Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारकडून २०२४ च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली आहे, त्यापैकीच एक म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही एक आहे.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महिलांना आर्थिक सहयोग मिळावा म्हनुण महाराष्ट्र सरकारने आर्थिक स्वरूपात महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक विशेष योजना सुरू करते. या योजनेच्या अंतर्गत हर साल 46,000 कोटी रुपये खर्च केले जातात, एकत्र राज्याची 21 ते 65 वर्षांची महिलांना प्रत्येक महिने आर्थिक मदत प्रदान केली जाते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने लागू करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या बँकेत जमा होणार आहेत. एक आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु करण्यात आली आहे.
उपमुख्यमंञी अजित पवार यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यायोजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा १५०० दिले जाणार आहेते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात नविन बदल करण्यात आले आहेत.
१] सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळयात आली आहे.
२] योजनेत लाभार्थी महिलांचे पाञता वय हे 21 ते 60 वर्ष होते पण आता वयोगट ऐवजी 21 ते65 वर्ष करण्यातआले आहे.
३] इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत यांच्या पतीचे ,जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
४] मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची शेवटची मुदत १५ जुलै ठेवण्यात आली होती. नंतर मुदतवाढ देण्यात आली आहे, १ जुलै ते ३१ ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करु शकतो,दोन महिन्यांची मुदतवाढ आहे.
५] 2.5 लाख रुपयांचा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रतून सुट आहे.
६] मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कुटुंबातील महिला पाञ असणारी अविवाहित असेल तरी सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
७] मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.असे नमूद करण्यात आले होते पण आता आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीच चे ,रेशन कार्ड, मतदार ओळखपञ,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ,जन्म दाखला . या चारपैकी कोणतेही ओळखपञ म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
माझी लाडकी बहिण योजना Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अंतर्गत आता जेवढे फॉर्म तुम्हाला भरता येतील तेवढे फॉर्म भरून घ्या, १५ जुलै नंतर १५०० रुपये लगेच जमा करण्यात येणार आहे अशी अपडेट आहे. आणि थोड्या दिवसात नवीन वेबसाईट पोर्टल सुद्धा येणार आहे त्यामुळे काही दिवसांनी फॉर्म भरायच्या तीन पद्धती असतील पहिली पद्धत, नारीशक्ती दूत, ॲप मध्ये दुसरी पद्धत वेबसाईट पोर्टलवर आणि तिसरी पद्धत ऑफलाईन अंगणवाडी सेविकाकडे जाऊन अर्ज करु शकता.तुम्ही ३१ ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरू शकता, तुम्ही शेवटी ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला ऑगस्टपर्यंतचे दोन्ही हप्ते मिळणार आहेत, असे सरकार ने सांगितले आहे.
योजनेचा फॉर्म हा ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत येथे भरता येणार आहे.फॉर्म भरण्याची सुरवात 0१ जुलै २०२४ पासून, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे.या योजनेसाठी पात्र असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील सर्व महिलांनी याचा लाभ मिळेल .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana फॉर्म कसा भरायचा, आज पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया. Narishakti Doot नारी शक्ती दूत अॅप इन्स्टॉल करा.
१] प्ले स्टोअरला भेट द्या.
२]नारी शक्ती दूत अॅपचा लोगो शोधा आणि डाऊनलोड करा.
३]इन्स्टॉल झाल्यावर अॅप उघडा.
४] स्क्रीनच्या डाव्या बाजूला स्किप पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा मोबाईल नंबर टाका.
५] अटी स्वीकृत अॅक्सेप्ट पर्यायावर क्लिक करा आणि नंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.
६]ओटीपी सत्यापित करा: मोबाईलवर आलेला ओटीपी टाका आणि सत्यापित करा.
७] वैयक्तिक माहिती भरा प्रोफाइल पर्यायावर क्लिक करा. ~१} पूर्ण नाव टाका २} ईमेल आयडी ३} जिल्हा – परिसर ४} अर्जदाराचा फोन नंबर ५} अर्जदाराचे लिंग निवडा. ६} अर्जदारीची जन्म तारीख निवडा ७} मुलीचे जन्मस्थान आणि जिल्हा निवडा ८} पैसे मिळत आहेत का ? जर पैसे मिळत असतील तर रक्कम टाका.९} वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती निवडा (अविवाहित, विवाहित, विधवा).
कागदपञे अपलोड करा. १} आधार कार्ड: आधार कार्डाच्या दोन्ही बाजू अपलोड करा. २} डोमिसाइल प्रमाणपत्र जर नसल्यास, जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, किंवा 15 वर्ष जुना रेशन कार्ड अपलोड करा.३} आय प्रमाणपत्र नसल्यास, पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करा.४} बँक पासबुक हा ऐच्छिक आहे, पण हवे असल्यास अपलोड करा.५} लाइव फोटो पर्यायावर क्लिक करा (पासपोर्ट फोटो अपलोड करू नका).६}अधिसूचना स्वीकृत करा ,आधार कार्ड अधिसूचना स्वीकृत करा.
सर्व माहिती तपासा आणि सर्व तपशील दस्तऐवज तपासा.फॉर्म सबमिट करा आणि फॉर्म सबमिट पर्यायावर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका आणि सत्यापित करा.तुम्हाला पुष्टीकरण कोड दिसेल आणि तुमचा अर्ज स्थिती प्रलंबित असेल.अर्ज स्थिती “नारी शक्ती दूत” अॅपमध्ये अर्जाच्या स्थितीची माहिती मिळवा.
वरील प्रमाणे नारी शक्ती दूत अॅप मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरु शकता.