Vijay Sethupathi|विजय सेतुपती यांचा महाराजा चिञपट थोड्यक्यात.

Vijay Sethupathi

Vijay Sethupathi

Vijay Sethupathi महाराजा ” विजय सेतुपती यांची मुख्य भुमिका आसलेल्या या चित्रपटाबद्दल स्टोरी बद्दल थोडक्यात जाणुन घेऊया.

social media सोशल मीडियावर “महाराजा” ह्या विजय सेतुपती च्या चित्रपटाची खुप चर्चा होत होती, महाराजा मुव्ही ची सस्पेन्स स्टोरी आणि त्या चित्रपटातील कॅरेक्टर च्या भावना ह्याची कथा , दिग्दर्शन, प्रत्येक पत्राची अभिनय क्षमता सगळी कशी एकदम भारी आहे. एन. स्वामीनाथन ह्यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट संपल्या नंतर आपल्याला एका वेगळ्याच गोंधळात मध्ये घेऊन जातो.

महाराजा या चित्रपटात विजय सेतुपती ( महाराजा) आणि अनुराग कश्यप (सिलव्हम) दोन्ही एका आदर्श बाबांच्या भुमिकेत आहेत अनुराग कश्यप आणि विजय सेतुपती या दोन कलाकारांनी हा चित्रपट जशी आनोखी कलाकारी दाखवलेली आहे चेहर्‍यावर हास्य नाही एकदम शांत आहेत. या दोघांन कडेही फिल्म इंडस्ट्रीला पाहीजे तसे हॅन्डसम ,आकर्षक चेहरे नाहीत आणि सिक्स पॅक वाली बॉडी नाही,तरिही दोघेजण महाराजा हा पुर्ण सिनेमा करतात.

महाराजा’ मध्ये प्रत्येक मुलीला हा चित्रपट पाहताना त्याच्यामध्ये आपला कदाचीत बाबा दिसला आसेल डोळ्यांतून आणि भावनेतून त्याने ह्या बाबाची भुमिका साकारली आहे. बाप कसा असतो! आपल्या लेकीला हवी ती वस्तु मिळावी,म्हणुन धडपड करणारा तिच्यावरचा अन्याय दुर व्हावा,म्हणुन जीवाचं रान करणारा आत्तापर्यंत जेवढे चित्रपट झालेत,त्यात जास्तीत जास्त चित्रपटात तर आई बद्दल आहेत आहेत. पण या चित्रपटात बाप काय आसतो तो कय करु शकतो याबद्दल आहे.

महाराजा हा सिनेमा बाप कसा असावा,ते सांगतो. लेक म्हणजे बापाची लक्ष्मी असते. तिची अब्रू ही त्याची अब्रू असते. सिनेमात तर तिचं त्याच्याशी रक्ताचं नातंही नाही. तीच त्याच्या जगण्याचं निधान आहे. ती नसेल तर त्याच्या आयुष्याला काही अर्थही नाही. बापाने मुलीसाठी किती कष्ट सोसावे, या चित्रपटात ह्याच्या सीमा या चित्रपटात दिसतात. मुली लाही बापाची खुप काळजी आहे. आपला बाप आपल्यासाठी किती टोकाचं पाऊल उचलू शकतो,याची पुर्ण कल्पना मुलीला असते . आपण त्याची खरी लेक नाही,याची तिला कल्पनाही नाही,तरिही ती तिच्या बाबाला जीव लावून आहे. सिनेमात या सगळ्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोचतात.

संपुर्ण नाव विजय गुरुनाथ सेतुपती Vijay Sethupathi, जो विजय सेतुपती म्हणून ओळखला जातो, हा एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे .16 वर्षांहून अधिक अनुभवासह तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि इतर भारतीय भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता बनला आहे . त्याने एक वेब सिरीज आणि 12 लघुपटांमध्ये पण काम केले आहे.विजय सेतुपती हा भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे सेतुपती यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी त्यांचे बरेच चित्रपट सुपरहिट झाले आहेत.

विजय सेतुपती यांचा 2024 या वर्षांत एक चित्रपट रिलीज झाला आहे. तो म्हणजे ” महाराजा ” एक चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटात एका बाप आणि मुलीची गोष्ट आहे. या चित्रपटात अनुराग कश्यप देखील आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटगृहांमध्ये खळबळ माजवत आहे. अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केलेली होती.”महाराजा” हा चित्रपट विजय सेतुपती च्या प्रसिद्ध चित्रपटा पैकी एक आहे. महाराजा हा चित्रपट त्याची अ‍ॅक्टींग उत्तम कलाकारी च एक उदाहरण आहे.

चित्रपटाची स्टोरी ही एका सामान्य माणुस जो सलुन मध्ये काम करतो आशा माणसाच्या आयुष्यात असाधारण प्रवासावर आधारित आहे. सुरुवातीस असाधारण वाटणारा प्रवास आचानक किती भयंकर वळण घेतो या चित्रपटात स्पष्ट केल आहे ‘महाराजा’ चित्रपट नितिल स्वामीनाथन यांनी दिग्दर्शित केला आहे. त्याने राम मुरली यांच्यासोबत चित्रपटाचे लेखनही केले आहे.

महाराजा चित्रपटातील विजय सेतुपती जे पाञ स्विकारले आहे त्या पात्राचे नाव महाराजा अस आहे. तो महाराजा चिञपटात विजय सेतुपती हा व्यवसायाने हेअर कंटिग सलुन मध्ये काम करतो. चिञपटात तो एका मुलीचा बाप आहे जिच्यावर तो जिवापाड प्रेम करतो. एका रोजी त्याच्या घरात चोरी होते आणि महाराज आपली तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात जातो . घरातून त्याची ‘लक्ष्मी’ चोरीला गेल्याचे तक्रारीत सांगतो व लक्ष्मी काय आहे हे तुम्हाला चित्रपट बघितल्याशिवाय नाही समजणार .तर दुसरीकडे अनुराग कश्यपची एक वेगळीच भुमिका आपल्याला यात पाहायला मिळते.

अनुराग कश्यप आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा माणूस आहे. चिञपटात अस दाखवलय कि तो व्यवसायाने चोर आहे आणि आणि तो इतर पात्रासारखा तो चोर नाही, ज्याला काही प्रमाणिक तत्त्वे आहेत.महाराजा चित्रपटा विषयी थोडक्यात :एक साधा सरळ कटिंग सलुन मध्ये काम करणाऱ्या माणसाची कथा आहे सुरुवातीला अगदी साधी सोपी वाटणारी स्टोरी ही थोड थोड इतक खतरनाक रूप घेते की ते पाहताना अगदी क्षणो क्षणी अंगावर शहारे येतात.. महाराजा Maharaja तुमच मन पुर्ण पणे सस्पेन्स मध्ये टाकतो. साध्या सरळ एक योग्य व्यक्तीच व्यक्तीमत्व उघडपणे मांडून दाखवतो. अगदी सिम्पल सरळ वावरणारा माणुस त्याच साध रुप आणि वेळ प्रसंगी त्याची जिद्द त्याच्या स्वभावात होणारा बद्द्ल.

माणूस कसा खूपच साधा आसतो आणि वेळप्रसंगी तो कसा अत्यंत क्रूर कसा बनू शकतो हे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार. पण हे नक्की काय चाललंय हे चित्रपटाच्या climax पर्यंत कळणार नाही ते मनात डोक्यात फिरत राहणार.. आणि चित्रपटाचा शेवट तुम्हाला एका वेगळ्याच विचारात नेऊन सोडतो. महाराजा हा चित्रपट भारत देशातील 2024 मधील सगळ्यात उत्कृष्ट चित्रपट आहे कोणत्याही पुरस्कार किंवा कौतुक सोहळा, या चित्रपटाच्या टोटल कलेक्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर डिंपेड नाही या सर्वाची काहीच गरज नसणारा आणि त्याहून पलीकडचा गोंधळात टाकणारा हा चित्रपट आहे.

चित्रपटाची सुरुवात होते आणि महाराजा त्याची लक्ष्मी चोरीला गेली म्हणुन पोलीस स्टेश मध्ये तक्रार करायला जातो (लक्ष्मी म्हणजे एक कचऱ्याचा डब्बा आसतो) पोलीस आधी नकार देतात मग नंतर लक्ष्मी ला शोधु अस सांगतात. पण तो पोलीस स्टेशन मध्ये तो दररोज येतो तो कशाच्या तरी शोधात आसतो. खरा ट्विस्ट तर येथ सुरु होतो.

आपल्या मुली सोबत वाईट कृत्य करणाऱ्या माणसाच्या पाठीवर एक खुण म्हणजेच एक निशान आहे असे त्याला मुलीने सांगितल म्हणून महाराजा जेव्हा जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जायचा, त्यावेळी प्रत्येक पोलीसाच्या पाठीवर हात मारून किंवा स्पर्श करून तो निशान तिकडे आहे का याची खातरी महाराजा करत आसतो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत विचार दिग्दर्शक निथीलनने केलेला आहे. आपल्याला या चित्रपट बघताना लक्षात येत.

लक्ष्मी पासुन सुरु झालेला चिञपट एक वेगळच वळण घेत. तो चुकीचा नसतानाही मदत करायला जातो आणि कुठेतरी चुकीचा ठरतो. अनुराग कश्यप ची एक वेगळीच भुमिका आहे. लक्ष्मी शोधत आसताना तो कोणत्या तरी व्यक्ती च्या शोधात आसतो. चोरी तर एक कारण असत शोध होता सुरू आसतो .खर लक्ष्मी च्या शोधात महाराजा त्याच्या मुली सोबत वाईट कृत्य केलेल्या चोराच्या शोधात आसतो. त्या आपराध्यांचा शोध घेतो आणि त्या आपराध्यांना शिक्षा देतो.

महाराजा ‘ चित्रपटात अनुराग कश्यप ला जेव्हा समजत आपली मुलगी आपल्यापासुन कायमची दुरावलीय,ती आपल्याला ओळखतही नाही,या सर्वाचा जिमेदार स्वतः आहे हे समजल्यावर तो पुर्ण आतुन डगमगतो अगदी शारीरिक वेदनां पेक्षाही त्याची ही धडपड त्याला जीवघेणी वाटु लागते .अनुराग कश्यप ने ही धडपड त्याच्या फार मन हेलावून टाकणारी दाखवली आहे. त्याच्यातला बाप आपल्याला हेलावून टाकतो.

शेवट हाच एवढा थरारक आहे वेदना, भावना , प्रेम धडपड या सर्वाच मिश्रण आहे खर हा चित्रपट प्रत्येकाने बघावा.

एक प्रमाणिक माणुस काय करु शकतो नेहमी म्हणतात सामन्य माणसाची प्रचीती बघु नका असच काहीतरी या चिञपटात आहे. सामन्य माणुस जेव्हा एक वेगळी भूमिका घेतो तेव्हा काय करु शकतो. (अनुराग कश्यप) सिलव्हम त्याच्यावर काही स्टोरी आधारित आहे शेवटी तो एक चुक करतो त्याचा शेवट हा एकदम थरारक आणि गोंधळून टाकणार भयंकर आहे .जस जस मुव्ही बघाल तस सर्व समजेल.Vijay Sethupathi

महाराजा हा आपल्या मुलीवर वाईट कृत्य केलेल्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी शोधात आसतो. ही फिल्म सुरवातीला बघताना अनेक प्रश्न सोडून जाईल – अस वाटत पण हे होणं गरजेचं का होतं आणि हीच तर एक चांगल्या सस्पेन्स थ्रिलरची चित्रपटाची खासियत आहे. खर तर या त्यांच्या चित्रपटात महाराजा च्या चेहऱ्यावर हास्य कधीच दिसत नाही आणि चुका अजिबात सहन न करण्याची महाराजा ची सवय या भूमिकेला अधिक खास बनवते आणि चित्रपटाला सुद्धा.

चित्रपटाची एक बाजु म्हणजे, प्रेम,भावना,निरागसपणा प्रमाणिक पणा आणि इतर अनेक गोष्टी खूपच प्रभावशाली आहेत.महाराजा चित्रपटाची स्टोरी ही सामन्य माणसाची आसामान्य गोष्ट आहे आणि ती प्रेक्षकांना आपल्याशी जोडून ठेवते. सुरवातीला तर स्टोरी समजणार नाही सामन्यात या चित्रपटात एका सामान्य माणसाच्या आयुष्यात येणार प्रवास, कठीण काळ, संघर्ष याबद्दल आहे.एक साधा “गैरसमज” सामान्य माणसाच्या आयुष्यात किती गोष्टी घडवून आणु शकतो व त्याच आयुष्य कठीण करतो याचा एकंदर विचार या मुव्ही मध्ये दाखविला आहे.

चित्रपटाची स्टोरी जशी बघत जातो तसा तसा चित्रपट उलघतडत जातो हे या चित्रपटाचे कौशल्य आहे या चित्रपटात विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप ने एकदम आनोखा अभिनय केला आहे.

जर तुम्हाला महाराजा या चित्रपटाचा ट्रेलर पाहायचा असेल तर तुम्ही YouTube वर जाऊन “Maharaja movie ” असे शोधू शकता. पुर्ण चित्रपट नेटफिलिक्स पहायला भेटेल.Vijay Sethupathi Maharaja Movie Story