PM Kusum Solar Yojana 2024
PM Kusum Solar Yojana 2024 पीएम कुसुम सोलार पंप योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्यसरकार देत आहे 90% अनुदान पहा सविस्तर माहिती.
नमस्कार आपण नेहमीच कृषी किंवा इतर महत्वाचे आपडेट आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून देत आसतो केंद्र सरकार व राज्य सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या योजना किंवा शेती विषयी माहिती व इतर महत्वाचे तुमच्या पर्यंत योग्य तीच माहिती देण्याचा प्रयत्न करत आसतो. आपल्या वेबसाईटवर जी माहिती देतो त्याच कारण आस की योजना किंवा इतर महत्वपूर्ण माहिती पासुन कोणी वंचित राहु नये सर्वाना लाभ मिळावा या उद्देशाने देत आसतो.
कृषी विषयी योजना संदर्भात राज्यातील कोणताही शेतकरी हा आपल्या केंद्रा शासनाच्या व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या लाभ व योजना पासून वंचित राहू नये. प्रत्येक पाञ लाभार्थ्यांना लाभ मिळावा हाच एकमेव उद्देश ठेवुन माहिती लिहीत आसतो .तर आज आपण कृषी संदर्भातील अशाच एका योजनेबद्दल जाणुन घेणार आहोत आज आपण कुसुम सौर पंप योजना या योजने अंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून 90% अनुदान आहे या योजनेबद्दल जाणुन घेणार आहोत.
भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो केंद्र शासन कृषी क्षेत्रातील हितासाठी विविध योजना राबवत आसते कृषि क्षेत्राला प्राधान्य देऊन कार्य केले जाते विविध योजना योजना राबवल्या जातात त्यापैकी कुसुम सोलार पंप योजना आहे कृषी क्षेत्रात योग्य निसर्ग पुरक खतपाणी महत्वाचे खरीप हंगामातील पिकासाठी पाणी जास्त नाही लागत पण रब्बी हंगामासाठी पिकाला मुबलक पाणी लागत आणि यासाठी वीज महत्त्वाची असते वेळेत वीज उपलब्ध असेल तर पिकांसाठी सिंचन करता येते म्हणून कृषी क्षेत्रात पिकाला योग्य वेळेत सिंचन उपलब्ध व्हाव सिंचनासाठी वीजेची समस्या उद्भवणार नाही याने शेतातील पिकांच नुकसान होणार नाही याने कृषी क्षेत्रात प्रगती होईल विजेची समस्या सुटेल या केंद्र शासनाने पीएम कुसुम सोलार पंप योजना राबवली आहे.
ही योजना कृषी क्षेत्रासाठी एक वरदान ठरणार आहे शेतकरी बांधवासाठी खुप महत्वाची आहे यात आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारांकडून अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे आणि सौर पंप दिले जातात आता हे संर पंप तीन एचपी ,पाच एचपी ,साडे सात एचपी या कार्यक्षमतेचे आसतात या योजने अंतर्गत जर पीएम ठरलात तर कॅटेगरी नुसार अनुदान दिल जात ओपन कॅटेगरी मधील पाञ अर्जदाराला 90 टक्के इतक अनुदान दिले जाते तर एसी , एसटी तील पाञ अर्जदाराना 95 टक्के इतक अनुदान दिल जाते .
पीएम कुसुम सोलार पंप योजना हि एक केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे शेतकरी ( किसान ) हितासाठी ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेतुन केंद्र शासनातर्फे 60 टक्के अनुदान देण्यात येत आहे आणि 30 टक्के कर्ज loan दिले जाते .या योजनेतुन शेतकरी बांधवांना या योजने अंतर्गत एकूण किती खर्च येणार आहे तर एकुन खर्चाच्या फक्त 10% खर्च शेतकर्यांना करावा लागणार आहे.
या योजनेच्या साह्याने केंद्र सरकारला सौर ऊर्जेतुन वीज निर्मिती करता येणार आहे. ज्यामुळे शेतातील वीज पंपाद्वारे पाणी देण्यासाठी विजेच्या समस्या उद्भवणार नाही. शेतकर्यांना शेतीला पिकासाठी दिवसा सिंचन करता या दिवसा पाणी देता याव यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना राबविण्यात येत आहे भारत देशात 80% लोक पारंपारिक शेती करतात त्याच सर्व शेतीवर अवलंबून असते शेतातील पिकांसाठी मेहनत घेत आसतो पण शेतीवरील होणार्या समस्या पिकाला राञीच सिंचन करताना किती समस्यांना तोंड द्याव लागत किती संकटात सिंचन कराव लागत ह्या सर्व समस्यांबद्दल जाणून त्याच्या हितासाठी भारत सरकार व राज्य सरकार सज्ज आहे म्हणुन त्यांनी ही प्रधानमंञी कुसुम सौर पंप योजना राबवली आहे याने त्याना अर्थ सहाय्य दिले जाणार 90% अनुदान सुलभ व सोयीस्कर अशी योजना तर या योजनेची सर्व माहीती जाणुन घेऊया.
प्रधानमंञी कुसुम सौर पंप योजनेचा उद्देश :
- सौर ऊर्जा उपलब्ध करून देणे जेणेकरून शेतकर्यांना वीज दराचा खर्च कमीत कमी येईल.
- सिंचनासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देणे वेळेत पिकाला सिंचन करता येणार आहे.
- सौर ऊर्जेमुळे पर्यावरण संरक्षण होईल प्रदुषण कमी होईल.
- शेतकऱ्यांना वेळेवर लाईट मिळेल व त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
- सौर ऊर्जेचा वापर वाढवून ग्रामीण भागातील विकासाना चालना मिळेल.
या योजने अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजेच ओपन प्रवर्ग एकुण पंपाच्या किंमतीच्या 90 % एवढ अनुदान तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग एकुण पंपाच्या किंमतीच्या 95 % एवढ अनुदान उपलब्ध आहे.
प्रधानमंञी कुसुम सौर पंप योजनेसाठी पात्रता :
- अर्जदार हा भारतीय नागरीक आसावा.
- अर्जदाराकडे सिंचन करण्यासाठी शेती आसावी.
- अर्जदाराचे विज कनेक्शन आसावे.
- राष्ट्रकृत बँकेत अर्जदाराचे खाते आसावे.
- अर्जदाराचा आधार मोबाईल नंबर बँकेशी जोडलेला आसावा.
अनुदानाचे स्वरूप :
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार अनुदानाचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे.
- 3 एचपी पंपासाठी दिल जाणार अनुदान :
- एकूण किंमत – 1,93,803 रुपये
- सर्वसाधारण OPEN प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा– 19,380 रुपये
- SC/ ST एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -9,690 रुपये
- 5 एचपी पंपासठी दिल जाणार अनुदान:
- एकुण किंमत -2,69,746.
- सर्वसाधारण Open प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा – 26,975.
- Sc/Stएससी/ एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा -13,488.
- 7.5 एचपी पंपासाठी दिल जाणार अनुदान :
- एकुण किंमत – 3,74,402 आहे .
- OPEN सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा -37,440 आहे .
- SC / ST एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा -18,720
पंपासाठी निकष काय ते पुढील प्रमाणे :
प्रधानमंञी कुसुम सौर पंप योजने अंतर्गत काही शेतीनुसार निकष ठेवण्यात आले आहेत त्यानुसार सौर पंप मिळणार आहे ते कस पुढील प्रमाणे आहे.
- एक हेक्टर जमीन असणाऱ्या जमीन धारकास 3 Hp पंप आहे तर 2) एक ते दोन हेक्टर जमीन आसणार्या जमीन धारकास 5 Hp आहे तर 3) दोन हेक्टरपेक्षा आधिक जमीन असेल तर त्या शेतीधारकास 7.5 Hp पंप आहे.
प्रधानमंञी कुसुम सौर पंप योजनेचे फायदे :
- या योजने अंतर्गत फक्त स्वता:चा खर्च 10% किंवा 5% प्रवगानुसार आसणार आहे.
- सरकार सौर पंप खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे याचा फायदा होणार.
- शेतीसाठी स्वतः ऊर्जा उपलब्ध करुन याबतीत कोणती अडचण येणार नाही.
- राञी पिकाला पाणी द्यायचे समस्या सुटतील.
- वीज दर संदर्भातील खर्च कमी होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
- नियमित योग्य वेळी पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार व पिकाची सुधारणा होईल.
प्रधानमंञी कुसुम सौर पंप योजनेच्या अर्जा करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
- सातबारा उतारा , त्यावर विहीरीची किंवा बोअरची नोंद आवश्यक आहे.
- सामायिक सातबारा असेल तर 200 रुपयांच्या बाँडवर इतर भागवाटदारांच ना हरकत प्रमाणपत्र.
- आधारकार्ड/ओळखपत्र
- जातीचा पुरावा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमाांक
- या योजनेसाठी संबधीत विभागाकडून मिळणार अर्ज.
सर्व कागदपत्रे ओरीजिनल आणि त्याची झेरॉक्स दोन्ही स्वरूपात असणे गरजेच आहे.काही प्रमाणात आधिक कागदपत्रे सुद्धा मागवु शकतात. कुसुम सोलार पंप योजने अंतर्गत चालणार आधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात आणि संबधीत कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतींत सुद्धा अर्ज करु शकत.
कुसुम सोलर पंप योजनेच लाभ घेण्यासाठी व अर्ज करण्यासाठीच किंवा शासनाच्या आधिकृत महिती साठी महाराष्ट्र सरकार च्या अधिकृत वेबसाइटवर आवश्य भेट द्या Mahaurja.com
कुसुम सोलर पंप योजनेची इतर माहिती पाहिजे आसल्यास शासनाच्या आधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता किंवा शासनाच्य संबधित कार्यालयात जाऊन माहिती मिळवु शकता आणि योग्य पद्धतीने रितसर माहिती घेऊन योग्य तीच कागदपञे ठेऊन अर्ज करु शकता घरबसल्या अर्ज करायचा आसेल तर शासनामार्फत चालवल्य जाणार्या अधिकृत वेबसाइटवर आवश्यक ती माहिती भरुन अर्ज करु शकता आणि यासाठी काही समजत नसल्यास युट्यूब व व्हीडिओ पाहून सविस्तर माहीती बघुन फ्राॅम भरु शकता.
या योजने अंतर्गत प्रवर्गानुसार अनुदान आहे याचा लाभ सर्व शेती करणार्या लोकांना होणार तर सविस्तर माहिती घेऊन या प्रधानमंञी कुसुम सौर पंप योजनेचा लाभ मिळवु शकता आणि वीज च्या कटकटी पासुन आणि अन्य सिंचनाच्या समस्या पासुन सुटका करु शकत या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा आवश्य लाभ घ्या आणि 90/95 % अनुदान मिळवा यासाठी स्वतःचा लागणारा खर्च 10 ते 5 % आहे.अगदी मोफत आहे अस समजा आणि या पीएम कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ घ्या.