Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार योजनेची संपुर्ण माहिती यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहीती पाहुया.
नमस्कार आज आपण संजय गांधी निराधार योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी लागणारी पात्रता काय आहे,कागदपत्रे कोणकोणती लागतील यामध्ये फायदे काय असणार आहेत ही सर्व माहिती जाणून घेऊया. तसेच या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा हे सुद्धा पाहणार आहोत.
या योजनेमध्ये 65 बर्षाखालील निराधार पुरुष व महिला आहेत.अनाथ मुले आहेत अपंगातील सर्व प्रवर्ग आहेत, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतः चा चरितार्थ चालवु न शकणारे पुरुष व महिला हे दोन्ही यामध्ये सहभागी आहेत.
तसेच ज्या निराधार किंवा विधवा महिला असतील म्हणजे घटस्फोट झालेल्या पण पोटगी न मिळालेल्या अशा महिला सुद्धा या योजनेमध्ये सहभागी आहेत. या योजनेत अत्याचारीत व वैश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतियपंशी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहित स्त्रिया,तसेच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी या सर्वांना या योजनेमध्ये लाभ मिळतो. तसेच या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील असलेल्या कुटुंबाच्या यादीत नाव असणे गरजेचे आहे.
जर दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नसेल तर 21,000 रुपयापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदाराकडुन घेणे आवश्यक आहे. आता या योजनेचे फायदे किंवा लाभ काय आहेत बघा. या योजनेमध्ये कुटुंबातील एक लाभार्थी पात्र असल्यास 1000 रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य देण्यात येते आणि जर कुटुंबातील लाभार्थी एकापेक्षा जास्त असतील तर 1200 रुपये प्रति महिना या योजनेमध्ये आर्थिक सहाय्य दिले जाते. हे या योजनेचा फायदा/ लाभ आहे. या योजनेद्वारे तूम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता .
● तर संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते बघा.Sanjay Gandhi Niradhar Yojana
तर बघा मित्रांनो आपण संजय गांधी निराधार ऑनलाईन अर्ज करण्यासाठी aaplesarkar. maha online. gov. in या वेबसाईटवर जायच आहे या वेबसाइटवर आल्यावर हे सर्च करायच आहे हे सर्च केल्यावर तुम्हालातुम्हाला समोर एक पर्याय दिसेल तो म्हणजे नवीन युजर येथे नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायच आहे नंतर समोर नोंदणी करावी.
नोंदणी करताना ईथे ज्या व्यक्तीला लाभ घ्यायचा आहे त्याच व्यक्तीची समोर पर्याय नंबर वन वर क्लिक करायच आहे आणि समोर नोंदणी करायची. जिल्हा निवडायचा नंतर आपण नंबर टाकायचा OTP घ्यावी . नंतर आपल युजर नेम टाकून नाव तयार करायच ही सर्व माहिती भरून घ्यावी नंतर log in करण्यासाठी होम पेजवर जायच आहे जिथे तुम्हाला होम पेज आणि पासवर्ड बनवला असेल तो तुम्हाला समोर लाॅग इन करायच आहे. यामध्ये जो व्यक्ती लाभ घेणार आहे त्या व्यक्तीचच येथे अकाउंट उघडुन लाॅग इन करायच आहे. ही गोष्ट लक्षात असुद्या पुढे तुम्ही जो युजर नेम व पासवर्ड बनवला आहे तो तुम्हाला टाकायचा आहे.
आणि ते टाकल्यावर पुढे कॅप्च्या टाकायच आहे ते टाकून झाल्यावर समोर जो सिक्युरिटी कोड दिलेला असेल तो सिक्युरीटी कोड आहे तसा येथे टाकून द्यायचा आहे त्यानंतर समोर जिल्हा निवडायचा आहे आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा नंतर मग लागॅ इन बटनावर क्लिक करायच या लागॅ इन या बटनावर क्लिक करताना मराठी किंवा इंग्रजी ही भाषा तुम्ही करु शकता त्यापुढे डाव्या बाजूला स्क्रोल करायच आहे नंतर स्क्रोल केल्यावर समोर विभाग दिसेल आणि तो विभाग कोणता असते बघा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा विभाग आहे.
पुढे सामाजिक न्याय व विशेष विभाग यावर क्लिक करायच आहे ईथे क्लिक केल्यावर विशेष सहाय्य योजना या पर्यायावर निळ्या रंगाने टिक करायच आहे ते टिक करून झाल्यावर पुढे जा या पर्यायावर क्लिक करायच आहे. त्यानंतर समोर च्या पेजवर जाऊन विशेष सहाय्य योजना हाच पर्याय निवडायचा आहे. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला येथे आवश्यक कागदपत्रे असतात ते दिसतील ज्यामध्ये तुम्हाला ओळखीच्या पुराव्यांमध्ये फोटो देता येतो किंवा तुमच पा किंवा तुमच पारपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड देता येते. या पेजवर दिसणाऱ्या पर्यायांपैकी यातील एक तुम्हाला ओळखीच्या पुरावा म्हणून देता येते.
यामध्ये नऊ पर्याय असतात त्यापैकी तुम्हाला कोणतही एक ओळखीचा पुरावा म्हणून देता येतो. नंतर पत्याचा पुरावा म्हणून रहिवासी दाखला हा द्यायचा आहे. तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा दुसर कोणतही मंडळ येथे निरिक्षक येथे यांनी दिलेलाच रहिवासी दाखला असण गरजेच आहे किंवा कोणत्याही न्यायाती मध्ये दिलेला दाखला असला तरी चालते. येथे दस्तऐवज देणे आवश्यक आहे ज्यामध्ये येथे विधवा महिलांचे प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता. तसेच प्रमाणपत्र असेल, घटस्फोटित महिलांच प्रमाणपत्र असल किंवा अपंग असतील तर त्याच सुद्धा प्रमाणपत्र येथे देता येते निराधार असेल तर निराधाराच प्रमाणपत्र येथे तुम्हाला देता येते ज्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभार्थी आहोत त्याच प्रमाणपत्र तुमच्याकडे असण खूप महत्त्वाचे आहे.
तर हे प्रमाणपत्र तुम्ही येथे देऊ शकता त्यानंतर तुम्ही येथील सर्व माहिती वाचुन यामध्ये वयाचा पुरावा द्यायचा आहे त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला असेल तर या चार पैकी तुम्हाला एक कागदपत्रे यामध्ये अपलोड करावे लागतात. त्यामधील ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिकाचा जन्मनोंद किंवा वहिनोंद यापैकी काहीही चालते. यामध्ये उत्पनाचा पुरावा महत्त्वाचा आहे त्यामध्ये तहसीलदाराचा किंवा उपविभाग अधिकारी जो कोणी असेल त्याचा सुद्धा दाखला येथे देऊ शकता . त्यानंतर जात यामध्ये तुम्ही कोणत्या कास्ट मध्ये असाल त्याचा दाखला द्यायचा आहे ओपन कास्टवाले हे सोडून द्यावे.
त्यानंतर येथे कायद्याशीर दस्तऐवज असतील ते तुम्हांला देणे गरजेचे आहे,रहिवासी दाखला देण गरजेच आहे पुढे अर्जाची जी प्रत आहे म्हणजे अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्यास तो पुरावअसल्यास तो पुरावा म्हणून द्यायचा आहे. 30 दिवसामध्ये हे प्रमाणपत्र भेटते. या योजनेला श्रावणबाळ योजना असेही म्हणतात. पुढे विशेष सहाय्य योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील तपशील द्यायचा असतो. होय किंवा नाही म्हणून तपशील द्यायचा. असेल तर होय किंवा नसेल तर नाही असे बटणावर क्लिक करून पुढे जायच आहे पुढे गेल्यानंतर सर्वात पहिले आधार कार्ड नंबर येथे टाकून घ्यायचा आहे.
त्यानंतर OTP घेऊन तो OTP टाकायचा आहे. पुढे संबोधन निवडायच म्हणजे जे काही श्री,श्रीमती जे काही असेल ते नंतर पुर्ण नाव आपोआप येईल. वडिलांचा संबंध श्री असतो म्हणून श्री निवडायच वडिलांचे नाव टाकायचे आहे त्यानंतर पुढे जन्म तारीख तपासून घ्यावी बरोबर आहे का ते नंतर भ्रमणध्वनी नंबर म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे. लिंगा मध्ये स्त्री पुरुष जे असेल ते सिलेक्ट करायच. ईमेल पत्ता हा आपोआप येतो पुढे व्यवसाय सिलेक्ट करायच आहे . ईमेल आयडी नसेल तर ईमेल पत्ता सुद्धा येथे टाकता येते आपला व्यवसाय जो असेल तो व्यवसाय टाकायचा आहे जसे शेतकरी, मजुरी, शेतमजुरी, शिक्षक, विद्यार्थी जे काही असाल ते येथे सिलेक्ट करावे. त्यानंतर निवासाच्या अर्जदाराचा तपशील द्यायचा आहे.
म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जे पत्ता आहे तो ईथे द्यायचा असतो. सोबत पिन कोड सुद्धा द्यायचा पुढे क्षेत्र निवडायच आहे आपण शहरी भागातील आहोत की ग्रामीण भागातील आहोत ते निवडून उपविभागी निवडु शकतो. हे निवडल्या नंतर समोर जायच आहे समोर योजनेचा संबंधित तपशील येथे द्यायचा असतो. हा योजनेचा संबंधित तपशील आहे तो येथे प्रवर्ग द्यायचा आहे म्हणजे तुम्ही विकलांग असाल, महिला असाल किंवा अनाथ असाल तृतीयपंति असाल किंवा आत्महत्या बळी कुटुंबाचे सदस्य असाल तर येथे तुम्ही निवडायच आहे. नंतर महाराष्ट्रात रहिवाशीपासी किती वर्षापासून राहता ते सर्व येथे टाकायच आहे.
प्रत्येक वेळी सिलेक्ट करत असताना हे लक्षात ठेवायच आहे खालील जी माहिती आहे ती बदलायची आहे. समजा तुम्ही विकलांगला सिलेक्ट केल 15 वर्षापासून राहते अस टाकल कुटुंबातील सदस्याची संख्या लिहायची वार्षिक उत्पन्न किती असेल ते लिहायचे आहे आणि तसेच वार्षिक उत्पन्न हे 21 हजारच्या आतल असणे गरजेचे आहे. जास्त असेल तर ते जमणार नाही कमीच असायला पाहिजे 21 हजारच्या मध्येच. जे जात प्रवर्ग असेल ते निवडायच आहे. इंग्लिश करून जात प्रवर्ग निवडता येतो.
त्यानंतर विकलांग असल्यावर टक्केवारी टाकायची आहे विकलांगाचा काय प्रकार आहे ते द्यायचा आहे नंतर बॅकेचे खात जे आहे ते खात द्यायच आहे व बॅंकेच्या तपशील मध्ये सगळी माहिती द्यायची ज्यामध्ये बॅक खाते क्रमांक असेल खातरजमा बॅंकेचे नाव किंवा शाखेचे नाव असेल बॅंकेचा आय एस एस सी नंबर असेल ते सुद्धा येथे द्यावा लागतो. आय एस सी कोड, बॅंकेचा पत्ता हे पण येथे टाकायच आहे. आणि ही सगळी माहिती झाल्यावर तुमचा कराराचा तपशील म्हणजे अर्ज मंजूर करण्यासाठी पाठवायचा असतो.
तर मला मंजूर आहे या बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज तुम्हाला जतन करायच आहे. अर्ज जतन झाल्यानंतर तुमचा अर्ज सेव होतो. अर्ज सेव झाल्यावर कागदपत्रे अपलोड करायची असतात. तर कागदपत्रे कशी अपलोड करायची असतात बघा आपले सरकार या पोर्टलवरती भरपूर वेळा व्हिडिओ पाहतो ज्यामध्ये इनकम सर्टिफिकेट चा व्हिडिओ असेल किंवा डोमासाईलचा व्हिडिओ असेल अगदी त्याप्रकारचे कागदपत्रे,साईज वगैरे अपलोड करायची आहे आणि हा अर्ज तुम्ही सबमिट करायचा आहे.
सबमिट केल्यावर 33 रुपयांची पेमेंट करायची असते. पेमेंट झाल्यावर हा अर्ज 30 दिवसासाठी तहसील कार्यालयात मंजुरीसाठी जातो. येथे काही अडचण येत असेल तर तुम्ही महा ई सेवा केंद्र किंवा आपल्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्र, सेतु सेवा केंद्र यामध्ये जाऊन तुम्ही हा अर्जअर्ज करू शकता जर तुम्हाला येथे काही ऑनलाईन अडचण येत असेल तर तुम्ही तुमचा ऑफलाईन अर्ज घेऊन डायरेक्ट तहसील कार्यालयात जाऊ शकता. 30 दिवसामध्ये अर्ज मंजूर नाही झाला तर तुमचे कागदपत्रे घेऊन तुम्ही डायरेक्ट तहसीलांना भेटावे तहसील हवालदार ऑफिसमध्ये जाऊन हा अर्ज तुम्हाला मंजूर करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण संजय गांधी निराधार योजना हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ती सर्व माहिती बघीतली आहे.