Namo Shetkari Yojana |नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याच वितरण.

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ४ था हप्ता २००० हजार रुपये ऑनलाईन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्र शासना मार्फत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता खात्यात हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्य़ात परळी येथे राज्यस्तरीय कृषी महोत्वस प्रसंगी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात DBT प्रणाली द्वारे हस्तांतरित करण्यात आला आहे. तसेच राज्यातील शेतकरी जे हेक्टरी पाच हजार अनुदान मिळणार होत त्यातील पिक पेरा नोंदणी जाचक अट रद्द करण्यात आली आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टलही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले.

महाराष्ट्रातील सरकार हे शेतकरी बांधवांच्या हिताला प्राधान्य देणारे सरकार आहे आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे.

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान ७/१२ उत्तार्यावर मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्र राज्यातील महिलांचा खुप मोठा प्रतिसाद मिळालेला दिसुन येत आहे. व यासोबतच लाडका भाऊ योजनेअंतर्गत भावांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना आणली आहे . यानंतर शेतकरी हितासाठी कापुस सोयाबीन अनुदान देणार आहे सरकार आता धर्तीवर विविध महाराष्ट्र राज्यातील लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. याची सुरुवात आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.

प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजना हि एक केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी राबवली जाणारी महत्वाकांक्षी योजना आहे केंद्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या या योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन हे शेतकरी साठी नेहमी विविध योजना राबवण्यास सक्षम आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार ने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात आली आहे . या महाराष्ट्र सरकारच्या योजने अंतर्गत शेतकर्यांना दर वर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेतुन केंद्र सरकार द्वारे दर वर्षी सहा हजार रुपये तसेच राज्य शासनाद्वारे सहा हजार अशे दोन्ही मिळुन एकूण बारा हजार रुपये शेतकरी बांधवांना वार्षिक दिले जाणार आहे.

महाराष्ट्र शासन हे नेहमी शेतकरी हितासाठी विविध योजना राबवत असते त्या अनुषंगाने त्यांना कशी मदत होईल याचा विचार समोर ठेवून योजने राबवली जाते शेतकरी कर्ज माफी किंवा इतर अनुदान ज्याद्वारे शेतकर्यांना आर्थिक साहाय्य मिळेल व शेतकरी सुखी होईल हे महाराष्ट्रातील सरकारचे धोरण आहे या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी नेहमी शेतकरी वर्गाल मदत साह्र केले आहे .महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य हे राज्यातील सरकार करत आहे. नमो शेतकरी योजना राज्यातील शेतकरीच वर्गाला एक आर्थिक मदत घेऊन आली आहे.

शेतक-यांना निनिश्चि अशी मदत मिळावी म्हणून केंद्र शासन PM- KISAN योजना राबवत आहे तर याच केंद्र शासन च्या योजनेचा आधार घेऊन महाराष्ट्र राज्य शासन ही शेतकरी सन्मान म्हणून ही योजना राबवत आहे ही योजना महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी खुप मोठी आणि एक महत्वाची योजना आहे याने शेतकऱ्यास आर्थिक मदत प्रदान करण्यात येत आहे माननीय महाराष्ट्र सरकारचे वित्त मंञी यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात अन्नदाता बळीराजा याच्यासाठी योजना राबविण्यात येणार आसल्याची घोषणा केली आहे.

केंद्रं शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अनुदानात बळीराजा हितासाठी राज्यशासनाने भर घातली आहेकृषी सन्मान हा बळीराजा चा सन्मान आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या धर्तीवर ही योजना दिनांक 30 मे 2023 रोजी घोषणेची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या उपक्रमांर्तगत शेतकर्यांना प्रति वर्ष 6000 अर्थिक साह्य मिळणार आहे अस या योजनेअंतर्गत आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकर्यांना तीन हप्ते तर मिळाले पण चौथा हप्ता कधी पडणार याची प्रतिक्षा शेतकरी बांधवांना लागली होती पण चौथा हप्ता हा वेळेनुसार खात्यात हस्तांतरित होणार याची कल्पना होती . महाराष्ट्र राज्यातील जवळ जवळ ९० लाख ८८ हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता येत्या दोन दिवसांत मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. पण वित्त विभागाने हप्ता देण्यास मान्यता दिल्याने पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वितरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेची कार्यपद्धत.

नमो शेतकरी महासन्मान योजनेची कार्यपद्धत ही महाराष्ट्र शासनामार्फत ठरवलेली आहे ज्या द्वारे पीएम किसान सन्मान निधीच्या प्रमान च या योजनेची कार्य पद्धत असेल त्याच वेळेस ह्या योजनेची रक्कम DBT प्रणाली द्वारे आधार कार्ड लिंक बँक खात्यात जमा होणार आहेत पद्धत ही प्रत्येक वेळेस दोन हजार रुपये या प्रमाणे ऐकुन सहा हजार रुपये शेतकर्यांना मिळणार आहेत.

  • पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलैपर्यंत खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे
  • दुसरा हप्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.
  • तिसरा हप्ता हा डिसेंबर ते मार्च महिन्यात खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.

याच प्रमाणे प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.

2023-24 मध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचे तीन हप्ते मार्च पर्यंत शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहे आता चौथा हप्ता हा दिनांक 21 ऑगस्ट पासून खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहे खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Namo Shetkari Yojana –

 शेतकरी बांधव याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे. नमो किसान योजनेच्या (Namo Shetkari Yojana) चौथ्या हप्ता आज ऑनलाईन DBT प्रणाली द्वारे वितरण करण्यात आल आहे केंद्रीय कृषीमंत्री भारत सरकार माननीय शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या उपस्थितीत तर या चौथ्या हप्त्याचं वितरण होताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंञी अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माननीय धनंजय मुंडे , नुकतेच झालेल्या विधान परिषद आमदार पंकजाताई मुंडे या सर्वांच उपस्थितीत या योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता वितरीत झाला आहे जवळपास खुप शेतकऱचा खात्यात रक्कम जमा पण झाली आहे आपल्या खात्यात या योजनेची रक्कम जमा झाली किंवा नाही झाली यासाठी Beneficiary Status चेक करणे गरजेच आहे त्यासाठीच तुम्ही ते चेक करु शकता.

Beneficiary Status लाभार्थी स्थिती कसा तपशील पाहावा ते पुढील प्रमाणे.

  1. गुगल ब्राऊजर वर जाऊन Namo Shetkari Yojana Status List क्लिक करा.
  2. नंतर पहिल जी वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यापैकी एका पर्याययावर क्लिक करा
  3. मोबाइल नंबर किंवा रेजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा या योजनेसाठी जोडलेला मोबाइल नंबर हा पर्याय निवडला तरी चालेव.
  4. त्यानंतर Captcha कोड भरा व Get Data बटन वर क्लिक करा.
  5. त्यानंतर तुम्हाला तुमच Beneficiary Status लाभार्थी तपशील दिसेल हप्ते जमा झालेत का Pending वर आहेत सर्व माहिती दिसेल.

महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकर्यांना PM – KISAN साठी पाञ आहे त्या सर्वाना हा महाराष्ट्र सरकार चालवलेल्या योजनेचा हप्ता मिळणार आहे.यासाठी शेतकरी बांधव किंवा भगिन याचे आधार कार्ड बँकेशी संलग्न असणे गरजेच आहे.तर या योजनेचा लाभ द्वारे मिळणारी रक्कम थेट आपल्या खात्यात जमा होणार आहे . पीएम किसान किवा इतर कोणतीही अनुदान रक्कम आपल्या खात्यात जमा होत नसेल तर आधार कार्ड बँक खात्याशी त्वरीत जोडुन घ्या.

या योजनेअंतर्गत योजने संदर्भात इतर माहिती साठी तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊ शकता व सविस्तर माहीती पाहु शकता सोशल मीडियावर किवा युट्यूब वर तुम्हाला माहिती मिळेल ही सर्व माहिती अचुक व योग्य देण्याचा प्रयत्न केला आहे या संदर्भात आपण माहिती शोधु शकता.