Rahul Dravid
Rahul Dravid राहुल शरद द्रविड भारतीय संघाचा माजी खेळाडू , कर्णधार ,प्रशिक्षक यांच्या विषयी थोडक्यात जाणुन घेऊया
पूर्ण नाव राहुल शरद द्रविड आहे यांचा जन्म मध्यप्रदेश, इन्दौर चा आहे. नंतर बंगलोर मध्ये स्थाईक झाले.द्रविड यांचं शालेय शिक्षण बंगळूर येथील सेंट जोसेफ बॉइज हायस्कूलमध्ये झालं. तसेच सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली. त्यानंतर पुढील एमबीएचे शिक्षण घेत असताना द्रविड यांचे भारतीय क्रिकेट संघात निवड झाली.
राहुल द्रविड हे नाव क्रिकेट विश्वात निर्माण झालेले एक महान व्यक्तिमत्व राहुल द्रविड सारख्या खेळाडु वर आर्टिकल लिहीणं म्हणजे एका महान क्रिकेट विश्वचा एक काळ गाजवलेल नेतृत्त्व आहे यावर बोलन किंवा शब्दात उतरविणे सोप नाही, आणि मी काही मोठा शाब्दिक एवढा मोठा लेखक नाही, माझ्या सारख्याचा लेखनीला राहुल द्रविड सारखा मजबूत विषय झेपणार नाही. राहुल द्रविड हा लेखाचा विषय अजिबात नाही. राहुल द्रविड हे एक महाकाव्य आहे.राहुल द्रविड चा स्वभाव आणि राहणी साधी असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे द्रविड हे खुप मोठे असले तरी त्यांना अहंकार मात्र नसल्याचे पाहायला मिळते.
राहुल द्रविड Rahul Dravid यांचे 1996 ला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. विनोद कांबळी यांच्या ऐवजी राहुल द्रविड यांना नाव पुढे करण्यात आलं ते संघात सिलेक्ट झाले.राहुल यांचा एकदिवसीय क्रिकेट मधील करिअर हे खूप अडथळ्यातून सुरू झाल. त्यांना एकदिवसीय क्रिकेट मध्ये चांगल्या प्रकारे प्रदर्शन करता आलं नाही. द्रविड यांची रन काढण्याची गती खूप कमी झाली होती त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे रोशाला सामोरे जावे लागले.संघासाठी आपलं शंभर टक्के देणं हे त्याच कर्तव्य तो करत राहिला.
मग ते संघा मध्ये समतोल राखण्यासाठी २००३ च्या वर्ल्डकप यष्टिरक्षण करणं असुदे नाही तर २०१२ च्या ऑस्ट्रेलियातील संघाच्या खराब प्रदर्शना नंतर वरिष्ठांनी निवृत्त व्हावे असा शब्द निघाल्यावर सगळ्यात आधी निवृत्ती ची घोषित करणे असो. यात सर्वात प्रमाणिक खेळाडु आहे.महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा खूपदा म्हणालाय, नव्वदीच्या शतकातील क्रिकेट क्षेत्रातील एका बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघात एका भारतीय खेळाडूला घेण्याची आवश्यकता वाटली, तर फक्त राहुल द्रविडला संघात थेट प्रवेश आहे.त्याची प्रत्येक खेळी ही अगोदरच्या खेळी पेक्षा नेहमीच श्रेष्ठ असायची, त्यामुळे मी त्याच्या कोणत्याही खेळीला सर्वात्तम अशी उपमा देणार नाही, अशी उपमा देणे म्हणजे त्याच्या इतर खेळीवर अन्याय करण्यासारखं आहे.
ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार स्टीव्ह वॉ ने आपल्या आत्मचरित्रात लिहीलय, “राहुल द्रविडला पहिल्या पंधरा मिनीटात बाद करण्याचा प्रयत्न करा, जर तुम्हाला हे शक्य होत नसेल तर मग भारतीय संघातील दहा फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न करा, तेंव्हाच तुम्ही कसोटी सामना जिंकू शकाल.राहुल द्रविड ने कसोटीच्या २८६ डावात ५३ च्या सरासरीने, १३२८८ धावा ठोकल्या आहेत! त्यात त्याने ३६ शतके आणि ६३ अर्धशतके ठोकली आहेत, २७० धावांची त्याची सर्वाच्च खेळी होती.त्याने ३१ २५८ चेंडू खेळलेत, कसोटीत ३०००० चेंडू खेळून काढणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे, आणि हा त्याचा विश्वविक्रम आज देखील अबाधित आहे. कसोटी क्रिकेट मध्ये राहुल द्रविड ने तब्बल २१० झेल घेतलेत, त्याचा हा विश्वविक्रम आज देखील अबाधित आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यात तब्बल १७३ सामन्यानंतर राहुल द्रविड पहिल्यांदाच शुन्यावर बाद झाला होता, त्याचा हा विश्वविक्रम आज देखील अबाधित आहे.राहुल द्रविड तब्बल १० वेळा कसोटीत नव्वदीत बाद झालाय, हा आगळावेगळा विश्वविक्रम देखील त्याच्याच नावावर आहे.
राहुल द्रविड कसोटीत ४४ १५८ मिनिटे क्रीझ वर उभा होता, हा त्याचा विश्वविक्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरची Sachin Tendulkar पार्टनरशिप, ही जगात सर्वात जास्त धावा जमवणारी पार्टनरशीप आहे.
राहुल द्रविड ने कसोटी सामन्यात ०६ वेळेस ३०० पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप केलीय, हा एक विश्वविक्रम आहे. राहुल द्रविड Rahul Dravid ने ८८ वेळेस १०० पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप केलीय, हा एक विश्वविक्रम आहे.
कधीकधी अनुकूल परिस्थितीत भारतीय संघाला राहुल द्रविड नावाच्या व्हेंटीलेटरने, परत उठून जोमाने धावण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त करून दिली आहे.भारतीय फलंदाजी जेंव्हा कधी अडचणीत यायची, तेंव्हा भारतीय क्रिकेट चाहत्यांना राहुल द्रविडची आठवण यायची. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे दोघेही भारतीय संघाची दिग्गज खेळाडू होते ,दोघेही भारतीय क्रिकेट संघातील महत्वपूर्ण भाग होते ! सचिन तेंडुलकर जर लवकर आऊट झाला, तर राहुल द्रविड भारतीय संघाची फलंदाजी जिवंत ठेवायचा.कसोटी पुरता फलंदाज अस वाटायचे पण एकदिवसीय क्रिकेट मध्ये देखील त्याने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.
ख्रिस गेल ऐकदा म्हणाला होता, राहुल द्रविड या जन्मात माझ्या सारखा आक्रमक खेळेलही, पण मी सात जन्मातही राहुल द्रविड इतकं जिद्दीने कधीही खेळू शकणार नाही.Rahul Dravid
एकदिवसीय क्रिकेट मध्ये त्याने ३१८ डावात, ४० च्या सरासरीने १० ८८९ धावा चोपून काढल्यात, त्यात त्याचे १२ शतके आणि ८३ अर्धशतके आहेत!राहुल द्रविड ने यष्टीरक्षकाची भुमिका देखील जबरदस्त बजावलीय, त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात यष्टीरक्षक म्हणून ४०६ झेल घेतलेत आणि १४ फलंदाजांना यष्टीचीत केलेत! विरेंद्र सेहवाग जेंव्हा श्रीलंके सोबत २९३ धावांवर बाद झाला, तेंव्हा राहुल भर मैदानात प्रचंड भावनिक झाला होता, त्याच्या डोळ्यातील अश्रु दाटले होते.
पहिल्याच दिवशी सेहवाग ने २५० चेंडूत २८५ धावांची प्रचंड आक्रमक खेळी केली होती, पण तो खूपच थकला होता.शेवटची पाच षटके शिल्लक होती, राहुल द्रविड सेहवाग जवळ गेला आणि म्हणाला, “आपल्याकडे अजुन उद्याचा दिवस शिल्लक आहे, तु उद्या ब्रायन लारा चा नाबाद ४०० धावांचा विश्वविक्रम मोडून टाक, तु आता खूपच थकला आहेस, तू निवांत घे, अन्यथा तू आऊट होशील.
सेहवाग गमतीने म्हणाला,अरे मी आजच दोन चार षटकार ठोकून त्रिशतक पूर्ण करेन. सेहवाग जोखीम घेऊन बाद होईल, या भीतीने राहुल द्रविड ने नंतर सेहवागला फलंदाजीला येऊच दिलं नाही! तो पाच चेंडू खेळायचा आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव घ्यायचा, आणि स्ट्राईक आपल्याकडेच ठेवायचा, द्रवीडने पुढचे पाच षटक आरामात खेळून काढले!दुसर्या दिवशी सेहवागने पहिल्याच षटकात दोन दमदार चौकार मारले, आणि दुर्देवाने पुढच्याच चेंडूवर तो मुरलीधरनला मारण्याच्या प्रयत्नात त्याच्याकडेच झेल देऊन बाद झाला! आणि सेहवागचं तिसरं त्रिशतक फक्त सात धावांनी हुकलं, जड अंतःकरणाने त्याने मैदानातून माघार घेतली . द्रविडला वाटलं की आपल्यामुळेच सेहवागचं त्रिशतक हुकलं, मी जर त्याला काल रोखलं नसतं तर त्याने कालच त्रिशतक पूर्ण केलं असतं.
ब्रायन लारा एकदा मिडीया समोर बोलताना म्हणाला होता, माझ्या आयुष्यात मला जर कोणाची बॅटींग पहायला आवडेल, तर तो राहुल द्रविड आणि जॅक कॅलिस आहेराहुल द्रविड हा कसोटी क्रिकेट मधील महासागर आहे, त्याने कसोटी क्रिकेटला सुवर्णयूग बनवलं.
पुढे राहुल द्रविड हा भारतीय टीमचा कोच झाला 2021 ते 2024 या काळात भारतीय क्रिकेट टिमचा कोच होता.2024 ला भारतीय संघ T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर राहुल द्रविडला BCCI ने 5 कोटी देऊ केले तर हा म्हणाला बाकीचे तीन कोच जितकं मानधन घेत आहेत, तेवढंच मी घेईन कारण T20 वर्ल्डकप जिंकण्यात आम्हा सगळ्यांचं समान सहकार्य आहे. असं म्हणत त्याने फक्त अडीच कोटी घेतले . Rahul Dravid
असं वागण्याची राहुल द्रविड ची ही पहिली वेळ नाही या पूर्वी अंडर 19 वर्ल्डकपच्या वेळीही त्याने बोनस रक्कम नाकारली होती. मागे बंगलोरच्या विद्यापीठाने त्याला मानद डॉक्टरेट दिली होती तेव्हा राहुलने ती नम्रपणे नाकारताना म्हटलं होतं मला माहितीय किती कष्ट घेतल्यानंतर ही पदवी मिळते ते. मी कधी वाटलं तर संशोधन करून पदवी मिळवेन पण आयती पदवी नको .काय ते उच्च विचार चेहर्यावर सतत स्मित हास्य ठेवणारा राहुल शरद द्रविड लिहायला तर खुप आहे कधी न संपणर सुवर्णयूग. Rahul Dravid