनची पाञता :
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरीक हा कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचा रहिवास आसला पाहीजे.
- पांढरे/केशरी/पिवळे रेशन कार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड किंवा अन्नपूर्णा कार्ड धारण करावे.
- आर्थिक दृष्टय़ा कमकुवत कमजोर असलेल्या गरीब कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये पेक्षा कमी आसावे.
- महाराष्ट्र राज्यातील आपत्ती ग्रस्त आसलेले कुटुंब व त्यातील सदस्य या योजनेसाठी प्राञ आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेसाठी आवश्यक कागदपञे :Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana important Documents
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपञे पुढील प्रमाणे.
- ओळखीचा पुरावा आधार कार्ड
- बॅंकेचे पासबूक
- रेशन कार्ड
- दवाखान्यातील आजार संबधीत सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला पांढरा शिधापत्रिका आणि 7/12 उतारा
- आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सरकारने निर्धारित केलेले ओळखपत्र
- आपल्याकडे आसलेले राशनकार्ड पिवळ किंवा केशरी राशनकार्ड
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत योजने अंतर्गत जवळपास 1209 आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचे प्रावधान आहे. आतापर्यंत या योजने अंतर्गत 2 लाख पर्यंतचे उपचार मोफत केले जात होते मात्र आता या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयां पर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत. आता एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश केला आहे .
ग्रामीण भागात आसणार्या अनेक गरीब मागास कुटुंबांना आजारांवरील उपचाराचा खर्च न परवडल्यामुळे ते कर्जाच्या विळख्यात सापडतात. बऱ्यादा उपचारासाठी टाळाटाळ केल्याने निदान होणारे आजार बळावून दुर्धर व जास्त पिडादायक होतात एका दुर्धर आजारात त्याचे रूपांतर होते. हे टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने केशरी रेशनकार्ड, पिवळे रेशनकार्ड, पांढरे रेशनकार्ड धारक कुटूंब या योजनेच्या लाभासाठी पात्र केल आहे . याचबरोबर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका, अंत्योदय योजनेचे लाभधारक यांनाही ही महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना लागू आहे.
या योजने संदर्भात ऑनलाईन अर्ज कसे करावे लाभ कसा मिळेल यासाठीचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत मधील केंद्रचालक, सीएससी सेंटर,गावातील आशाताई, अंगिकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र तसेच सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथामिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र आदी सर्व शासकीय रुग्णालयात याबाबत मार्गदर्शन उपलब्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ही मोबाईल वापरुन सूद्धा आयुष्यमान ॲप डाऊनलोड करून त्यात आपल्या नावाची नोंदणी करता येईल.
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने ची आधिक माहिती घेण्यासाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राला भेट देऊ शकता किंवा महाराष्ट्र शासना मार्फत चालविण्यात येणारे या योजने अंतर्गत अधिकृत पोर्टलवर भेट देऊ शकता सोशल मीडियाचा वापर करुन सुद्धा आधिक माहिती मिळवु शकता महाराष्ट्र राज्य शासन या योजनेचा लाभ सर्वाना मिळावा यासाठी राज्यातील शासकीय रुग्णालयांसह शासनाने यासाठी काही खाजगी रुग्णालयांनाही यात समावेश केला आहे तशा प्रकारच्य सुविधा ही शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत कारण सर्वसामान्य नागरिकाल कोणत्याही आजारावर तात्काळ मोफत उपचार उपलब्ध व्हावेत खर्च लागेल यामुळे आजारच निदानापासुन दुर पळू नये सर्व सामान्याच उपचार व आजारांवरील निदान व्हावे यासाठीच साठी केंद्र व राज्य सरकारने एकत्रीत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही उपलब्ध करून दिली आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंञी जन आरोग्य योजना किंवा महात्मा ज्योतिराव फुले योजना या दोन्ही योजना एक केंद्र शासनाची आहे तर दुसरी महात्मा फुले योजना महाराष्ट्र शासनाची आहे या दोन्ही योजना एकञित केल्या दोन्ही पैकी कोणत्याही एका योजनेची पूर्तता असेल तरीही आपण योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात भेट द्या किवा ज्या खाजगी रुग्णालयाचा समावेश आहे अशा खाजगी रुग्णालयाला भेट दिल्यास तुम्हाला योग्य माहिती मिळेल या योजनेचा आवश्यक लाभ घ्या.
आमच्या वेबसाईट च्या माध्यमातून वेळोवेळी महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र शासनाकडून चालवल्या जाणार्या विविध योजना कृषी ,आरोग्य व इतरही माहिती प्रदान करुण देण्याचा प्रयत्न अजुन माहिती देण्याचा प्रयत्न करतो कारण शासनाच्या योजनेपासून कोणी वंचित राहु नये सर्वाना लाभ मिळावा यासाठी आज आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबद्दल माहिती बघितली आहे.आधीक माहितीसाठी जवळच्या संबधीत शासकीय कार्यालयाला भेट द्या आणि मोफत या योजनेचा लाभ घ्या.