Soyabean Cotton Subsidy E-KYC
Soyabean Cotton Subsidy E-KYC महाराष्ट्र शासन सोयाबीन व कापुस पिकासाठी अनुदान देत आहे लाभ घेण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे जाणुन घ्या सविस्तर माहीती.
महाराष्ट्र राज्य शासन हे शेतकरी हिताचे आहे नेहमीच शेतकऱ्याच्य हिताचे निर्णय घेत आसते जेणेकरून त्यांना शेतीसाठी आर्थिक मदत होईल या रितीने सरकार नेहमीच विविध योजना राबवत असते त्या योजने अंतर्गत अनुदान रक्कम देण्यात येते ते शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरते प्रत्येक शेती उपयोगी वस्तु साठी अनुदान आहे महा डि बी टी MahaDBT अंतर्गत अर्ज करु शकता आत्ताच काही दिवसा आधीच महाराष्ट्र राज्य शासनाने 2023 मध्ये पिक पेरा नोंदवलेल्या शेतकरी बांधवासाठी कापूस व सोयाबीन अनुदान देण्याची घोषणा केली आहे अनुदान लाभ घेण्यासाठी केवायसी करणे गरजेच आहे त्याबद्दल ची सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.
शासनाच्या विविध योजना आपल्यापर्यंत पोहचविण्यात याव्या यासाठी आमच्या वेबसाईटवर नेहमी शासनामार्फत चालवल्या जाणार्या विविध योजना माहिती अनुदान योजना या सारखी महत्वपूर्ण माहिती पाहत आसतो आज आपण कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार्या अनुदाना संदर्भात ई- के वायसी करणे या संबधीत माहितीपूर्ण पाहणार आहोत.
२०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. मागील वर्ष नैसर्गिक असमतोला मुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाव पडल्यामुळे नुकसान झाले होते त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे त्यानुसार लवकरच शेतकर्यांच्या खात्यात अनुदान रक्कम जमा होणार आहे कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले आहे २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा ई-शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. हे अनुदान ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०२३ मध्ये ई-पिक पाहणी केलेल्या शेतकर्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार अशी अट होती सरसकट शेतकर्यांना अनुदान मिळाव यासाठी ही जाचक अट रद्द करण्यात आली आणि या अनुदनाचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना केवायसी करने गरजेच आहे तर केवायसी कशी करायची याबद्दल सविस्तर माहीती पाहुया.
२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत विशेष अनुदान वितरणाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर हे अनुदान डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यातील एकूण सुमारे ९६ लाख शेतकरी खातेधारक या अनुदान योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत ,आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया म्हणजे ई-के वायसी पुर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येणार आहे , तसेच ही अनुदान रक्कम टप्प्याटप्प्याने उर्वरित पाञ लाभार्थी शेतकरी बांधवांना देखील लाभ दिला जाईल.
२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान अर्थ साह्य मिळविण्यासाठी शेतकरी खातेदार याना KYC करणे आवश्यक आहे. राज्यातील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना ई-पीक पाहणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आसल्यास त्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर ५,००० रुपये ( २ हेक्टर पर्यंत मर्यादेत) अर्थिक सहाय्य सरकार देणार आहे सदर महाराष्ट्र राज्य सरकार कडुन मिळणारे अर्थ सहाय्य शेतकरी खातेदारांच्या आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे यापैकी ९६ लाख खातेदारा पैकी ६८ लाख खातेधारक यांनी आपली आधार संमती दिली आहे या पैकी शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत यांची KYC करण्याची आवश्यकता नाही .
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी या व्यतिरिक्त २१.३८ लाख खातेधारक आधार KYC करणे आवश्यक आहे या पैकी काही खातेधारकानी केवायसी पुर्ण केलेली आहे उर्वरित खातेधारक यांनी कापुस सोयाबीन अनुदान घेण्यासाठी केवायसी करणे गरजेच आहे महाराष्ट्र राज्य शासनाने केवायसी करण्यासाठी शेतकर्यासाठी एक वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे महाराष्ट्र सरकारने केवायसी करण्यासाठी दिलेली वेबसाईट scagridbt.mahait.org आहे या शासनाने दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन kyc करु शकता .
• कापुस व सोयाबीन अनुदानासाठी ई-के वायसी पुढील प्रमाणे करु शकता.Soybean Cotton Subsidy KYC
ज्या शेतकऱ्यांचे केवायस करायचे आहे त्या शेतकर्यांची यादी आपल्या गावात प्रदर्शित करण्यात आली आहे सदर ज्या शेतकर्याची अनुदान संबधीत केवायसी झालेली नसेल त्यांनी संबधीत कृषी साह्यकाशी संपर्क साधावा कृषी सहायक त्यांच्या लाॅगीन login मध्ये उपलब्ध आसलेल्या सुविधेद्वारे संबधीत शेतकरी खातेधारकाची आधार संलग्न आसलेल्या मोबाईल येणार्या OTP च्या साह्याने केवायसी करुन घेतील.
तसेच स्वता शेतकरी सुद्धा आपल्या मोबाईल च्या साह्याने पोर्टलवर जाऊन ओटीपी च्या माध्यमातून किंवा Biometric माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात CSC जाऊन सुद्धा E-KYC करता येते या करी अधिकृत पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement status यावर क्लिक केल्यावर शेतकर्यांने आपला आधार क्रमाांक टाकावा नंतर मोबाईल वर ओटीपी किंवा CSC केंद्रातील Biometric मशीन च्या साह्याने केवायसी पुर्ण करु शकता.
कोणत्याही मध्यस्थांच्या हसतक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थयाांच्या आधार-सांलग्न बँक खात्या मध्ये पोहोचावा, याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-के वायसी प्रक्रिया सुरू के ली आहे. आपली ई-के वायसी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानांतरच शेतकरी एकवेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-के वायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.पहिल्या वेळी लाॅगीन करतानाच ई-के वायसी प्रक्रिया पूणि केली जाईल.
• स्वतः ई-के वायसी पुर्ण करण्याची प्रक्रिया :
- सर्व प्रथम गूगल वर जाऊन https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.
- Disbursement Status’ वितरण स्थितीत यावर क्लिक करा.
- Enter Aadhaar Number’ या रकान्यात आपल्या आधार क्रमाांक टाईप करा.
- captcha रकान्यात अक्षराांची नोंद करा.
पुढे दोन पर्याय दिलेले आसतील ई-के वायसी करण्यासाठी त्यापैकी एक पर्याय निवडा : 1] ओटीपी आधारीत ई-के वायसी. 2] बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी.
1]ओटीपी आधारीत ई-के वायसी : पुढे 1] OTP’ या बटणावर क्लिक करा. 2]. तुमच्या आधार-क्रमांक जोडलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी प्राप्त होईल. 3] . ई-के वायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ओटीपीची नोंद करा. 4] Get Data’ या बटणावर क्लिक करा. 5] तुम्ही नोंद केलेला ओटीपी, मोबाईलवर प्राप्त ओटीपीसोबत जुळल्यास ई-के वायसी प्रक्रिया
यशस्वीरीत पुर्ण होईल.
2] बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी : 1] Biometric’ या बटणावर क्लिक करा. 2] वापरकर्त्यांना यांत्रणेमध्ये स्थापीत के लेल्या उपलब्ध उपकरणाांमधून योग्य पर्यायाचा निवड करावी. 3] योग्य उपकरणाची निवड केल्यास व्यवस्थित काम करू लागेल. 4] Biometric मशीन वर लाईट प्रकाशित होईल. 5] वापरकर्त्यांना या प्रकाशित लाईट आपले बोट ठेवून दाबावे.6] बायोमेट्रिक नोंद घेतली जाईल आणि ती यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचा मेसेज पटलावर दिसुन येईल. 7] Validate UID वर क्लिक करा.8] ई-के वायसी यशस्वीरीत्या पूर्ण होईल.
सर्व प्रथम कापुस सोयाबीन अनुदान लाभ घेण्यासाठी आपल्याला ई – के वायसी करायची आहे करणे आवश्यक आहे सोयाबीन कापुस अनुदान या संदर्भात इतर माहिती हवी आसल्यास महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पेजवर व पोर्टलवर आधिक माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषीमंञी धनंजय मुंडे यांच्या आधिकृत सोशल मीडिया पेजवर किंवा इतर ठिकानी महाराष्ट्र सरकार च्या संबधीत कार्यालयत मिळुन जाईल आपल्या जर ई – के वायस करण्यास अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन के वायस करु शकता.
आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकरी योजना व अन्य अन्य सरकारी महत्वपूर्ण योजनेविषयी माहिती देत आसतो सोयाबीन कापुस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार्या अनुदानापासुन कोणी वंचित राहु नये कारण ई के वायसी केल नसल्यामुळे अनुदान लाभ मिळवण्यास समस्या येऊ शकतात शासनाची विविध माहिती काहीना माहिती नसते त्यामुळे ते मिळणार्या लाभापासुन वंचित राहतात त्यामुले शेतकर्यांना मिळणार्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार्या अनुदानापासुन कोणी वंचित राहु नये म्हणुन ही माहिती प्रदर्शित करत आहोत .
कापुस व सोयाबीन उत्पादक अनुदाना संदर्भात काही समस्यांबद्दल आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयात भेट देऊ शकता आणि सविस्तर माहिती घेऊ शकता मोबाईलचा वापर करुन योग्य ती माहिती शासनाच्या अधिकृत पेजवर सुद्धा उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, यासाठी अशाच सर्व माहिती व योजनाचा लाभ घेण्यासाठी आमच्या संपर्कात राहण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या वाॅट्सअॅप जाॅईन करा आणि नेहमी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्या.
● YouTube