Pradhanmantri Matri Vandana Yojana |प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.

Pradhanmantri Matri Vandana Yojana

Pradhanmantri Matri Vandana Yojana

Pradhanmantri Matri Vandana Yojana प्रधानमंञी मातृ वंदना योजना या अंतर्गत गरोदर महिला व स्तनदा माता यांना ५००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते पहा सविस्तर.

केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासन नेहमी जन हितासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते देशातील नागरीकांना कोणत्यातरी स्वरुपात आर्थिक मदत केली जाते महिलांसाठी, कृषी साठी अशा विभागा मार्फत केंद्र व राज्य शासनाकडून योजना राबवल्या जातात याच योजना पैकी महिलांच्या हितासाठी त्यांना एक आर्थिक मदत मिळावी म्हणून हि योजना राबवली जाते “प्रधानमंञी मातृ वंदना योजना ” ही महिलांना गरोदरपणात आर्थिक अडचणींना समोर जाव लागु नये गरोदर आसताना सूद्धा काहींना शारीरीक क्षमता नसता नाही मजुरी करावी लागते याने त्याच्या गर्भातील बाळाच्या आरोग्य होत आहे हे सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून प्रधानमंञी मातृ वंदना योजना राबवली जात आहे तर या योजने संदर्भात सविस्तर माहीती जाणुन घेऊया.

प्रधानमंञी मातृत्व वंदना योजना :

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारी २०१७ रोजी ही प्रधानमंञी मातृ वंदना (PMMVY) योजनेची सुरुवत केली .आहे या,योजने अंतर्गत गरोदर महिला व स्तनदा माता यांना लाभ मिळणार आहे या योजनेतुन त्यांना ५००० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे .केंद्र सरकारने ही योजना महिला व बालविकास मंत्रालयामार्फत गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली आहे. या योजने अतंर्गत शासन गर्भवती महिलांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देत आहे गर्भवती महिलांना सरकार कडून आर्थिक मदत दिली जाते. त्यांना होणार बाळ हे कुपोषित राहू नयेत, कुठलाही आजार होऊ नये, यासाठी महिलांना मातृ वंदना योजने अतंर्गत पैसे दिले जातात.

भारतातल दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांन गरोदरपणाच्या शेवटच्य टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही काम मजुरी करावी लागते यामुळे देशातील गर्भवती माता बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे याने माता व बाल मृत्यु दर यात वाढ झाल्याने ते नियंञित करण्यासाठी योग्य आहार माता व बाल मृत्यूदर होणार नाही केंद्र शासन नेहमी विविध योजना आणण्यासाठी अग्रेसर आहे ही गर्भवती माता यांना खुप महत्वपूर्ण ठरणार आहे या योजने अंतर्गत गरोदर मातांना आर्थिक मदत प्रदान केली जाणार आहे .

सदर ही योजना केंद्र शासन व राज्य शासना यांच्या सहभागाने राबविण्यात येत असुन या योजने अंतर्गत केंद्र शासनाचा ६०% तर राज्य शासना चा ४०% सहभाग असणार आहे हा निधी योजनेसाठी तरतुद करण्यात आली होती योजनेच्य अंमलबजावणी साठी उभारण्यात आलेला निधी Escrow account जमा करण्यात येत होता केंद्र शासनाने विहीत केलेल्या प्रमाणे या योजनेची अंमलबजावणीत करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत १४ जुलै २०२२ रोजी मिशन शक्ती च्या मार्गदर्शक सुचनानुसार मिशन शक्ती अंतर्गत दोन भागात एकूण चौदा योजनाचा समावेश केला आहे. त्यापैकी सामर्थ्य विभागातुन ६ योजना आहेत त्यातच प्रधानमंञी मातृत्व वंदना योजना आहे या योजने अंतर्गत पाच महिलांन लाभ देणे व योजना राबविण्या बाबतच्या सुधारीत मार्गदर्शक सुचना सन २०२३-२४ पुढील प्रमाणे लागु करण्यास मान्यता देत आहे तसेच ही योजना राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या सहभागाने राबविण्यात येत आहेत. या योजनेत केंद्र सरकार चा साठ टक्क तर राज्य सरकार चा चाळीस टक्के खर्च असणार आहे योजनेचा संपुर्ण खर्च शासनाच्या स्व निधीतून भागविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

प्रधानमंञी मातृत्व वंदना योजने अंतर्गत पाञ लाभार्थी महिला विहीत सर्व अटी व कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता केल्यानंतर त्या महिलेला पहिल्य आपत्यासाठी रू ५००० तर ती मिळणारी रक्कम दोन हप्त्यात तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर पहिल्या टप्प्यात ६००० रुपये चा लाभ आधार जोडलेल्या बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

या योजने अंतर्गत कसा मिळतो लाभ : या योजने अंतर्गत लाभार्थी पाञ महिलेला पाच हजार रुपये दिले जातात, जे कि टप्यानसार त्या महिलेला रक्कम प्रदान केले जाते. जननी सुरक्षा योजने अंतर्गत पात्र आसणार्या महिलेला एक हजार रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण सहा हजार रुपये पात्र महिलेला दिले जातात. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत दिले जाणारे रक्कम खालीलप्रमाणे.

पहीला हप्ता : राज्य सरकार ने अधिसुचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखे पासून सहा महिन्याच्या आत किमान एक प्रसुती पुर्ण तपासणी झालेली आसावी. तर पहिल्या होणार्या अपत्यासाठी तीन हजार रुपये दिले जातात.

दुसरा हप्ता : बाळाची जन्म नोंदणी करणे आवश्यक आणि बालकास बीसीजी, ओपीव्हीझीरो, ओपीव्हो ३ माञा अथवा समतुल्य पर्यायी लसीकरण प्राथमिक चक्र पुर्ण करणे आवश्यक आहे .मग नंतर दोन हजार दिले जातात. दुसरे आपत्य मुलगी आसल्यास तीच्या जन्मानंतर सहा हजार रुपये एकञित दिले जातात.

• पाञता :

  • लाभार्थी महिला ही भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
  • 1 जानेवारी 2017 रोजी किंवा नंतर त्यांच्या पहिल्या मुलासह गर्भवती झालेल्या कोणत्याही गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला पात्र आहेत.
  • कोणत्याही गर्भवती किंवा नर्सिंग स्त्रिया ज्या तुलनात्मक लाभ देतात अशा व्यवसायातील कर्मचारी नाहीत, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू), आणि नियमित राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

• योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

  • पूर्णपणे भरलेला अर्ज फॉर्म ( जे तुम्हाला शासनाच्या https://wcd.delhi.gov.in या वेबसाईटवर मिळुन जाईल)
  • MCP कार्ड प्रत ( माता-बाल संरक्षण कार्ड )
  • ओळखीच्या पुराव्याची झेरॉक्स 
  • बँक/पोस्ट ऑफिस अकाउंट पासबुकची झेरॉक्स.
  • अर्जदार आणि तिच्या पतीने स्वाक्षरी केलेले हमीपत्र/संमती

• योजनेची उद्दिष्टे :

  1. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा माता यांना चांगला आहार मिळावा सकस आहार घेऊन त्याच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.
  2. जन्माला येणार्‍या नवजात बालकाचे आरोग्य सुधारावे आणि गर्भवती माता मृत्यू व बाल मृत्यु यात घट व्हावा व मात व बाल मृत्यूदर नियंञित राहावा.
  3. सदर योजने अंतर्गत लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधरावे, स्ञी भ्रुण हत्या आवरोध करणे व स्ञी जन्माचे स्वागत करणे .
  4. लाभार्थ्यांकडून आरोग्य संस्थांच्या सुविधाचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढून संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे.
  5. नवजात अर्भकाच्या जन्मा बरोबर च जन्म नोंदणी प्रमाणात वाढ व्हावी हा उद्देश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा पुढील प्रमाणे :

या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी या योजनेचा फॉर्म तुम्हाला घ्यावा लागेल. तुम्ही शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://pmmvy.wcd.gov.in/ वर जाऊन किंवा आपल्या गावातील जवळच्या अंगणवाडी केंद्राला भेट द्या अंगणवाडी सेविका तुम्हाला माहिती सांगेल किंवा जवळच्या शासकीय आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन सर्व माहिती मिळवु शकता आणि शासनाच्य ऑनलाईन वेबसाईटवर अर्ज कसा या संदर्भात योग्य माहिती मिळेल व या योजनेचा लाभ घेता येईल.तसेच आपल्या वेबसाईटवर केंद्र शासन व महाराष्ट्र शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजना बद्द्ल बघत आसतो सरकारी योजनेचा लाभ सर्वांन मिळावा या हेतूने एक योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतो .