Post office Ppf Yojana|पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना.

Post office Ppf Yojana

Post office Ppf Yojana

Post office Ppf Yojana पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना काय आहे पीपीएफ खाते कसे उघडायचे या योजनेचा फायदा काय आहे याबद्दल सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

आमच्या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या बचत योजना शासनाच्या विविध योजना तुमच्यासाठी घेऊन येत आसतो अशी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. पोस्ट ऑफिस ची पीपीएफ योजना याबद्दल जाणून घेणार आहोत या योजने अंतर्गत गुंतवणूक कशी करायची किती गुंतवणूक करावी लागणार खाते कसे व कुठे उघडायचे या योजनेच्या लाभाचे स्वरुप काय आहे लाभ कशा प्रमाणात आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहुया.

नमस्कार मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिस ppf बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही 12 हजार रुपये जमा करून 40 लाख रुपये मिळवु शकता. तर ते कसे मिळवायचे, कशा पद्धतीने इन्स्टिट्यूट करायचे आहे ते सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.तसेच यामध्ये लोन सुद्धा देण्यात येते. तसेच हे खाते कोणीही उघडु शकते. चला तर मग जाणून घेऊया.

PPF योजना म्हणजे काय आहे :Post office Ppf Yojana

पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund) म्हणजे थोडक्यात सांगायच झाल तर एक दिर्घकालीन गुंतवणूक आहे ज्या व्यक्तीला बचत करुन रक्कम गुंतवणूक करुन उच्च पण स्थिर परतावा मिळवायचा आहे आशासाठी ही योजना लोकप्रिय आहे Ppf खाते उघडणाऱ्या व्यक्तीचे मुख्य धोरण म्हणजे सुरक्षितता आसते.

संस्थात्मक व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी सारख्या अनेक योजनांचा समावेश केला आहे हा निधी पीपीएफ योजना 2019 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालतो पोस्ट ऑफिसची ही योजना नियमित पणे योगदान देणार्‍यांना एक चांगला परतावा तर मिळतो पण अनेक सवलतीसाठी देखील आहे सर्वप्रथम या योजने अंतर्गत गुंतवणुक करण्यासाठी योग्य व अचुक माहिती असणे आवश्यक आहे.

PPF योजनेची वैशिष्ट्ये :

पोस्ट ऑफिस योजना पीपीएफ योजनेची ठळक वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत.

  • या योजनेतुन मिळणारा व्याज दर हा 7.1 टक्के ( हा व्याज दर तीन महिन्यांनी बदलु शकतो . केंद्र सरकारकडून जाहीर केला जातो.
  • योजनेची मुदत 15 वर्ष आहे .
  • किमान गुंतवणूक 500/- रुपये वर्षातुन किमान एकदा तरी .
  • कमाल गुंतवणूक 1,50,000 वर्षातुन एकदा.
  • कर सवलत आयकर कायद्याच्या कलम 80 सी बर्षाला 1.50 लाख रुपयापर्यंत.
  • सुरक्षितता या योजने अंतर्गत गुतविंण्यात येणारी सर्व रक्कम सुरक्षित असुन त्या रक्कमेवर मिळणारे व्याजही जाहीर दराप्रमाणे नियमित पणे जमा केले जातात.

PPF खाते कोण उघडू शकते :Post office Ppf Yojana

पीपीएफ खाते कोण उघडु शकते याची पाञता काय आहे ते पुढील प्रमाणे पाहुया.

  • निवासी भारतीया व्यक्ती ज्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे.
  • पीपीएफ खाते उघडण्यसाठी कोणतही उच्च वयोमर्यादा नाही.
  • पगार आसणारी व्यक्ती किंवा स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह कोणताही निवासी भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडू शकतो.
  • एका व्यक्तीच्या नावे एकच खाते उघडू शकता.
  • अल्पवयीन मुलाच्या/मुलीच्या वतीने पालक पोस्ट ऑफिसमध्ये अल्पवयीन PPF खाते उघडू शकतात. हे देखील प्रति बालक एका अल्पवयीन PPF (Public Provident Fund)  खात्यापुरते मर्यादित आहे.

PPF खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदञे :

पोस्ट ऑफिस योजना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते PPF ( Public Provident Fund ) खाते उघडण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता आसणार आहे.

  • ओळखीचा पुरावा आधारकार्ड/ मतदार ओळखपत्र.
  • फॉर्म बी (पे-इन-स्लिप).
  • फॉर्म ई (नामांकित व्यक्ती घोषित केल्यास).
  • पत्याच पुरावा.
  • पॅनकार्ड.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.

वरील सर्व कागदपञे आवश्यक आहे किंवा इतरही काही महत्वपूर्ण कागपञे आसल्यास कागदपञे बँक मागणी करु शकता सविस्तर कागदपञांची माहिती घ्यावी.

पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड Public Provident Fund या योजनेबद्दल जाणुन घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर लेख पाहणे गरजेच आहे सविस्तर माहिती पुढे आहे .

सुरुवातीला आपल्याला पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर जायचे आहे. समोर ppf अकाउंट बद्दल संपूर्ण माहिती दिली असेल हे खाते 15 वर्षे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते म्हणतात. याचा कालावधी 15 वर्षाचा असतो तसेच याचा व्याजदर किती असतो बघा 1-1-2024 पासून याचा कालावधी हा 7.1% असतो. प्रत्येक वर्षाला याचा कालावधी बदलत असतो. आता खाते उघडण्यासाठी किमान रक्कम आणि जास्तीत जास्त शिल्लक ठेवली जाते. म्हणजे यासाठी तुम्ही 500 रुपये रक्कम भरणे गरजेचे आहे. ही रक्कम तुम्ही महिन्याला किंवा वर्षाला भरु शकता.

वर्षाला ही रक्कम जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार म्हणजे दिड लाख रुपये रक्कम तुम्ही वर्षाला भरु शकता. यापेक्षा जास्त रक्कम भरता येणार नाही. आणि कमीत कमी 500 रुपये तरी रक्कम तुम्ही भरु शकता. तसेच ही रक्कम हप्त्यांमध्ये भरु शकता. हे खाते आपला भारतीय नागरिक उघडु शकते . हे खाते 18 वर्षाखालील मुले सुद्धा उघडु शकतात. म्हणजे पालकांनी ते पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडावे लागेल. तर हे खाते आपण कुठे उघडु शकता बघा.

देशभरातील जेवढे काही पोस्ट ऑफिस आहेत त्यापैकी कुठेही कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ppf खाते उघडु शकता. किंवा कोणत्याही बॅंकेमध्ये जाऊन सुद्धा हे खाते उघडु शकता. तर समोर बघा यामध्ये तुम्ही किती रक्कम ठेउ शकता. कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दिड लाख रुपये ठेऊ शकता. आर्थिक वर्षात कितीही हप्त्यांमध्ये रक्कम तुम्ही भरु शकता. हे खाते तुम्ही कॅशमध्ये किंवा चेक मध्ये उघडु शकता.आयकर कायद्याच्या कलम अंतर्गत ठेवी वजावटीसाठी पात्र ठरतात. म्हणजे तुम्हाला इनकम टॅक्स भरताना यामध्ये सुट भेटते. Atc आणि c च्या अंतर्गत इनकम टॅक्स रिटर्न फाईल भरत असाल तर यामध्ये वर्षाला दिड लाख रुपयांपर्यंत सुट भेटते.

जर तुम्हाला खाते बंद करायचे असेल तर काही नियम आहेत बघा. जर कोणत्याही आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा न केल्यास पिपिएफ खाते बंद केले जाते. हा एक नियम महत्त्वाचा आहे. वर्षभरात तुम्ही 500 रुपये जमा नाही केले तर खाते बंद केले जाते. म्हणून वर्षभरात कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त दिड लाख रुपये तुम्ही भरु शकता. म्हणजे खात जर बंद झाल असेल आणि ते तुम्हांला परत चालू करायचे असेल तर ते खाते तुम्हाला परत चालू करता येते. पण त्यासाठी वर्षाला जे काही पैसे भरायचे असतील ते भरावे लागतात.

आता व्याज बघुया . तर 2024 मध्ये 7.1% एवढा व्याज आहे.गुगल वर जाऊन ppf calculator सर्च करायचे आहे हे सर्च केल्यावर पहिलीच वेबसाइट येईल त्या वेबसाइटवर जाउन कॅल्क्युलेशन करु शकता. वर्षाला जर तुम्ही 1 लाख 50 हजार रुपये 15 वर्षासाठी इन्वेस्ट केले तर 15 वर्षानंतर भेटणारी रक्कम तुम्ही चेक करु शकता . म्हणजे 15 वर्षानंतर 22 लाख 50 हजार रुपये इन्स्टिट्यूट करणार आणि मॅच्युरीटी ही 40 लाख 68 हजार 209 रुपये असेल. याला लागणार टॅक्स हे फ्रि असणार आहे. जर तुम्ही वर्षाला 10 हजार रुपये भरले तर 15 वर्षाचे 7% ने किती होतील कॅल्क्युलेट करून बघु शकता.

1 वर्ष पैसे भरून 1 वर्षानंतर कर्ज भेटते. तर पुढे बघा आपण जास्त कर्ज घेऊन शकतो का तर 1 वर्षामध्ये 1 कर्ज घेता येतो. आणि तसेच पहिल्या कर्जाची परतफेड होई पर्यंत दुसरा कर्ज दीला जाणार नाही. घेतलेल्या कर्जाची परतफेड ही 36 महिन्याच्या आत करावी लागते. तर तुम्हाला 1% व्याजदरानी कर्ज लागु होईल जर तुम्ही 36 महिन्यानी त्याची कर्ज परतफेड करत असाल तर 6% जे व्याजदर आहे ते लागते. अशा पद्धतीने कर्जाचे वाटप अशा पद्धतीने कर्जाचे वाटप असते.

त्यानंतर पैसे कसे काढायचे बघा. पैसे काढायचे असतील तर खाते उघडण्याचे वर्ष वगळून 5 वर्षानंतर आर्थिक कालावधीत पैसे काढु शकता. पैसे काढण्याची रक्कम चौथ्या मागील वर्षाच्या शेवटी किंवा अखेरीस क्रेडिटवर शिल्लक असल्यावर 50% पर्यंत घेतली जाते. अगोदर तुम्हाला त्यामध्ये पैसे जास्त ठेवावे लागतील मग त्यानूसार तुम्ही ते पैसे काढु शकता. त्याची मॅच्युरिटी बघा . खाते वगळून पहिल वर्षे जे आहे ते तुमची मॅच्युरिटी 15 वर्षानी होणार आहे. अशा प्रकारे याची सर्व माहिती आपण बघितली आहे. याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही ppf calculator या लिंक वर जाऊन अधिक माहिती पाहु शकता.

पोस्ट ऑफिसची ही योजना शासनाची आसल्याने अत्यंत सुरक्षित आहे आणि खात्यावर जमा होणारे व्याज चक्रवाढ पद्धतीने जमा होतात त्यामुळे दिर्घकालीन परतावा भरघोस व मोठा मिळतो. या योजनेची सुरक्षितता आहे पण ठरलेल्या कालावधीच्या आगोदर रक्कम किमान सात वर्ष झाल्यानंतर रक्कम काढण्याची योजनेत मुभा आहे आपल्या भविष्या साठी अत्यंत उपयोगी योजना आहे

पोस्ट ऑफिस योजना या योजने बद्दल आधिक माहितीसाठी जवळच्या बॅंकेत संपर्क साधा करा कोणत्याही बँकेत माहिती मिळेल किंवा तुमचे पीपीएफ(Public Provident Fund) खाते उघडून दिले जाईल या योजनेबद्दल गूगल वर जाऊन शोध घेऊ शकता खुप सर्व लेख मिळतील त्याद्वारे योग्य माहिती मिळेल योग्य व आवश्यक माहिती घेऊन यात गुंतवणूक करा.

आशाच विविध माहितीसाठी आमच्या वेबसाईटवर अपडेट रहा लेख आवडल्यास महत्त्वाची माहिती आहे पुढे पाठवा.