Mukhyamantri Vayoshri yojana maharashtra
Mukhyamantri Vayoshri yojana maharashtra मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेची पाञता ही योजना कोणासाठी या विषयी सविस्तर अशी माहिती पुढिल प्रमाणे आहे.
थोड्याच दिवसा आगोदर महाराष्ट्र सरकार ने राज्यातील महिलांसाठी “लाडकी बहिण योजना” सुरु केली आहे या योजने अंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रती महिना मिळणार. राज्यातील तरुणांसाठी तर मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजने अंतर्गत ” लाडका भाऊ योजना ” योजना सुरू केली आहे त्या योजने अंतर्गत तरुणांना १० हजार रुपये प्रती महिना मिळणार आहेत.आता राज्य सरकार ने राज्यातील जेष्ठ नागरिकां साठी एक योजना सुरु करण्यात आली आहे जेष्ठ नागरिकांना साठी आता ” मुख्यमंत्री वयोश्री योजना ” या अंतर्गत ३ हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व,अशक्तपणा, कमजोर पणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता व तसेच मनःस्वाथ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी , द्वारे त्याांचे मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो. सदर बाब विचारात घेवून केंद्र शासनाने दारिद्रय रेर्षेखालील या सर्व बाबी संबधीत दिव्यांग /दुबलताग्रस्थ ज्येष्ठ नागररकासाठी शारिरीक अक्षमतेनुसार आर्थिक सहाय्य साधने/उपकरणे पुरवण्यासाठी ” मुख्यमंत्री वयोश्री योजना “सुरु केली आहे.Mukhyamantri Vayoshri yojana
त्या योजनेअंतर्गत अशा ज्येष्ठ नागरिकांना च्या सक्रीय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता, संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे, यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनःस्वाथ केंद्र ,योगोपचार केंद्र इ. द्वारे त्याांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे आबाधित ठेवून कौटुंबिक स्वास्थ्य चांगले सुरक्षित ठेवून वय प्रमाणे यानुसार एक अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र शासना च्या योजनेच्या धर्तीवर राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचारात आणली होती.
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत लाभार्थ्यांची पात्रता :
१} सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांचे वय दिनांक.३१ डिसेंबर २०२३ च्या अखेर पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण असावे असे नागरीक पाञ समजण्यात येतील या योजनेअंतर्गत.
२} ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्ष किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे त्या नागरिकांचे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. किंवा त्या व्यक्ती कडे आधार कार्ड काढण्यासाठी अर्ज केलेला असावा किंवा आधार कार्ड काढलेले नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर या योजनेसाठी लाभार्थी व्यक्ती कडे आधार कार्ड नसेल तर इतर स्वतंत्र ओळख कागदपञे असतील, तर ते कागपञे ओळख त्या व्यक्ती ची ओळख पटवण्यासाठी असेल.
३} लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमा अंतर्गत इंदिरा गाांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजनेंतर्गत किंवा राज्य/केंद्रशासित सरकारच्याच इतर कोणत्याही पेन्शन योजनेंतर्गत वृद्धापकाळ निवृत्त वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो.
४} लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.२ लाखाच्या आत असावे.या बाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापञ सादर करणे आवश्यक आहे.
५} सदर लाभार्थी व्यक्तीने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांचे व सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांर्तगत कोणत्याही शासकीय योजनाच्या स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. या बाबतचे लाभार्थ्याने सदर व्यक्तीचे स्वयंघोषणा पञ सादर करणे आवश्यक आहे.
पात्र लाभार्थी व्यक्तीच्या बँकेत त्याच्या वैयक्तीक आधार कार्ड लिंक असलेल्या बचत खात्यात रु.३०००/- लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर सदर योजने अंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वाथ केंद्राव्दारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत संबधीत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण याांच्याकडून प्रमाणित करुन संबधित केंद्रीय सामाजिकउपक्रम (CPSU) संस्थेमार्फत विकास पोर्टलवर ३० दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यातील, एकुण लाभार्थ्यांच्या सांख्येपैकी ३० टक्के महिला असतील.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत महिलांन प्राधान्य दिले आहे जिल्ह्य़ातील एकुण लाभार्थ्यांपैकी तीस टक्के जेष्ठ लाभार्थी महिला आसतील व ही योजना आर्थिक दुर्बल कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती साठी खुप मोठा लाभ आहे उतार वयात नागरिकांच शरीरात काही न काही समस्या असतातच त्या समस्यांवर मात करण्यासाठी त्यांना अडचण येऊ नये म्हणून या योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजने विषयी थोडक्यात महत्वपूर्ण बाबी :
महाराष्ट्रातील जेष्ठ नागरीक वय ६५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वय आसलेले ज्येष्ठ नागरिक त्यांच्या दैनंदिन जीवनात सहकार्य मदत करण्यासाठी आवश्यक साधने व उपक्रम उपलब्ध करुन देणे
.अपंगत्व आणि अशक्तपणावर,कमजोरी उपाययोजना करणे.मानसिक स्वास्थ्य केंद्रे, योग उपचार केंद्रे इत्यादींमध्ये मदत करणे.आर्थिक सहाय्य शारीरिक कमतरता पुर्ण करण्यासाठी पायाभूत साधने व उपकरणे खरेदी करण्याची सुविधा देण्यात येत आहे .नियंत्रण होल्डिंग, निब्रेट लकबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.प्राप्त साधने:ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी साहाय्य साधने उपलब्ध करणे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे : Mukhyamantri Vayoshri yojana
१. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड.
२. राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक.
३. पासपोर्ट आकाराचे २ फोटो
४. स्वयं घोषणापञ
५. कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र (2 लाखांपेक्षा कमी)
६. मोबाईल क्रमाांक
७. उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र
८. वैद्यकीय प्रमाणपत्र
९. शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदञे.
सदर योजनेअंतर्गत पात्र जेष्ठ नागरीक/लाभार्थ्यांना त्याांच्या शारीरिक असमर्थता/+ दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने/ उपकरण खरेदी करता येतील.ते पुढील प्रमाणे आहेत .
श्रवणयंत्र
चष्मा
ट्रायपॉड
स्टिकव्हील चेअर
फोल्डिंग वॉकर
कमोड खुर्ची
नि-ब्रेस
लंबर बेल्ट
सर्वाइकल कॉलर
आधिक माहितीसाठी येथे क्लिक करा मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अधिक माहिती साठी आपल्या गावातील ग्रामपंचायत किंव इतर शासकीय कार्यालयात भेट देऊ शकता व आपल्या जवळच्या मोबाईलचा वापर करुन सोशल मीडियावर, महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, युट्यूब वर माहिती मिळवु शकता आमच्या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र शासनाकडून चालवल्या जाणार्या विविध योजना ,माहिती देण्याचा प्रयत्न करतो आमच्यासोबत जोडुन राहण्यासाठी आमच्या वाॅट्सअॅप समूहत सामील व्हा. Whatsapp