what is ipo
what is ipo शेअर बाजारातील आयपीओ म्हणजे नेमक काय आहे आयपीओसाठी कसे अप्लाय करायचे त्याचे फायदे काय आहे तोटे काय आहे याबद्दल थोडक्यात पाहूया.
नमस्कार, नेहमी आपण योजना , विविध माहिती यावर लेख लिहित आसतो पण आज आपण आयपीओ बद्दल तुम्हाला माहित नसेल तर पाहणार आहोत जर तुम्ही ट्रेडिंग करत आसाल तर आयपीओ नेमका काय आहे तुम्हाला कळणार ज्यांना कोणाला आयपीओ म्हणजे काय माहित नाही त्यांच्यासाठी आज या बद्दल सुलभ व सोप्या भाषेत समजुन घेणार आहोत.
जेव्हा कधी तुम्ही मोबाईल वर बातमीत बघत असता, तेव्हा तुम्हाला एखाद्या कंपनीने आयपीओ देण्याची घोषणा केली आहे. तर तुम्हाला नेमका आयपीओ म्हणजे काय आहे माहित नसतो तर तुम्हाला आज आपण आयपीओ म्हणजे काय आहे आयपीओ साठी गुंतवणूक कुठे करायची आयपीओ चे फायदे काय आहे आयपीओ चे तोटे काय आहे ही सर्व माहिती आज आपण पाहुया.
IPO म्हणजे नेमक काय आहे तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग (initial public offer) प्रथम काय होत की यात लोकांना शेअर्स ऑफर केले जातात कोणतीही कंपनी बाजारात येते तेव्हा सर्व सामान्य लोकांना त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवण्याची पहिल्यांदा संधी देते तेव्हा त्या कंपनीने IPO आणला अस म्हणतात. एखादी कंपनी जेव्हा त्या कंपनीच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेऊन कंपनी आणखी कशी प्रगती कशी करेल कंपनीच्या इतर शाखा उघडायच असा निर्णय घेईल पण इतर शाखा उघडण्यसाठी आवश्यकता आसते ती भांडवलाची त्या भांडवलासाठी कंपनी बाजारात म्हणजे शेअर्स मार्केट मध्ये IPO आणते आणि लोकांना त्यात गुंतवणूक करण्यासाठी ऑफर केली जाते त्या गुंतवणुकीवर त्यांना कंपनीची भागीदारी मिळते.
एखादी खाजगी कंपनी शेअर बाजारात प्रवेश करुन सामन्याकडुन भांडवल उभा करण्यासाठी सुरवातीला सार्वजनिक ऑफर केली जाते जेव्हा कंपनीला पैशाची गरज असते तेव्हा ती कंपनी शेअर बाजारात सुचीबद्ध करते कंपनीला हे भांडवल निधी फेडण्यासाठी किंवा कंपनीच्या वाढीसाठी वापरला जातो.
आपल्याला प्रश्न पडला असेल की एखादी कंपनी आयपीओ का ऑफर करते ते म्हणजे पैसे कमावण्याचा पद्धत आहे. प्रत्येक कंपनीला भांडवलाची गरज असते, आपल्या कपनीचा विस्तार करणे, त्यांचा व्यवसायात सुधारणा करणे, पायाभूत सुविधा चांगल्या करणे, कर्ज फेडणे इत्यादी काही कारणे असु शकतात.
या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर प्रश्न पडतो कंपनी IPO काढते बॅंकेकडुन कर्ज देखील घेऊ शकते पण बँकेला व्याज द्यावा लागतो भागीदारी नाही विचार केला तर बॅंकेचा व्याज हा 10 ते 13 टक्के आसतो बँक ही देयक झाली कंपनीला नफा होईल किंवा कंपनीला तोटा होईल कोणत्याही परिस्थितीत बँकेला व्याज द्यावाच लागतो म्हणुन त्या ऐवजी काही पर्याय आहे का हे शोधल जात म्हणुन कंपनी सर्व सामान्य लोकांना ऑफर करते आय पी ओ मार्फत की पैसे उचलु शकतात थोडक्यात यालाच आपण initial public offer म्हणतो.
जे लोक कंपनीत आपल्या पैशाची गुंतवणूक करतात त्यांना व्याज नाही द्यावा लागत ते कंपनीत पैसे गुंतवून मालक होतात कंपनीची भागीदारी त्यांना मिळते. भविष्यात कंपनी जेंव्हा नफा कमवेल तेव्हा सर्वसामान्य लोकांचे कंपनीत आसणारे शेअर्स पण वाढणार रक्कम वाढणार अशा पध्दतीत नफा होणार. कंपनीत जो काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात त्या सर्व निर्णयात यांना मतदान करण्याचा अधिकार आसतो कारण ते कंपनीचे देयक नसुन मालक आसतात .जेव्हा कंपनीत चालु वर्षात किंवा भविष्यात चांगला नफा कमवते तेव्हा कंपनी डिव्हिडंड देते.
• IPO ला Apply करण्यासाठी काय करावे.
IPO म्हणजे काय आपण बघितल व यासाठी Apply कसे करावे अप्लाय करण्यासाठी काय प्रकिया आहे ते पाहुया. यात तुम्हाला दोन पर्याय आहेत तुमच्याकडे एखाद्या बॅंकेचे ऑनलाईन अॅक्सेस असेल तर त्यावरून तुम्ही अप्लाय करु शकता बँकेच्या पोर्टलवरच आय पी ओ चा पर्याय दिलेला आसतो त्यावर क्लिक करुन आय पी ओ साठी अप्लाय करु शकता आणि क्रमांक दोनचा पर्याय आहे जर तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असेलच तर ब्रोकरच्या अॅप च्या साह्य़ाने सूद्धा आय पी ओ साठी अप्लाय करु शकता.
जर upstock अॅप Stock market ट्रेडिंग साठी वापरत आसाल तर अॅप मध्ये डिस्कवर मध्ये जा तिथे IPO ऑप्शन ला क्लिक करा क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे सध्या IPO मध्ये आलेली कंपनी दिसेल त्यावर क्लिक करा किती शेअर्स घ्यायच आहे बघा तुम्हाला किती रक्कमेला घ्यायच आहे ती रक्कम टाका आणि सबमिट करा. त्यात शेअर्स ची किंमत कमी किमतीत मागणी करु शकता.
• IPO मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे.
आयपीओ मध्ये गुंतवणूक करणे जेवढ फायद्याच आहे तेवढच धोक्याच पण आहे.
- काही प्रमाणात IPO च्या किंमती लवकर वाढतात त्यामुळे गुंतवणूकदारांन चांगला नफा सूद्धा मिळु शकतो.
- गुंतवणूक करणार्यांना कंपनीचा वाढीत सहभागी होतात कंपनीच्या नफा झाला लाभ मिळू शकत.
- कंपनीत जेंव्हा कधी चांगला नफा कमवते तेव्हा गुंतवणूक करणार्यांना डिव्हिडंड चा लाभ मिळणार.
• IPO मध्ये गुंतवणूक केल्यास होणारे तोटे .
आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम सुद्धा पत्करावी लागते प्रत्येक आयपीयो मध्ये फायदा होणारच असे नाही तोटा सुद्धा होऊ शकतो.
- इतर गुंतवणूकी प्रमाणे आयपीओ मध्ये सूद्धा जोखीम असते कधी किंमती वाढत नाहीत तर कधी किंमती कमी होतात.
- कंपनी आयपीओ भांडवल आहे त्याचा उपयग कर्ज फेडण्यसाठी करु शकते.
जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुक करायच असेल तर तुम्हाला शेअर बाजारातील काही माहित नसेल तर गुंतवणूक जोखीमीची ठरु शकत त्यामुळे विशेषता शेअर बाजारातील ज्ञान आसलेल्या सल्ला घ्या किवा युट्यूब ला Rachana ranade याचे व्हीडिओ पहा शेअर बाजारातील माहीत मिळेल. आधिक information हवी असल्यास युट्यूब योग्य पर्याय आहे यावर सर्व ज्ञान मिळेल योग्य ज्ञान व विश्लेषण आसल्याशिवाय गुंतवणूक करणे धोक्यात आहे अर्धवट ज्ञान सुद्धा जोखीम असते परिपूर्ण ज्ञान घेऊनच बाजारात गुंतवणूक करा.
आयपीओ संदर्भात थोडक्यात माहीत करुन देण्याचा प्रयत्न केला आहे आयपीओ म्हणजे काय आहे .गुंतवणूक कशी करायची, फायदे ,तोटे अशी थोडक्यात माहिती आहे तरि सविस्तर माहितीसाठी सोशल मीडियावर किंवा वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या ही माहीती फक्त तुम्हाला माहित आसावि म्हणून आहे कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक संदर्भात सल्ला नाही.