Satara district information
Satara district information महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे अशा सातारा जिल्ह्याबद्दल माहिती थोडक्यात पाहुया.
महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध जिल्ह्या पैकी एक जिल्हा म्हणून सातारा हे ऐतिहासिक महत्त्व आणि प्राचीन किल्ले, मंदिरे आणि संग्रहालये आहेत उद्याने/अभयारण्य , धबधबे , छञपत शिवाजी महाराजांचे गड किल्ले, जलविद्युत प्रकल्प, थंड हवेचे ठिकाण, धरणे या तसा खुप मोठा ऐतिहासिक वारसा आहे .तेव्हाच्या कालावधीत छत्रपती शिवजी महाराज निवास करत आसलेले ठिकाण व पांडवांचे त्यांच्या वनवासात विश्रांतीचे ठिकाण होते. सातारा जिल्ह्यात भेट देताना आपल्याला ऐतिहासिक वारसा तर पाहायला मिळणार आहे पण सोबतच निसर्ग रम्य वातावरण छञपतीचे गड किल्ले आता तिथे साताऱ्यात निवास करत आसलेले त्यांचे वंशज छञपती उदयनराजे भोसले व अन्य खुप मोठा आहे सातारा पुढे थोडक्यात पाहुया.
● सातारा जिल्हा माहिती Satara district information.
सातारा जिल्हा हा पुणे विभाग म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे तस संपुर्ण पश्चिम महाराष्ट्र निसर्ग रम्य सह्याद्री ने नटलेले आहे तस बघितल तर संपुर्ण महाराष्ट्र हा प्रसिद्ध आहे आज सातारा ह्या जिल्ह्याबद्दल जाणुन थोडक्यात जाणुन घेऊया.
सातारा जिल्ह्याचे मुख्यालय हे सातारा याच ठिकाणी आहे.महाराष्ट्र राज्या मध्ये सातारा या जिल्ह्याचे नेमके ठिकाण, सातारा या जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्हयाच्या सिमा लागलेल्या आहेत. ते जिल्हे कोणकोणते आहेत ते किती आहेत किंवा या सातारा जिल्ह्याला इतर कोणकोणत्या राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत ते राज्य कोणते किती सिमा लागलेल्या आहेत सर्व माहीत असणे गरजेचे आहे.ही माहिती आपल्याला आसायला हवी सातारा या जिल्ह्याला ५ जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत तर ते ५ जिल्हे कोणकोणते आहेत ते माहीत असणे सुद्धा गरजेचे आहे . तर बघा रत्नागिरी,रायगड,सोलापुर,पुणे, आणि सांगली या ५ जिल्ह्याच्या सिमा सातारा या जिल्ह्याला लागलेल्या आहेत.हे तुम्ही लक्षात असुद्या.
तसेच या जिल्ह्याला इतर कोणत्याही राज्याच्या सीमा लागलेल्या नाहीत. नंतर सातारा या जिल्ह्याचे क्षेत्रफळ बघुया. महाराष्ट्रतल्या आसो किंवा इतर पेपरमध्य वारंवार हा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे क्षेत्रफळ,एकुण लोकसंख्या, पुरुष महिला प्रमाण ,एकुण साक्षरता या सर्व गोष्टी माहित असायला पाहिजेत.
तर पहिल्यांदा बघुया सातारा या जिल्ह्याचे क्षेत्रफळ,तर सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे १०,४८४ चौ. कि. मी. एवढे आहे. एकुण लोकसंख्या ही ३०,०३,९२२ ही सातारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आहे. तर या सातारा जिल्ह्यामध्ये पुरुष व महिला प्रमाण म्हणजेच दर हजार पुरुषांमागे एकुण किती महिला आहेत किंवा महिलेंच एकुण प्रमाण किती आहे तर या सातारा जिल्ह्यामध्ये दर १००० पुरुषांमागे ९८६ या महिला आहेत. त्याचबरोबर या सातारा जिल्ह्याची एकूण साक्षरता ही ८४.२०% आहे.
नंतर बघा या सातारा जिल्ह्यामध्ये एकुण किती तालुके आहेत आणि ते कोणकोणते आहेत, त्या तालुक्याची नावे काय आहेत हे सुद्धा माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर आयोग आपल्याला हा सुद्धा प्रश्न विचारतो कीएखादा जिल्ह्या दिलेला असता आणि त्या जिल्ह्याच्या उत्तर ते दक्षिण तालुक्याचा क्रम लावा किंवा दक्षिण ते उत्तर, पूर्व ते पश्चिम किंवा पश्चिम ते पूर्व तालुक्याचा क्रम हा प्रश्न सुद्धा आयोगाने विचारतो. त्यासाठी आयोग खूप खोलवर जाऊन प्रश्न विचारतो, त्यासाठी तुम्हाला हे सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे.
सातारा जिल्हा छञपती जिल्हा म्हणूनही ओळखला जातो । सप्तर्षिंपैकी एक वैदिक ऋषि व ब्रम्हदेवांचे मानसपुत्र महर्षि भृगु ह्यांचे तपःस्थान व समाधी मंदिर साताऱ्यात आहे । श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचा सज्जनगड , श्री गगनगिरी महाराज ह्यांचे जन्मस्थान पाटण हे देखील साताऱ्यात आहे ।
● आता सातारा या जिल्ह्यातील तालुके बघा.
या जिल्ह्यामध्ये एकुण ११ तालुके आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत. सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण, कोरेगाव, पाटण, खंडाळा, जावळी (मेढा), माण(दहिवडी), खटाव, (वडूज). ही ११ तालुके आपण लक्षात ठेवायला पाहिजेत.
● सातारा या जिल्ह्यामधून काही नदया वाहतात ते कोणकोणत्या आहेत बघा.
कृष्णा, कोयना, वेण्णा, नीरा, तारळई, कुंडली, उरमोडी, माणगंगा, वांग, मांड या सगळ्या ज्या नदया आहेत त्या सातारा या जिल्ह्यातून वाहतात. त्याचबरोबर या सातारा जिल्ह्यामधून काही नद्यांचा संगम होतो, त्या कोणकोणत्या नद्या आहेत बघा या सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा व वेण्णा नदीचा संगम होतो तर कुठे होतो तर माहुली या ठिकाणी कृष्णा व वेण्णा नदीचा संगम होतो. त्याचबरोबर कृष्णा व कोयना नदीचा संगम कराड या ठिकाणी होतो.
● सातारा जिल्ह्यात तलाव .
कोणकोणते आहेत ते पाहू. कण्हेर,वेण्णा, नेर, कास, येरळवाडी, कुरवली,शिटवसागर, तांबवे, दरुज, म्हसवड,पिंगळी, धोम, रानंद ही सगळी जी तलाव आहेत ते सातारा या जिल्ह्यातील आहेत ते लक्षात असुद्या, त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात खनिज संपत्ती सुद्धा आढळते.
● सातार या जिल्ह्यातील खनिज संपत्ती.
काही प्रमाणात या जिल्ह्यामध्ये बाॅक्साइटच प्रमाण आहे आणि बाॅक्साइटचे साठे आहेत ते काही प्रमाणात या जिल्ह्यामध्ये आढळतात. या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात शेतकी उत्पादने घेतली जातात ते सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. तर या सातारा जिल्ह्यामध्ये कोणती प्रमुख शेतकी उत्पादने सातारा या जिल्ह्यामध्ये घेतली जातात.
● सातारा जिल्ह्यातील धरणे
शिवाजी सागर, धोम खोडशी, कण्हेर.
शिवाजी सागर हे धरण कोयना नदीवर आहे. त्याचबरोबर धोम, खोडशी हे धरण कृष्णा नदीवर आहे आणि कण्हेर धरण हे वेण्णा नदीवर आहे. नंतर या ठिकाणी काही शिखरे सुद्धा आहेत बघा.
प्रतापगड, महाबळेश्वर, कुंभार्ली हे जे महत्त्वाचे शिखर आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. आता आपण सातारा जिल्ह्यामधील काही किल्ले आहेत ते कोणते ते पाहुत.
● सातारा जिल्ह्यातील किल्ले.
अजिंक्यतारा, पांडवगड, सज्जनगड, वैराटगड, वर्धनगड, कमळगड, प्रतापगड ही सर्व किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये आहेत.
● सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण.
महाबळेश्वर, पाचगणी येथे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यातील काही धबधबे आहेत ते केळघर, लिंगमळा, भिलर, मंदाकिनी, धोबी, निडल, पाँइंट, ठोसेघर. या सातारा जिल्ह्यामध्ये काही उदयान अभयारण्य आहेत ते पाहू.
● सातारा जिल्ह्यातील उदयान/ अभयारण्य.
चांदोली किंवा सह्याद्री व्याघ्र उदयान हे जे उदयान आहे चांदोली ते ३ जिल्ह्यामध्ये आहे. (सातारा,सांगली, कोल्हापूर) त्याचबरोबर कोयना अभयारण्य हे सुद्धा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. नंतर बघा सातारा जिल्ह्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प आहे आणि हा कोयना जलविद्युत प्रकल्प कोयना नदीवरच आहे, त्याचबरोबर कण्हेरी किंवा कान्हेर हा जो जलविद्युत प्रकल्प आहे ते वेण्णा नदीवर आहे तसेच धोम हा सुद्धा जलविद्युत प्रकल्प याच नदीवर आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कोयना, कण्हेरी किंवा कान्हेर आणि धोम हे तीन जलविद्युत प्रकल्प आहेत.
● सातारा जिल्ह्याविषयी काही विशेष माहिती बघा.Satara district information.
सज्जनगड: या ठिकाणी समर्थ रामदास स्वामीची समाधी आहे. प्रतापगड, अजिंक्यतारा,पांडवगड, मकरंदगड आणि इतरही किल्ले आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यामध्ये शिखर शिंगणापूर नावाचे मंदिर आहे या ठिकाणी शंभू महादेवाचे मंदीर आहे. तसेच कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथून होतो.
महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ही सातारा जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली होती. हा खुप महत्त्वाचा मुद्दा आहे हे लक्षात असुद्या तसेच सातारा येथील रयत शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रात स्पृहणीय यश संपादन करून राज्यात मोठा लौकिक प्राप्त केला आहे. सातारा जिल्ह्यात लोणंद व परिसरात कांदा व लसूण यांची पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारच्या स्थापना केली होती. या जिल्ह्यात महाबळेश्वर येथे ‘मधुमक्षिका पालन केंद्र’ आहे. औंध येथे श्री भवानी केंद्र सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. राज्यात कृत्रिम पावसाचा पहिला यशस्वी प्रयोग वडूज या तालुक्यात करण्यात आलेला होता.
महाराष्ट्र राज्यातील हिरवा हृदय म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे , महाराष्ट्राच्या पश्चिम प्रदेश हा सातारा जिल्ह्य वसलेला आहे , आपल्या साताऱ्यात ला खुप मोठे ऐतिहासिक महत्त्व, निसर्गाच्या सौंदर्याने आणि समृद्ध वेढलेला आसा जिल्हा आहे आणि संपुर्ण भारतात आणि महाराष्ट्र राज्यात खुप प्रसिद्ध आहे. इतिहास त मराठा साम्राज्य अग्रेसर होते तेव्हा सातारा जिल्हा हा या साम्राज्याचे केंद्र होते आसे म्हणटले जाते.
छञपती शिवाजी महाराजांच्या काळात साताऱ्याला एक विशेष महत्त्व होते छञपती शिवाजी महाराजा नंतर, त्यांचे वंशज होते त्यांच साताऱ्यात राज्य होत सातारा हा काही कालावधी साठी मराठा साम्राज्याची राजधानी होता.आणि सातार जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले या जिल्ह्यातीव अनेक ऐतिहासिक किल्ल्याचे महत्वपूर्ण योगदान आहे, आता पण सातारा जिल्ह्यात छञपती शिवाजी महाराजांचे वंशज राहतात.
सातारा जिल्ह्या बद्दल ऐतिहासिक जुन्या अशा वारसा आणि नैसर्गिक खनिज संपत्ती मध्ये तलाव, धबधबे, पक्षी उदयाने/अभयारण्य आणि सातारा जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण अशा पर्यटन स्थळांचा समावेश आहे. तुम्ही भेट देऊन संपुर्ण माहिती पाहु शकता . लोकप्रिय अशा सातारा जिल्ह्यातील पर्यटन व अन्य ऐतिहासिक माहिती छञपतीचे शिवाजी महाराज यांचे गड्ड किले आहेत ,खुप तलाव आहेत, निसर्ग रम्य आस ठिकाण म्हणजेच सातारा जिल्हा आहे. ऐतिहासिक आसा वारसा लाभलेल्या सातरा जिल्ह्यातील पर्यटन, ईतिहासाची साक्ष देणारे गड किल्ले आणि प्रसिद्ध ठिकाण महाबळेश्वर आणखी काही सविस्तर माहिती आपण पुढील लेखात पाहणार आहोत.