Pink e Rickshaw Yojana 2024|महिलांसाठी खास पिंक ई रिक्षा योजना.

Pink e Rickshaw Yojana 2024

Pink e Rickshaw Yojana 2024

Pink e Rickshaw Yojana 2024 महाराष्ट्र राज्य शासनाने खास महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना राबवली आहे योजनेची पाञता काय आहे अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती पाहुया.

महाराष्ट्र राज्य शासन खुप महत्वाकांक्षी शासन आहे महिलांसठी विविध योजना राबवण्यात आग्रेसर आहे महिलांन सशक्त बनवण्यसाठी त्यांना व्यवसाय करता यावा यासाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना आहे त्यांना आधीक सक्षम कसा बनवतात येईल असा महाराष्ट्र राज्य शासनाचा उद्देश आहे महिलांन व्यवसाय करता याव महिला कर्तबगार आहे त्यांना संधी मिळत नाही त्यांना सक्षम उभ राहता याव त्यांना स्वतः स्वातंत्र्य काहीतरी करता याव भविष्यात महिलांन पुढे कसे जाता येईल या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने एक उपक्रम राबविला या उपक्रमांर्तगत महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना राबवली आहे ही योजना नेमकी काय आहे या योजनेची पाञता काय आहे या योजनेसाठी अर्ज कसा करता येणार आवश्यक कागदपत्रे काय आहे ही सर्व माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलीना रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यात मदत करणे , महिलांना सर्व बाबतीत आत्मनिर्भर व्हावे यासाठी सक्षम करणे, महिला व मुलींच्या प्रवास सुरक्षित करणे यासाठी नौकरी, तसेच मोठ्या मोठ्या शहरात त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आशा मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, नगर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, अमरावती, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर आणि सोलापूर इत्यादी शहरातील इच्छुक गरजु महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थिक साह्य देणे व रिक्षा चालविण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने पिंक(गुलाबी) ई-रिक्षा’ ही योजना लागू केली आहे.

पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ ही योजना म्हणजे काय आहे Pink e Rickshaw Yojana 2024

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आहे या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करुन देण्यात शासनाने मान्यता दिली आहे . महाराष्ट्र राज्यातील सतरा शहरातील दहा हजार महिलांन या योजनेचा फायदा मिळणार आहे पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ ही योजने अंतर्गत रिक्षा खरेदीसाठी 20% रक्कम महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येईल महिलांन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारची ही योजना आहे .

महाराष्ट्र राज्यातील गरजू महिलांना त्यांना अर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने ही योजना राबवली आहे या योजने अंतर्गत रिक्षा खरेदीसाठी फक्त 10% रक्कम महिलांन द्यावी लागणार आहे 20% राज्यसरकार अस एकुन 30% आणि 70% बँकेतून कर्ज मिळणार आहे ही रिक्षा गुलाबी आसणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील महिलांना व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे , त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यात व त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे, महिलांना व मुलींना सशक्त बनविणे महिलांना व मुलींना सुरक्षीत प्रवास करता यावा यासाठी राज्यातील सतरा शहरातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी यासाठी पिंक ई रिक्षा योजना आणि इच्छुक व गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन आर्थिक साह्य देणार आहे तसे उर्वरित रक्कम ही बँकेतून कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देणार आहे बँकेतून मिळालेल्या रक्कम परतफेड करण्याचा कालावधी हा पाच वर्ष इतका राहील.

योजनेचा उद्देश काय आहे .

सदर योजनेचा नेमका उद्देश काय आहे ते पुढील प्रमाणे पाहुया

  • सदर योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे
  • महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्माण करण्यासाठी चालना देणे.
  • महाराष्ट्रातील महिलांचे व मुलींचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.
  • राज्यातील गरजू व होतकरु मुली व महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे.
  • महाराष्ट्र राज्यातील मुली व महिला यांना सुरक्षित प्रवास करता यावा हा उद्देश आहे.
  • राज्यातील मुलीं व महिलांना सशक्तीकरणास चालना देणे.

योजनेच स्वरुप काय आहे.


पिंक ई रिक्षा खरेदी साठी महिलांना व मुलींना कशा प्रकारे मदत मिळणार आहे त्याचे स्वरूप काय पिंक ई रिक्षा योजना अर्थिक साह्य कशा प्रकारे मिळणार आहे ते सविस्तर जाणुन घेऊया पुढीलप्रमाणे.

  • पिंक ई रिक्षा किंमतीत सर्व करांचा समावेश आसेल. [ Gst, registration, Road tax etc. ]
  • जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँका / नागरी सहकारी बँका/ राष्ट्रीयकृत बँका / अनुदान आसलेल्या काही खाजगी बॅंकेकडुन पिंक ई रिक्षाच्या 70 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र राज्य शासन पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी 20 टक्के आर्थिक साह्य आसणार आहे .
  • सदर योजने अंतर्गत लाभार्थी महिला व मुलींना यांना लाभ घेण्यासाठी फक्त 10 टक्के आर्थिक भार आसणार आहे.
  • सदर योजनेतून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी हा पाच वर्ष (60 महिने) आसणार आहे .

पिंक ई रिक्षा योजनेसाठी लाभार्थी पाञता. Pink e Rickshaw Yojana Eligibility

या योजने अंतर्गत लाभार्थी महिला /मुलीची पाञता काय आसणार आहे ते पुढील प्रमाणे आहेत.

  • लाभार्थ्यी महीला व मुलीचे कुटूंब महाराष्ट्र राज्यातील रहीवाशी असणे आवश्यक आहे .
  • अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्ष दरम्यान आसणे गरजेच आहे जास्त असु नये.
  • सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलाकडे स्वताचे बँक खाते आसणे आवश्यक आहे .
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपया पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना ( Driving license ) असणे आवश्यक आहे .
  • महाराष्ट्र राज्यातील विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित , अनाथ प्रमाणपत्र प्राप्त महिला युवती तसेच अनुरक्षण गृह / बालगृहातील आजी / माजी प्रवेशित यांना आगोदर प्राधान्य देण्यात येईल.
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना सूद्धा या योजने अंतर्गत आगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे .

पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपञे

  • सदर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
  • अर्जदारचे आधार कार्ड व पॅनकार्ड
  • महाराष्ट्रात राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र
  • लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आसणे आवश्यक ).
  • बँके खाते पासबुक
  • पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
  • मतदान कार्ड ओळखपत्र ( 18 वर्ष पुर्ण मतदार यादीत नाव आसल्याचा प्रमाणपत्र ).
  • रेशनकार्ड कार्ड
  • चालक परवाना ( Driving license).
  • या योजनेतुन मिळणारी रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार आसल्याच हमीपञ.
  • सदर योजनेच्या सर्व अटी व शर्तीचे पालन करत आसल्या बाबत हमीपञ.

पिंक ई रिक्षा योजनांसाठी अर्ज करण्याची कार्यपद्धती.Pink e Rickshaw Yojana

सदर योजनेतून अर्ज करण्याची पद्धत सोपी व सोयीस्कर आहे या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपञे आपण वरील प्रमाणे दिलेली आहेत ती सर्व कागदपत्रे व्यवस्थित एकञ जमा ठेवा म्हणजे अर्ज करताना कोणत अडचण येणार नाही .

  • सदर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक महिलांन संबधीत जिल्ह्यातील महिला व बालविकास आधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करतील.
  • सर्व प्राप्त झालेल्य अर्जाची अंतिम तपासणी करण्याची जबाबदारी जिल्हा आधिकारी यांच्या आध्यक्षतेखाली समिती राहील.
  • या योजनेसाठी पाञ अर्जदाराना महाराष्ट्र राज्य शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकेची माहिती व वाहन पुरवठा करणाऱ्या संबधीत एजन्सीची माहिती देण्यात येईल रिक्षा खरेदी करण्यासाठी.
  • शेवटच्या मंजुरीनंतर लाभार्थी शासनाच्या निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य आसणार्‍या बँकेत रिक्षा खरेदी साठी 70 टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन अर्ज मंजुर करुन देण्यात येईल.
  • बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील.
  • बँकेची कर्जाची रक्कम मंजुर झाल्यानंतर संबधीत अर्जदाराला 10 टक्क रक्कम संबधीत रिक्षा खरेदी करणाऱ्या एजन्सीकडे भरावी लागेल.
  • रिक्षा खरेद साठी सर्व रक्कम भरल्यानंतर संबधीत एजन्सीकडून अर्जदाराला रिक्षा उपलब्ध करून देण्यात येईल.
  • ही रिक्षा महिलांन चालवायची आहे ही तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक पोलीस विभाग व परिवहन विभाग यांच्याकडे राहील.

शहारातील लाभार्थी सख्या पुढील प्रमाणे राहील.

शहर लाभार्थी संख्या पुढील प्रमाणे असणार आहे 1)छत्रपती संभाजी नगर- 400 2)कोल्हापूर-200
3)सोलापूर-200 4)वसई विरार-400 5)डोंबिवली-400 6)पनवेल-300 7)चिंचवड-300 8)अमरावती-400
9)पिंपरी-400 10)नवी मुंबई-500 11)कल्याण-400
12)नागपूर-1400 13)पुणे-1400 14)मुंबई उपनगर-1400 15) नाशिक – 700 16)अहमदनगर – 400 17) ठाणे- 1000 एकूण 10.000 लाभार्थी आसणार आहेत .
सदर योजनेतून कोणत्या जिल्ह्याला किती रिक्षा मिळणार आहेत .

• योजनेच्या अटी व शर्ती.Pink e Rickshaw Yojana 2024

  • योजनेच्य अटी व शर्ती खालील प्रमाणे आसतील.
  • या योजने अंतर्गत लाभार्थ्यी महिलेला एकच वेळा लाभ घेता येईल.
  • सदर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्य शासनाकडून चालवल्या जाणार्‍या इतर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ई पिंक रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा.
  • सदर लाभ घेणारी लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी.
  • कर्ज परतफेड करण्याची जबाबदारी सर्वस्वी महिलेची राहील .

महाराष्ट्र राज्यातील एकुन दहा हजार निश्चित आसलेल्या महिलांन लाभ मिळणार आहे जर संबधीत जिल्ह्यातील ठेवलेल्या अर्जापेक्षा जास्त अर्ज आले आसतील तर निवड प्रकिया ही लाॅटरी पद्धतीचा अवलंब करुन करण्यात येईल असे सुद्धा या जठार मध्ये सांगीतले आहे .या योजने अंतर्गत आजुनही जास्तीची आधिक माहिती हवी आसल्यास जिल्हयातील महिला व बालविकास विभागाला भेट देऊन घेऊ शकता तसेच मोबाइलच्या साह्याने सूद्धा अधिक माहिती मिळवु शकता.

आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून विविध योजना तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आसतो योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आसतो या योजनेच्या अधिक माहिती साठी संबधीत कार्यालयत भेट द्या.Pink e Rickshaw Yojana 2024 पिंक ई रिक्षा योजना