PM Kisan Yojana 2024
PM Kisan Yojana 2024 प्रधानमंत्री किसान सन्मान नीधी योजनेचा १८ वा हप्ता ५ ऑक्टोबर २०२४ रोजी शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार जाणुन घ्या सविस्तर माहीती.
नमस्कार, प्रधानमंञी किसान सन्मान नीधी योजना ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजने अंतर्गत शासनाकडून शेतकर्यांना आर्थिक साहाय्य दिल जात शेतकर्यांचा सन्मान म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे शेतकऱ्यांकना आर्थिक रूपाने सशक्त करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधि योजनांच्या पात्रतेनुसार शेतकऱ्यांना तीन समान हप्ता प्रति वर्ष 6000 रुपये राशि प्रदान केली जाते. प्रति वर्षी सहा हजार रुपये मिळणारी रक्कम टप्यानुसार शेतकऱच्या खात्यात डीबीटी प्रणाली द्वारे देण्यात येत आहे .
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हा केंद्र शासनाचा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे जो कि शेतकरी सन्मान म्हणून राबवला जातो हा उपक्रम शेतकऱ्यासाठी खुप फायद्यचा ठरत आहे या योजने अंतर्गत शेतकर्यांना आर्थिक मदत मिळत आहे प्रति वर्ष सहा हजार रुपये ही योजना 1 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या 2019 च्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात पियुष गोयल यांनी या उपक्रमाची घोषणा केली होती. महा उपक्रम शेतकरी सन्मानार्थ खुप महत्वाकांक्षी आहे याने शेतकऱ्यास टप्यानुसार प्रत्येक टप्पा दोन हजार अशा तीन टप्यानुसार मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी यावे शेतकरी समृद्ध होईल भारत सरकारची विशेष आणि महत्वपूर्ण योजना आहे. यासाठी पूर्णपणे केंद्र शासनाकडून निधी दिला जातो.
केंद्र सरकारकडून चालविण्यात येणारी देशातील सर्व शेतकरी कुटुंबांना शेती व संबधीत काम करण्यासाठी तसेच शेती उपयोगी खर्च करण्यासाठी किंवा शेतकऱ्याच्या अर्थिक गरजा आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्यांना अर्थिक साह्य मिळवून देणारी योजना आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यी शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्याचे संपूर्ण आर्थिक उत्तरदायित्व भारत सरकार घेईल. केंद्र शासन हे शेतकरी हितासाठी विविध योजना राबवल्या जातात योजने अंतर्गत अनुदान रक्कम देण्यात येते व शेती उपयगी वस्तु मध्ये अनुदान आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे मानले जाते शेतकऱ्याच्या शेतीमालास योग्य भाव नसतो व निसर्ग सूद्धा योग्य साथ देत नाहि त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे या उद्देशाने पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत त्यांना आर्थिक सहाय्य केल जात आहे शेतकर्यांना मिळणारी रक्कम ही एकुन सहा हजार आहे तर ही रक्कम टप्यानुसार म्हणजेच प्रत्येक चार महिन्यांत एक हप्ता दोन हजार रुपये अशा प्रकारे तीन हप्ते मिळणार आहेत एकुन सहा हजार रुपये मिळणार आहेत.
केंद्र सरकार हे महत्वाकांक्षी आहे नेहमी शेतकरी हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते ज्यामुळे शेतकरी चांगल्या प्रकारे आपल्या शेतीत मशागत करु शकेल आणि विविध उपकरण व शेती उपयोगी विविध वस्तु घेण्यासाठी अनुदान योजना शेतकरी हा आपल्या शेतात योग्य मशागत करुन कष्ट करतो केंद्र सरकारकडून याच कष्टाच फलित म्हनुण शेतकर्यांचा सन्मान झाला पाहिजे जे की शेतकरी राजाला संकटातून काढण्यासाठी एक मदत म्हणून ही मदत शेतकर्याला उपयोगी पडावी या हेतुन केंद्र शासनाकडून ही योजना राबवली जात आहे या योजनेची घोषणा 2019 मध्ये झाली तेव्हापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 17 हप्ते शेतकर्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आता शेतकरी राजाला प्रतिक्षा आहे 18 व्या हप्त्याची तर हा हप्ता कधी खात्यात जमा होणार याची वाट शेतकरी बघत आहे .
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्य आठराव्या हप्त्याच वितरण लवकरच करणार आहेत दसर्याच्या मुहुर्तावर Pm kisan yojana योजनेचा 18 वा मिळणार आहे असे समजले जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी सशक्त भारत समृद्ध भारत हिच भारत देशाची ओळख आहे तर आठराव्या हप्त्याच वितरण हे 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील वाशीम जिल्ह्यातुन होणार आहे 9.5 करोड लाभार्थी शेतकर्यांना एकुन 20,000 हजार करोड रुपये ऑनलाईन थेट बँक खात्यात हस्तांतरित केले जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचव्या हप्त्याच वितरण सुद्धा 5 ऑगस्ट 2024 महाराष्ट्र राज्यातील 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच ऑक्टोबर 2024 रोजी एकुन चार हजार रुपये जमा होणार आहेत, पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट-नोव्हेंबरचे हप्ते जमा होणार आहेत. अशी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे
आता शेतकर्यांचा दसरा गोड होणार कारण महाराष्ट्र शासना मार्फत चालविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकुन दोन हजार रुपये तर केंद्र शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता एकाच दिवशी खात्यात जमा होणार आहे 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाचा व केंद्र शासनाचा हप्ता जमा होणार आहे महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे .
योजना 30 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेची घोषणा केली होती आता पर्यंत महाराष्ट्र राज्य शासनाच्या या योजनेचे चार हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाले आहेत तर पाचवा हप्ता कधी मिळणार याची प्रतिक्षा होती केंद्र शासन व राज्य शासनाकडून या योजने अंतर्गत दोन्ही हप्त्याच वितरण वाशिम जिल्ह्यातून पाच ऑक्टोबर रोजी डीबीटी प्रणाली द्वारे शेतकर्याच्या खात्यात जमा होणार आहेत.
प्रधानमंञी किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या महिन्यात मिळणार तर या योजने अंतर्गत पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै महिन्या पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे तर या अंतर्गत मिळणारा दुसरा हप्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्या पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे किंवा करण्यात येणार आहे. तर तिसरा हप्ता हा डिसेंबर ते मार्च महिन्यात खात्यात शेतकऱ्यांच्या हस्तांतरित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC करणे आवश्यक आहे आणि आपल्या बँक खात्याला आधार जोडलेल आसाव बँक खात्याला आधार जोडलेल नसेल तर अडचण येऊ शकते पैसे जमा होणार नाहीत आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेत किंवा नाही हे पाहु शकतो आपल्या मोबाईल च्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीत किती हप्ते जमा झाले आहेत किती हप्ते जमा ह्याचे आहेत ही सर्व माहिती पाहु शकता
प्रधानमंञी किसान सन्मान निधी योजनेचा Beneficiary Status लाभार्थी स्थिती कसा तपशील पाहावा ते पुढील प्रमाणे.
- सर्व प्रथम गूगल वर https://pmkisan.gov.in/ अस टाईप करा .
- Pm kisan वेबसाईट उघडा.
- वेबसाईट उघडल्यानंतर know your status यावर क्लिक करा.
- Registration नबंर टाका व पुढील कॅप्चा टाईप करा .
- आधार जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपि येईल ओटीपी टाका आणि सबमिट करा.
- नंतर तुमची सर्व माहिती दिसेल नाव , मोबाईल नंबर सर्व माहिती आता पर्यंत किती हप्ते जमा झालेत किती pending वर आहेत ही सर्व माहिती दिसेल.
याच पद्धत नमो शेतकरी योजनेचा Beneficiary Status कसे पाहता येईल यासाठी Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर क्लिक करा.
आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच देशातील योजना व ईतर महत्वपूर्ण माहिती देत आसतो कारण राज्यातील व देशातील योजना त्याची परिपूर्ण माहिती नागरीकांना नसते त्यामुळे ते विविध योजनापासुन वंचित राहतात त्यामुळे राज्यातील शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजना आपल्या पेजच्या माध्यमातून देत आसतो प्रधानमंञी किसान सन्मान निधी योजना केंद्र शासनाची महत्वपूर्ण योजना आहे या योजनेची केवायसी करणे गरजेच आहे मोबाईल माध्यमातून पहा केवायसी झाली आहे का नाही झाल्यास शासनाच्या या लाभापासुन वंचित राहता.
महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र सरकारकडून चालविण्यात येणार्या विविध योजना जाणुन घेण्यासाठी आपल्या वेबसाईटवर पाहत राहा आणि वर दिलेल्या दोन्ही योजना संदर्भात काही अडचण असल्यास केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्य अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधिक माहिती घेऊ शकता किंवा जवळच्या शासकीय कार्यालयात भेट देऊ शकता आणि माहिती घेऊ शकता. पीएम किसान सन्मान निधी च्या आधिक माहिती साठी या योजने अंतर्गत शोशल मीडियावर अधिकृत पेज आहे त्यावर जाऊन पाहु शकता जर काही बद्दल झाला तर तीथे तुम्हाला kyc अपडेट्स किंवा इतर कोणतेही अपडेट्स योजने संबधीत मिळेल किंवा आपल्या वेबसाईटवर ही माहिती आपल्या पर्यंत पोहचविण्याचा एक प्रयत्न करत आहोत.
अधिक माहितीसाठी महा सोशल कार्नर या वेबसाईटवर पाहत राहा आम्ही योग्य तीच माहिती आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आसतो तरी इतर माहितीसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.